पर्यावरणवादी व शास्त्रज्ञांना सुचना

अमृतांजन's picture
अमृतांजन in जनातलं, मनातलं
30 Dec 2009 - 7:28 am

कोपनहेगनची परिषद निष्फळ झाल्यामुळे मला राहवले नाही व मी निराश झाले. पृथ्वीवासियांना ग्लोबल वार्मिंगमुळे पडणाऱ्या कडाकाच्या थंडीत थोडीशी वैचारीक ऊब कशी देता येईल ह्याचा मी खूप विचार करता मला पुढील पर्याय दिसले; तेच मी आपणासमोर मांडत आहे.

१. समुद्रात परागकण, बिया, सोडावीत. त्या तरंगतील व ढगांची निर्मीती होतांना त्या ढगात जातील. पावसाबरोबर जमीनीवर पडतील व विनासायास सगळीकडे जंगले वाढतील
२. वरील उपायांबरोबरच खतेही अशाच प्रकारे त्या बियांबरोबर पुढील नक्षत्राच्या पावसाबरोबर पोहोचवता येतील.
३. असे क्रमाक्रमाने करत पावसाच्या प्रत्येक नक्षत्राचा उचित उपयोग करुन पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम नष्ट करता येतील.

कळावे.

काही प्रश्न असल्यास कळवावेत. आहे काय न नाही काय. (उगीच परिषदा घेत फिरत बसण्यापेक्षा मिपावर तुमचे प्रश्न विचारा- खात्रीशीर योग्य उत्तरे मिळतील)

जीवनमानभूगोलविचार

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

30 Dec 2009 - 7:46 am | मदनबाण

Humans equal Virus :--- http://bit.ly/5JtNVl

जाता जाता...
मॅट्रीक्स :---
Agent Smith:

I'd like to share a revelation that I've had during my time here. It came to me when I tried to classify your species. I realized that you're not actually mammals. Every mammal on this planet instinctively develops a natural equilibrium with the surrounding environment, but you humans do not. You move to an area, and you multiply, and multiply, until every natural resource is consumed. The only way you can survive is to spread to another area. There is another organism on this planet that follows the same pattern. A virus. Human beings are a disease, a cancer of this planet, you are a plague, and we are the cure. --The Matrix
http://bit.ly/4BiKxG

(Neo)
मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

अमृतांजन's picture

31 Dec 2009 - 7:11 am | अमृतांजन

अशा क्लिप्स पाहिल्या की, डार्विनचा उत्क्रांतीवाद कसा झुटा आहे ते अधिकच खुलून वर येते,

पाषाणभेद's picture

30 Dec 2009 - 8:48 am | पाषाणभेद

"उगीच परिषदा घेत फिरत बसण्यापेक्षा मिपावर तुमचे प्रश्न विचारा- खात्रीशीर योग्य उत्तरे मिळतील"

एकदम सही बोला भिडू!
आमचेबी एक सजेशन : अँन्टी ब्रेक एनर्जी रिजनरेशन सारखी ग्लोबल वार्मींग पासून एनर्जी जनरेट करायची.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

अमृतांजन's picture

30 Dec 2009 - 7:35 pm | अमृतांजन

<<अँन्टी ब्रेक एनर्जी रिजनरेशन सारखी ग्लोबल वार्मींग पासून एनर्जी जनरेट करायची.>>

कल्पना आवडली! उचलून धरली.

विजुभाऊ's picture

31 Dec 2009 - 10:52 am | विजुभाऊ

समुद्रात परागकण, बिया, सोडावीत. त्या तरंगतील व ढगांची निर्मीती होतांना त्या ढगात जातील. पावसाबरोबर जमीनीवर पडतील व विनासायास सगळीकडे जंगले वाढतील
अमृतांजन तै /भौ आपला जीवशास्त्राचा आणि भौतीक शास्त्राचा अभ्यास जरा कमी असावा किंवा आपण ते इतर कोणत्यातरी ग्रहावर शिकला असावात अशी शंका येतेय.
समुद्रात सोडलेले परागकण कुजून जातील.
फक्त काहीच वनस्पतींच्या बिया वार्‍यावर तरंगतात. काही वनस्पतींच्या बिया काही प्राण्यांच्या/पक्ष्यांच्या पोटातून जाऊन आल्यावरच विष्ठेद्वारे त्यांचे झाड होऊ शकते.
शिवाय अशा प्रकारे सोडलेल्या बिया हव्या त्या ठीकाणीच पडतील यावर कसलेच नियंत्रण नसणार. त्याचे काय करणार?
तरी बरे....समुद्रतळची जमीन ही शेतीसाठी वापरली तर शेतीला पाणी देण्याचा प्रश्न येणारच नाही आणि शेतीसाठी भरपूर जमीन उपलब्ध होईल असा शोध तुम्ही लावला नाहीत हे आमचे नशीबच.
( अर्थात हे भविष्यात शक्य होऊ शकेल अशी एक आशा करायला वाव आहे)
वरील उपायांबरोबरच खतेही अशाच प्रकारे त्या बियांबरोबर पुढील नक्षत्राच्या पावसाबरोबर पोहोचवता येतील.
कै च्या कैच ......
तै / भै तुम्ही कधी शेतात काम केलेले दिसत नाही. घरी सुद्धा कधी झाडे लावलेले दिसत नाही.
खते ही पाण्याद्वारे अथवा जमिनीतून दिली जातात. खतांत मुख्यतः नत्र स्फुरद पोटॅश ही असतात. नत्र हवेत असले तरी झाडांच्या मुळाना ते जमिनीतून मिळत असते. हे तुम्ही कसे साधणार?

असे क्रमाक्रमाने करत पावसाच्या प्रत्येक नक्षत्राचा उचित उपयोग करुन पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम नष्ट करता येतील.

ताई एकूण सत्तावीस नक्षत्रे असतात त्यातली सगळीच काही पावसाची नसतात. हे आपणास ठाऊक असेलच.
असो...........
आपल्या सूचनेमुळे आमच्या अज्ञानात भर पडली. धन्यवाद.

<<अँन्टी ब्रेक एनर्जी रिजनरेशन सारखी ग्लोबल वार्मींग पासून एनर्जी जनरेट करायची.>>
कल्पना आवडली! उचलून धरली.

म्हणजे नक्की काय करणार आहात हो?
एकूणच तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नक्की काय ते कळालेले दिसत नाही.
वातावरणातील कार्बनचे प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाचे सर्वसाधारण तापमान वाढत आहे त्यामुळे धृवीय प्रदेशातले बर्फ वितळणे/ समुद्र पातळी वाढीला लागणे हे परीणाम दिसत आहेत.
पावसाचे प्रमाण कमी होणे/ऋतुमानात बदल होणे त्यामुळे शेतीउत्पादनावर परीणाम होणे हे परीणाम होतात.
ग्लोबल वॉर्मिंग चे काही चांगले परीणामदेखील आहेत.
आईसलँड सारख्या शीत प्रदेशात बर्फ वितळून जमीन उघडीपडत आहे तेथे वनस्पती उगवत आहेत.
परंतु त्याच वेळेस बर्फ वितळल्यामुळे समुद्रपातळीत वाढ होऊन मालदीव सारखे देश जलसमाधी घेत आहेत.

ग्लोबलवॉर्मिंग पासून एनर्जी कशी जनरेट करण्याची कोणताही आगापीछा नसलेली कल्पना उचलून धरताय यावरून एकूणच आपले अगाध अज्ञान दिसून येतेय.
असो....
या असल्या अवावस्तव पोरकट प्रतिसाद देताना/ धागा काढताना निदान सर्वसामान्य मिपाकरांच्या बौद्धीक सक्षमतेचा विचार करा ही विनन्ती .

अमृतांजन's picture

31 Dec 2009 - 8:31 pm | अमृतांजन

विजुभाऊ, सर्व्प्रथम आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

समुद्रात सोडलेले परागकण कुजून जातील.
फक्त काहीच वनस्पतींच्या बिया वार्‍यावर तरंगतात.

हे सर्वसामान्य मत झाले. असे होऊ नये म्हणून त्यावर काही प्रक्रिया नाही का करता येणार?

शिवाय अशा प्रकारे सोडलेल्या बिया हव्या त्या ठीकाणीच पडतील यावर कसलेच नियंत्रण नसणार. त्याचे काय करणार?
नियंत्रण नकोच आहे. आता तरी आहे का? बिया जेथे पडतील तेथे झाडे उगवतील नाही तर बिया रुजणार नाहीत. पुढील १० वर्षे असे प्रयोग केले तर २०% जरी बिया रुजल्या तरी खूप फरक पडेल असे वाटते.

तरी बरे....समुद्रतळची जमीन ही शेतीसाठी वापरली तर शेतीला पाणी देण्याचा प्रश्न येणारच नाही आणि शेतीसाठी भरपूर जमीन उपलब्ध होईल असा शोध तुम्ही लावला नाहीत हे आमचे नशीबच.

भन्नाट आयडीया आहे.

तै / भै तुम्ही कधी शेतात काम केलेले दिसत नाही.
नाही मी इतरांना कामाला लावायला वाकबगार आहे.

खते ही पाण्याद्वारे अथवा जमिनीतून दिली जातात. खतांत मुख्यतः नत्र स्फुरद पोटॅश ही असतात. नत्र हवेत असले तरी झाडांच्या मुळाना ते जमिनीतून मिळत असते. हे तुम्ही कसे साधणार?

असे काहीतरी करावे लागेल की, पावसाच्या पाण्याचा थेंब जमीनीवर येईपर्यंत त्यात नायट्रोजन्चे मिश्रण होईल व ते पाणीच खत म्हणून उपयोगी पडेल.

विजुभाऊ's picture

2 Jan 2010 - 11:32 am | विजुभाऊ

पावसाच्या पाण्याचा थेंब जमीनीवर येईपर्यंत त्यात नायट्रोजन्चे मिश्रण
हे आत्ताही असे होते. पाऊस पडताना त्यात काही प्रमाणात नायट्रोजन मिसळतोच
असो.
तुमचा एकूणच शास्त्रांचा अभ्यास जरा अम्मळ कच्चच दिसतोय.
हरकत नाही. अज्ञानी असणे हे वाईट नाही पण अज्ञानी रहाण्याची आवड असणे हे वाइट.
असो. थोडा अभ्यास करा आणि मगच अशा विषयांवर काही मते मांडा ही विनन्ती.

अमृतांजन's picture

2 Jan 2010 - 12:15 pm | अमृतांजन

फारच जजमेंटल आहात तुम्ही. मी खरच अज्ञ्यानी आहे.

अमृतांजन's picture

2 Jan 2010 - 12:24 pm | अमृतांजन

पावसांच्या ढ्गांवर खतमिश्रीत पाणी फवारुन खतं पीकांवर फवारता येणार नाहीत का?

विजुभाऊ's picture

3 Jan 2010 - 4:25 pm | विजुभाऊ

पावसांच्या ढ्गांवर खतमिश्रीत पाणी फवारुन खतं पीकांवर फवारता येणार नाहीत का?
ऑ ! हे आणखी नवे काय बॉ.
पावसाचे पाणी नेम धरुन फक्त पीकांवर पडते काय?
आणि खते फवारीत नाहीत ती जमिनीत पसरतात मग ती मातीतून पीकाना मिळतात.
जंतुनाशके फवारतात. संप्रेरके फवारतात.
अमृतांनज तै/भौ कधी तरी कुंडीत एखादे झाड लावून पहा.
नवे शोध लावायला हरकत नाही.....पण या अशा ना आगा ना पिछा असे न मांडता थोडी तार्कीक बैठक वापरून मग मांडा.

अमृतांजन's picture

3 Jan 2010 - 4:29 pm | अमृतांजन

>>नवे शोध लावायला हरकत नाही.....पण या अशा ना आगा ना पिछा असे न मांडता थोडी तार्कीक बैठक वापरून मग मांडा.>>

नवे शोध असेच अतार्किक वाटतात सुरुवातीला.

अमृतांजन's picture

3 Jan 2010 - 4:32 pm | अमृतांजन

तुम्ही तुमच्या सगळ्या परतिसादात मला अज्ञानी, अतार्किक, वगैरे दुषणे दिली आहेत आणि तुमच्या सगळ्या प्रतिसादावरुन तुम्ही लैच नॉलेजेबल वाटता राव. तुम्ही लावला आहे का हो एखादा शोध तार्कीक काय अशी बैठक घेऊन.

अमृतांजन's picture

3 Jan 2010 - 4:35 pm | अमृतांजन

तुमच्या सगळ्या प्रतिसादात तुमची सही "ब्रोकन इमेज" अशी येते. म्हणजे काय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jan 2010 - 6:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>तुमच्या सगळ्या प्रतिसादात तुमची सही "ब्रोकन इमेज" अशी येते. म्हणजे काय?

विजुभौची इमेज ब्रोकन झाली असा अर्थ घेऊ नका म्हणजे झाले. ;)

-दिलीप बिरुटे

कोपनहेगनची परिषद निष्फळ झाल्यामुळे मला राहवले नाही व मी निराश झाले.

मी कोपेन्हेगन च्या परिषेदेत सहभागी झालेल्या सर्व देशाचा निषेध करतो . पृथ्वीचे आता कसे होणार ही काळजी खुप भेडसावत आहे.मी दोन दिवस नीट जेवु शकलो नाही. :S

परंतु त्याच वेळी सर्वसामान्य मिपाकर अश्लील वेबसाईट वर सर्च इंजीन बंदी आणणार ह्या तद्दन बाजारु विषयावर गप्पा मारण्यात गुंग आहे ;)

तुमच्या कल्पना खरोखर खुपच क्रांतीकारक आहेत. आपण अजुन ह्या विषयावर काही संशोधन केले असेल तर त्याची माहिती इथे सामान्य मिपाकरांना उपलब्द करुन द्यावी अशी मी आपणास विनंती करतो.

आपण परागकण किंवा बियां एवजी सरळ झाडेच समुद्रात उखडुन टाकली तर ती ढगाव्दारे इतर ठिकाणी उगवुन येवु शकणार नाहीत का?
वेताळ

प्रभो's picture

31 Dec 2009 - 11:25 am | प्रभो

त्याचं काय आहे ना वेताळराव की ही परिषद ५-१० वर्षात एकदाच होते..
पण त्या सायटी पब्लीक कडून दिवसातून ५-१० वेळा हुडकल्या आणी पाहिल्या जातात......

रोजच्या सोयीची बोंब झाली उदा. वीज्,पाणी तर कसे सामान्य माणूस मोर्चे काढ्तो..आंदोलनं करतो....जास्त झालं तर मग बटाटे फेकून मारतो...बस फोडतो....तसं सध्या रोजच्या अन्न, वस्त्र,लाईट्,पाणी आणी तेल ह्या प्रमाणे तो ही सध्या एक ज्वलंत विषय आहे..कारण तो ही आता महाग होणार आहे...असो..आणीबाणी असल्याने जास्त खोलात जात नाही...

जाता जाता मनसे ला ह्या महागाईबद्दल एक पत्र लिहावे म्हणतोय...
प्रसनदा, सूहास कुठे गेला रे.......

--(बटाटा चाळीतला आंदेलन्कर्ता)प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अमृतांजन's picture

31 Dec 2009 - 8:39 pm | अमृतांजन

तुमच्या कल्पना खरोखर खुपच क्रांतीकारक आहेत.

संशोधकांना खूप टिका सहन करावी लागते हे वर्षानूवर्षे घडत आलेले दुर्दैव आहे.

आपण परागकण किंवा बियां एवजी सरळ झाडेच समुद्रात उखडुन टाकली तर ती ढगाव्दारे इतर ठिकाणी उगवुन येवु शकणार नाहीत का?

मी ह्या कल्पनेवर बराच विचार केला. पण अधिक सखोल विचार करुन सांगेन. मागे एकदा विमानातून एका बॉम्बसदृष वस्तू व्दारे रोपटी जमीनीवर फेकण्याचा प्रयोगाबद्दल ऐकले होते. त्याने तो बॉम्ब सरळ जमीनीत घुसून रोपटे खड्डे घेतल्याशिवाय रुजवता येईल अशी कल्पना होती.

हा घ्या पुरावा

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

संजा's picture

1 Jan 2010 - 9:08 pm | संजा

जयपालजी आपले चित्र खुपच विचार करण्यासारखे.

२०१० चा विचार करतो आहे. चित्र डोळ्यासमोर ऊभे आहे.

संजा.

अमृतांजन's picture

2 Jan 2010 - 7:41 am | अमृतांजन

माझ्या माहितीप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगमुळे खूप थंडी वाढणार आहे. आणि सगळीकडे पावसाचे प्रमाण वाढणार, समुद्राची पाणी पातळी वाढणार; म्हणून जास्त कपडे घालावे लागतील. पुन्हा १८ व्या शतकाकडे जावे लागेल असे वाटते. त्यामुळे वरील चित्र पाहून २०१० च्या पुढे काय असेल ह्याचे मनोरथ १०० च्या स्पीडने जे पळवायला लागले आहेत त्यांना ब्रेक मारावाच लागेल.

आनंद घारे's picture

2 Jan 2010 - 8:49 am | आनंद घारे

ग्लोबल वॉर्मिंगमुळे खूप थंडी वाढणार आहे.
आता नवी डि़क्शनरी बनवावी लागणार!

एक सूचना: मुंबईतल्या भटक्या कुत्र्यांना पकडून समुद्रात नेऊन टाकावे. आपोआप ते पर्वतांच्या शिखरावर जाऊन तिथे निसर्गाच्या सान्निध्यात सुखाने राहतील. शहरातल्या लोकांना त्यांचा त्रास होणर नाही. समुद्रात त्यांना खायला मासे मिळतीलच. ते उपाशी राहण्याची भीती नाही. ज्यांना त्यांची अत्यंत काळजी वाटते अशा प्राणीमित्रांनाही त्यांच्याबरोबर समुद्रात टाकले तर ते त्या कुत्र्यांची विशेष काळजी घेतील. खार्‍या पाण्यापासून त्यांच्या प्राणाचे रक्षण करण्यासाठी काही तरी उपाययोजना असेलच. ती केली तर प्राणीहत्येचे पाप लागणार नाही. हे सगळे त्यांच्या भल्यासाठी होत असल्यामुळे त्याला कायद्याची आडकाठी येऊ नये.
क्रांतीकारक कल्पना मांडणार्‍यांचे नेहमीच हंसू होत आले आहे. तसे माझेही होईल. कदाचित नववर्षाच्या पार्टीचा हँगओव्हर उतरला नाही असे कोणी समजतील. पण जगाला वाचवण्याची इतकी अफलातून कल्पना वाचल्यानंतर आपल्या आसपास राहणार्‍या हताश लोकांना त्रासापासून वाचवण्याचा एक मार्ग सापडला, तो दिला.

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

चित्रा's picture

2 Jan 2010 - 9:10 am | चित्रा

लय भारी.

अमृतांजन रावांचे (का ताईंचे?) डोके लोककल्याणासाठी खोक्याच्या बाहेरचे बघते हे अगदी स्पष्ट दिसते आहे आणि त्यामुळे ते/त्या अनेक बुद्धिमान लोकांनाही खोक्याच्या बाहेरचा विचार करायला लावतात हे त्याहूनही महत्त्वाचे आहे.

अमृतांजन's picture

2 Jan 2010 - 9:54 am | अमृतांजन

माझ्या मनाच्या खोक्याच्या बाहेरच्या मनातले बोललात!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jan 2010 - 3:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घारे साहेब, कल्पना उत्तम आहे. :)
>>नववर्षाच्या पार्टीचा हँगओव्हर उतरला नाही असे कोणी समजतील.
मला तसेच वाटले. ;)

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

31 Dec 2009 - 12:01 pm | परिकथेतील राजकुमार

सहज व सोपे 'परागीकरण' कसे करावे ह्या विषयी सखोल महितीसाठी प्रभु गुर्जींना भेटा अथवा व्यनी करा.

(प्रभु गुर्जीची शाखा कुठेही नाही)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अवलिया's picture

31 Dec 2009 - 12:06 pm | अवलिया

अथवा सहज सोप्या परागीकरणातील अडचणी आणि येणारे नैराश्या वर सखोल माहिती संजोपरावांकडुन मिळवा.

--अवलिया

टारझन's picture

2 Jan 2010 - 5:23 pm | टारझन

पोकल बांबु चे फटके देउ का रे ? तुम्ही दोघांनी काय दुसर्‍याची मार्केटिंग करायची एजन्सी काढलीये काय ?
अंमळ स्वत:ची मार्केटींग कशी करावी ह्या साठी कोदांना भेटा !

- पोकल बांबू

अमृतांजन's picture

3 Jan 2010 - 12:36 pm | अमृतांजन

टार्‍या, तु़झा "कोदा" विषयीचा डाटा जरा आम्हाला माहिती होऊ दे. हे काय आहे ते मला माहित नाही. वरील धाग्याश्गी त्याचा दुरान्व्यानेही संबंध नाही असे वाटले म्हणून लिहिले.

स्ध्या डोळे अंमळ पाणावायचे थांबले वाटते. जप हो. [आणि ते ही कोणत्या विषयी नेहमी तुझ्या प्रतिसादांमधे असते ते ही कळू दे[]

महेश हतोळकर's picture

1 Jan 2010 - 9:17 am | महेश हतोळकर

तुमच्या संशोधनात मला प्रणितींची छाप जाणवते. त्यांचे हे संशोधन आणि हे मत तुमच्याशी बरेच जुळते.

पुढील संशोधनास शुभेच्छा!

अमृतांजन's picture

2 Jan 2010 - 9:58 am | अमृतांजन

मला साध्र्म्य दिसले नाही पण "आय सी व्हॉट यु से".

अमृतांजन's picture

2 Jan 2010 - 7:30 am | अमृतांजन

A question that sometimes drives me hazy: am I or are the others crazy? -Albert Einstien

अमृतांजन's picture

2 Jan 2010 - 9:57 am | अमृतांजन

माणूस आपल्या सभोवतालच्या परिस्थितीला इतका खरे मानू आणि अंतिम मानू लागतो की, त्यात काही बदल होऊ शकतो हिच जाणीव तो हरवून बसतो. - अमृतांजन

पुष्कर's picture

2 Jan 2010 - 11:53 am | पुष्कर

हसून हसून पुरेवाट

आपला निर्णय योग्य आहे. शांततेने विचार करुन आपल्या शंकेचे समाधान करीन. तरीपण सर्व वाचकाना विनंती की आपल्या घरातील काही द्विदल धान्य प्रवासाला जाताना बरोबर घेऊन जावे व ज्या ठिकाणी डोंगरदर्‍या किंवा जंगले असतील त्या ठिकाणी पेरत जावे ह्यातील फक्त ५% ते १०% बियाचा जन्म होईल, किंवा जमल्यास इतर बिया सुध्दा विकत घेऊन त्या पेर्‍याव्यात हा प्रयोग मी तुंगारेश्र्वरच्या जंगलात ( वसई ) येथे केला आहे. त्या मुळे जंगलातील आदिवाशीना माठ, मुळा, पापडी, चवळी, मुग, राई, घेवडा इत्यादि भाज्या उपलब्द झाल्या आहेत.

पर्यावरण प्रेमी
संजीव

अमृतांजन's picture

2 Jan 2010 - 1:20 pm | अमृतांजन

धन्यवाद संजीवजी.

नुसते अज्ञानी-अज्ञ्यानी म्हणून ज्ञानी माणसांनी काहीच नव्या कल्पनांना जन्म न देण्यापेक्षा नुसते आमच्या सारख्या अज्ञानी माणसांना नुसतं शिकवलं तरी किती भंल् होईल ज्ञानी माणसांच, नाही?

(साधारण ५५-८५ च्या अधला मधल्या काळातील) माटूंग्याच्या व्हिजेटिआयचे जीऑलॉजीचे प्राध्यापक ओक हे त्यांच्या पुणे-मुंबई प्रवासात कायम स्वतः फळे खाल्लेल्या बीया तसेच इतर प्रवाशांनी खाल्लेल्या फळांच्या बीया गोळा करून खंडाळा घाटात फेकायचे. (बाकी कचरा नाही!) कारण हेच की त्यातील काही रुजतील. नाहीतर पक्षी खातील अथवा जमिनीत त्याचे काँपोस्ट होऊन जाईल... सुधीर गाडगीळांच्या मुलखावेगळी माणसे मधे त्यांची मुलाखत झाली होती.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अक्षय पुर्णपात्रे's picture

3 Jan 2010 - 7:55 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री विकास, एखाद्या ओसाड जमिनीवर एखादेच झाड वाढलेले दिसावे असे वाटले. बाकी धागा आणि इतर प्रतिसाद टाकाऊ.

अमृतांजन's picture

3 Jan 2010 - 8:45 am | अमृतांजन

<<बाकी धागा आणि इतर प्रतिसाद टाकाऊ.>>

वरील उदाहराणात श्री. ओक ह्यांनी टाकाऊ पासून टिकावू कसे साधायचे ह्याचा धडा दिलेला आहे; तो कळला मला. तुम्हाला?

अक्षय पुर्णपात्रे's picture

3 Jan 2010 - 9:31 am | अक्षय पुर्णपात्रे

पण मी बीयांना टाकाऊ समजत नाही. धागा व प्रतिसाद टाकाऊ आहेत याचा अर्थ यातून काही टिकाऊ निर्माण होऊ शकत नाही असे नाही. अर्थात तसे झाले तरी टाकाऊ वस्तूस कोणी टिकाऊ म्हणेलच असे नाही.

______________________________________________
We fight because we communicate.

अमृतांजन's picture

3 Jan 2010 - 9:46 am | अमृतांजन

>> धागा व प्रतिसाद टाकाऊ आहेत याचा अर्थ यातून काही टिकाऊ निर्माण होऊ शकत नाही असे नाही.>>

हं आता बराचसा संयमीत प्रतिसाद.

सुधीर काळे's picture

2 Jan 2010 - 12:31 pm | सुधीर काळे

मला १०० टक्के खात्री नाहीं पण वाटते कीं बाष्पीभवनाच्या प्रक्रियेत फक्त पाण्याची वाफ होते. म्हणूनच समुद्र खार्‍या पाण्याने भरला असला तरी पाऊस खारा नसतो.
त्यामुळे पाण्यात कांही गोष्टी सोडून/मिसळून कांहीं उपयोग होणार नाहीं. अशा मिसळलेल्या गोष्टी वाफेबरोबर ढगात जाणार नाहींत.
पण सायन्सच्या तज्ञांनी याबाबत लिहावे. कदाचित् ही कल्पना क्रांतिकारक असायची!
------------------------
सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम

अमृतांजन's picture

2 Jan 2010 - 3:29 pm | अमृतांजन

>>बाष्पीभवनाच्या प्रक्रियेत फक्त पाण्याची वाफ होते. म्हणूनच समुद्र खार्‍या पाण्याने भरला असला तरी पाऊस खारा नसतो.>>>

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.

पण समुद्रात होणारी वादळे काही बदल घडवून आणतात, जसे, कधी-कधी माशांचा पाऊस पडतो. नुसते समुद्रात बिया किंवा खते टाकणे हे आपल्याला अपेक्षित परिणाम मिळवून देणार नसेल तर व्हेदर मॉडेफिकेशनच्या धर्तीवर काही प्रयोग करुन ढगांवर खतांची व बियांची फवारणी करता येते ते पहाता येईल.

गेलाबाजार, प्रत्येक प्रवासी विमानाला बंधनच घालायचं- वर गेलात की हे वर पसरवं म्हणून - फुकटात आणि विनासायास व्हेदर मॉडीफिकेशन करता येईल. -

संजीव नाईक's picture

2 Jan 2010 - 4:49 pm | संजीव नाईक

काय पसरवं ते कळेल काय?
संजीव

अमृतांजन's picture

2 Jan 2010 - 6:12 pm | अमृतांजन

खतं, बिया, परागकण, सीओटू डिझॉल्व्हर, ई

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jan 2010 - 9:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

... तर व्हेदर मॉडेफिकेशनच्या धर्तीवर काही प्रयोग करुन ...

व्हेदर धिस मॉडीफिकेशन इज नीडेड ऑर नॉट इज अ डीबेटेबल क्वेश्चन!

तुम्हाला व्हेदर म्हणायचं आहे का वेदर? हवामान बदल म्हणायचं आहे का ....??

अदिती
-----------------------------------
नास्तिक असल्यामुळे माझा देवावर विश्वास नाही, पण स्वतःवर आहे.

अमृतांजन's picture

3 Jan 2010 - 10:18 pm | अमृतांजन

वेदर च हो, थोडं थिक फिंगरचा प्रोंबलेम आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jan 2010 - 10:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो अमृतांजन, नसेल जमत तर नका इंग्लिश वापरू. पण आता प्रोंबलेम काय? मराठी सायटीवर अंमळ मराठीत लिहा की!

अदिती
-----------------------------------
नास्तिक असल्यामुळे माझा देवावर विश्वास नाही, पण स्वतःवर आहे.

अमृतांजन's picture

3 Jan 2010 - 10:38 pm | अमृतांजन

"सायटीवर" सारखेच शब्द आहेत हो ते!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jan 2010 - 10:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेम!

विजुभाऊ's picture

3 Jan 2010 - 4:33 pm | विजुभाऊ

अमृतान्जन तै /भौ
ही घ्या एक प्रॅक्टीकल कल्पना
सर्व शेतांमध्ये सार्वजनीक संडास बांधावेत आणि गावकर्‍याना तेथेच जाण्याची सक्ती करावी.त्या॑योगे शेतात फुकटचे सोनखत मिळेल शिवाय बायोगॅस मिळेल.
शहरातून नदीत समुद्रात जाणारे मैलापाणी गावांकडे वळवावे ते जमिनीत मुरवावे म्हणजे जमीन सुपीक होईल.
( मैलापाणी वासविरहीत करायचे तंत्र सध्या बाल्यावस्थेत आहे......असो.)

अमृतांजन's picture

3 Jan 2010 - 4:41 pm | अमृतांजन

>>सर्व शेतांमध्ये सार्वजनीक संडास बांधावेत आणि गावकर्‍याना तेथेच जाण्याची सक्ती करावी.त्या॑योगे शेतात फुकटचे सोनखत मिळेल शिवाय बायोगॅस मिळेल.>>

एखाद्या गावाची लोकसंख्या ७६९ असेल आणि त्यात ३७६ पुरुष, (९०% प्रमाणे स्त्रीया) अ इतर वृद्ध आणि मुले असतील तर किती सोन्खत दिवसाला तयार होईल? ते किती एकर शेतीला पुरेल?

>>शहरातून नदीत समुद्रात जाणारे मैलापाणी गावांकडे वळवावे ते जमिनीत मुरवावे म्हणजे जमीन सुपीक होईल.>>

हा प्रयोग अगदी यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. आमच्या पुण्याचे सगळे पाणी आम्ही उजनी धरणात पाठवतो- तेथून ते भिगवण ते सोलापूर्च्या सगळ्या शेतीला जाते. तेथे काय परिस्थिती आहे?

अमृतांजन's picture

3 Jan 2010 - 4:44 pm | अमृतांजन

उपप्रश्न-
आवश्यक तेव्हढ् सोनखत उपलब्ध नसेल तर त्या गावच्या लोकांना किती हेलपाटे मारावे लागतील?
किती मनुष्यतास त्या कामाला द्यावे लागतील?
त्यांनी तेव्हढे सोन्खत तयार करायला किती अन्नाग्रहण केले पाहिजे?
त्यांनी काम आउट्सोर्स करावे का?- किती बिलिंग रेट असावा?

विजुभाऊ's picture

3 Jan 2010 - 4:52 pm | विजुभाऊ

मुम्बैत हे प्रश्न पडत नाहीत.
सगळ्या भारतात मुम्बै त्याबाबतीत दुथडी भरून वहात असते.
सेन्ट्रल रेल्वेच्या सर्व स्टेशनांजवळ कोणत्याही ऋतूत छत्र्यांचा खप त्यामुळे नेहमी जास्त असतो

ज्ञानेश...'s picture

3 Jan 2010 - 4:53 pm | ज्ञानेश...

किती ई-कचरा तयार होतो आहे या धाग्यावर!