रामराम!
आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे नवा धागा काढला आहे!
आजची एक बातमी:
मुलाला मोठा इंजिनिअर करण्याचं स्वप्न बाळगून पालकांनी आपल्या पाल्यांना इंजिनिअरिंगमध्ये 'टाकायला' सुरुवात केली. मधल्या काळात या विद्यार्थ्यांचा आकडा बराच वाढला होता. पालकवर्गाच्या वाढत्या उत्साहामुळे महाविद्यालयंही पत्त्यांसारखी उभी राहिली. मात्र आता हा उत्साह ओसरलेला दिसत असल्याने इंजिनिअरिंगच्या जागाही रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयांची चांगलीच अडचण झाली आहे.
2016 - इंजिनियरिंगच्या 43 टक्के जागा रिक्त
2017- इंजिनियरिंगच्या 44 टक्के जागा रिक्त
2018- इंजिनियरिंगच्या 40 टक्के जागा रिक्त
ही घसरगुंडी महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंग महाविद्यालयांची आहे. गेल्या चार ते पाच वर्षात राज्यात कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी कॉलेजेस उगवली. विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगची स्वप्नं दाखवली गेली. पण इंजिनियरिंगकडे वाढलेला ओढा आता आटला आणि अनेक महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली.
महाराष्ट्रात सध्या 360 इंजिनियरिंग कॉलेज आहेत, तर 447 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. 2017 साली एक लाख 44 हजार जागांपैकी 64 हजार 625 जागा रिक्त राहिल्या, तर 2018 साली एक लाख 38 हजार जागांपैकी 56 हजार जागा रिक्त राहिल्या. दरम्यान, फार्मसी म्हणजेच औषधनिर्माणशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं दिसत आहे.
इंजिनियरिंगमधील घसरणीचं मूळ हे कॉलेजच्या बाहेर आहे, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मिळणाऱ्या अपुऱ्या संधींमध्ये आहे. पण या स्थितीवर सरकारने तूर्तास काही उपाययोजना आखलेल्या आहेत
नव्याने सुरु होणाऱ्या इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांना स्थगिती देण्याची विनंती एआयसीटीईला करण्यात आली आहे. ज्या खाजगी संस्थांनी इंजिनियरिंग कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी अभ्यासक्रमात बदल करुन प्रात्यक्षिकांवर भर देऊन व्यवसायाभिमुख शिक्षणाला भर दिला जाणार आहे.
प्रतिक्रिया
सध्याच्या ट्रेंडनुसार निकाल.
भाजपा : ११२
कॉंग्रेस : ०६६
जेडीएस : ०४२
देणाऱ्या पोरांना 'तलाठी भरती' चे फॉर्म सुटायची आस लागणे दुर्दैवी होय
बिचारा NDTV !! खुप यातना होठ असतील!!
रविश कुमारच तोंड पडलेल आहे !
भाजप काठावर पास. सहिष्णू पक्षांचा नैतिक विजय. २०१९ ला भाजप चा पराभव निश्चित.
मतदानयंत्रात घोटाळे केल्यामुळेच भाजप विजयी :)
इव्हीएम मशीन, खोटे/बनावट मतदार यांची कंबक्ती भरली म्हणायची.
(त्याला नका जावु द्या रे प्रचाराला जिथे निवडणुक असते तिथे.......दरवेळेस असच कायतरी रिझल्ट आणतयं तोंडावर पाडुन)
भाजप : १२०
कॉंग्रेस : ०५९
जेडीएस : ०४१
---
तथाकथित निधर्मांध व पुरोगाम्यांच्या तोंडावर हि चा
लिंगायत समाजाला वेगळ्या धर्म बनवण्याचा कॉंंग्रेसचा प्रयत्न फेल गेलाय !!
कसलीही कारणे न देता मोदींचे या निखळ यशाबद्दल अभिनंदन.
भाजप काठावर पास. सहिष्णू पक्षांचा नैतिक विजय. २०१९ ला भाजप चा पराभव निश्चित. ===
2019 ला कॉंग्रेस निश्चित !!
भाजपचे अभिनंदन !
विजय हा विजय असतो.
काँग्रेसने नेतृत्वाबद्दल गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे किंवा हा २०१९ काँग्रेसचा अंत असेल .
असे झाले तर भारतात १९५२ - ७७ जसा कालखंड होता ( सबळ राष्ट्रीय विरोधी पक्ष) तसा काल्खंड येइल .
कपिलमुनी,
या विधानात गडबड झालेली वाटते. काँग्रेस जर २०१९ साली नामशेष झाली तर सबळ विरोधी पक्ष कोणता?
आ.न.,
-गा.पै.
भारतात १९५२ - ७७ जसा कालखंड होता ( सबळ राष्ट्रीय विरोधी पक्ष नसलेला) तसा कालखंड येइल .
असे वाचावे.
भारतात १९५२ - ७७ जसा कालखंड होता ( सबळ राष्ट्रीय विरोधी पक्ष नसलेला) तसा कालखंड येइल .
अश्या कालखंडाच स्वागत च होईल !! धर्माधारीत , जातीमध्ये देशाला वाटण्या ऐवजी देशाला विकासच्या दिशेला नेण्यासाठी ह्याची नितांत गरज आहे. श्री मोदीजी अजुन १५ वर्ष पं प्र असु देत, भारताची विजय पताका जगात फडकु दे !!
कर्नाटक निवडणुकांचा धागा थंड का पडलाय?
निकालांचा वेगळा धागा येणार का?
कर्नाटकातल्या लिंगायत, मुस्लिम व दलित या तीन समूहाचा कल निश्चित कोणाकडे झुकेल ते माहित नव्हतं. मात्र या तिघांनी भाजपला दिलेला कौल स्पष्ट आहे :
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/karnataka-elections-2018-bjp-gains-massive-lead-in-lingayat-dominated-seats/articleshow/64170396.cms
लिंगायतांना अल्पसंख्य म्हणून वेगळा दर्जा द्यायचा काँग्रेसी विभाजनवादी बनाव कुणाच्यातरी थोबाडावर सणकून आपटून पार फुटला आहे.
-गा.पै.
लिंगायत सामाज्याने आपल्या "येडियुरप्पासाठी काही पण" हे ट्रम्प कार्ड खेळलेले दिसतंय. आणि लिंगायत समाजाची भीती दाखवून 'हिंदू खतरे मे' ही भाजपची चाल यशस्वी ठरली आहे असा माझा प्राथमिक अंदाज आहे. (बेळगावच्या एका मित्राकडून साभार).
बाकी सविस्तर विश्लेषण उद्या पेप्रात वाचायला मिळेलच.
कर्नाटकात भाजपाच सत्तेवर येणार असे दिसते आहे. राहूल गांधीनी कर्नाटकात जेथे जेथे सभा घेतल्या तेथे काँग्रेस पिछडीवर आहे..
राज ठाकरे ह्यांनी 'ई.व्ही.एम.' चा विजय असो असे म्हंटले आहे. मग जिकडे काँग्रेस जिंकत आहे व्व जिंकणार आहे, त्या मतदारसंघांबद्दल काय? की तिकडे विजय काँग्रेचा?
.
एकदा विश्वेश्वरैया नाय बोलता आलं म्हणुन कोणी असं करत व्हय ??............(नाव सांगायची गरज आहे का?)
मोडिविरोधी हुकमी एक्के नाही आले अजून !
विश्लेषण करत असतील बहुतेक
मोडिसमर्थक हुकमी एक्के पण नाही आले अजून !
===
चिल्ल्ड झाले असतील बहुतेक.
मोदी विरोधकांना नथीतून तीर मारणे?
का
आपली भाजप जिंकते आहे त्याचा आनंद साजरा करणे?
का
निव्वळ मोदींविरोधक म्हणून कोणाला किंवा कोण्या समूहाला वैयक्तिक टार्गेट करणे?
काहीतरी सकारात्मक काँट्रिब्युट करा की राव.
असल्या वैयक्तिक होण्यानेच भाजप अन पर्यायाने मोदींजींना कमीपणा येतो हे समजायला काही रॉकेट सायन्स शिकायला लागत नाही.
(डोळस भाजप चाहता) वांडो
सुंभ जळला तरी पीळ जात नाहीए.:;)
निवडणुक आयोगाचे सध्याचे आकडे
------------

वाढावी अन बहुमतावर मेंटेन राहावी हीच प्रार्थना.
ऑल इंडिया रेडिओ आणि आयोगाच्या आकडेवारीत इतका फरक कसा आला असेल?
भाजप अर्ध्या हळकुंडाने पिवळी होताना दिसतेय. नंबर्स फेवर मध्ये नसताना उगाच का गोंधळ घालत आहेत? सगळे निकाल निघेपर्यंत पण दम निघत नसेल का?
----------------------------
१०५- १०६ च्या आसपास राहण्याची शक्यता दिसत आहे. अशा परिस्थितीत भाजपकडे काय पर्याय राहतात? मलातरी वैयक्तिकरित्या कुमारस्वामींना लॉटरी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
कन्व्हर्जन फॅक्टर वर भाजप मजबूत वाटत होती, तोवर प्रसाद भाऊ आयोगाचे आकडे घेऊन आले. आता माझा बेंबट्या झालाय कारण दोन सरकारी संस्थांच्याच आकडेवारीत जबरी तफावत दिसते आहे.
कुमारस्वामींकडे जर किंगमेकर रोल आला तर ते आपले उपद्रवमूल्य पणाला लावून किमान उपमुख्यमंत्री पद तरी पदरात पाडून घेतीलच. अर्थात जेडी-एसची लीड पूर्ण कन्व्हर्ट झाली तर त्यांच्याकडे हाच पाट काँग्रेस सोबत लावायचा पर्याय असेलच.
आता आपण २०१९ चा विचार करू,
ह्यात मला एक मूलभूत माहिती नाहीये, ती म्हणजे जेडी-एसच्या केंद्रात काय इच्छाआकांक्षा आहेत? कारण तिसरी आघाडी नाव असलेली मोट बांधायची झाली तर जेडी-एस त्या आघाडीची कन्नड फ्रेंचाईजी असेल, अश्या परिस्थितीत ते आत्ता राज्यात सत्ता स्थापन करायला काँग्रेसला सोबत घेण्यात झुकते माप देतील. कारण कर्नाटकात जर भाजपशी संग केला तर तिसऱ्या आघाडीत पत उरणार नाही, पण जर केंद्रातील इच्छाआकांक्षा नसल्या तर ही युती शक्य होऊ शकेल, त्यांना केंद्रातही एनडीए घटकपक्ष व्हायला जर मोदी शहांनी आमंत्रण दिले तर काय ही शक्यता मी अजून विचारात घेतलेली नाहीये हे स्पष्ट करतो
मला वाटते निवडणुक आयोगाची http://eciresults.nic.in/ ही साईट, ऑल इंडीया रेडीओच्या तुलनेत खुपच स्लो असावी, म्हणुन दोन्ही सरकारी एजन्सीच्या आकड्यात तफावत दिसत असावी.
---
सध्याचे आकडे खालील प्रमाणे आहेत.
--

तो येडाअप्पा तर मुख्यमंत्रीपदाचे बाशींग, घुढग्याला बांधून दिल्लीकडे यायला निघालाय. शिवाय दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन, भाजपा स्वत:ला विजयी घोषीत करणार आहे, अशी बातमी सध्या सुरु आहे.
काँग्रेसने कुमारस्वामींना मुख्यमंत्री करण्यास तयारी दाखवल्याची बातम्या येत आहेत. तिकडे निर्मला सीतारामन म्हणत आहेत कि काँग्रेसने कितीही लास्ट मिनिट हालचाली केल्या तरी सरकार आम्हीच बनवू. मघाशी राम माधव म्हणाले कि चिंता नसावी, आपल्याकडे अमित शाह आहेत. अवघडंय!
पाहिल्यापासूनच राम माधव ह्यांच्यावर विश्वास ठेवावा वाटत नाही. उगा एक हात लाकूड चार हात ढलपी बोलणे!.
प्रत्येक ठिकाणी काय अमित शहा आहेतचा जप करायचा राव!
बीजेपी तोंडावर पडणार नक्की. जेडीएस ने काँग्रेसचा प्रस्ताव स्विकारल्याच्या बातम्या आहेत. कुमारस्वामी मुख्यमंत्री, काँग्रेस-जेडीएस उद्या राज्यपालांना भेटणार.
सध्याची परिस्थिती पाहाता कॉंग्रेस-जेडी(एस) एकत्र सत्ता स्थापन करणे सहज शक्य वाटतेय. येत्या काही तासात चित्र स्पष्ट होईलच.
--
भाजपा : ३९-६७-१०६
कॉंग्रेस : १०-६३-७४
जेडी(एस) : ०४-३५-३९
अशी सध्याची स्थिती आहे.
फक्त चार सीट्स कांसोलिडेट? च्यायला हे लैच हाय टेन्शन इलेक्शन होतंय! मजा आली, लोकशाहीचा विजय असो, ह्याला म्हणतात अस्सल निवडणूक!
२०-२० आय पी एल सारखा चालू आहे. दिनेश कार्तिक ब्याटिंग करतोय असे फील येतंय.
२०-२० आय पी एल सारखा चालू आहे. दिनेश कार्तिक ब्याटिंग करतोय असे फील येतंय.
हा हा हा !!
ईव्हीएम चा निर्णय आपल्याच हातात असल्याने दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन, भाजपा स्वत:ला विजयी घोषीत करणार आहे
अस दिसतय !
टाईम्स ऑफ इंडीयावरील हा कर्नाटक निवडणूक मॅप वेगवेगळ्या भूमिकांवर कन्नड जनतेने कल कसा दिला याचे रोचक प्रेझेंटेशन देतो . वेगवेगळ्या ड्रॉपडाऊन मेनुतील पर्याय निवडून अवश्य पहावे .
कल बघून आनंद / दु:ख व्यक्त करणे व्यर्थ आहे . अजूनही कल येत आहेत , ते कधीही फिरू शकतात.
त्यामुळे निकाल पुर्ण किती वाजता येणार आहे ? त्यावर अवलंबून आहे .
मागच्या दोन निवडणूकीतून धडा घेत काँग्रेसने युतीच्या हालचालि लौकर चालू केल्या आहेत.
भाजपा : ५७-४७-१०४
कॉंग्रेस : ३०-४७-७७
जेडी(एस) : ११-२७-३८
फायनल स्कोर
मला वाटलं कुठे गावकुसाबाहेर पिंपळाच्या झाडावर ......
जाउदे
पिंपळाला ब्राम्हण मुंजे लटकतात ,
आम्हाला खजुराचे झाड लागेल
फायनल स्कोर आता सांगणे कठीण आहे. कारण मत मोजणी अजून सुरु आहे.
---
सध्याची स्थिती.
भाजपा :७५-२९-१०४
कॉंग्रेस : ४५-३३-७८
जेडी(एस) : २०-१७-३७
एकुण १४२-८०-२२२
भा ७५- २९ -१०४
काॅ ४५ - ३३ - ७८
ज २० - १७ - ३७
कर्नाटक मध्ये भाजपची मुसंडी.