एअर ट्रॅफिक कंट्रोल

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
8 Dec 2009 - 5:03 pm

तीनेक वर्षांपुर्वी एअर ट्रॅफिक कंट्रोल ह्या सिस्टीमच्या एका छोट्या भागाचा अभ्यास करण्याचा योग आला होता. त्यावेळी जवळ-जवळ हजार पानांइतके स्पेक वाचायची, त्या गंजीतून सुई शोधून काढायची कामगिरी टाकण्यात आली होती.

येथे मी लिहिणार आहे ते त्यातील काही मनोरंजक गोष्टींबद्दल, ज्या आपल्या सर्व-सामान्यांच्या आयुष्यात अनेकदा कळत-नकळत प्रवेश करतात. किंबहूना मी असे म्हणेन की, ह्यांच्या शिवाय आपण विमानप्रवास सुखरुप करुच शकणार नाही व विमानप्रवास जरी केला नसेल तर आजपर्यंत आपल्या डोक्यावर भरकटून (सहजा-सहजी) एखादे विमान का आदळत नाही हे समजायला ही माहिती उपयोगी ठरावी. [ही संदेश प्रणालीचा संबंध सिक्रेट एन्क्रिप्टेड मेसेजशी अजिबात नाही]

एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम एक काटेकोरपणे तयार केलेली संवादप्रणाली आहे. विमानं, हेलिकॉप्टरं, जहाजं ह्यांना एकमेकांशी तसेच नियंत्रण कक्षाशी सतत संपर्कात राहण्यात तसेच सुचनांची देवाण-घेवाण करण्यास उपयोगी पडेल अशी ही प्रणाली वर्षानुवर्षांच्या अनुभवातून (गंभीर चुकांमधून धडे व बोध घेतघेत) तयार झाली आहे.

ह्याचा एक भाग म्हणजे प्रत्येक विमानं, ई ना विशिष्ठ नावे देणे- ह्याची पद्धत प्रत्येक देशासाठी ठरवण्यात आली आहे.
दुसरा भाग एकमेकांशी संवाद साधतांना जी उपकरणं वापरतात त्यांच्या प्रमाणीकरणाबद्दल बोलतो- रडार, रेडिओ फ्रिक्वेन्सी, ई,

तिसरा भाग, संवाद काय साधायचा. हा सगळ्यात क्लिष्ट भाग आहे. त्यातील एक प्रकार आपल्या अगदी ओळखीचा आहे. जेव्हा दोन व्यक्तिंना (एक जण नियंत्रण कक्षातला व दुसरा विमानातला) एकमेकांशी प्रत्यक्ष बोलायची वेळ येते तेव्हा ते "आल्फा, बीटा.." असे संबोधन ए, बी,... साठी करतांना आपण ऐकले असेलच. जगभर हेच कॉलसाईन वापरले जातात. त्यांचं बोलण अत्यंत अचूक, खात्रीशीर व्हावे ही त्यातील कल्पना असते. व्यक्तिंना एकमेकांशी बोलण्याची वेळ शक्यतो टाळली जाते, हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसते कारण ऐकण्या-सांगण्यात होणारा फरक. त्यामुळे जास्तीत-जास्त मदार संगणकीय संवादावर असते. जेव्हा दोन संगणक एकमेकांशी बोलतात व ते त्यातील अर्थ काढून वैमानिकाला सांगतात [आणि त्या उलट], तेव्हा अचूक संवाद साधला जातो.

मिलिटरीसाठी प्रत्येक देश आपापली संदेश प्रणाली करु शकते किंवा ते शक्य नसल्यास नाटो सारख्या संस्थेचे सभासद्स्यत्व घेऊन त्यांची प्रणाली वापरु शकते. तसेच नौदल, वायुदल, भूदल ह्यांच्याशी समन्वय साधण्यासाठी तिघांचीही संदेश प्रणाली एकमेकांना पाठवलेले संदेश उलगडून दाखवण्यात वाकबगार असणे आवश्यक असते. (अमेरीका व्हियेतनामच्या युद्धात जे काही शिकली त्यात हे एक महत्वाचे शिक्षण होते).

पुढे, प्रत्येक विमान रडारच्या कक्षेत असेल तर व बाहेर असेल तर त्यातही कसे संदेश द्यायचे-घ्यायचे त्याचे प्रकार ठरलेले आहेत. एकदाका रडारच्या कक्षेत आले की, त्या विमानाला एक विशिष्ठ पध्दतीने ट्रॅक केले जाते- त्या विमानाचा त्यावेळी अवतीभवती असलेल्या इतर विमानांशी अपघात होऊ नये म्हणून त्यांच्या सतत संपर्क साधणे (संगणकाद्वारे), व वैमानिकाने तो संदेश ग्रहण केला ह्याची नोंद ठेवणे, त्याचे तंतोतंत पालन केले गेले की नाही ह्याची नोंद ठेवणे असे अनेक कामं संगणक बिनबोभट करत असतो.

जर नियंत्रण कक्षाला वैमानिका सांगायचे असेल की, तू आता उतरायला सुरुवात कर, अमुकएक अल्टीट्युडला ऊड, तर ते अशाच "भाषेत" नियंत्रण कक्षाच्या संगणकातून विमानातील संगणकाला पाठवले जाते. तो संगणक त्याचे भाष्यांतर करुन वैमानिकाला कळेल अशा भाषेत त्याच्या पटलावर तो संदेश उमटवतो असे गृहीत धरु. [दोन ड्रायव्हर जसे रस्त्यात भेटले की, ट्र्क मधेच थांबवून खबरबात करतात तसा प्रकार येथे नसतो. नाहीतर, नियंत्रण कक्षातील नियंत्रक, "काय रे, पक्या कसा आहेस, आईने पाठवलेला गाजराचा हलवा मधेच संपवला तर नाही ना? (वाचक आपापले व्हरीएशन येथे टाकू शकतात)" अशा गप्पा मारत असतांना दुसरी दोन विमान एकमेकांना धडकली हे सुध्दा कळणार नाही]

[किंवा अचानक रडारवर नवे विमान दिसले तर, कंट्रोलर रेडिओ घेऊन, "कोण आहेस रे तू, काय काम काढलंस इकडे?" "अरे, मी तुझ्या पुण्याच्या मावशीचा विनय, आलो आज इकडे ड्युटीवर". "अरे, तू आहेस होय, मला वाटलं की कोण आलं". असे संभाषण न होता, विमानाच्या "आयडेंटीफाय", "फ्रेंड ऑर फो" अशा स्वरुपाच्या सुचना कशा पाठवायच्या ह्याचे एक स्पेक असते. तसेच विमान ह्या संदेशांना कशी उत्तरे देईल, म्हणजे ती इथल्या संगणकाला कळतील ह्या सगळ्या गोष्टी ठराविक पध्द्तीनेच पार पाडाव्या लागतात.]

तिसऱ्या भागाबद्दल बरेच बोललो आता रटाळ व्हायच्या आत थांबतो. पण हा विषय इतका मोठा आहे की, एकदा त्याबद्दल वाचायला घेतलं ह्या विषयातील खोलीबद्दल आश्चर्य वाटतं.

चौथा भाग आहे तो नियंत्रकांना प्रशिक्षण कसे द्यायचे, त्यांचे वय काय असले पाहिजे, निवृत्त केव्हा व्हायला पाहिजे अशा नियमांचा.

अशा सिस्टीम जर डेव्हलप (विकसित) केल्या तर त्या टेस्ट कशा करायच्या हा ही एक गुंतागुंतीचा विषय आहे. टेस्टींगच नव्हे तर सिस्टीमचा वापर करतांना छोटीशी चूकही झाली तरी भयंकर विध्वंस ठरलेलाच असतो त्यामुळे प्रत्येक संबंधीत व्यक्तिंवर प्रचंड दडपण असते.

एखाद्याला ह्यात करीयर करायचे असेल तर त्या-त्या पातळीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था अमेरीकेत तसेच युरोपात आहेत. भारतात आहेत की नाही माहित नाही.

विज्ञानअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

jaypal's picture

8 Dec 2009 - 5:48 pm | jaypal

इमान उडल्या उडल्या लगी उतरवल व्हय?
जरा लांबचा फेरा तर मारया पयजे व्हता मालक.
म्होरल्या टायमला इसरु नगासा

टुकुल's picture

8 Dec 2009 - 11:19 pm | टुकुल

हेच म्हणतो..

नवीन माहिती आहे, अजुन सविस्तर लिहा. वेळ लागला तरी चालेल लिहायला.

--टुकुल

संग्राम's picture

8 Dec 2009 - 6:56 pm | संग्राम

नवीनच माहिती समजली ...
धन्यवाद ..
मला एक प्रश्न नेहमी पडतो की साइन बोर्ड वगैरे नसताना वैमानिक विमान कसे चालवतात ? त्यांना "रस्ता" कसा सापडतो ?अक्षांश्/रेखांश इ. चा उपयोग करून का ?

अजय भागवत's picture

8 Dec 2009 - 7:50 pm | अजय भागवत

दिवस-रात्र जस-जशी बदलते, ट्रॅफिकचे प्रमाण बदलते हे खालील चित्रफितीत दाखवलेले आहे (सिम्युलेटेड पण डाटा खरा आहे)

अजय भागवत's picture

8 Dec 2009 - 7:55 pm | अजय भागवत
अजय भागवत's picture

8 Dec 2009 - 7:28 pm | अजय भागवत

महत्वाचे म्हणजे, एखाद्या रडारच्या क्षेत्रात एकावेळी शेकडो विमानं ऊडत असतांना येणारा संदेश व पाठवायचा संदेश अचूक विमानाकडेच जायला हवा हे ही संगणक सांभाळतो. व त्याचसाठी अशा प्रगत संदेश देवाण-घेवाणीचा वापर आवश्यक ठरतो.

अक्षय पुर्णपात्रे's picture

8 Dec 2009 - 9:46 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री भागवत, चांगली माहिती. एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि वैमानिक यांच्यात काटेकोर संवाद असणे गरजेचे आहे. माल्कम ग्लॅडवेल यांच्या 'आउटलायर' या पुस्तकात यासंदर्भात एक प्रकरण आहे. काही देशातील (पुस्तकात कोरिया आणि कोलंबिया याबाबत चर्चा आहे.) एयरलाइन्समध्ये काही काळ अपघाताचे प्रमाण जास्त का आढळते, याची सांस्कृतिक कारणे या प्रकरणात स्पष्ट केली आहेत. वैमानिकांतील (पायलट व को-पायलट) आपापसातील संवाद हा एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी होणार्‍या संवादावर परिणाम करतो. न्युयॉर्क शहरातील एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स हे तुलनेने थोडेसे उद्धट वाटतात (मोठ्या प्रमाणावरील विमानांची येजा वगैरेंमुळे थोडीफार दांडगाई दाखवतात) व त्यामुळे काही पायलट्स बुजून जाऊन घडणार्‍या चुका यांचे अतिशय वाचनीय वर्णन या पुस्तकात आहे. आउटलायरचा मूख्य विषय मात्र समाजात काही लोक सामान्यांपेक्षा वेगळे का आढळतात याविषयी असून अत्यंत वाचनीय आहे. (परीक्षण)

अजय भागवत's picture

9 Dec 2009 - 7:16 am | अजय भागवत

अक्षय, ग्लॅडवेलचा मी निस्सीम भक्त आहे. हे पुस्तक मात्र खूप वेळा घ्यावेसे वाटले पण हातातील इतर पुस्तके वाचल्याशिवाय एकही नवे पुस्तक घ्यायचे नाही असा कमकुवत निश्चय केला होता; तो आज मोडावा लागणार. वाचेन!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Dec 2009 - 10:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मनोरंजक माहीती, पण लेख गुंडाळल्यासारखा वाटला.

(अ‍ॅल्युमिनीयमच्या नळकांड्यात कंटाळणारी) अदिती

अभिज्ञ's picture

8 Dec 2009 - 11:00 pm | अभिज्ञ

अगदी हेच म्हणतो.

अभिज्ञ.

चतुरंग's picture

8 Dec 2009 - 11:10 pm | चतुरंग

खूपच त्रोटक झालाय. तीन चार भागांची मालिका करा की आवडेल वाचायला.

चतुरंग

उदय's picture

9 Dec 2009 - 12:41 am | उदय

युनायटेड एअरलाईन ने प्रवास करताना चनेल ९ वर ATC चे संभाषण ऐकता येते.

Atlanta ATC च्या Live feed साठी ATCMonitor.com ही वेबसाईट बघा. संभाषण ऐकून गम्मत वाटेल.

उदय's picture

9 Dec 2009 - 12:43 am | उदय

युनायटेड एअरलाईन ने प्रवास करताना चनेल ९ वर ATC चे संभाषण ऐकता येते.

Atlanta ATC च्या Live feed साठी ATCMonitor.com ही वेबसाईट बघा. संभाषण ऐकून गम्मत वाटेल.

पाषाणभेद's picture

9 Dec 2009 - 7:30 am | पाषाणभेद

हो पण संगणक नव्हते तेव्हा हे काम कसे चालायचे तेही सांगा लगोलग.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी

अजय भागवत's picture

9 Dec 2009 - 7:30 am | अजय भागवत

तीनेक वर्षांपुर्वी ते स्पेक वाचल्यामुळे जरा त्रोटक माहिती लक्षात होती. काल लेख लिहायला घेतला तेव्हा फार पटपट आठवत नव्हते. व जे आठवत होते ते "कॉन्फिडेन्शियल" किंवा दुसरे खूपच तांत्रिक होते म्हणून त्यातल्यात्यात लेखासाठी माहिती जी योग्य वाटली ती लिहिली.
कालपासून जयपाल, आदिती, टूकुल, चतुरंग, अभिज्ञ ह्यांच्या प्रतिसादामुळे डोळ्यातील कुसळ दिसले. लेख लिहिल्यापासून धूळ बसलेली माहिती, विस्मरणात गेलेली नव्हती तर सर्च इंजनला पटकन सापडत नव्हती हे लक्षात आले. त्या नव्या माहितीतून आणखी एक-दोन लेख (माऊस दोनदा स्क्रोल करावा लागेल एव्हढ्या उंचीचे) होतील ते यथावकाश लिहिन. आभारी आहे.

उदय, दुवा खूप मस्त आहे! :-)

सहज's picture

9 Dec 2009 - 8:30 am | सहज

अजुन येउ दे!

>संगणक नव्हते तेव्हा हे काम कसे चालायचे

यावरुन असेच अवांतर आठवले, जगातील पहिले टेलेफोन बुक / डिरेक्टरी १८७८ मधे न्यु हेवन डिस्ट्रीक्ट टेलेफोन कंपनीने काढली. एक पानी होती व ५० नावे होती (व त्याकाळी ऑपरेटर सर्व फोन जुळवून देत असल्याने) कोणाचे फोन नंबर त्यात नव्हते. टेलेफोन नंबर नसलेली टेलेफोन डिरेक्टरी :-) तरीच फार जुने इंग्लीश सिनेमे बघताना कधी संवाद ऐकला असेल, कोणीतरी फोन उचलतो व म्हणतो "ऑपरेटर कनेक्ट मी टू ..."

भानस's picture

9 Dec 2009 - 8:55 am | भानस

माहिती आहे. हे वाचताना दोन ओळीतच डोळ्यासमोर ' Ground Control ' हा Kiefer Sutherland चा लिडींग रोल असलेला वैमानिक व ग्राऊंड कंट्रोल टॉवर यांच्यातील अंत्यत महत्वाच्या देवाणघेवाणीवर आधारलेला चित्रपट आला. नो रडार. नो कॉन्टॅक्ट. नो कंट्रोल.( आवर्जून पाहण्यासारखा चित्रपट ) लेख चांगला आहे. अर्थात विषयाचा आवाका प्रचंड असल्याने अजून लिहावे.:)

मदनबाण's picture

9 Dec 2009 - 9:14 am | मदनबाण

एका वेगळ्या विषयावर वाचायला मिळाले...यावर अजुन वाचायला आवडेल.

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

वरुणराजे's picture

9 Dec 2009 - 9:37 am | वरुणराजे

अजुन माहिती मिळाली तर मजा येईल आणि लागोलाग ह्यामध्ये जर करियर करायचे असेल तर काय करावे लागेल ते पण सांगा.....

वरुणराजे....

पाषाणभेद's picture

9 Dec 2009 - 9:47 am | पाषाणभेद

मला डिसकव्हरीवर या विषयावरची माहीती आठवली.

ATC चे लोकं, प्रत्येक विमानासाठी एक फिजीकल खेळण्यातले विमान एका टेबलावर अजूनही (संगणकीय) काळात वापरतात व तेच विश्चासार्ह आहे असे त्यांचे मत आहे.

वर विचारल्याप्रमाणे संगणक नव्हते तेव्हा हे काम कसे चालायचे हे पहाणे उत्सूकतेचे ठरेल.

अवांतर: धमाल मध्ये ATC चा सिन धमाल झाला आहे. माझा मुलगा ते पाहून गडबडा लोळतो.
त्या ऑफीसरचे नाव काय?
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी

sneharani's picture

9 Dec 2009 - 11:04 am | sneharani

अजुनही माहिती येऊ दे. वाचायला आवडेल.

गणपा's picture

9 Dec 2009 - 3:52 pm | गणपा

एक वेगळ्या विषया वरचा आगळा लेख.
इतर मिपावासियां सारखेच म्हणतो की अजुन माहिती येउद्या.
मग भले क्रमशः आल तरी चालेल.
आवडला हे वेसांनल.

-माझी खादाडी.

संग्राम's picture

9 Dec 2009 - 4:39 pm | संग्राम

>> मला एक प्रश्न नेहमी पडतो की साइन बोर्ड वगैरे नसताना वैमानिक विमान कसे चालवतात ? त्यांना "रस्ता" कसा सापडतो ?अक्षांश्/रेखांश इ. चा उपयोग करून का ?

अजय भागवत's picture

9 Dec 2009 - 6:30 pm | अजय भागवत

संग्राम, तुम्हाला येथे थोडीशी माहिती मिळेल-
http://en.wikipedia.org/wiki/Flight_plan

संग्राम's picture

9 Dec 2009 - 6:40 pm | संग्राम

धन्यवाद

सुधीर काळे's picture

9 Dec 2009 - 8:49 pm | सुधीर काळे

भागवत-जी,
सुंदर लेख. वाचतांना कांहीं जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
पहिली होती दिल्लीपासून अगदी जवळ झालेली कझाकस्तान व सौदी अरेबियांच्या जंबोंची टक्कर. कदाचित् प्राणहानीनुसार जगातला सर्वात भीषण अपघात. केवळ इंग्रजी भाषेच्या गोंधळामुळे झाला होता असेही आठवते.
Airport या Arthur Haily लिखित पुस्तकातही याची खूप छान माहिती वाचायला मिळते. जेंव्हां एकादे विमान अडचणीत असते त्यावेळी या ATC operators ना मनाचा तोल बिघडवू न देता, न चिडता वैमानिकांना कसे मार्गदर्शन करायचे, असंबद्ध प्रश्न कसे टाळायचे याचे प्रशिक्षण दिलेले असते असाही उल्लेख आहे व अशी दृष्ये मी कांहीं चित्रपटात पाहिलीही आहेत.
इथे 'वॉशिंग्टन डीसी'च्या IAD या विमानतळाला जायच्या रस्त्यावर एक या विषयावरचे वस्तुसंग्रहालय/प्रदर्शनही आहे जे आमच्या मुलाने आम्हाला दाखविले होते. तेही फारच छान आहे. श्री मुक्तसुनीत व श्री धनंजय यांनी कदाचित् पाहिलेही असेल.
भागवतसाहेब, लेखाचे असे आगळे विषय निवडण्याची तुमची हातोटी कौतुकास पात्र आहे.
जय हो!
------------------------
सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम