तुला फोन करताना
तुला एसएमएस करायचे ठरवताना
मागच्याच महिन्यात आलेले बिल पडले हातात
बिल भरा बिल भरा असे कोकलली ती बया फोनमध्ये
फडा फडा फडा
तुझा इनकमिंग उचलताना
तु पाठवलेले एसएमएस वाचताना
आठवण येते अनबिल्ड अमाऊंटची
खिसा सुध्दा थरथर कापतो माझ्या हाताप्रमाणे
मी फोन उचल्यावर
तु तोंड केले वाकडे व चिडलेल्या स्वरात
मला म्हणालीस,
"मोबाईलचं बिल तरी भर की रे फुकट्या !"
***
प्रेरणा दोन तीन आहेत... कुठली दाखवू :?
प्रतिक्रिया
10 Mar 2009 - 3:32 pm | निखिल देशपांडे
वा राजे विडंबन.... सहि आहे.....
10 Mar 2009 - 3:38 pm | नरेश_
वारा जेवा ;-)
वारा जेवा ;-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
10 Mar 2009 - 4:05 pm | अवलिया
तरीच काल नंबर लागत नव्हता तुझा...
--अवलिया
10 Mar 2009 - 4:14 pm | दशानन
:$
नको सांगू कुणाला !
13 Mar 2009 - 10:33 am | घाशीराम कोतवाल १.२
"मोबाईलचं बिल तरी भर की रे फुकट्या !"
:)] :)] :)] =)) =)) =))
काय राजे मार्केट पडल तर किति वांदे होतात ना राव? >:) >:)
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
10 Mar 2009 - 4:07 pm | परिकथेतील राजकुमार
'राजध्वनी' आवडला !
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य
13 Mar 2009 - 10:31 am | मृगनयनी
मला म्हणालीस,
"मोबाईलचं बिल तरी भर की रे फुकट्या !"
=)) =)) =)) =)) =))
ज ब रा! राजे.....
...... मार्केट डाऊन झाल्याचं माहित नसावं तिला.... बहुधा! ;)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
13 Mar 2009 - 12:01 pm | दशानन
>>मार्केट डाऊन झाल्याचं माहित नसावं तिला....
=))
काय सागू व कसं सांगू हा हाल माझा ;)