शिवाम्बूचिकित्सा मित्र मंडळ

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जनातलं, मनातलं
2 Nov 2009 - 1:05 pm

(हे लेखन संपूर्णपणे काल्पनिक आहे)
शिवाम्बूचिकित्सा मित्रमंडळ ( पुरुषांसाठी )
वार्षिक सभा आणि नूतन सभासद नोदणीचा कार्यक्रम

सदाशिव पेठेतल्या रा.ब. कुमठेकर मार्गावरच्या जुन्या वाड्याच्या भिंतीवरची हि पाटी पाहून मला फार आनंद झाला. "चला .. संस्थेबद्दलची उत्सुकता आता फार काळ ताणली जाणार नाही " असे मनातल्या मनात म्हणत मी पाटी परत एकदा वाचून बघितली. खाली सभेची तारीख आणि वेळ ठळकपणे लिहिलेली होती.

कुमठेकर रोड हा माझा नेहमीचा जाण्या-येण्याचा रस्ता. जाता-येताना माझे लक्ष नेहमी वाड्याच्या भिंतीकडे जाते, तिथे साधारणपणे दर महिन्याला तारीख बदलून मंडळाच्या सभेची नोंद केलेली असते. मला नेहमी प्रश्न पडे कि, इथे नक्की काय चालंत असावे ? बरं, शिवाम्बूनंतर चिकित्सा मित्रमंडळ हे शब्द असल्याने माझी उत्सुकता अजून वाढलेली होती. ह्यावेळी मात्र पाटी अगदी 'लक्ष्यवेधी' होती, म्हणजे नूतन हे शब्द ठळक आणि अधोरेखीत केलेले होते. नवीन ह्या सोप्या आणि वापरात असणार्‍या शब्दाच्याऐवजी 'नूतन' हा शब्द लिहून आणि परत त्यात ठळकपणा आणून त्याला अगदी 'समर्थ' बनविले होते. कदाचित लिहिणार्‍या म्हातार्‍या गृहस्थाला नूतन हि जुनी नटी आवडंत असावी असा एक निरर्थक विचार माझ्या मनात येऊन गेला. संस्था, तिचे सभासद, कामकाज, कार्यक्रम ह्याबद्दलच्या फक्त उत्सुकतेपोटी सभेला जायचे ठरवून मी सभेच्या तारीखेची मनात पक्की नोंद करुन ठेवली.

सभेच्या दिवशी अंगात मी ठराविक कपडे घालून निघालो. संयोजकांना किमान मी 'होतकरु' सभासद, इथे 'होतकरू' ह्या शब्दाचा अर्थ - 'करू म्हणता, होत आहे ' असा घ्यावा, असावा असे तरी वाटायला हवे असा विचार करुनच मी शुभ्र लेंगा आणि करड्या रंगाचा जुना 'समाजवादी' झब्बा - ह्या झब्ब्याला, शर्टला असतो तसा - पेन, छोटी डायरी, चष्म्याचे पाकीट ठेवायचा खिसा असतो आणि नेहमीची नायलॉनची बटने नसून प्लास्टीकच्या गुंड्या असतात ( पूर्वी सुताच्या असायच्या ) हे कपडे घातलेले होते.

सभा वाड्यातल्या एका मोठ्या हॉलसदृश खोलीमध्ये होती. खोलीत सुमारे १२/१५ प्लास्टीकच्या खुर्च्या आणि त्यांच्यासमोर पांढराशुभ्र टेबलक्लॉथ घातलेले भले मोठे टेबल होते. टेबलाशेजारी दोन खुर्च्या - त्यावर स्व. मोरारजीभाई देसाई आणि आयुर्वेददेवता धन्वंतरी ह्यांचे फोटो होते. झब्ब्या-लेंग्यातली साधारणे सत्तरीच्यापुढची तीन म्हातारी माणसे सभेची तयारी करत होती. मला पाहताच त्यातले एक आजोबा " या! या! - तुमचे स्वागत आहे" असे छापील वाक्य म्हणंत माझ्याजवळ आले. " तुम्ही पहिल्यांदाच येताहात म्हणून विचारतो, तुम्हाला आमच्या संस्थेबद्द्ल आणि आजच्या सभेबद्द्ल कसे कळाले ? " मी त्यांना पाटीवाचून आलो असे म्हटल्यावर एकदम त्यांनी दुसर्‍या म्हातार्‍याला हाक मारली आणि म्हणाले " वसंतराव, बघा , मी जे ठळकपणे आणि मोट्ठ्या अक्षरात लिहिले त्याचा अपेक्षित परिणाम झालाच. हे बघा, हे गृहस्थ पाटी वाचून आलेले आहेत" मी समजलो कि हाच तो नूतनचा फॅन. मग दुसरे म्हातारे गृहस्थही आमच्याजवळ आले. आजोबा पुढे म्हणाले ' मी प्रमोद जोशी, हे वसंतराव बागाईतकर आणि ते यशवंत दाबके. मग मीही माझी ओळख करुन दिली. आजोबा म्हणाले "सभेला अजून वेळ आहे, इतर सभासद आणि अजूनकाही तुमच्यासारखीच नवीन मंडळी यायची आहेत, तोवर तुम्ही ह्या खुर्चीवर बसून रहा". असे म्हणून स्वतः तयारीसाठी निघून गेले.

मला खोलीच्या भिंतीवर चिटकवलेलं एक मजेशीर पत्रक दिसलं. त्यात शेजारी शेजारी दोन चित्रे होती, पहिल्या चित्रात एका खंगलेल्या माणसाच्या हातात एक पेला होता त्यावर 'दारु' असे लिहिलेले होते आणि आणि दुसर्‍या चित्रात एका धष्टपुष्ट माणसाच्या हातात एक पेला होता त्यावर 'शिवाम्बू' असे लिहिलेले होते - आणि त्या दोन्ही चित्रांखाली एक वाक्य होते - तुम्हाला हातात काय घ्यायला आवडेल ?

क्रमश :

विनोदप्रकटनविचार

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

2 Nov 2009 - 2:29 pm | प्रकाश घाटपांडे

बिअर होती का पेल्यात? ती सुरवातीला गोमुत्रासारखी लागते म्हनुन इचारले
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

पाषाणभेद's picture

2 Nov 2009 - 2:30 pm | पाषाणभेद

आमाला वाचायला आवडेल.
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

यन्ना _रास्कला's picture

2 Nov 2009 - 3:16 pm | यन्ना _रास्कला

एक मजेशीर पत्रक दिसलं.

पेर्नादायी आस बोला. :|

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

विजुभाऊ's picture

2 Nov 2009 - 4:22 pm | विजुभाऊ

सदर अलेखन हे पुण्यातील सदाशिव पेठेतील रहिवाशाची निंदा नालस्ती करत आहे.
कुणीही यावे आणि सदाशिव पेठेला नावे ठेवून जावे हे यापुढे चालवून घेतले जाणार नाही.
खडकी दापोडी / हडपसर ला नावे ठेऊन बघा ना कधीतरी. सदाशिव पेठेत सहनशील लोक रहातात म्हणून त्याना उठसुठ नावे ठेवली जातात.
आम्ही या गोष्टीचा जागतीक सम्मेलनात कडाडून निषेध करतोय.

तिमा's picture

2 Nov 2009 - 8:06 pm | तिमा

मला पूर्णपणे निपक्षपाती राहून हा विषय चर्चेलाही आवडेल. पण सर्व शिवांबुप्रेमींनी हे लक्षांत घ्यावे की कुठलेही प्रयोग फक्त वैज्ञानिक कसोटीवरच सिध्द होतात. कोणीतरी धागा सुरु करा रे!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

पाषाणभेद's picture

2 Nov 2009 - 8:25 pm | पाषाणभेद

माझेही अनूमोदन. शिवाम्बूचिकित्सा करणारी मंडळींना खरच काही फायदा होतो का? विज्ञान तर सांगते की ते त्याज्य आहे. शरीराला अपायकारक आहे.

चेष्टेचा सुर आता गंभीर व्ह्यायला हरकत नाही.
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

विकीवरचा हा दुवा पहा. जगातल्या वेगवेगळ्या भागात शेकडो वर्षे ही उपचारपद्धती अस्तित्वात आहे. ह्याला आधुनिक वैद्यकशास्त्र मान्यता देत नाही परंतु ही उपचार पद्धती बरेचजण करतात असे दिसते.

(अंबुप्राशक)चतुरंग

दशानन's picture

2 Nov 2009 - 9:03 pm | दशानन

हे काय माहीत नाय...
पण लहानपणी खेळता खेळता कधी पायाला जख्म झाली की आम्ही शिवाम्बू सोडायचो ते आठवलं :D

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही