मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शनिवारचा उतारा - खात्री

३_१४ विक्षिप्त अदिती · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
पुण्याच्या पेशव्यांच्या बुधवारच्या कवितांवरच्या पुढच्या उतार्‍याची ही प्रेरणा . . लेखनाची सुरूवात नेहेमी निवेदनात्मक असते शेवटास येता येता लेखन हास्यास्पद असते पहिली 'विनोदा'ची खात्री निवेदन संपताच होते पण प्रसिद्धीच्या स्वप्नाने काकांचे* ऊर भरून येते वाचने कमी प्रतिसाद नाही मन सैराभैरा होते टाळ्या वाजवता स्वतःच्या "बघू काय होते?" सुटता संयम काकांचा* शून्यच हाती येते +१ आणि विरोधांची बेरीज मन विदीर्ण करते नवी लिंक नवा धागा जुनीच टेप वाजू वाजू पहाते विरोधासाठी निमित्तमात्र अदिती शनिवारीच लिहीते! . लेखनाची सुरूवात नेहेमी निवेदनात्मक असते शेवटास येता येता लेखन हास्यास्पद असते . . *कोणी ठराविक काका नाहीत, पण एकूण प्रतिसादलोलुप लेखकांच्या मनोवृत्तीला काका असं 'नाव ठेवलं' आहे.

वाचन 2829 प्रतिक्रिया 0