महिला दिन विशेषांक २०१७
उपेक्षित स्त्रियांचे हक्काचे घर - माऊली
'पिंजर' चित्रपटातला एका प्रसंगात 'पगली'ला दिवस गेल्याचे कळते, तेव्हा पुरोला धक्काच बसतो. अगदी दु:खी होऊन ती विचार करते, "कैसा आदमी होगा वो, जिसने ..."
सायकलिंगच्या छंदातून समाजप्रबोधन करणार्या आनंदयात्री
गंध हलके हलके - प्राजक्ता पटवर्धन
रसिका स्टिच वर्क्स - कल्पकतेचा उत्तुंग व्यावसायिक प्रवास
सौ. रेखा सोलापूरकर - बोरकर यांचा बुलडाण्यात स्वतःचा 'रसिका स्टिच वर्क्स' हा संगणकीकृत एम्ब्रॉयडरीचा (कशिदाकामाचा) व्यवसाय आहे. केवळ एक छंद म्हणून सुरू होऊन हळूहळू व्यवसायात त्याचं रूपांतर होऊन आता देशांतर्गत आणि देशाबाहेरही विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवलं आहे. तुम्हा-आम्हा सर्वसामान्य स्त्रियांमधल्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांसाठी, करू इच्छिणार्यांसाठी प्रेरणादायी अशी ही कहाणी, या मुलाखतीतून थोडक्यात तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवते आहे.
'स्टोरीवाली आंटी' - गायत्री आपटेकर
गायत्री आपटेकर एक व्यावसायिक कथाकथनकार, थेरपिस्ट आणि लेखिकाही आहे. मोठ्या माणसांचं आणि लहान मुलांचं भावनिक आरोग्य राखणं हे तिच्या कामाचं क्षेत्र, तर गोष्टींच्या माध्यमातून समस्या सोडवायला मदत करणं हे त्याचं स्वरूप. मानसिक आरोग्य आणि त्यासंबंधीची आव्हानं हा विषय लोकांपर्यंत नेण्याबद्दल ती आग्रही आहे.
उद्याच्या करियर्स - A Curtain Raiser
१२ प्रकारची मूलभूत कौशल्यं. करियर्सचे ६००पेक्षा जास्त मुख्य गट आणि त्याच्या दसपट संख्येने उपलब्ध असलेले शैक्षणिक पर्याय
....आणि फक्त एक आयुष्य!
मिनार - An Insight
मिनार!
माझी आणि तिची ओळख प्राचार्यांच्या कक्षात झाली. "मिनार आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेते आहे. तिला राज्यशास्त्र विषय हवा आहे आणि तिला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. तिला तुमच्या वर्गात घ्या." प्राचार्यांनी ओळख करून दिली आणि मिनार माझी विद्यार्थिनी झाली. पण खरं तर तिनेच मला कितीतरी गोष्टी शिकवल्या आहेत.
समतेच्या वाटेवर.. प्रीती करमरकर
आर्थिक स्वावलंबन - स्वप्नांच्या वाटेवर
"ए राजा, ऊठ"
"झोपू दे गं आई अजून थोडं..."
"अरे, शाळेत जायला उशीर होईल."
"होऊ दे.
दररोज मी का जायचं शाळेत याची दोन चांगली कारणं दे, तरच उठतो."
"एक म्हणजे तू आता पन्नास वर्षांचा घोडा आहेस आणि दुसरं म्हणजे तू शाळेचा मुख्याध्यापक आहेस." हा विनोद आपण पूर्वी ऐकला असेल आणि हसून सोडून दिला असेल किंवा मनात असंही आलं असेल कदाचित की हो ना राव, मलाही नाही जायचं रोज उठून काम करायला.