अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
12 May 2018 - 9:22 pm

मंडळी नमस्कार,
नमस्कार म्हणजे काय त्रिवार दंडवत नमस्कार हो, कारण मिपावर आल्या दिवसापासून बघतूया. एकेक सुपरस्टार हायेत राव हितं. आपले मिपाकर म्हणून नाते जुळत जातंया आणि अचानक कळतंया हे माणूस लै वल्ली है. इथं आपल्यासारखा मिपाकर म्हनून वावरतंय पन असली दुनियेत लैच नाव कमवून हाये. ज्या गोष्टी उगा आपण पेपरात बिपरात वाचतांव, टीव्हीवर बघताव ती माणसे चक्क मिपावर हायेत आपल्या संगं. मला तर कवाबवा असंबी वाटतंय की आपन लैच चिल्लर हाय राव. पण मिपाकरांनी अशा अटकेपार रवलेल्या झेंड्याचे कवतिक तर असणारच ना भौ. एकतर आपलं माणूस असतंय. आपलं मराठी माणूस.
आता हेच बघा की, आपले बिकामालक, म्हणजे आपले बिपिन कार्यकर्ते हो. भारी लिहितेत आणि लै भारी माणूस हायेत म्हणून ऐकलेले. भेटले एकदा आवर्जून आमच्या गावात येऊन. एकदम सिंपल माणूस हो. प्रेमाने बोलणारा, तेवढ्याच प्रेमानं आपलंसं करणारा. आपले प्राडॉ. बिरुटे सर घ्या, जयंतकाका घ्या नायतर मालक नीलकांत प्रशांत घ्या. ते बी तसेच. आपुलकीने जीव लावणारच. मिपावरचा स्नेह तर असणारच शिवाय प्रत्यक्ष आयुष्यातील अडचणीसाठी पाठीवर विश्वासाने हात ठेवणारी माणसे ही.
तर मी काय सांगत होतो तर आपले बिकामालक हो. बिपिनदादांचा लिहिता हात काय वर्णावा. त्यांचे खोबार वर्णनापासून आम्ही चाहते त्यांच्या लिखाणाचे. तर मनोविकास प्रकाशनातर्फे उर्वशी बुटालिया लिखित संपादनांचा 'हे शांतततेचे बोलणे' काश्मीरी स्त्रियांचा आवाज हा अनुवाद आपल्या बिपिनदादांनी केलेला प्रकाशित होतोय.

bk

मान्यवर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या अशा लेखनांबद्दल बिपिनदादांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या आगामी लेखनासाठी सर्वच मिपाकरांतर्फे मनापासून शुभेच्छा.

साहित्यिकप्रकटन

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

12 May 2018 - 9:34 pm | पद्मावति

वाह,मस्तच. बिपिन कार्यकर्ते यांचे मन:पूर्वक अभिनन्दन.

यशोधरा's picture

12 May 2018 - 9:38 pm | यशोधरा

अरे वा! अभिनंदन!

अभिजीत अवलिया's picture

12 May 2018 - 9:42 pm | अभिजीत अवलिया

अभिनंदन बिकाशेठ. मिपावरचे माझे अत्यंत आवडते लेखक.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2018 - 10:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! अभिनंदन बिकाशेठ !!

चित्रगुप्त's picture

12 May 2018 - 10:30 pm | चित्रगुप्त

त्रिवार अभिनंदन आणि कोटि कोटि प्रणिपात बिपिनपंत. हे पुस्तक वाचण्याची तीव्र इच्छा आहे.
(चित्र दिसत नाहीये अभ्याश्री)

नंदन's picture

12 May 2018 - 11:51 pm | नंदन

हार्दिक अभिनंदन, बिका!

नाखु's picture

13 May 2018 - 12:05 am | नाखु

बिकाशेट

बिकांना भेटलेला एक सामान्य सदस्य (नाखु मिपाकर)

टवाळ कार्टा's picture

13 May 2018 - 1:07 am | टवाळ कार्टा

हार्दिक अभिनंदन

अमरेंद्र बाहुबली's picture

13 May 2018 - 1:30 am | अमरेंद्र बाहुबली

काका अभिनंदन हो

जयंत कुलकर्णी's picture

13 May 2018 - 7:30 am | जयंत कुलकर्णी

अभिनंदन बिका...

अभिनंदन!
चित्र दिसत नाहीए.

झेन's picture

13 May 2018 - 11:30 am | झेन

अभिनंदन !
इंटरेस्टिंग विषयाबद्दल तुमचे लेखन वाचण्यासाठी उत्सुक.

सस्नेह's picture

13 May 2018 - 11:36 am | सस्नेह

बिकांचे अभिनंदन !
पुस्तक वाण्यास उत्सुक.

गामा पैलवान's picture

13 May 2018 - 12:45 pm | गामा पैलवान

भाषाप्रभू बिकांचं मी अभिनंदन करणं म्हणजे सशाने हत्तीचं अभिनंदन करणं होय. तरीपण करतो.

-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2018 - 1:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिकासेठ, अभिनंदन....! बिकासेठ म्हणजे लै मोठा माणूस. आपलं नशीब असं की यांचा सहवास लाभलाय. धन्स मिपा.

अवांतर : अभ्या लेका माझं नाव मोठ-मोठ्या लोकात घुसायडाची काय पण गरज नव्हती. अरे मिपावर बडी बड़ी हस्तियाँ आहेत. बसल्यावर सॉरी भेटल्यावर बोलूच.

-दिलीप बिरुटे
(साधा मास्तर )

-दिलीप बिरुटे

अनिंद्य's picture

13 May 2018 - 2:36 pm | अनिंद्य

बिपिन कार्यकर्ते यांचे अभिनंदन !

सर्वसाक्षी's picture

13 May 2018 - 2:48 pm | सर्वसाक्षी

श्री बिका यांचे हार्दिक अभिनंदन

नि३सोलपुरकर's picture

13 May 2018 - 3:08 pm | नि३सोलपुरकर

हार्दिक अभिनंदन, बिकामालक .

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन बिपीन जी...!!
ग्रेट लोक आहेत मिपावर..
माझे तर आयुष्यच बदलून गेले आहे मिपावर आल्यापासून.

प्रसाद_१९८२'s picture

13 May 2018 - 4:37 pm | प्रसाद_१९८२

बिपिनदादांचे हार्दीक अभिनंदन !
---
लेखातला फोटो दिसत नाही.

निशाचर's picture

13 May 2018 - 6:24 pm | निशाचर

अरे वा! अभिनंदन!!

(फोटो दिसत नाही, पब्लिक अ‍ॅक्सेस नसावा.)

वरुण मोहिते's picture

13 May 2018 - 6:56 pm | वरुण मोहिते

सरजी

बिपिन कार्यकर्ते's picture

13 May 2018 - 7:59 pm | बिपिन कार्यकर्ते

सर्वांचे मनापासून धन्यवाद! _/\_

स्वाती२'s picture

14 May 2018 - 4:01 am | स्वाती२

बिपिनदा, अभिनंदन!

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 May 2018 - 9:21 am | ज्ञानोबाचे पैजार

बिपिनदांचे मनापासून अभिनंदन , बरं बाटत असं काही वाचल की...
पण त्यांच्याबद्दल एक तक्रार सुध्दा आहे, आजकाल ते इकडे जरा कमीच येतात,
मिपावरची माया अशी पातळ करु नका बिकासेठ
पैजारबुवा,

अभिनंदन बिका !!!!! आनंद वाटला.

बिपिन कार्यकर्ते's picture

14 May 2018 - 11:25 am | बिपिन कार्यकर्ते

परत एकदा धन्यवाद!

आदरणीय बिकाशेठ यांचे त्रिवार अभिनंदन!!

प्रकाश घाटपांडे's picture

14 May 2018 - 12:16 pm | प्रकाश घाटपांडे

झकास बिका! अभ्याने आवर्जुन इथे टाकल्याबद्दल धन्यवाद

संजय पाटिल's picture

14 May 2018 - 1:21 pm | संजय पाटिल

बिपिन कार्यकर्ते यांचे अभिनंदन !

नीलकांत's picture

14 May 2018 - 1:48 pm | नीलकांत

बिपीनदाचे मनापासून अभिनंदन.

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 May 2018 - 1:51 pm | राजेंद्र मेहेंदळे

अभिनंदन बिका

सुमीत भातखंडे's picture

14 May 2018 - 2:02 pm | सुमीत भातखंडे

बिपिनदांचे मनापासून अभिनंदन

अभिनंदन बिकाशेठ.
लिहित राहा.

बिकाशेठचं हार्दिक अभिनंदन..

लिहित राहा.

शिव कन्या's picture

14 May 2018 - 11:04 pm | शिव कन्या

हे शांततेचे बोलणे मराठीत आणल्याबद्दल बिकांचे हार्दीक अभिनंदन.

तर त्या बोलाचा प्रतिध्वनी इथे उमटवल्या अभ्या भौ यांचे अभिनंदन .

अर्धवटराव's picture

15 May 2018 - 9:25 pm | अर्धवटराव

त्रिवार अभिनंदन

कानडाऊ योगेशु's picture

15 May 2018 - 11:35 pm | कानडाऊ योगेशु

"अभ्या"नंदन बिपिनसेठ!

रातराणी's picture

15 May 2018 - 11:47 pm | रातराणी

अभिनंदन!!

मनापासून अभिनंदन. खोबार अतिशय आवडली होती.

खटपट्या's picture

17 May 2018 - 5:10 pm | खटपट्या

अभिनंदन,
चित्र दिसत नाही

पुंबा's picture

18 May 2018 - 5:27 pm | पुंबा

सहर्ष अभिनंदन..
आणखी उत्तमोत्तम पुस्तकांची निम्र्मिती मिपाकरांकडून होत राहो..

मित्रहो's picture

21 May 2018 - 2:42 pm | मित्रहो

श्री बिपिन कार्यकर्ते यांचे सहर्ष अभिनंदन

पिवळा डांबिस's picture

22 May 2018 - 12:14 am | पिवळा डांबिस

बिकाचे हार्दिक अभिनंदन!!

तुषार काळभोर's picture

29 Jun 2018 - 1:15 pm | तुषार काळभोर

‘Speaking Peace: Women's Voices from Kashmir’ या उर्वशी बुटालिया यांनी मूळ इंग्रजीमध्ये संपादित केलेल्या पुस्तकाचा बिपीन कार्यकर्ते यांनी ‘हे शांततेचे बोलणे : काश्मिरी स्त्रियांचा आवाज’ या नावानं केलेला मराठी मराठी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेले हे पुस्तक ‘भारतीय लेखिका’ या मालिकेतील नवीन पुस्तक आहे. या पुस्तकाला बुटालिया यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

समीरसूर's picture

6 Jul 2018 - 1:16 pm | समीरसूर

त्रिवार अभिनंदन, काका! आपलं नाव मोठं आहेच; ते उत्तरोत्तर अधिक मोठे होत राहो या सदिच्छा!! :-) पुस्तक नक्की वाचणार.

समीर

चौथा कोनाडा's picture

6 Jul 2018 - 10:57 pm | चौथा कोनाडा

बिकादादांचे हार्दिक सुपर अभिनंदन!!
बिका रॉक्स !

विषयाला साजेसे अतिशय सुंदर मुखपृष्ठ:

बिकाचे हार्दिक अभिनंदन!