पुण्याच्या पेशव्यांच्या बुधवारच्या कवितांवरच्या पुढच्या उतार्याची ही प्रेरणा
.
.
लेखनाची सुरूवात नेहेमी निवेदनात्मक असते
शेवटास येता येता लेखन हास्यास्पद असते
पहिली 'विनोदा'ची खात्री निवेदन संपताच होते
पण प्रसिद्धीच्या स्वप्नाने काकांचे* ऊर भरून येते
वाचने कमी प्रतिसाद नाही मन सैराभैरा होते
टाळ्या वाजवता स्वतःच्या "बघू काय होते?"
सुटता संयम काकांचा* शून्यच हाती येते
+१ आणि विरोधांची बेरीज मन विदीर्ण करते
नवी लिंक नवा धागा जुनीच टेप वाजू वाजू पहाते
विरोधासाठी निमित्तमात्र अदिती शनिवारीच लिहीते!
.
लेखनाची सुरूवात नेहेमी निवेदनात्मक असते
शेवटास येता येता लेखन हास्यास्पद असते
.
.
*कोणी ठराविक काका नाहीत, पण एकूण प्रतिसादलोलुप लेखकांच्या मनोवृत्तीला काका असं 'नाव ठेवलं' आहे.
प्रतिक्रिया
14 Nov 2009 - 2:24 pm | घाटावरचे भट
शनिवारचा उतारा खरं तर रविवारी सकाळी यायला हवा, पण असो (किंवा नसो).
14 Nov 2009 - 3:10 pm | नंदन
उतारा मस्तच. मात्र त्याची 'मात्रा' लागू होणार की नाही याबद्दल साशंक आहे.
--- क्या बात है! एकंदरीत तुमचा व्यक्तीला विरोध नसून प्रवृत्तीला आहे हे स्पष्ट केल्यामुळे तुम्हांला (तथाकथित नव्हे) विचारवंत म्हणायला हरकत नसावी. बाकी अलीकडे बर्याचदा एल.पी. अडकून थकले रे नंदलाला चे दलाला, दलाला [संदर्भ - भाईकाकांचं लेखन] ऐकू येण्याचं प्रमाण वाढलं आहे, हेही खरं.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
14 Nov 2009 - 3:17 pm | बिपिन कार्यकर्ते
अवांतर: विचारवंत झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!! आता विचार करायला लागायला हरकत नाही.
बिपिन कार्यकर्ते
14 Nov 2009 - 4:24 pm | परिकथेतील राजकुमार
तरी आम्ही सांगत होतो की अवखळकरतै 'भयानक भयानक गाण्याचे' व्हिडीओ बघु नका.
उतारा भयंकर छान जमला आहे आणि हो स्वतःला बदलीनच आणि हो अजुन काय म्हणता आणि हो व्यनितुन उत्तर दिले आहे.
©º°¨¨°º© बधिर पाठलाग ©º°¨¨°º©
आमचे राज्य
14 Nov 2009 - 9:16 pm | प्रभो
चालू द्या
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
14 Nov 2009 - 9:34 pm | विकास
कविता (का स्वगत?) आवडली....
कोणी ठराविक काका नाहीत, पण एकूण प्रतिसादलोलुप लेखकांच्या मनोवृत्तीला काका असं 'नाव ठेवलं' आहे.
असे फक्त "काका"च असतात का? समानतेच्या जमान्यात अशा काकू-मावश्या नसतात का? ;)
15 Nov 2009 - 12:50 am | श्रावण मोडक
कविता (का स्वगत?) आवडली....
एवढ्या पुरतेच सहमत. त्यातही कंसाशीच...
15 Nov 2009 - 9:39 pm | llपुण्याचे पेशवेll
हॅ हॅ हॅ. छान जमली आहे. आता १०-१२ कौतुकाचे व्यनि पाठवून दाखवतोच.
बाय द वे, अंमळ प्रसिद्ध झाल्यासारखे वाटत आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984