शनिवारचा उतारा: ((संभवित) तह)
लेखनविषय:
काव्यरस
तर आमचा हा संभवितपणा (आमचा यावर अजिबात जीव नाही!) व्यक्त करण्यासाठी आम्ही या कुबड्या वापरल्या.
लेखणी दाबून आपुली खरडी उडवत जाऊया,
विचार दाबूनी लेखन 'तिकडे' आपण पाडीत जाऊया॥
सोडूनी मूळ स्वभाव आणिक परीटघडीचे लिहूया,
एकच मुद्दा अनेक लेख प्रतिसादे वरती काढूया॥
कवितांगण सोडून आता फॉक्स न्यूज वाचूया
दिसेल त्याला सहमती देवोनी इनो थोडे चाखूया॥
शांत राहूनी अंमळ थोडे नवे मार्ग शोधूया,
हिंसा-शस्त्रे नाय कामाची उपहास थोडा लिहू या॥
थकलो तरी प्रयत्न व्यर्थ उपडा घडा पाहू या,
मौजेस मित्रा अंत ना रे, सदर आपण चालवू या॥
आमचे परममित्र (कोण ते विचारू नका, अपमान होईल) यांचे दु:ख न पहावल्याने शनिवारचा उतारा या आठवड्यात अंमळ लवकरच आला.
-- अदितीबेन गॉन-धी
वाचन
7085
प्रतिक्रिया
0