विविध प्रकारच्या वाईट बातमीचा धुराळा उडत असताना नेहमी प्रमाणे आमच्या मीडियाने एक चांगली बातमी लोकां पर्यंत पोचवलीच नाही.
महिंद्रा ह्या भारतीय कंपनीच्या Airvan १० ह्या दहा लोकांना नेऊ शकणाऱ्या विमानाला DGCA आणि इतर वायुवाहन संबधी यंत्रणांनी हिरवा कंदील दाखवला. आता महिंद्रा येत्या सहा महिन्यात भारतात हि विमाने विकू शकेल. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया मध्ये २०१७ सालीच त्यांना परमिशन मिळाली होती.
इंजिन रोल्स रॉयस चे आहे. अजून पर्यंत विमानासाठी इंजिन बनवणे भारताला शक्य झालेले नाही. विमानाची किंमत सुमारे १० कोटी असेल. पण त्याच्या तुलनेत सेसना इत्यादी विदेशी विमानांची किंमत सुमारे १८ कोटी आहे. हे विमान चांगले चालले तर भारतातील अनेक छोट्या शहरांना विमानसेवेने जोडणे शक्य होणार आहे. विमान छोटे असल्याने कमी उंचीवरून उडू शकते आणि ईशान्य भारत, काश्मीर किंवा घनदाट जंगल असलेल्या भागात ते छोट्या धावपट्टीवर सुद्धा उतरू शकते.
विमान भारतीय बनावटीचे नाही. Gipps-Aero हि ऑस्ट्रेलियन कंपनी महिंद्राने विकत घेतली होती आणि हे विमान सुद्धा मेलबॉर्न इथेच बनवले जाईल. सुमारे २०० विमाने ह्या कंपनीने आधी विकली होती. विमान निर्माण हे फार उच्च दर्जाचे अभियांत्रिकी ज्ञान आहे आणि विदेशी गुंतवणूक भारतात होत नसल्याने मागील ६० वर्षांत भारताला ह्या क्षेत्रं काहीही विशेष साध्य करणे शक्य झाले नाही. त्या मानाने १९४७ साली भारतात खाजगी विमान निर्माण करणाऱ्या कंपन्या होत्या हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटते.
अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये परमिशन असली तरी भारतीय DGCA नियमा नुसार १५०० किलो पेक्षा जास्त वजनाच्या विमानाला किमान २ पायलट असणे आवश्यक आहे त्यामुळे महिन्द्राला मूळ डिसाईन मध्ये खूप बदल करावे लागले.
महिंद्राने ह्या क्षेत्रांत पाऊल ठेवल्याने भारताला ह्या क्षेत्रांत देशांत सुद्धा प्रगती करणे शक्य होईल अशी अपेक्षा आम्ही ठेवू शकतो.
प्रतिक्रिया
1 Jun 2018 - 9:23 am | नाखु
सकारात्मक बातमीसाठी अभिनंदन
शिक्कामोर्तब झाल्याने कुठल्याही प्रकारची प्रशंसनीय बातमी देता येत नाही अशा वाचकांचा प्रतिनिधी नाखु
1 Jun 2018 - 10:42 am | सतिश गावडे
एका भारतीय कंपनीचे हे खुप मोठे यश आहे.
1 Jun 2018 - 10:51 am | जेम्स वांड
रिजनल काँनेक्टिव्हिटी हे भविष्य आहे एअर ट्रॅव्हलचं. आणि त्या दिशेने हे एक सकारात्मक पाऊल आहे.
1 Jun 2018 - 11:33 am | डॉ सुहास म्हात्रे
उत्तम आनंददायी बातमी. लवकरच हे विमान व्यापारी तत्वावर उडू लागून त्यात बसायची संधी यावी असे मनात आले ! :)
1 Jun 2018 - 12:04 pm | एस
छान बातमी. भारतात नाविन्यपूर्ण संशोधन व्हावं. तसं झालं तरच भारत ज्ञानसत्ता आणि पत्ययाने खरी महासत्ता बनू शकेल.
1 Jun 2018 - 12:21 pm | पुंबा
सकारात्मक बातमी.
महिंद्रांचे अभिनंदन.
एलन मस्क- महिंद्रांची पुर्वी बोलणी चालली होती सहकार्यासंबंधी. तसे झाले तर उत्तमच होईल. महिंद्रा भारी माणूस वाटतो.
1 Jun 2018 - 6:08 pm | गामा पैलवान
साहना,
वार्ता ऐकून मन प्रसन्न झालं. धन्यवाद! :-)
भारतात विमाननिर्मिती सहज शक्य आहे. जिथे पूर्ण रॉकेट बनू शकतं तिथे विमान निर्मिती फारशी कठीण नसावी. फक्त थोडा अनुभव मिळवावा लागेल. त्यासाठी एखादे दशक पुरेसे पडावे.
आ.न.,
-गा.पै.
2 Jun 2018 - 11:06 am | शलभ
चांगली बातमी.
ह्याच्यामुळे खालील बातमी आठवली.
http://zeenews.india.com/marathi/news/maharashtra/amol-yadavs-make-in-in...
आताचा अपडेट
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/tha...
2 Jun 2018 - 12:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
चांगली बातमी. पण, बाबू लोकांचा भोंगळ कारभार आडवा येतोय :(
2 Jun 2018 - 12:59 pm | गवि
बातमी एक पायरी म्हणून चांगली. पण भारतीय बनावट नाहीच. इंजिनही एस्टॅब्लिश्ड कंपनीचं. असेंम्बली ऑस्ट्रेलियात.
कंपनी भारतीय आहे इतकंच.
बाकी भारतीय असावंच असा काही खास आग्रह नाही. पण भारतासाठी खास बातमी असं म्हटलं तर खूप मोठी घटना नाही.
त्यापेक्षा बोइंग वगैरे मोठे प्रकल्प इथे उत्पादन करायला लागले की जास्त महत्वाचं ठरेल.