ताज्या घडामोडी- भाग ३३

Primary tabs

खेडूत's picture
खेडूत in काथ्याकूट
15 May 2018 - 10:16 am
गाभा: 

रामराम!
आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे नवा धागा काढला आहे!

आजची एक बातमी:
मुलाला मोठा इंजिनिअर करण्याचं स्वप्न बाळगून पालकांनी आपल्या पाल्यांना इंजिनिअरिंगमध्ये 'टाकायला' सुरुवात केली. मधल्या काळात या विद्यार्थ्यांचा आकडा बराच वाढला होता. पालकवर्गाच्या वाढत्या उत्साहामुळे महाविद्यालयंही पत्त्यांसारखी उभी राहिली. मात्र आता हा उत्साह ओसरलेला दिसत असल्याने इंजिनिअरिंगच्या जागाही रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयांची चांगलीच अडचण झाली आहे.

2016 - इंजिनियरिंगच्या 43 टक्के जागा रिक्त

2017- इंजिनियरिंगच्या 44 टक्के जागा रिक्त

2018- इंजिनियरिंगच्या 40 टक्के जागा रिक्त

ही घसरगुंडी महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंग महाविद्यालयांची आहे. गेल्या चार ते पाच वर्षात राज्यात कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी कॉलेजेस उगवली. विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगची स्वप्नं दाखवली गेली. पण इंजिनियरिंगकडे वाढलेला ओढा आता आटला आणि अनेक महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली.

महाराष्ट्रात सध्या 360 इंजिनियरिंग कॉलेज आहेत, तर 447 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. 2017 साली एक लाख 44 हजार जागांपैकी 64 हजार 625 जागा रिक्त राहिल्या, तर 2018 साली एक लाख 38 हजार जागांपैकी 56 हजार जागा रिक्त राहिल्या. दरम्यान, फार्मसी म्हणजेच औषधनिर्माणशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं दिसत आहे.

इंजिनियरिंगमधील घसरणीचं मूळ हे कॉलेजच्या बाहेर आहे, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मिळणाऱ्या अपुऱ्या संधींमध्ये आहे. पण या स्थितीवर सरकारने तूर्तास काही उपाययोजना आखलेल्या आहेत

नव्याने सुरु होणाऱ्या इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांना स्थगिती देण्याची विनंती एआयसीटीईला करण्यात आली आहे. ज्या खाजगी संस्थांनी इंजिनियरिंग कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी अभ्यासक्रमात बदल करुन प्रात्यक्षिकांवर भर देऊन व्यवसायाभिमुख शिक्षणाला भर दिला जाणार आहे.

प्रतिक्रिया

कर्नाटक मध्ये भाजपची मुसंडी. भाजपला देवे गौडांची मदत घायचा प्रश्नच निर्माण होणार नाही.

प्रसाद_१९८२'s picture

15 May 2018 - 10:30 am | प्रसाद_१९८२

सध्याच्या ट्रेंडनुसार निकाल.
भाजपा : ११२
कॉंग्रेस : ०६६
जेडीएस : ०४२

जेम्स वांड's picture

15 May 2018 - 10:30 am | जेम्स वांड

देणाऱ्या पोरांना 'तलाठी भरती' चे फॉर्म सुटायची आस लागणे दुर्दैवी होय

डँबिस००७'s picture

15 May 2018 - 10:38 am | डँबिस००७

बिचारा NDTV !! खुप यातना होठ असतील!!

डँबिस००७'s picture

15 May 2018 - 10:39 am | डँबिस००७

रविश कुमारच तोंड पडलेल आहे !

भाजप काठावर पास. सहिष्णू पक्षांचा नैतिक विजय. २०१९ ला भाजप चा पराभव निश्चित.

प्रचेतस's picture

15 May 2018 - 10:46 am | प्रचेतस

मतदानयंत्रात घोटाळे केल्यामुळेच भाजप विजयी :)

इरसाल's picture

15 May 2018 - 10:52 am | इरसाल

इव्हीएम मशीन, खोटे/बनावट मतदार यांची कंबक्ती भरली म्हणायची.
(त्याला नका जावु द्या रे प्रचाराला जिथे निवडणुक असते तिथे.......दरवेळेस असच कायतरी रिझल्ट आणतयं तोंडावर पाडुन)

प्रसाद_१९८२'s picture

15 May 2018 - 10:59 am | प्रसाद_१९८२

भाजप : १२०
कॉंग्रेस : ०५९
जेडीएस : ०४१
---
तथाकथित निधर्मांध व पुरोगाम्यांच्या तोंडावर हि चा

डँबिस००७'s picture

15 May 2018 - 11:02 am | डँबिस००७

लिंगायत समाजाला वेगळ्या धर्म बनवण्याचा कॉंंग्रेसचा प्रयत्न फेल गेलाय !!

कसलीही कारणे न देता मोदींचे या निखळ यशाबद्दल अभिनंदन.

डँबिस००७'s picture

15 May 2018 - 11:19 am | डँबिस००७

भाजप काठावर पास. सहिष्णू पक्षांचा नैतिक विजय. २०१९ ला भाजप चा पराभव निश्चित. ===

2019 ला कॉंग्रेस निश्चित !!

कपिलमुनी's picture

15 May 2018 - 11:29 am | कपिलमुनी

भाजपचे अभिनंदन !
विजय हा विजय असतो.

काँग्रेसने नेतृत्वाबद्दल गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे किंवा हा २०१९ काँग्रेसचा अंत असेल .
असे झाले तर भारतात १९५२ - ७७ जसा कालखंड होता ( सबळ राष्ट्रीय विरोधी पक्ष) तसा काल्खंड येइल .

गामा पैलवान's picture

15 May 2018 - 11:52 am | गामा पैलवान

कपिलमुनी,

या विधानात गडबड झालेली वाटते. काँग्रेस जर २०१९ साली नामशेष झाली तर सबळ विरोधी पक्ष कोणता?

आ.न.,
-गा.पै.

कपिलमुनी's picture

15 May 2018 - 12:09 pm | कपिलमुनी

भारतात १९५२ - ७७ जसा कालखंड होता ( सबळ राष्ट्रीय विरोधी पक्ष नसलेला) तसा कालखंड येइल .

असे वाचावे.

डँबिस००७'s picture

15 May 2018 - 12:15 pm | डँबिस००७

भारतात १९५२ - ७७ जसा कालखंड होता ( सबळ राष्ट्रीय विरोधी पक्ष नसलेला) तसा कालखंड येइल .

अश्या कालखंडाच स्वागत च होईल !! धर्माधारीत , जातीमध्ये देशाला वाटण्या ऐवजी देशाला विकासच्या दिशेला नेण्यासाठी ह्याची नितांत गरज आहे. श्री मोदीजी अजुन १५ वर्ष पं प्र असु देत, भारताची विजय पताका जगात फडकु दे !!

कर्नाटक निवडणुकांचा धागा थंड का पडलाय?
निकालांचा वेगळा धागा येणार का?

जेम्स वांड's picture

15 May 2018 - 12:24 pm | जेम्स वांड

.

चुरशीच्या लढ्यात, मतमोजणीच्या जितक्या फेऱ्या होतात तितक्या क्लीन स्वीप मध्ये होत नाहीत. ११६ वरून ११२ (लेटेस्ट १०८) वर उतरली आहे भाजप. घटलेल्या सीट्स वरील आघाडी काँग्रेसच्या पारड्यात पडून त्यांची आघाडी ६८ सीट्सची झाली आहे. जेडी/एस गाळात जात असून त्यांची पीछेहाट ४३ वरून, ३९ झाली आहे.

भाजपने लवकरच परत मॅजिक फिगर गाठून ती लीड किमान अडीच-पावणे तीन वाजेपर्यंत मेंटेन ठेवायला हवी. म्हणजे सगळं कसं नीट होईल, हँग असेंम्बली मध्ये मजा नाय राव काहीच.

कर्नाटकातल्या लिंगायत, मुस्लिम व दलित या तीन समूहाचा कल निश्चित कोणाकडे झुकेल ते माहित नव्हतं. मात्र या तिघांनी भाजपला दिलेला कौल स्पष्ट आहे :

https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/karnataka-elections-2...

लिंगायतांना अल्पसंख्य म्हणून वेगळा दर्जा द्यायचा काँग्रेसी विभाजनवादी बनाव कुणाच्यातरी थोबाडावर सणकून आपटून पार फुटला आहे.

-गा.पै.

लिंगायत सामाज्याने आपल्या "येडियुरप्पासाठी काही पण" हे ट्रम्प कार्ड खेळलेले दिसतंय. आणि लिंगायत समाजाची भीती दाखवून 'हिंदू खतरे मे' ही भाजपची चाल यशस्वी ठरली आहे असा माझा प्राथमिक अंदाज आहे. (बेळगावच्या एका मित्राकडून साभार).
बाकी सविस्तर विश्लेषण उद्या पेप्रात वाचायला मिळेलच.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 May 2018 - 12:30 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

कर्नाटकात भाजपाच सत्तेवर येणार असे दिसते आहे. राहूल गांधीनी कर्नाटकात जेथे जेथे सभा घेतल्या तेथे काँग्रेस पिछडीवर आहे..
राज ठाकरे ह्यांनी 'ई.व्ही.एम.' चा विजय असो असे म्हंटले आहे. मग जिकडे काँग्रेस जिंकत आहे व्व जिंकणार आहे, त्या मतदारसंघांबद्दल काय? की तिकडे विजय काँग्रेचा?

.

इरसाल's picture

15 May 2018 - 12:32 pm | इरसाल

एकदा विश्वेश्वरैया नाय बोलता आलं म्हणुन कोणी असं करत व्हय ??............(नाव सांगायची गरज आहे का?)

भंकस बाबा's picture

15 May 2018 - 12:56 pm | भंकस बाबा

मोडिविरोधी हुकमी एक्के नाही आले अजून !
विश्लेषण करत असतील बहुतेक

विशुमित's picture

15 May 2018 - 1:05 pm | विशुमित

मोडिसमर्थक हुकमी एक्के पण नाही आले अजून !
===
चिल्ल्ड झाले असतील बहुतेक.

मोदी विरोधकांना नथीतून तीर मारणे?

का

आपली भाजप जिंकते आहे त्याचा आनंद साजरा करणे?

का

निव्वळ मोदींविरोधक म्हणून कोणाला किंवा कोण्या समूहाला वैयक्तिक टार्गेट करणे?

काहीतरी सकारात्मक काँट्रिब्युट करा की राव.

असल्या वैयक्तिक होण्यानेच भाजप अन पर्यायाने मोदींजींना कमीपणा येतो हे समजायला काही रॉकेट सायन्स शिकायला लागत नाही.

(डोळस भाजप चाहता) वांडो

.

ह्या आकड्यांनुसार, भाजपचे 'लीड टू विन कन्व्हर्जन ऑफ सीट्स' जवळपास ८०% आहे, काँग्रेसच्या ६८ लीड्स पैकी फक्त वीस कन्व्हर्ट झालेल्या आहेत, एकंदरीत लीड टू विन कन्व्हर्जन ऑफ सीट्स ३३.३३% वगैरे म्हणता येईल ढोबळमानाने.

भाजपचा लीड कांसोलिडेशन स्पीड असाच राहिला तर मजाच आहे, खराखुरा जनादेश!. अर्थात आत्ता १३४० वाजलेत, ही पेस किमान अडीच पावणेतीन पर्यंत मेंटेन ठेऊन भाजपच्या लीड्स सीट्स मध्ये कन्व्हर्ट झाल्या की बेस्ट काम होईल.

इरसाल's picture

15 May 2018 - 1:41 pm | इरसाल

सुंभ जळला तरी पीळ जात नाहीए.:;)

प्रसाद_१९८२'s picture

15 May 2018 - 1:47 pm | प्रसाद_१९८२

निवडणुक आयोगाचे सध्याचे आकडे
------------
A

जेम्स वांड's picture

15 May 2018 - 1:53 pm | जेम्स वांड

वाढावी अन बहुमतावर मेंटेन राहावी हीच प्रार्थना.

जेम्स वांड's picture

15 May 2018 - 1:54 pm | जेम्स वांड

ऑल इंडिया रेडिओ आणि आयोगाच्या आकडेवारीत इतका फरक कसा आला असेल?

भाजप अर्ध्या हळकुंडाने पिवळी होताना दिसतेय. नंबर्स फेवर मध्ये नसताना उगाच का गोंधळ घालत आहेत? सगळे निकाल निघेपर्यंत पण दम निघत नसेल का?
----------------------------
१०५- १०६ च्या आसपास राहण्याची शक्यता दिसत आहे. अशा परिस्थितीत भाजपकडे काय पर्याय राहतात? मलातरी वैयक्तिकरित्या कुमारस्वामींना लॉटरी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

कन्व्हर्जन फॅक्टर वर भाजप मजबूत वाटत होती, तोवर प्रसाद भाऊ आयोगाचे आकडे घेऊन आले. आता माझा बेंबट्या झालाय कारण दोन सरकारी संस्थांच्याच आकडेवारीत जबरी तफावत दिसते आहे.

कुमारस्वामींकडे जर किंगमेकर रोल आला तर ते आपले उपद्रवमूल्य पणाला लावून किमान उपमुख्यमंत्री पद तरी पदरात पाडून घेतीलच. अर्थात जेडी-एसची लीड पूर्ण कन्व्हर्ट झाली तर त्यांच्याकडे हाच पाट काँग्रेस सोबत लावायचा पर्याय असेलच.

आता आपण २०१९ चा विचार करू,

ह्यात मला एक मूलभूत माहिती नाहीये, ती म्हणजे जेडी-एसच्या केंद्रात काय इच्छाआकांक्षा आहेत? कारण तिसरी आघाडी नाव असलेली मोट बांधायची झाली तर जेडी-एस त्या आघाडीची कन्नड फ्रेंचाईजी असेल, अश्या परिस्थितीत ते आत्ता राज्यात सत्ता स्थापन करायला काँग्रेसला सोबत घेण्यात झुकते माप देतील. कारण कर्नाटकात जर भाजपशी संग केला तर तिसऱ्या आघाडीत पत उरणार नाही, पण जर केंद्रातील इच्छाआकांक्षा नसल्या तर ही युती शक्य होऊ शकेल, त्यांना केंद्रातही एनडीए घटकपक्ष व्हायला जर मोदी शहांनी आमंत्रण दिले तर काय ही शक्यता मी अजून विचारात घेतलेली नाहीये हे स्पष्ट करतो

प्रसाद_१९८२'s picture

15 May 2018 - 2:18 pm | प्रसाद_१९८२

मला वाटते निवडणुक आयोगाची http://eciresults.nic.in/ ही साईट, ऑल इंडीया रेडीओच्या तुलनेत खुपच स्लो असावी, म्हणुन दोन्ही सरकारी एजन्सीच्या आकड्यात तफावत दिसत असावी.
---
सध्याचे आकडे खालील प्रमाणे आहेत.
--
a

प्रसाद_१९८२'s picture

15 May 2018 - 2:10 pm | प्रसाद_१९८२

तो येडाअप्पा तर मुख्यमंत्रीपदाचे बाशींग, घुढग्याला बांधून दिल्लीकडे यायला निघालाय. शिवाय दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन, भाजपा स्वत:ला विजयी घोषीत करणार आहे, अशी बातमी सध्या सुरु आहे.

बिटाकाका's picture

15 May 2018 - 2:20 pm | बिटाकाका

काँग्रेसने कुमारस्वामींना मुख्यमंत्री करण्यास तयारी दाखवल्याची बातम्या येत आहेत. तिकडे निर्मला सीतारामन म्हणत आहेत कि काँग्रेसने कितीही लास्ट मिनिट हालचाली केल्या तरी सरकार आम्हीच बनवू. मघाशी राम माधव म्हणाले कि चिंता नसावी, आपल्याकडे अमित शाह आहेत. अवघडंय!

जेम्स वांड's picture

15 May 2018 - 2:23 pm | जेम्स वांड

पाहिल्यापासूनच राम माधव ह्यांच्यावर विश्वास ठेवावा वाटत नाही. उगा एक हात लाकूड चार हात ढलपी बोलणे!.

प्रत्येक ठिकाणी काय अमित शहा आहेतचा जप करायचा राव!

बिटाकाका's picture

15 May 2018 - 2:30 pm | बिटाकाका

बीजेपी तोंडावर पडणार नक्की. जेडीएस ने काँग्रेसचा प्रस्ताव स्विकारल्याच्या बातम्या आहेत. कुमारस्वामी मुख्यमंत्री, काँग्रेस-जेडीएस उद्या राज्यपालांना भेटणार.

प्रसाद_१९८२'s picture

15 May 2018 - 2:29 pm | प्रसाद_१९८२

सध्याची परिस्थिती पाहाता कॉंग्रेस-जेडी(एस) एकत्र सत्ता स्थापन करणे सहज शक्य वाटतेय. येत्या काही तासात चित्र स्पष्ट होईलच.
--
भाजपा : ३९-६७-१०६
कॉंग्रेस : १०-६३-७४
जेडी(एस) : ०४-३५-३९

अशी सध्याची स्थिती आहे.

जेम्स वांड's picture

15 May 2018 - 2:37 pm | जेम्स वांड

फक्त चार सीट्स कांसोलिडेट? च्यायला हे लैच हाय टेन्शन इलेक्शन होतंय! मजा आली, लोकशाहीचा विजय असो, ह्याला म्हणतात अस्सल निवडणूक!

२०-२० आय पी एल सारखा चालू आहे. दिनेश कार्तिक ब्याटिंग करतोय असे फील येतंय.

२०-२० आय पी एल सारखा चालू आहे. दिनेश कार्तिक ब्याटिंग करतोय असे फील येतंय.

डँबिस००७'s picture

15 May 2018 - 2:25 pm | डँबिस००७

हा हा हा !!

ईव्हीएम चा निर्णय आपल्याच हातात असल्याने दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन, भाजपा स्वत:ला विजयी घोषीत करणार आहे
अस दिसतय !

माहितगार's picture

15 May 2018 - 2:39 pm | माहितगार

टाईम्स ऑफ इंडीयावरील हा कर्नाटक निवडणूक मॅप वेगवेगळ्या भूमिकांवर कन्नड जनतेने कल कसा दिला याचे रोचक प्रेझेंटेशन देतो . वेगवेगळ्या ड्रॉपडाऊन मेनुतील पर्याय निवडून अवश्य पहावे .

कपिलमुनी's picture

15 May 2018 - 2:45 pm | कपिलमुनी

कल बघून आनंद / दु:ख व्यक्त करणे व्यर्थ आहे . अजूनही कल येत आहेत , ते कधीही फिरू शकतात.
त्यामुळे निकाल पुर्ण किती वाजता येणार आहे ? त्यावर अवलंबून आहे .
मागच्या दोन निवडणूकीतून धडा घेत काँग्रेसने युतीच्या हालचालि लौकर चालू केल्या आहेत.

प्रसाद_१९८२'s picture

15 May 2018 - 3:11 pm | प्रसाद_१९८२

भाजपा : ५७-४७-१०४
कॉंग्रेस : ३०-४७-७७
जेडी(एस) : ११-२७-३८

manguu@mail.com's picture

15 May 2018 - 3:39 pm | manguu@mail.com

फायनल स्कोर

भंकस बाबा's picture

15 May 2018 - 3:57 pm | भंकस बाबा

मला वाटलं कुठे गावकुसाबाहेर पिंपळाच्या झाडावर ......
जाउदे

manguu@mail.com's picture

15 May 2018 - 3:59 pm | manguu@mail.com

पिंपळाला ब्राम्हण मुंजे लटकतात ,

आम्हाला खजुराचे झाड लागेल

प्रसाद_१९८२'s picture

15 May 2018 - 3:58 pm | प्रसाद_१९८२

फायनल स्कोर आता सांगणे कठीण आहे. कारण मत मोजणी अजून सुरु आहे.
---
सध्याची स्थिती.

भाजपा :७५-२९-१०४
कॉंग्रेस : ४५-३३-७८
जेडी(एस) : २०-१७-३७

एकुण १४२-८०-२२२

शाम भागवत's picture

15 May 2018 - 3:58 pm | शाम भागवत

भा ७५- २९ -१०४
काॅ ४५ - ३३ - ७८
ज २० - १७ - ३७

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 May 2018 - 3:51 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

गोव्यातून धडा घेऊन काँग्रेसने जनता दलाला ऑफर दिली आहे अशी बातमी आहे.
जेडी(एस)आमदाराचा भाव प्रत्येकी ४० कोटी असल्याचे बोलले जाते. आता अपक्ष/जेडी(एस्)चे आमदार कुठल्या रिसॉर्टवर जातात ते बघुया.

manguu@mail.com's picture

15 May 2018 - 3:57 pm | manguu@mail.com

तर परत पैसे कशाला ?

manguu@mail.com's picture

15 May 2018 - 4:01 pm | manguu@mail.com

*ब्रेकिंग न्युज*

*कॉंग्रेस - जेडीएस देणार भाजपच्या हातावर तुरी*

*कौल कर्नाटकचा*

▪ *सर्वाधिक जागा जिंकूनही भाजप राहणार सत्तेपासून दुर*

▪ *५ वाजता राज्यपालाना भेटुन जेडीएस करणार सत्तास्थापनेचा दावा*

▪ *जनता दलाचे कुमारस्वामी मुख्यमंत्री होण्याची शक्यता*

पक्षीय बलाबल

*भाजप = १०४*
*कॉंग्रेस =७७*
*जनतादल(s)= ३९*
*इतर = ०२*

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 May 2018 - 4:12 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मंगू, अरे पण सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाला आधी आमंत्रित केले जाते असे काहीतरी आहे ना? त्यांनी 'नाही' म्हंटले तर मग दुसरे ना?

manguu@mail.com's picture

15 May 2018 - 4:49 pm | manguu@mail.com

जो आधी जातो, त्याला पहिला चान्स

गोव्यात दुसर्या नंबरवर असूनही भाजपवाले आधी गेले

शब्दबम्बाळ's picture

15 May 2018 - 4:24 pm | शब्दबम्बाळ

ऑफिस मध्ये सगळे जण बीजेपीला शिव्या घालत आहेत! त्यातल्या बऱ्याच लोकांना खरतर बीजेपी यावे असे वाटत होते पण सकाळपासून बीजेपीवाल्यांच्या ज्या हालचाली सुरु होत्या त्या बघून यांचं पण डोकं फिरलं... इतका ओव्हर कॉन्फिडन्स का करायचा? तो 'येडी'(सगळे असेच हाक मारतात, बऱ्याच लोकांना त्याचा राग आहे खरतर, जरी मोदींना समर्थन देत असले तरी) शपथ घ्यायलाच बसला होता, आम्हाला कोणाचं समर्थन लागणार नाही आणि घेणारही नाही असली वक्तव्य आधीच करून बसलेत!
आता काही जणांना असेही वाटतंय की बर झालं! सिध्धु बाहेर जाणार, येडी ला पण चान्स नाही मिळायचा आणि कुमारस्वामी सीएम बनू शकतो. एका अर्थाने मोठया पक्षांना धडा मिळाला आणि तिसराच पुढे आला...
बघूया काय होतंय, चांगलेच ट्विस्ट आलेत!

अवांतर: या निमित्ताने प्रसारमाध्यमांची घिसाडघाई पुन्हा दिसून आलीच!

प्रसाद_१९८२'s picture

15 May 2018 - 4:32 pm | प्रसाद_१९८२

आजघडीला मतदान, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर होत असून सुद्धा संपूर्ण निकाल लागायला संध्याकाळचे पाच का वाजावे लागतात हेच कळत नाही.

manguu@mail.com's picture

15 May 2018 - 4:52 pm | manguu@mail.com

मतदान मशीनवर असले तरी फायनल प्रिंट पेपरवर होऊन ती स्वाक्षरी झाली की प्रोसेस कायदेशीर होते,

निकाल आधीच लागला तरी डिग्रीचे सर्टिफिकेट उशीराच भेटते ना

आगामी २०१९ चा रिझल्ट डोक्यात ठेवून बीजेपी क्लेम करायला जाणार का? म्हनजे ते कैतरी समीकरण वगैरे आहे ना?
आम्हाला मोदीकाका पायजेत बाबा २०१९ ला पण.
कारण म्हणजे कर्नाटकात असले काही तरंगते राजकारण झाले की सोलापूराचा बाजार वधारतो.

manguu@mail.com's picture

15 May 2018 - 5:24 pm | manguu@mail.com

नवी दिल्ली: मणिपूर आणि गोव्यात आघाडी करून सत्ता स्थापनेची खेळी करणाऱ्या भाजपवर त्यांचचं तंत्र उलटलं आहे. काँग्रेसने भाजपच्या याच तंत्राचा वापर करत कर्नाटकात जेडीएससोबत आघाडी केली असून आजच हे दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा करणार आहेत. त्यामुळे कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं असून भाजपला हा मोठा हादरा असल्याचं मानलं जात आहे.

मणिपूर आणि गोव्याच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असतानाही भाजपनं प्रादेशिक पक्षांना आपल्या बाजूला वळवून दोन्ही राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्याचंच उट्टं आता काँग्रेसने काढलं आहे. कर्नाटकमध्ये बहुमतासाठी ११३ जागा हव्या आहेत. मात्र कोणत्याही पक्षाला हा आकडा गाठता आलेला नाही. कर्नाटकमध्ये भाजप १०६ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ७३ आणि जेडीएस ४१ जागांवर आघाडीवर आहे.

काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे. जेडीएस नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करण्याबाबत सोनिया गांधी आणि आझाद यांच्यात चर्चा झाली असून सोनिया यांनी त्याला हिरवा कंदिल दाखवला होता. त्यानंतर आझाद यांनी देवगौडा यांच्याशी चर्चा करून जेडीेएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. जेडीेएसनेही ही ऑफर स्वीकारली असून काँग्रेसबरोबर आघाडी केल्याचं जाहीर केलं आहे. आज सायंकाळी काँग्रेस आणि जेडीेेएसचे नेते राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. तर येत्या १८ मे रोजी जेडीएस नेते कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं जेडीएसने स्पष्ट केलं आहे. गोव्याच्या धर्तीवरच राज्यपालांनी आम्हालाही सरकार स्थापनेसाठी पाचारण करावं, अशी मागणीही जेडीएसने केली आहे.

प्रसाद_१९८२'s picture

15 May 2018 - 5:37 pm | प्रसाद_१९८२

तुम्ही एक विसरताय,
गोवा व मणिपूर ह्या दोन्ही राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री आहे. कॉंग्रेससारखी जागा जास्त असूनही मुख्यमंत्री पद, एका कमी जागा असलेल्या पक्षाकडे द्यायची नामुष्की भाजपावर ओढवली नव्हती.
--
या घटनेने एक सिद्ध झाले की कॉंग्रेस सत्ता हव्यासी होतीच पण आता लाचार देखील झालेय .

manguu@mail.com's picture

15 May 2018 - 5:53 pm | manguu@mail.com

लहान भावाला सत्ता देण्यात किती आनंद असतो हे आता सेक्युलर लोकांनी रामभक्तांना शिकवायचे ?

प्रसाद_१९८२'s picture

15 May 2018 - 5:58 pm | प्रसाद_१९८२

निवडणुक प्रचारात ह्याच(जेडी-एस) लहान भावाला कॉंग्रेसने कश्या प्रकारच्या शिव्या घातल्या होत्या, हे सर्व जनतेने पाहीले आहेच.

बिटाकाका's picture

15 May 2018 - 6:01 pm | बिटाकाका

दुसऱ्याला सत्तेचा आनंद देता देता आपल्याला वनवासात पाठवण्यात आले आहे याची जाणीव झाली हेही नसे थोडके.
--------------------------
बाकी सेक्युलर लोकं रामभक्त नसतात?

बिटाकाका's picture

15 May 2018 - 5:57 pm | बिटाकाका

घाई होतेय हो मंगूसाहेब! उतावळ्या मेडियासारखं लगेच निष्कर्षाला कशाला पोहोचायचं? गोवा आणि मणिपूर मध्ये काँगेसने आपला प्रस्ताव पाठवायच्या आधी भाजपने प्रस्ताव पाठवला होता. ढिलाई काँगेसची होती, त्याचं समर्थन भाजपची खेळी, तंत्रने नाही होऊ शकत. कुठलाही चाणाक्ष, जुना/मुरलेला पक्ष करू शकला असता ते काँग्रेसला करता आलं नाही हि वस्तुस्थिती आहे.
-------------------------------------
इथे भाजपनेही तितक्याच तत्परतेने सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला आहे आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे आताच काहीही निष्कर्ष काढणे अवघड आहे. राज्यपाल कुणाला आमंत्रण देतात यावर सगळं आहे.
------------------------------------
भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावून बहुमत सिद्ध करायला वेळ दिला गेला तर मात्र कर्नाटकात पुढचे पंधरा दिवस राजकारण उतू जाणार आहे एवढे नक्की.

manguu@mail.com's picture

15 May 2018 - 5:59 pm | manguu@mail.com

१८ तारखेला शपथ घेणार होते म्हणे. मग सात दिवस कशाला हवे आहेत ?

बिटाकाका's picture

15 May 2018 - 6:05 pm | बिटाकाका

ती तर सिद्धरामैय्यापण घेणार होते, त्याचे काय झाले ते नाही विचारले? भाजपला जनतेने नाकारल्यामुळे वगैरे जड वाक्य फार जुनी नाहीत मंगूसाहेब!
-------------------------------
बाकी वरील वाक्य बघून, जेडीएस चे सरकार आले कि तो तो काँग्रेसचा नैतिक विजय ठरणार आहे यात काही शंका उरलेली नाही :):).

भंकस बाबा's picture

15 May 2018 - 6:27 pm | भंकस बाबा

निवडून आलेल्या उमेदवारानी कुमारस्वामीच्या नावाला आक्षेप घेतला आहे , आता जर कोंग्रेसचा बार फुसका ठरला तर वदनि कवल घेता म्हणून झाल्यावर ताटावरुन उठवल्यासारखे होईल ,

ते राहुलबाबा कुठे दिसले नाही?
बघा आमच्यात परिवर्तन झाले , पप्पू नाही म्हटले , आता खरोखरच दया येते बिच्यार्याची!

गामा पैलवान's picture

15 May 2018 - 7:09 pm | गामा पैलवान

मंगूश्रीपंत,

उत्तम विवेचन आहे. (बघा, माझ्या सहवासाने तुमच्या प्रतिभेस कसे धुमारे फुटू लागलेत ते)

माझ्या मते येदियुरप्पांचा पत्ता कट करायला भाजप सरकार बनवत नाहीये. हिमाचलात धूमलांचा वापर करून भाजपने निवडणूक जिंकली, पण स्वत: धूमल हरले (संदर्भ व अधिक माहिती : http://jagatapahara.blogspot.co.uk/2018/05/blog-post_5.html ). याचा अर्थ असा की भ्रष्ट चेहऱ्याचा वापर करून निवडणूक खुशाल जिंकायची, पण त्यात असा काही मोडता घालायचा की भ्रष्ट व्यक्तीस विजयाची फळं चाखता येऊ नयेत.

असाच काहीसा प्रकार कर्नाटकात घडलेला दिसतो. मात्र येदि सावध असल्याने पराभूत झाले नाहीत. अशा वेळेस सरकार न स्थापायचा डावपेच भाजप श्रेष्ठींनी खेळला असावा.

आ.न.,
-गा.पै.

manguu@mail.com's picture

15 May 2018 - 7:14 pm | manguu@mail.com

इतका अफाट खर्च करायचा आणि सत्त सोडायची ते कुणाला तरी धडा द्यावा म्हणुन !

भाजपावाले सत्ता स्थापायला जात नाहीत कारण त्यांच्याकडे सध्या तितके मनुष्यबळ नाही

विशुमित's picture

15 May 2018 - 7:17 pm | विशुमित

ये बात कूच हजम नही हुआ..!
===
<<<(बघा, माझ्या सहवासाने तुमच्या प्रतिभेस कसे धुमारे फुटू लागलेत ते)>>
==>> म्हणून तर मी तुमचा फॅन आहे.

कंजूस's picture

15 May 2018 - 6:46 pm | कंजूस

थोडक्यात बंगळुरु दूर.

कपिलमुनी's picture

15 May 2018 - 7:17 pm | कपिलमुनी

अशा परिस्थितीत काय करायचे याबद्दल आपल्या घटनेमध्ये याबद्दल स्पष्टता नाही.
मोठ्या पक्षाला बोलवायचे की आघाडीला बोलवायचे ?

पूर्वी वाजपेयीना सर्वात मोठा पक्ष असून बहुमत नव्हते तरीही सरकार स्थापनेला बोलावले होते .
सध्या गोवा , मणिपूर मध्ये आघाडीला बोलावले होते. आणि त्यांनी सत्ता स्थापन केली आहे.

सध्या दोन्ही पक्षाना भेटायला आहे . दोघांनी पत्रे दिली आहेत. मग मणिपूर गोव्यानुसार आता आघाडीला संधी हवी.
त्यांचा मुख्यमंत्री कोण हे ते अंतर्गत प्रश्न आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 May 2018 - 7:48 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

दोन्ही बाजू आहेत. भाजपाला सरकार स्थापन करायचे तर काही आमदार फोडावेच लाग्तील. मग अशावेळी घोडेबाजाराला उत्तेजन द्यायचे की जे स्थिर सरकार देऊ शकतात(किंवा तसा दावा करतात) अशांना आमंत्रण द्यायचे? ह्या दोन्ही पक्षांची युती निवडणूकीनंतर झाली आहे तेव्हा ह्यांचे सरकारही स्थीर शासन देइल ह्याची हमी नाही. वेळ आली की थातूर-मातूर कारण देऊन पाठिंबा काढून घ्यायचा हे धोरण इंदिरा गांधींच्या काळापासून चालत आले आहे. देवेगौडा ह्यांना त्याचा अनुभव आहेच.

गॅरी दादा कुठे गायबलेत देव जाणे. चक्क निवडणूक चाललीये आणि त्यांचा धागा नाही असा कसं काय :(

त्यांच्या गुजरात निवडणूक धाग्यावर 'सन्माननीय' सदस्यांनी काय दिवे लावले होते ते पाहिलं असेल तर असे प्रश्न पडणार नाहीत.
'आवरा यांना' म्हणून ३-४ दा संपादकांना हाळी दिलेली. 'ट्रोल अलर्ट' देणारं वॉचडॉग तेव्हा हड्डी चघळत बसलं होतं बहुतेक....

पण गॅरी ट्रुमन ना आधी पण अशा लोकांकडे संपुर्ण दुर्लक्ष करताना बघितलंय. त्या धाग्या वरच्या गोंधळामुळे ते लिहीत नसतील तर खरंच वाईट आहे मिपासाठी :(

संपादकांशी ओळख वगैरे काहीतरी बिनबुडाचं तुम्ही लिहिलेलं, तोच धागा का?

संपादकांशी ओळख - नाय हो मी जेमतेम येते कशीबशी मिपा वर आवड म्हणून , कुठली कुणाची ओळख नाहीये माझी :P

लोकसभेचे निकाल भाजपच्या बाजुने लागल्यास काँग्रेसचा कर्नाटकात पत्ता कट करण्याचा प्रयत्न केला जाईल.

manguu@mail.com's picture

15 May 2018 - 9:28 pm | manguu@mail.com

वाराणसीत पूल पडला,

नेहरूंच्या नावाने अजून कुणी कसे विव्हळले नाही ?

गामा पैलवान's picture

16 May 2018 - 2:00 am | गामा पैलवान

नेहरूंच्या नावे पप्पू विव्हळतोय म्हणून.

-गा.पै.

अवांतर : यालाच अच्छे दिन म्हणतात.

डँबिस००७'s picture

16 May 2018 - 1:53 am | डँबिस००७

वाराणसी मध्ये निर्माणाधीन पुलाचा बीम कोसळुन मोठा अपघात झालेला आहे. बरीच वहाने ह्या बीम खाली सापडल्याने मोठी जिवीत हानी झालेली आहे !
मृृृतात्मानां श्रद्धांजली !!

मा. संपादक मंडळ ,
mangoo ह्या सदस्याला वाराणसीत झालेल्या अपघाताबद्दल असंवेदनशील टिप्पणी केल्याबद्दल सक्त ताकीद देण्यात यावी!

डँबिस००७'s picture

16 May 2018 - 1:54 am | डँबिस००७

वाराणसी मध्ये निर्माणाधीन पुलाचा बीम कोसळुन मोठा अपघात झालेला आहे. बरीच वहाने ह्या बीम खाली सापडल्याने मोठी जिवीत हानी झालेली आहे !
मृृृतात्मानां श्रद्धांजली !!

मा. संपादक मंडळ ,
manguu ह्या सदस्याला वाराणसीत झालेल्या अपघाताबद्दल असंवेदनशील टिप्पणी केल्याबद्दल सक्त ताकीद देण्यात यावी!

देवाने मुद्दाम पूल मोडून तुम्हाला संदेश दिला आहे कि सत्ताधारी पक्षापासून तुम्ही बंगालला वाचवावे - मोदीजी जेंव्हा कोलकाता मधील पूल पडला तेंव्हा.

वाराणसीत पूल पडून लोक मेले ह्याच दुःख आहे. - आपल्या मतदारसंघात पूल पडला तेंव्हा मोदीजी.

https://www.independent.co.uk/news/world/asia/kolkata-flyover-collapse-w...

निवडणूक प्रचारात बऱ्याच वेळेस काहीही बरळतात मोदी, भाषणे ऐकावी पण वाटत नाहीत.
------------------------------------
तरीही तुमची वरची तुलना पटली नाही. ज्या दिवशी कोलकत्यात अपघात झाला त्या दिवशी ते अमेरिकेत होते. तिथून त्यांनी काल जसा शोक व्यक्त केला आणि जे मत व्यक्त केले तेच मत व्यक्त केले होते. अपघाताच्या दिवशीची बातमी -
https://www.ndtv.com/kolkata-news/pm-modi-expresses-shock-and-sadness-ov...
नंतर पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात त्या पुलाचं बांधकाम करणाऱ्या कंपनीने पूल कोसळणे हे देवाचे काम (पक्षी-ऍक्ट ऑफ गॉड) आहे असे म्हटले होते. त्याला उद्देशून हे ऍक्ट ऑफ गॉड नसून ऍक्ट ऑफ फ्रॉड आहे आणि असलाच काही मेसेज देवाचा तर तो असा कारभार करणाऱ्या सरकारला हटवण्याचा आहे असे मोदी म्हणाले.
-----------------------------------
अर्थात हि फक्त पार्शवभूमी, याने मोदींच्या त्या वाक्यातला फोलपणा कमी होत नाही. फक्त त्या पुलाच्या वेळी प्रतिक्रिया वेगळी, आता वेगळी असं चित्र निर्माण करणे चुकीचे आहे.

प्रसाद_१९८२'s picture

16 May 2018 - 10:03 am | प्रसाद_१९८२

निवडणूक प्रचारात बऱ्याच वेळेस काहीही बरळतात मोदी, भाषणे ऐकावी पण वाटत नाहीत.

--

अगदी सहमत !
मागे ABP MAZA च्या चर्चेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, "निवडणुक प्रचारा दरम्यान जो माणूस मोदींची भाषणे लिहितो त्याला 'पोकळ बांबू' ने फटकावले पाहिजे", इतकी त्यांची भाषणे निराधार असतात.

manguu@mail.com's picture

16 May 2018 - 1:15 pm | manguu@mail.com

हिणकस बोलून सारवासारव करण्यात काही लोक पटाईत असतात

दाभोलकरांच्या मृत्यूबाबतही त्यांना कर्माचे फळ मिळाले अशी वाक्ये लिहिली होती , नंतर सारवासारव केली

manguu@mail.com's picture

16 May 2018 - 9:58 am | manguu@mail.com

खूप वाईट शब्द वापरले आहेत मोडीजीनी. लोकांच्या मृत्यूचे राजकारण करणे , हे खूपच वाईट आहे.

कपिलमुनी's picture

16 May 2018 - 1:05 pm | कपिलमुनी

test

गब्रिएल's picture

17 May 2018 - 10:51 am | गब्रिएल

आसे म्हायतीविनाचे आकडे कश्ये शेंडी लावाय्ला वापर्तात ह्ये इतरांनी त्येंच्या परतिसादात लिवले हायेच. आनि आसं क्येला तर बाकी लोकं कपाटातली जुनी हाडे धडधडा बाहेर पाडतात आनि लईच पंचाईत व्हते रं बाबा !

जवापत्तूर कायदा वापरून काम व्हतंय तवापत्तूर कोनीबी फकस्तं 'आप्लं नुस्कान व्हतंय रे बाबा' म्हनून गळा काड्ला की लोकान्ला लै मज्जा येतीया रं बाबा !

हमाममे सबच नंगे है रं बाबा...

When Vajubhai Vala watched Deve Gowda dismiss BJP government in Gujarat ह्ये काय लईच कानुनी व्हतं का ?

इंदिराबाईंन्नी बिगरकाँग्रेसची लै सरकारं राष्ट्रपती व राज्यपालांना हाताशी पकडून घडधडा पाल्डी व्हती त्ये आटवतं का ?! त्ये तर जंक्शन गैरकानुनी व्हते रं बाबा !?

=)) =)) =))

निष्कर्ष : पक्षाध्यक्ष डोकं वापरणारा असला कि बरं पडत (कायद्याच्या चाकोरीत राहून सत्ताकारण करायला)

manguu@mail.com's picture

16 May 2018 - 1:28 pm | manguu@mail.com

कर्नाटकमध्ये भाजपाकडून जनता दल सेक्यूलरच्या आमदारांना १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कुमारस्वामी केला आहे. भाजपाकडे हा काळा पैसा येतो कुठून, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

बुधवारी कुमारस्वामी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर गंभीर आरोप केले. आमच्या आमदारांना १०० कोटी रुपये आणि मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्यांची ऑफर दिली जात आहे, असे कुमारस्वामींनी सांगितले. ते गरीबांचे सेवक असल्याचे सांगितले जाते. मग त्यांच्याकडे काळा पैसा कुठून येतो आणि आयकर विभागाचे अधिकारी काय करत आहेत, असा सवाल त्यांनी विचारला.

‘मी निकालावर समाधानी नाही. कर्नाटकात मोदी लाट नसून भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नाही. देशातील अन्य राज्यांमध्ये भाजपाने जे केले त्यानुसार कर्नाटकमध्ये त्यांना सत्तास्थापनेचा अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले. गोवा, मणिपूरमधील भाजपाच्या सत्तास्थापनेसंदर्भात ते बोलत होते. मी मुख्यमंत्रीपदाच्या मागे धावत नाही. पण आम्ही कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा ओलांडला आहे, असा दावा त्यांनी केला.

मला दोन्ही पक्षांनी ऑफर दिली होती. पण २००४ आणि २००५ मध्ये मी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने माझ्या वडिलांच्या राजकीय कारकिर्दीवर एक कलंक लागला. हा कलंक पुसण्यासाठीच मी काँग्रेससोबत जात आहे, असे कुमारस्वामी यांनी नमूद केले.

जेम्स वांड's picture

16 May 2018 - 1:41 pm | जेम्स वांड

हे नीट समजून घे की, हे

वरून कीर्तन आतून तमाशा आहे

हे न कळायला तू काय दुधखुळा नाहीस भावा. तुझं कौतुक केलं का तू काँग्रेसभक्ती करायला लागतो व्हय रं!

तर, १०० कोटी/आमदार दर कमी वाटल्यामुळे उघड मीडियात असली नैतिक बोंब उठवणाऱ्या कुमारस्वामींवर जनतेने कितपत विश्वास ठेवायचा हे जनतेला नीट कळते म्हणून तर त्यो तिसरा मोठा पक्ष झालाय. शेवटी काय कुमारस्वामी जास्तीत जास्त बोली लावणार माणसाकडे जाणार, असे नाहीतर तसे.

manguu@mail.com's picture

16 May 2018 - 2:43 pm | manguu@mail.com

एडीयुरप्पा उद्या शपथ घेणार

बिटाकाका's picture

16 May 2018 - 4:04 pm | बिटाकाका

घेऊ द्या हो, कुठे बहुमत आहे त्यांच्याकडे? उद्या घेतील आणि परवा राजीनामा देतील. काँगेस आणि जेडीएसला घाबरायचं काहीच कारण नाहीये हो.

manguu@mail.com's picture

16 May 2018 - 3:06 pm | manguu@mail.com

EVM problem मूळे हुबळीचा निकाल रद्द

मशीनाच्य क्षमतेपेक्षा 200 मते जास्त नोंदल्याचे आढळले

बिटाकाका's picture

16 May 2018 - 4:02 pm | बिटाकाका
डँबिस००७'s picture

16 May 2018 - 4:03 pm | डँबिस००७

काँग्रेसचे अध:पत्तन !!

'कर्नाटकच्या राज्यपालांनी काँग्रेस-जेडीएस आघाडीला सत्ता स्थापन्यासाठी आमंत्रण नाही दिलं तर कर्नाटकात रक्तपात होईल,' असा इशारा काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे कर्नाटमध्ये राज्यपाल कुणाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलावतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी हा इशारा दिला आहे. 'राज्यपाल संविधानिक मूल्यांचं पालन करत नसतील आणि आम्हाला सरकार स्थापन्यासाठी आमंत्रित करणार नसतील तर कर्नाटकात रक्तपात होईल,' असा इशारा आझाद यांनी दिला. काँग्रेसचे आमदार नाराज असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. असं काहीच नाही. उलट भाजपचेच आमदार असंतुष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. 'भाजपकडे बहुमताचा आकडा नाही. भाजपकडे केवळ १०४ आमदार आहेत. तर काँग्रेस-जेडीएसकडे ११७ आमदार आहेत. त्यामुळे राज्यपाल पक्षपाती होणार नाहीत, अशी आशा आहे,' असंही ते म्हणाले.

आणी हे म्हणतात काँग्रेस पक्ष म. गांधीजींच्या तत्वावर चालतात !!

देशात पुर्वी झालेल्या व होणार्या दंग्याच मुळे ईथेच आहे हे कळायला वेळ लागणार नाही !!

karnataka: काँग्रेसचे १२ आमदार बैठकीला गैरहजर

र्नाटकात कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यानं सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजपनं हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसने आज बोलावलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीला १२ आमदार गैरहजर राहिल्यानं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. त्याशिवाय चार आमदार गायब झाल्यानं या आमदारांना आणण्यासाठी काँग्रेसने हेलिकॉप्टर पाठविल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सर्वच राजकीय पक्षांनी आपल्याच संपर्कात आमदार असल्याचा दावा केल्याने या पक्षांनी आपआपल्या आमदारांवर वॉच ठेवला आहे. आज सकाळी काँग्रेसने नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती. यावेळी ७८ पैकी केवळ ६६ आमदाराच उपस्थित होते.

काँग्रेसने आज बोलावलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीला १२ आमदार गैरहजर राहिल्यानं काँग्रेस हादरलेली आहे !! आपल्या लोकांबद्दलच शंका आणी हे म्हणे राज्य चालवणार !

खेडूत's picture

16 May 2018 - 4:32 pm | खेडूत

'आकांक्षांपुढे जिथे गगन ठेंगणे’ या काव्य ओळींची आठवण यावी असे धाडस करण्यात आज चार आदिवासी विद्यार्थ्यांना यश आले आहे. जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणारा माउंट एव्हरेस्ट सर करण्यात आज मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.
.
या विद्यार्थ्यांचं अभिनंदन!!

बिटाकाका's picture

16 May 2018 - 4:47 pm | बिटाकाका

व्वा, मनपूर्वक अभिनंदन!!

प्रसाद_१९८२'s picture

16 May 2018 - 4:59 pm | प्रसाद_१९८२

विद्यार्थ्यांचं अभिनंदन!!

manguu@mail.com's picture

16 May 2018 - 5:04 pm | manguu@mail.com

छान

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 May 2018 - 8:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशासाठी अनेकानेक शुभेच्छा !!!

sagarpdy's picture

17 May 2018 - 11:58 am | sagarpdy

भारी. अभिनंदन.

गिर्यारोहण आणि त्यातही एव्हरेस्ट सर करणे ही काही खायची गोष्ट नाहीये. त्यातही आदिवासी-बहुल भागासारख्या पुरेशा संधी-सुविधांची कमतरता असलेल्या भागातील या मुलांनी जे अविरत परिश्रम घेतले आणि ध्येय जिद्दीने साध्य करून दाखवले, त्याला त्रिवार मुजरा! जियो! तुम्ही महाराष्ट्राचे नाव अजूनच मोठे केले आहे.

जेम्स वांड's picture

17 May 2018 - 4:03 pm | जेम्स वांड

हल्लीच स्पार्टाकस भाऊंच्या एवरेस्ट चढाई संबंधित लेखमाला वाचल्यामुळे ह्या पोरांनी काय भीमपराक्रम केलाय ते एकदम जाणवले, जियो, देव ह्यांना अजून खूप शिखरे सर करायची ताकद देऊ दे, ह्यांना कायम सेफ ठेऊ दे, हीच प्रार्थना.

जेम्स वांड's picture

17 May 2018 - 4:04 pm | जेम्स वांड

हल्लीच स्पार्टाकस भाऊंच्या एवरेस्ट चढाई संबंधित लेखमाला वाचल्यामुळे ह्या पोरांनी काय भीमपराक्रम केलाय ते एकदम जाणवले, जियो, देव ह्यांना अजून खूप शिखरे सर करायची ताकद देऊ दे, ह्यांना कायम सेफ ठेऊ दे, हीच प्रार्थना.

पिलीयन रायडर's picture

16 May 2018 - 5:42 pm | पिलीयन रायडर

खालची पोस्ट वाचनात आली. त्यातले आरोप सोडून दिले तरी आकडे खरे आहेत का? असे असेल तर नक्की कोण सत्तास्थापन करू शकतो? कुणाला राज्यपाल आधी बोलावतात?

*Goa (March 2017)*
Assembly Strength - 40.
Congress - 17.
BJP - 12.

BJP was invited to form the Govt by Governor in a post poll coalition BJP+MGP+GFP.
-------------------------------------

*Manipur (March 2017)*
Assembly Strength - 60.
Congress - 28.
BJP - 21.

BJP was invited to form the Govt by Governor in a post poll coalition.

_(So much so, 1 independent MLA was detained at Imphal Airport through security agencies & handed over to BJP.)_
-------------------------------------

*Meghalaya (March 2018)*
Assembly Strength - 60.
Congress - 21.
BJP - 2.

BJP was invited to form the Govt by Governor in post poll coalition with NPEP+UDP+PDF+HSDPDP.

-------------------------------------

*Karnataka (May 2018)*

Assembly strength - 224 (222 elections held)
Congress + JDS - - > 78 + 38 = 116
BJP - 104

Inspite of Post poll coalition of Congress and JDS having enough number surpassing the half way mark was not invited to form the Government.

On the other hand BJPee was given a week's time to prove the strength in floor test in a weeks time. On the basis of single largest party.

Now this is Called DEATH OF DEMOCRACY...
Vala is facilitating Kharidanewallas.

अभिदेश's picture

16 May 2018 - 5:46 pm | अभिदेश

अजून कोणालाच बहुमत सिद्ध करायला सांगितलेले नाही , आणि हे एकांगी आहे. आधी बरेच दाखले आहेत जिथे राज्यपालांनी / राष्ट्रपतींनी सर्वात मोठ्या पक्षाला आधी आमंत्रित केलं आहे.

अनुप ढेरे's picture

16 May 2018 - 6:14 pm | अनुप ढेरे

गोव्यात काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केला नव्हता भाजपाच्या आधी. भाजपाने केला. राज्यपालांनी भाजपला बोलावलं हा मोठा फरक आहे.
आणि ही उदाहरणं गेल्या दोन वर्षातली आहेत. गेल्या वीसेक वर्षातली पाहिली तर कोंग्ग्रेसने जे अनेक वर्ष केलं त्याचीच फळं मिळत आहेत आता त्यांना.

हे एक.

पिलीयन रायडर's picture

16 May 2018 - 7:07 pm | पिलीयन रायडर

नाही म्हणजे प्रश्न असाय की नक्की कायदा काय म्हणतो? मोठा पक्ष आधी जाणार की जो दावा करणार स्वतःच जाऊन त्याला संधी मिळणार? तसा काही कायदा नसेल तर असायला हवा ना? (आणि मोठ्या पक्षाला आमंत्रण जायला हवे असे माझे मत. भाजप ला टुकार मतं पडली तरी अनेक राज्यात सत्ता आहे. किंवा काँग्रेसनेही हे केले असेलच. पण जनादेश बघता मोठ्या पक्षाला संधी मिळायला हवी.)

शाम भागवत's picture

16 May 2018 - 7:48 pm | शाम भागवत

मोठ्या पक्षाला किंवा निवडणूक पूर्व आघाडीला. तरीपण सर्व प्रकारच्या शक्यता विचारात घेऊन १००% लिखीत घटना बनवणे अवघड आहे.

हाच विषय मायबोलीवर चालू आहे. काय हाॅरिबल भाषा वापरताहेत. मिपा खरच खूप गुणी आहे.

पिलीयन रायडर's picture

16 May 2018 - 8:12 pm | पिलीयन रायडर

आपल्याकडे नुकताच दंडुका दाखवलाय ;)

गामा पैलवान's picture

16 May 2018 - 9:06 pm | गामा पैलवान

शाम भागवत,

मुद्देसूद व संयत शब्दांत प्रतिवाद करणाऱ्या सदस्यांना हाकलून दिल्यावर भाषेची पातळी कशी होते त्याचं ज्वलंत उदाहरण आहे ते. तिथल्या लोकांची काय लायकी आहे ते जगजाहीर आहे. मात्र अशीच लोकं कुंपणावरच्या मतदारास मोदींकडे ढकलतात. त्यामुळे जे चाललंय ते चांगलंय.

आ.न.,
-गा.पै.

विशुमित's picture

16 May 2018 - 9:58 pm | विशुमित

आपल्या कडे पण आता चांगले चाललंय...!

mayu4u's picture

17 May 2018 - 10:20 am | mayu4u

गा पै अजून आहेत की इथं!

ह घ्या हो पै!

अनुप ढेरे's picture

16 May 2018 - 8:10 pm | अनुप ढेरे

नाही म्हणजे प्रश्न असाय की नक्की कायदा काय म्हणतो?

माझ्या माहितीप्रमाणे घटनेत असा कोणताही नियम नाही की अमुक एका सिक्वेंसने बोलवाले म्हणुन. त्यामुळेच ही लफडी उद्भवतात. प्रत्येक राष्ट्रपती (केंद्र सरकारसाठी)/राज्यपाल आपापले निर्णय घेतात.

अनुप ढेरे's picture

16 May 2018 - 8:10 pm | अनुप ढेरे

*बोलवावे

ट्रेड मार्क's picture

16 May 2018 - 8:10 pm | ट्रेड मार्क

जर बहुमत असेल तर प्रश्नच नाही. पण बहुमत नसेल आणि नुसताच मोठा पक्ष असेल पण बहुमत मिळण्यासाठी लागणारा पाठिंबा जमा करू शकत नसेल तर काय उपयोग?

उदाहरणासहित बघू -

मणिपूर (६० सीट्स) - काँग्रेस २८ सीट्स आणि भाजप २१ सीट्स. पण निकाल लागल्याबरोबर भाजपने बाकीच्या छोट्या पक्षांचा पाठिंबा असल्याचं पत्रक देऊन सत्तेसाठी आधी अर्ज केला. आता गव्हर्नरच्या दृष्टीने काँग्रेस २८ आणि भाजप+इतर मिळून ३२ सीट्स होतात. मग सगळ्यात मोठी बाजू कुठली झाली? एकदा इतर पक्षांनी लिखित पाठिंबा दिल्यावर जर ते गट बदलून काँग्रेस कडे गेले तर नियमाप्रमाणे त्यांची निवड रद्द होते आणि त्या सीट साठी परत निवडणूक होते (हा नियम असाच आहे का यावर तज्ज्ञ प्रकाश टाकू शकतील). मग या परिस्थितीत जरी गव्हर्नरांनी मोठा पक्ष म्हणून काँग्रेस ला बोलावलं तरी ते बहुमत कसं सिद्ध करणार?

या ठिकाणी सविस्तर माहिती आकडेवारीसकट दिलेली आहे.

या वेळेला काँग्रेसने हुशारी दाखवून आधीच जेडीपी बरोबर हातमिळवणी केली. पण त्यातही एक गडबड करून बसले. तिसऱ्या नंबरवर असलेल्या पक्षाच्या सदस्याला मुख्यमंत्रीपद देण्याचं मेनी केलं. म्हणजेच स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांना डावललं गेल्याची भावना होणं आणि सगळ्यात मोठा पक्ष असूनही दुय्यम भूमिका स्वीकारायला लागल्याचं दुःख होणं स्वाभाविक आहे. एकूणच काँग्रेसमध्ये सत्ता एका व्यक्तीभोवती एकवटल्यामुळे हा निर्णय घेताना स्थानिक नेत्यांना कितपत विश्वासात घेतलं गेलं असेल याबद्दल शंकाच आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात सत्ता स्थापन होईपर्यंत बऱ्याच गमतीजमती बघायला मिळतील असं वाटतंय.

हा प्रकार काँग्रेसनेही आधी बऱ्याच वेळेला केलेला आहे (म्हणून भाजपने करावा असं नाही आणि त्याचं समर्थनही करत नाहीये) पण आपली कर्म फिरून आपला पाठपुरावा करतात हे परत एकदा खरं ठरतंय.

पिलीयन रायडर's picture

16 May 2018 - 8:14 pm | पिलीयन रायडर

हम्म..

पण हे काही बरोबर नाही. आता फोडाफोडी सुरू होईल.

ट्रेड मार्क's picture

16 May 2018 - 8:44 pm | ट्रेड मार्क

फोडाफोडी करावी लागेलच असं नाही. कारण बहुमत मिळवूनही तिसऱ्या नंबरच्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री करणे ज्या काँग्रेसवाल्यांना पटणार नाही ते आपोआपच फुटतील. काठावर असलेल्यांना खेचायला (फोडायला) थोडेफार प्रयत्न करायला लागतील. पण मला तरी असं वाटतंय की काँग्रेसने हे चुकीचं पाऊल उचललं. कुमारस्वामींना उपमुख्यमंत्रीपद देणं ठीक आहे, पण स्वतःला कमीपणा घेऊन त्यांना मुख्यमंत्री करणे हे अगतिकता दर्शवते. ना तुला ना मला, घाल....... तिसऱ्यालाच या म्हणीचा प्रत्यय आला.

काँग्रेसचा उद्देश स्वतः जिंकावे किंवा सत्ता मिळवावी असा दिसत नसून फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे एवढाच दिसतोय. त्यामुळे आणि नेतृत्व तेवढे कर्तृत्ववान नसल्याने काँग्रेस भरकटत असावी.

पिलीयन रायडर's picture

16 May 2018 - 9:40 pm | पिलीयन रायडर

बरोबर, भाजपला लांब ठेवणे हा एकच हेतू आहे. भाजप वाले सहजा सहजी हे होऊ देतील असं वाटत नाही. (जस्ट अंदाज, मला फार कळत नाही ह्यातलं!)

बिटाकाका's picture

16 May 2018 - 8:15 pm | बिटाकाका

भाजपला निमंत्रण मिळालंय बहुतेक!
--------------------
कायदा असा काहीच नाहीये हाच मूळ प्रॉब्लेम आहे. वरील उदाहरणे फक्त एक बाजू दाखवतात. दिल्ली, झारखंड, जम्मू काश्मिर आणि वर सांगितलेली उदाहरणे आहेतच.
--------------------
भाजपने या केसमध्ये दावा करू नये असे मनापासून वाटते. हे सरकार किती आणि कसं चालतं हे बघायला हवं पण दुसऱ्या बाजूला असंही वाटतं कि सगळ्यात कमी जागा मिळालेल्या पक्षाचा मुख्यमंत्री फक्त राजकीय फायद्यासाठी आणि भाजपच्या विरोधासाठी होऊ देणे ही लोकशाहीची विटंबना होत असताना भाजपने नैतिकता कशाला कुरवळावी? काँग्रेसचा मुख्यमंत्री आणि जेडीएसचा पाठिंबा हे परफेक्ट कॉम्बिनेशन झालं असतं.
--------------------
जर भाजपकडे बहुमत नाही असा जेडीएस काँग्रेसचा दावा आहे तर मग डर कायेका? भाजप तोंडावर पडेलच!!

विशुमित's picture

16 May 2018 - 8:35 pm | विशुमित

<<,हे सरकार किती आणि कसं चालतं हे बघायला हवं पण दुसऱ्या बाजूला असंही वाटतं कि सगळ्यात कमी जागा मिळालेल्या पक्षाचा मुख्यमंत्री फक्त राजकीय फायद्यासाठी आणि भाजपच्या विरोधासाठी होऊ देणे ही लोकशाहीची विटंबना होत असताना भाजपने नैतिकता कशाला कुरवळावी? काँग्रेसचा मुख्यमंत्री आणि जेडीएसचा पाठिंबा हे परफेक्ट कॉम्बिनेशन झालं असतं.>>
==>> सहमत.
हरीश साळवे यांचे पण काल या प्रकारचंच मत व्यक्त केले होते.

पिलीयन रायडर's picture

16 May 2018 - 10:09 pm | पिलीयन रायडर

बहुमत सिद्ध होण्याआधी शपथविधी कसा काय होऊ शकतो पण? आणि बहुमत सिद्ध करायला वर 15 दिवस देणार. हे भाजप साठी अति सोयीस्कर नाही होते का?

काँग्रेस आणि जेडीसचं अजून नक्की होईना म्हणून असं होतंय का?

बिटाकाका's picture

16 May 2018 - 10:37 pm | बिटाकाका

नाही, नियमच तसा आहे. कलम ३५६ नुसार, राज्यपाल त्यांच्या विवेकानुसार सरकार तयार करू शकेल अशा पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री नेमतात. जर त्या नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बहुमतावर कुणाला संशय असेल तर राज्यपाल बहुमत सिद्ध करायला सांगतात. बहुमत हे फक्त विधानसभेतच (पक्षी फ्लोअरवरच) सिद्ध करणे गरजेचे आहे आणि माझ्या माहितीनुसार विधानसभा ही फक्त सरकार स्थापन झाल्यावरच बोलवता येते. मग एकतर मुख्यमंत्री विश्वासदर्शक ठराव आणतात किंवा विरोधक अविश्वास प्रस्ताव आणतात. या केसमध्ये विश्वासदर्शक ठराव येईल.
-------------------
भाजप आमदार फोडून स्वतःला जोडू शकणार नाही कारण काँग्रेस व जेडीएस व्हिप काढतील. त्यानुसार आमदारांना त्यांच्या पक्षाला मतदान करणे बंधनकारक ठरेल. पण आमदार गैरहजर राहू शकत असल्याने भाजप त्यादृष्टीने प्रयत्न करेल. सद्यस्थितीत भाजपकडे १०४ संख्याबळ असल्याने ते २०९ च्या सभागृहात बहुमत सिद्ध करू शकतात. म्हणजेच कमीत कमी १३ आमदार गैरहजर राहणे गरजेचे आहे.
-------------------
एकदा बहुमत सिद्ध झाले की परत सहा महिने बहुमत सिद्ध करायची गरज नसते. त्यामुळे भाजपला एकदा सिद्ध केले की फोडाफोडी/जुळवाजुळवी/घोडेबाजार करायला सहा महिने मिळू शकतात.
-------------------
चुकभुल देणे घेणे, काही चुकीचे असल्यास दुरुस्ती करावी.

पिलीयन रायडर's picture

16 May 2018 - 10:52 pm | पिलीयन रायडर

अच्छा! हे माहिती नव्हतं!

अर्धवटराव's picture

16 May 2018 - 11:12 pm | अर्धवटराव

तुम्ही अगदी नेमका प्लॅन सादर केला :ड
उ.प्र. मधे कल्याणसींग सरकारचे वेळी हि असली नाटकं खुप झाली होती.

जेम्स वांड's picture

17 May 2018 - 8:14 am | जेम्स वांड

विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रेस्पॉंसीबीलिटी!

रात्रभर कोर्ट चालवून भाजपने फक्त आपली प्रतिमा डागळुन घेतलीये, सत्ता (तूर्तास) सोडली असती तरी ही युती येत्या वर्षभरात किंवा दीड वर्षात तुटलीच असती (बिहारचे उदाहरण). आता मात्र जरा वेगळंच विचित्र वाटलं.

बिटाकाका's picture

17 May 2018 - 10:12 am | बिटाकाका

एकमेव गोष्टीमुळे या प्रकारात भाजपचं समर्थन करावं वाटतंय ते म्हणजे कुमारस्वामींचं मुख्यमंत्री होणं. २०१ पैकी फक्त ३८ जागा जिंकणार्यांना विनाशर्त मुख्यमंत्री बनवणे हे अजिबात पटले नाही. काँग्रेसने स्वतःचा मुख्यमंत्री बनवला असता, वाटाघाटी केल्या असत्या तर गोष्ट वेगळी होती. कसंही करून भाजपला बाहेर बसवायचंय हे जर नैतिक असेल तर काहीही करून भाजपने सत्तेत येणंही (दुर्दैवाने) नैतिक म्हणावं लागेल.
------------------------------------
या संपूर्ण सत्ताकारणाच्या गोंधळात कोणीही काहीही संविधानाच्या बाहेरचं करत नाही त्यामुळे प्रत्येकजण आपण कसं बरोबर आहोत हे सांगत सुटला आहे. विचित्र आहे हे सगळं.
------------------------------------
२०१९ मध्ये काँग्रेस जेडीएस एकत्र लढण्याच्या शक्यतेला गृहीत धरून भाजपने कर्नाटकची सत्ता सोडणे परवडणार नाही हे ताडले असावे. २०१९ च्या निवडणुकीआधी पॉप्युलर निर्णय घेऊन प्रभाव पाडता येईल वगैरे विचार असेल.

manguu@mail.com's picture

17 May 2018 - 11:05 am | manguu@mail.com

एकदा युती झाली की कुणाचा का करेनात मुख्यमंत्री

बिटाकाका's picture

17 May 2018 - 11:43 am | बिटाकाका

मंग तेच तर म्हणतोय, भाजपने पण काय पण करुदेकी कायद्यात राहून, काय फरक पडतोय.
-----------------------------
काँग्रेसचे १२ आमदार या अशा आघाडीने नाराज आहेत. ते कोणाच्या बाजूने आहेत हे विधानसभेत बहुमताच्या वेळी कळेल तोपर्यंत वाट बघायला पाहिजेकी!

अर्धवटराव's picture

17 May 2018 - 6:32 pm | अर्धवटराव

फक्त ३८ जागा जिंकणार्यांना विनाशर्त मुख्यमंत्री बनवणे हे अजिबात पटले नाही.

सरकारच्या स्टेबिलिटीबद्दल हे लॉजीक असेल तर ठीक. अन्यथा या न्यायाने तर मग राज्यसभा/विधानपरिषदच्या सदस्याने मंत्रीमंडळात यायलाच नको.

बिटाकाका's picture

17 May 2018 - 7:07 pm | बिटाकाका

काही कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे ते (किंवा मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला कळले नाही). २०१ जागांवर जनतेसमोर जाऊन ज्याला ३७ जागा मिळालेल्या त्याला जनतेने नाकारले आहे हे उघड आहे. जनादेश भाजप, काँग्रेस आणि मग जेडीएस असा आहे. भाजपला सरकार स्थापता येत नसेल, जोडाजोडी करता येत नसेल तर दुसरा पर्याय हा काँग्रेसच असायला हवा ना या परिस्थितीत?
----------------------------------
विधानपरिषद किंवा राज्यसभा सदस्यांचा निवडीचा मार्ग आणि गरज आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, त्याचा इथे काय संबंध तेही कळले नाही.

manguu@mail.com's picture

17 May 2018 - 7:29 pm | manguu@mail.com

पण युती झाली की दुसरा व तिसरा हे एकत्र मिळून पहिल्यापेक्षा मोठे होतात.

तुमचे लॉजिक लावायचे तर गोवा, बिहार, मणिपुरातून भाजपाने तोंड काळे करायला हवे.

बिटाकाका's picture

17 May 2018 - 10:07 pm | बिटाकाका

उगाच सेन्सेशनल वक्तव्य करण्यापेक्षा गोवा/मणिपूर/बिहार (नक्की बिहार?) आणि कर्नाटक यात काय साम्य यावर बोला. तुम्ही म्हणता त्या राज्यांमध्ये काँग्रेसने सरकार स्थापनेचा दावा केला होता का? दोन पैकी एक निवड झाली की एक पैकी एक याची माहिती असेल तर द्या. मुळात स्वतः दावा केला नाही कारण तशी जुळवाजुळवच करता आली नाही.

अर्धवटराव's picture

17 May 2018 - 8:02 pm | अर्धवटराव

सर्वात कमि सदस्य निवडुन आलेल्या पार्टीला मुख्यमंत्रीपद देऊ नये असं जर लॉजीक असेल तर जो व्यक्ती प्रत्यक्ष लोकांमधुन निवडुनच आला नाहि (विधान परिषद/राज्यसभा ) त्याला सरकारमधे काहिच स्थान असुन नये. विधानसभा/लोकसभेच्या सदस्यांनी निवडुन दिलेल्या राज्यसभा/विधानपरिषद सदस्याला जर सरकारी उच्चपद भुषवता येत असेल तर त्याच सदस्यांनी ठरवलेला, अल्प निर्वाचीत सदस्य असलेल्या पार्टीचा का असेना, व्यक्ती मुख्यमंत्री होण्यात काहिच जैर नाहि.

बिटाकाका's picture

17 May 2018 - 9:58 pm | बिटाकाका

असो, तुमचा माझा मुद्दा वेगळा आहे त्यामुळे अजून मत मांडत नाही.

ट्रेड मार्क's picture

17 May 2018 - 9:12 pm | ट्रेड मार्क

रात्रभर कोर्ट चालवून भाजपने फक्त आपली प्रतिमा डागळुन घेतलीये

भाजप का बरं कोर्टात जाईल? त्यांना पाहिजे तसा निकाल गव्हर्नरांनी दिला आहे. इथे पूर्ण बातमी वाचा. प्रत्येक वेळी फक्त भाजप/ मोदी/ शहा यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून काय होणार आहे?

लगेच दुसऱ्या दिवशी शपथविधी ठरला म्हणून काँग्रेस/ जदसे यांनी पळापळ करून कोर्टात शपथविधी थांबवण्यासाठी अर्ज केला व मध्यरात्री कोर्ट चालवून शपथविधी थांबवावा अशी मागणी केली.

आता यात गोम अशी आहे की बहुमत सिद्ध करायचं तर ते फक्त विधानसभेत होऊ शकतं. विधानसभा कोण बोलावू शकतं? तर ते फक्त मुख्यमंत्री करू शकतात . म्हणजे कुठलाही पक्ष जर बहुमत करू इच्छित असेल तर मुख्यमंत्री असणं आणि त्यासाठी शपथविधी होणं आवश्यक आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने तसेही कोर्ट त्यांच्या निर्णयात ढवळाढवळ करू शकत नव्हते. मग काँग्रेसने एवढी पळापळ करून काय मिळवलं काय माहित? त्याऐवजी तीच ताकद त्यांनी भाजपला बहुमत सिद्ध करता येऊ नये यासाठी वापरली असती तर? इथे त्यांचेच काही आमदार सापडत नाहीयेत म्हणून आरडाओरडा चाललाय. थोडक्यात काय काँग्रेसला कळत नाहीये काय चाललंय आणि त्यांची पुढची चाल काय असावी हे पण ते ठरवू शकत नाहीयेत.

वर पिरा म्हणल्याप्रमाणे १५ दिवस बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्त वाटत आहेत. तर त्यावर आक्षेप घेता येतो का ते बघायला पाहिजे होतं. जर १५ दिवसाचा कालावधी कमी करता आला असता तर तेवढाच वेळ भाजपाला आमदार गोळा करण्यासाठी कमी मिळाला असता.

बादवे मिस्टर वांड, तुमचे माहितीचे स्रोत कोणते आहेत? जरा कुतूहल वाटलं म्हणून विचारतोय.

गामा पैलवान's picture

16 May 2018 - 9:11 pm | गामा पैलवान

ट्रेड मार्क,

काँग्रेसचा उद्देश स्वतः जिंकावे किंवा सत्ता मिळवावी असा दिसत नसून फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे एवढाच दिसतोय. त्यामुळे आणि नेतृत्व तेवढे कर्तृत्ववान नसल्याने काँग्रेस भरकटत असावी.

काँग्रेसचं नेमकं उद्दिष्ट काय असा प्रश्न उपस्थित होतो. जर जदसेशी युतीच करायची होती तर परस्परविरोधांत निवडणूक लढवलीच कशाला? निवडणूकपूर्व युती केली असती तर आज मतांच्या टक्केवारीत काँग्रेस + जदसे मिळून ५६ % मतं मिळाली असती. यांपुढे ३६% मतं मिळवणारा भाजप पालापाचोळ्यासारखी उडून गेला असता. पण लक्षांत कोण घेतो! तुम्ही म्हणता तशी नेतृत्वाचं कर्तृत्व कमी पडंत आहे.

आ.न.,
-गा.पै.

ट्रेड मार्क's picture

17 May 2018 - 1:43 am | ट्रेड मार्क

जर काँग्रेस आणि जदसे यांनी आधीच युती केली असती तर भाजपाला निवडणूक फारच जड गेली असती. पण त्यासाठी तेवढा दूरदर्शीपणा असलेले नेतृत्व पाहिजे. आता सुद्धा काँग्रेस अध्यक्ष कुठे गायबलेत कोण जाणे. बहुतेक निवडणुकीनंतरच्या श्रमपरिहाराला गेले असावेत, तशी घोषणा त्यांनी आधीच करून ठेवली होती.

गडबड अशी आहे की, सध्याचे काँग्रेस अध्यक्ष स्वतःहून कोणाशी युती करायला जात नाहीत. दुसऱ्या कोणी यांच्याबरोबर युती करायची म्हणलं तर त्यांना काँग्रेसच्या नेतृत्वावर विश्वास नाही. आपण निवडणूक का हरतोय हे सुद्धा कदाचित काँग्रेस नेत्यांना कळत नसेल मग त्याची कारणमीमांसा करून, चुका दुरुस्त करून पुढे कसा विजय मिळवता येईल याची रणनीती कोण, कधी आणि कशी ठरवणार? इथे तर युवराज सुट्टीवर गेलेले दिसतात. दुसऱ्या कोणी ठरवली तरी युवराज ती रणनीती मानतीलच याची काय खात्री?

असं ऐकिवात आहे की मायावतींनी काँग्रेसला जदसे बरोबर युती करायचा आणि कुमारस्वामींना मुख्यमंत्री करायचा सल्ला दिला आणि एक से एक अनुभवी नेते असलेल्या काँग्रेसने तो जसाच्या तसा मानला. तरी मायावतींच्या पक्षाची एक सीट निवडून आलीये, नशीब त्याला मुख्यमंत्री करा असं म्हणत नाहीयेत.

नेतृत्वचं कमी डोक्याचे आहे,
मुख्य शत्रु भाजप आहे हे माहित असून देखील व त्रिशंकु विधानसभेचे संकेत असुनदेखिल युवराज पंतप्रधान बनण्याचे शेखचिल्ली स्वप्न पहात होते आणि जाहिर ही करत होते .
अशा माणसाला आपल्या डोक्यावर घेऊन नाचने कोणता पक्ष स्विकारेल , जर कोंग्रेसचा मुख्यमंत्री ही संकल्पना घेऊन जेडीएस कड़े गेले असते तर तिथेच वाटान्याच्या अक्षता मिळाल्या असत्या. कारण पुढे लोकसभा निवडणुकात कोंग्रेसने तड़जोड केली नसती वर सुधारणाचे गाजर कन्नडिगाना दाखवून आमच्या मुख्यमंत्रयाने केले असे ढोल बडवले असते

manguu@mail.com's picture

17 May 2018 - 12:24 pm | manguu@mail.com

पूर्वी भाजपे 2- 3 अशाच जागा जिंकायचे , तेंव्हा त्यांचे लोक पंतप्रधानपदाची स्वप्ने बघत नव्हते का ?

संघ 1925 , जनसंघ असेच कधीतरी 1951 , भाजप 1980 ..... ह्यांनाही स्वप्ने बघायचा अधिकार होताच की

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 May 2018 - 1:16 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

काँग्रेसने ताबडतोब नेतृत्व बदल केला पाहिजे असे ह्यांचे मत. काँग्रेस पक्षात नेत्यांची संख्या जास्त आहे.पूर्वी जो काही सहकारी चळवळ्, बॅन्का,जिल्हा परिषद.. पाय होता तो जवळपास संपुष्टात आला देशभरात.. राहूल ह्यांच्या आजुबाजुचे लोक नेते कमी व खुषमस्करे जास्त अहेत. पाया मजबूत होत नाही तोवर फरक पडणार नाही.

अजूनही अधक्षमहोदय धडा घ्यायला तयार नाहीत. कर्नाटकमध्ये जे चालू आहे ते फक्त पाकिस्तानात होते म्हणे. अजूनही हे महोदय, भाजप/संघ दलितविरोधी आहे आणि वेमूला सारख्यांना वर येऊ देत नाही यातच गुरफटलेले आहेत.
-----------------------
तसंही माई, तुमच्या मते कोण आहेत काँग्रेसमधले अध्यक्ष होण्याच्या लायकीचे नेते?

आनन्दा's picture

18 May 2018 - 6:54 am | आनन्दा

युवराज नाहीत ते आता.

साहना's picture

17 May 2018 - 1:52 pm | साहना

JDS आणि काँग्रेस ह्यांत विस्तव जात नाही. कर्नाटकातील बहुतेक लोकांना हे ठाऊक आहे. आता सुद्धा काँग्रेस ने सपशेल लोटांगण घेऊन JDS ला बिनशर्त पाठिंबा दिला आहे म्हणून निर्ल्लज पणे कुमारस्वामी घोड्यावर बसू पाहत आहेत पण हाच निर्ल्लज पणा आधी दाखवला असता तर लोकांनी त्यांना काळे फासले असते.

JDS काँग्रेस युती म्हणजे शरद पवार आणि शिवसेना युती इतकीच अशक्य गोष्ट आहे.