तर आमचा हा संभवितपणा (आमचा यावर अजिबात जीव नाही!) व्यक्त करण्यासाठी आम्ही या कुबड्या वापरल्या.
लेखणी दाबून आपुली खरडी उडवत जाऊया,
विचार दाबूनी लेखन 'तिकडे' आपण पाडीत जाऊया॥
सोडूनी मूळ स्वभाव आणिक परीटघडीचे लिहूया,
एकच मुद्दा अनेक लेख प्रतिसादे वरती काढूया॥
कवितांगण सोडून आता फॉक्स न्यूज वाचूया
दिसेल त्याला सहमती देवोनी इनो थोडे चाखूया॥
शांत राहूनी अंमळ थोडे नवे मार्ग शोधूया,
हिंसा-शस्त्रे नाय कामाची उपहास थोडा लिहू या॥
थकलो तरी प्रयत्न व्यर्थ उपडा घडा पाहू या,
मौजेस मित्रा अंत ना रे, सदर आपण चालवू या॥
आमचे परममित्र (कोण ते विचारू नका, अपमान होईल) यांचे दु:ख न पहावल्याने शनिवारचा उतारा या आठवड्यात अंमळ लवकरच आला.
-- अदितीबेन गॉन-धी
प्रतिक्रिया
20 Nov 2009 - 1:13 pm | llपुण्याचे पेशवेll
अदिती,
तुमचे हृदय परिवर्तन होते आहे हे पाहून आनंद वाटला. पण अंमळ फालतू कविता आहे. असो. तुम्हाला पाककृतीप्रमाणे कविताही जमत नसाव्यात. पण तारे बघणे आणि दाखवणे जमते हे या कवितेतून जाणवले.
पुलेशु
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
20 Nov 2009 - 2:21 pm | बिपिन कार्यकर्ते
सहमत.
बिपिन कार्यकर्ते
20 Nov 2009 - 3:04 pm | निखिल देशपांडे
सहमत
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
20 Nov 2009 - 3:45 pm | धमाल मुलगा
लै वेळा सहमत! :)
>>तारे बघणे आणि दाखवणे जमते.<< ह्म्म...हेच काय ते एकम्..शाश्वत...पुर्णसत्य!!! :D
20 Nov 2009 - 8:39 pm | प्रभो
सहमत
*आता हा धागा कोण अप्रकाशीत करनार??
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
20 Nov 2009 - 1:13 pm | नंदन
छान 'सभा टाकली' आहे.
--- क्या बात है! हे मनसेच्या आंदोलनाला उद्देशून आहे काय?
--- ये हुई ना बात! 'जो जे वांछिल, तो ते...'
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
20 Nov 2009 - 3:46 pm | धमाल मुलगा
>>छान 'सभा टाकली' आहे.<<
:D लय भारी! :)
20 Nov 2009 - 1:17 pm | विजुभाऊ
शनिवारचा उतारा शुक्रवारीच?
आंतरराष्ट्रीय वार रेषा पुण्यातून जाते काय?
Doing correct things is Management.
Correcting the things done is an Leadership
20 Nov 2009 - 2:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
विजुभाऊ, धागा पूर्ण वाचायच्या आधीच तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया सहज पकडता येतात.
अदिती
23 Nov 2009 - 4:43 pm | विजुभाऊ
शनीवारचा उतारा हा शुक्रवारीच प्रसिद्ध झाला तर
ते वांद्र्याच्या थोरल्या साहेबानी म्हंटल्याप्रमाणे तू मारल्या सारखे कर मी मेल्या सारखे करतो असेच होते ना
Doing correct things is Management.
Correcting the things done is an Leadership
20 Nov 2009 - 1:21 pm | jaypal
सोडूनी मूळ स्वभाव आणिक परीटघडीचे लिहूया,
एकच मुद्दा अनेक लेख प्रतिसादे वरती काढूया॥
कवितांगण सोडून आता फॉक्स न्यूज वाचूया
दिसेल त्याला सहमती देवोनी इनो थोडे चाखूया॥
जबरद्स्त , खतरनाक ई. शब्द अपुरे पडले म्हणुन
दया, क्षमा आणि शांती पुजक
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
20 Nov 2009 - 1:30 pm | परिकथेतील राजकुमार
कवितेला प्रतिक्रीया देणे बंद करावे अशा विचारत होतो, पण हा उतारा असल्याने राहावले नाही.
ह्या उतार्याचा काहि उपयोग होवो हि अपेक्षा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
20 Nov 2009 - 1:33 pm | श्रावण मोडक
बुधवारचा हँगओव्हर गेला एकदाचा.
20 Nov 2009 - 3:51 pm | सूहास (not verified)
आमचा हँगओव्हर डबल झाला ...
हॅ हॅ हॅ ...छान उतारा ...असा उतारा असल्यावर कविता चढली की नाही हे कसे समजावे !!
सू हा स...
20 Nov 2009 - 4:12 pm | गणपा
आमचा हँगओव्हर टिब्बल झाला ...
(शरदिनीतैंची कविता पण वाचली ना) ;)
21 Nov 2009 - 1:06 am | चित्रा
हँगओव्हर कसला कळले नाही. पण सगळे म्हणतात तर बहुदा बरोबरच असेल ;)
तह आवडला, अदितीबै, हुषार आहात. पण आधी लढाई कधी झाली तेच कळले नव्हते.
21 Nov 2009 - 1:16 am | Nile
लढाई झाली का नाही ते माहित नाही, चकमकी मात्र लै झाल्या ब्वॉ! ;)
23 Nov 2009 - 9:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मॉडर्न लढाया कागदावर खेळल्या जातात म्हणे. आणि लढाई झालीच नाही, म्हणून तर तह संभवित आहे ना! ;-)
(भुरटी) अदिती