मी पाहिले ..मी पाहिले

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
22 May 2018 - 9:40 pm

मी पाहिले ..मी पाहिले

या कथेतील एक नायक एके काळी भारतीय सैन्यात मेजर पदावर असलेला . एका धाडसी मोहिमेच्या वेळी स्फोटात जखमी झाल्याने त्याला आपला एक पाय गमवावा लागतो . नाईलाजाने आपल्या गावात परत येउन तो शेती व्यवसायात जम बसवतो. तरिही मनात कुठेतरी मुख्य प्रवाहापासुन वेगळे पडल्याचे दु:ख त्याच्या मनात आहेच . हे दु:ख आपल्या शेती कामातुन , तर कधी पिण्यातुन तो झाकुन टाकत असतो . पण कधी ना कधी त्याच्या बोलण्यातुन मनातला कडवटपणा बाहेर पडतोच . अजुनही त्याला बरेचजण आदराने मेजर या नावानेच ओळखतात .

कथेतील दुसरा नायक आहे मनोहर . शहरातील प्रसिद्ध उद्योजक असलेल्या श्रीमंत आई बाबांचा एकुलता एक मुलगा . ईंजिनीअर झालेला असला तरी मनातुन सिनेमा क्षेत्रात दिग्दर्शक बनण्याची इच्छा असलेला . त्यासाठी आई वडिलांची नाराजी पत्करुन एका सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणुन काम करणारा . याच सिनेमाच्या शुटिंगसाठी गावात आलेला . तिथेच त्याची मेजरशी ओळख होते . गावातील एक मंदीर शुटींगसाठी पसंत पडते . पण त्यासाठी आधी ते मंदीर ज्यांच्या मालकीचे आहे त्यांची परवानगी घेणे आवश्यक असते . मनोहर हि जबाबदारी स्विकारतो .

या कथेमधे दोन नायिका आहेत . दोघीही सख्ख्या बहिणी . थोरली सौम्या थोडी गंभीर , अंतर्मुख स्वभावाची . ती गावातीलच शाळेमधे प्रिन्सिपॉल म्हणुन काम करीत असते . तर धाकटी मिनु संगीत , कविता यांत रमणारी . स्वप्नांच्या जगात वावरणारी . दोघीही आपल्या आईबरोबर त्यांच्या आजोबांच्या भव्य वाड्यामधे राहात असतात . वयोमानामुळे आता अंथरुणाला खिळलेले त्यांचे आजोबा गावामधील एक बडे प्रस्थ असतात . गावामधील शाळा , मंदीर त्यांच्या मालकीचे असतात . एके काळी आपल्या मुलीने आपल्या मनाविरुद्ध लग्न केल्यामुळे रागाच्या भरात त्यांनी राहते घर आणी सर्व इस्टेट आपल्या मुलाच्या नावाने केली असते . अखेरच्या दिवसांमधे त्यांना आपल्या चुकीची जाणीव होते . आपली चुक सुधारण्यासाठी ते घरातील सर्वांना इस्टेटीची कागदपत्रे ठेवलेल्या पेटीकडे पाहुन "पेटी .. पेटी" असे कसेबसे सांगत असतात . पण त्यांचे बोलणे कुणालाच समजत नाही .

थोरल्या सौम्याच्या लग्नासाठी घरातील मंडळी वर संशोधन करीत असतात . पण या आधी तिला पहायला आलेल्या मुलाच्या बाबतीत घडलेल्या दुर्घटनेमुळे तिच्यावर अपशकुनी हा शिक्का बसलेला असतो . तिचे लग्न होणे अवघड बनलेले असते . आज खुप दिवसांनंतर तिला पाहायला एक मुलगा येणार असतो . ती काहिशा भितीने तर तिच्या घरची मंडळी उत्सुकतेने मुलाची वाट पाहात असतात .

नेमके याच वेळी मंदीरामधे शुटींगची परवानगी घेण्यासाठी मनोहर या घरी पोचतो . सौम्या व घरातल्यांचा तो सौम्याला पाहायला आलेला मुलगा आहे असाच समज होतो . मनोहरही जास्त फाटे न फोडता शुटींगसाठी "यस ऑर नो ? " असे विचारतो . तो लग्नासाठी विचारत आहे असे समजुन या अचानक प्रश्नाने भांबावलेली सौम्या "यस" असे म्हणुन नकळत आपली पसंती कबुल करते . त्याच वेळी कुणीतरी ओळखीचे येउन तिला पहायला येणा-या मंडळींच्या गाडीला अपघात झाल्याने ते येउ शकत नसल्याची बातमी देतात .

कुठल्यातरी अनोळखी तरुणाला आपण नकळत पसंतीचा होकार दिल्याचे लक्षात येउन सौम्या खजील होते . पण मनोहरलाही ती पसंत पडलेली असते . तिला भेटुन मनोहर आपले पुढले प्लॅन , सिनेमा दिग्दर्शक बनण्याचे आपले स्वप्न याबद्दल सविस्तर सांगतो . दोघेही पुढील भवितव्याची स्वप्ने एकत्र रंगवु लागतात . पण त्यांची ही स्वप्ने साकार होतात का ? का नियतीच्या मनात काही वेगळेच असते ?

इकडे मिनुलाही तिच्या स्वप्नातला श्रीमंत , रुबाबदार राजकुमार श्रीकांतच्या रुपात भेटतो . श्रीकांत हा शहरातील एका अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या फायनान्स कंपनीचा मालक असतो . त्यालाही मिनुसारखीच संगीत , कविता यांची आवड असते . त्याचीही आयुष्यात काही स्वप्ने असतात . या दोघांचेही प्रेम यशस्वी होते का ? का नियतीच्या मनात काही वेगळेच असते ?

आजोबांच्या निधनानंतर त्यांच्या कागदपत्रांनुसार सगळी इस्टेट हि त्यांच्या मुलाला मिळते . नाईलाजाने सौम्या , मिनु , त्यांची आई यांना घर सोडुन शहरात यावे लागते . घराची आर्थिक बाजु सांभाळण्यासाठी सौम्या एका बड्या आयटी कंपनीत टेलीफोन ऑपरेटरची नोकरी करु लागते . तिची शिकण्याची तळमळ पाहुन कंपनीचा एरवी खडुस वाटणारा बॉस तिला ट्रेनी डेव्हलपरची पोस्ट देतो . या क्षेत्रातही सौम्या प्रगती करु लागते .

मिनुलाही मेजरच्या प्रयत्नांमुळे संगीत शिकण्याची संधी मिळते . आपल्या मेहनतीमुळे आणी कलागुणांमुळे लवकरच मिनु ही एक प्रसिद्ध सिने पार्श्व गायिका बनते .

------------------ हे कथानक आहे ते " कंडुकोंडेन कंडुकोंडेन" या २००० साली गाजलेल्या तामिळ सिनेमाचे . कथेतील प्रश्नांची उत्तरे ही प्रत्यक्ष सिनेमात बघणेच योग्य ठरेल ( Kandukondain Kandukondain English: I have seen, I have seen -- विकीवरुन साभार . ). बॉम्बे , गुरु अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचा सिनेमॅटोग्राफर राजीव मेनन हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे . या आधी त्याने " मिनसारा कनवु " ( हिंदीतील "सपने" ) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते .
"सपने"ला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने , कदाचित त्याने " कंडुकोंडेन कंडुकोंडेन" हा चित्रपट हिंदीमधे आणला नाही . सिनेमाला सुरेल संगीत आहे ए.आर . रहमानचे . तर सिनेमॅटोग्राफर आहे रवी चंद्रन . यामधे तब्बु , ऐशवर्या राय , मामुटी , अजित , अब्बास अशा अनेक दिग्गज कलाकारांनी अभिनय केला आहे . सिनेमात पुजा बात्रा , दिनो मोरिया या हिंदी कलाकारांनी छोटे पण लक्षात राहण्यासारखे रोल केले आहेत . एरवे अनेक दाक्षिणात्य सिनेमांत खलनायकी भुमिका करणारा रघुवरन ( "शिवा" मधला भवानीदादा ) हा आयटी कंपनीच्या मालकाच्या खडुस पण सकारात्मक रोलमधे चमकुन सुखद धक्का देतो .

प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांना या सिनेमातील "इन्न सुल्ल पोगिरा " या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे . अनेक लाईव्ह कॉन्सर्टमधे हे गाणे गाण्याचा त्यांना आवर्जुन आग्रह होतो .

अजुनही एखाद्या रविवारी हा चित्रपट सन टिव्ही नाही तर के टिव्ही अशा तामिळ चॅनेलवर लागतो . अशा वेळी तुमचा ऑफीसमधला वेंकटेसन कींवा गुनाकरन नावाचा एखादा तामिळ सहकारी "वेरी नाइस मुवी मची , यु मस्ट वॉच " अशी प्रेमळ सुचना करतो . तुमच्या गेस्ट हाउसचा मॅनेजर "नॅशनल अ‍ॅवार्ड विनींग मुवी सssरss . वेरी फेमस मुवी ." अशी शिफारस डोळे मोठाले करुन कौतुकाने करतो . अशा वेळेस कलाकॄती एवढीच त्यावरील भक्तांची भक्ती मनाला भावुन जाते .

------------------------------------------------ समाप्त ------------------------------ THE END --------------------------------------------

कलासमीक्षा

प्रतिक्रिया

असंका's picture

23 May 2018 - 9:30 am | असंका

सेन्स अँड सेन्सिबिलीटी कादंबरीची आठवण झाली....

असंका's picture

23 May 2018 - 9:34 am | असंका

ओळख आवडली.

धन्यवाद!!

जेम्स वांड's picture

23 May 2018 - 9:57 am | जेम्स वांड

मस्त आवडला हा सिनेमा तुमच्या लेखणीतून, हे उत्कृष्ट सिनेमे पाहायला तरी तामिळ शिकावं अशी खूप इच्छा आहे. ह्या अगोदर आर माधवन-कमल हासनचा 'अनबे शिवम' , किंवा हिंदीतल्या युवाचा मूळ सिनेमा म्हणजेच मणिरत्नमचा अयात एलुतू पण खल्लास आवडले होते.

चित्रपटाची ओळख आवडल्याबद्दल धन्यवाद .

@असंका - हा चित्रपट राजीव मेननने सेन्स अँड सेन्सिबिलीटी कादंबरीवरुनच बेतलेला आहे .

छान चित्रपटाची सुरेख ओळख.
अजित तेव्हा छान दिसायचा एकदम. सध्या वेदालम वगैरे मध्ये वय जाणवते. ते तो लपवतही नाही पण त्याचे स्माईल आणि चार्म कायम आहे.
.
तुम्हाला तमिळ चित्रपटांची इतकी माहिती आहे तर येऊ द्या ना एकेक रत्ने. खुप सुरेख चित्रपट आहेत काहीकाही. आपल्या मराठीतले किंवा बॉलीवुडचे बरेच कलाकार तेथे कारकीर्द गाजवलेले आहेत.

प्रचेतस's picture

24 May 2018 - 1:58 pm | प्रचेतस

आम्हाला अजित म्हणजे 'मोना डार्लिंगवाला' इतकेच माहित आहे.

सिरुसेरि's picture

23 May 2018 - 7:55 pm | सिरुसेरि

धन्यवाद अभ्याभौ . दिग्दर्शक चांगला असेल तर अजितने नेहमी उत्तम काम केले आहे . मध्यंतरी जेव्हा शंकर - विक्रम यांचा "आय" आणी रजनीकांतचा "लिंगा" हे बिग बजेट चित्रपट म्हणावे तेवढे चालले नाहीत , तेव्हा तामिळ सिने क्षेत्रात मंदीचे , चिंतेचे वातावरण पसरले होते . अशा वेळी अजित आणी गौतम मेनन यांचा "येन्नाई अरिंधाल - If you know me " हा सिनेमा प्रदर्शीत झाला . ( हा गौतम मेननच्या police trilogy मधला ३ रा चित्रपट .) या सिनेमाने उत्तम कमाई करुन तामिळ सिने क्षेत्रात परत एकदा चैतन्य निर्माण केले होते .

मदनबाण's picture

25 May 2018 - 7:59 pm | मदनबाण

"इन्न सुल्ल पोगिरा "
माझं आवडत गाणं... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभिनेत्री ओ अभिनेत्री अभिनय नेत्री नट गायत्री... :- Mahanati

मराठी कथालेखक's picture

28 May 2018 - 4:33 pm | मराठी कथालेखक

शाळेची प्रिन्सीपॉल --> टेलिफोन ऑपरेटर --> ट्रेनी डेव्हलपर ...हुश्श...

सिरुसेरि's picture

29 May 2018 - 9:07 am | सिरुसेरि

हा..हा.. तरी एक राहिलंच की . शाळेची प्रिन्सीपॉल --> टेलिफोन ऑपरेटर --> ट्रेनी डेव्हलपर --> Onsite Opportunity

प्रिन्सीपॉल --> टेलिफोन ऑपरेटर --> ट्रेनी डेव्हलपर --> Onsite Opportunity --> मॉडेलिंग (इथे तिचा बावळट चष्मा काढून फेकून देणारा गॉडफादर दिग्दर्शक. मग हॉट मेकओव्हर) --> Acting --> टॉप हिरॉईन

असाही एक मार्ग आहे.

नाखु's picture

29 May 2018 - 9:22 am | नाखु

तरी डब केलेले पहायला मिळावेत

कणसुगारु हा कन्नड सिनेमा हिंदीत (डब/सब टायटल)आहे का ते बरेच दिवस शोधतोय.

भाषा अडाणी नाखु

उपयोजक's picture

25 Nov 2020 - 8:04 pm | उपयोजक

कंडुकोंडेन कंडुकोंडेन सबटायटल्ससहित उपलब्ध आहे तुनळीवर

https://youtu.be/dsJM-1nFRyY

चौथा कोनाडा's picture

10 Apr 2021 - 5:33 pm | चौथा कोनाडा

तूनळी संदर्भासाठी धन्यवाद, उपयोजक !

हिंदीत डब केलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांचा मी फार मोठा पंखा आहे!
काल वर आलेले तुमचे दोन धागे याआधी कसे काय वाचनातून निसटले होते काही समजत नाही. मला वाटतं चर्चा धाग्यांच्या गदारोळात त्यावेळी ते हरवले असावेत 😀
कथावैविध्य आणि तांत्रिक सफाईत हिंदी/मराठी चित्रपटांपेक्षा सरस असले तरी तमिळ, कन्नड आणि मल्याळम पेक्षा तेलगु चित्रपट जास्त करमणूकप्रधान असल्याने मला फार आवडतात. अजित, अर्जुन सर्जा, रवी तेजा, मोहनलाल, महेश बाबू, विजय सेतुपती हे माझे आवडते कलाकार!
सध्या मिपावर 'मृत्युपुराणावर' आधारित धाग्यांची चलती असल्याच्या पार्श्वभूमीवर नुकताच पाहिलेला Har Din Diwali (Prati Roju Pandage) हा चित्रपट खूप आवडला.

Oops... आवडत्या कलाकारांमध्ये पृथ्वीराज सुकुमारनचे नाव लिहायचे राहिले!
मध्यंतरी पाहिलेला त्याचा 'Anarkali' हा चित्रपट आवडला. त्याचे बरेचसे चित्रण लक्षद्वीप सारख्या नितांत सुंदर ठिकाणी झाले असल्याने तर डोळ्यांचे पारणे फिटले!

चौथा कोनाडा's picture

26 Nov 2020 - 12:47 pm | चौथा कोनाडा

सिनेमाची सुरेख ओळख !
बघायला पाहिजेल " कंडुकोंडेन कंडुकोंडेन"