Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by खेडूत on Tue, 05/15/2018 - 10:16
रामराम! आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे नवा धागा काढला आहे! आजची एक बातमी: मुलाला मोठा इंजिनिअर करण्याचं स्वप्न बाळगून पालकांनी आपल्या पाल्यांना इंजिनिअरिंगमध्ये 'टाकायला' सुरुवात केली. मधल्या काळात या विद्यार्थ्यांचा आकडा बराच वाढला होता. पालकवर्गाच्या वाढत्या उत्साहामुळे महाविद्यालयंही पत्त्यांसारखी उभी राहिली. मात्र आता हा उत्साह ओसरलेला दिसत असल्याने इंजिनिअरिंगच्या जागाही रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयांची चांगलीच अडचण झाली आहे. 2016 - इंजिनियरिंगच्या 43 टक्के जागा रिक्त 2017- इंजिनियरिंगच्या 44 टक्के जागा रिक्त 2018- इंजिनियरिंगच्या 40 टक्के जागा रिक्त ही घसरगुंडी महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंग महाविद्यालयांची आहे. गेल्या चार ते पाच वर्षात राज्यात कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी कॉलेजेस उगवली. विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगची स्वप्नं दाखवली गेली. पण इंजिनियरिंगकडे वाढलेला ओढा आता आटला आणि अनेक महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली. महाराष्ट्रात सध्या 360 इंजिनियरिंग कॉलेज आहेत, तर 447 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. 2017 साली एक लाख 44 हजार जागांपैकी 64 हजार 625 जागा रिक्त राहिल्या, तर 2018 साली एक लाख 38 हजार जागांपैकी 56 हजार जागा रिक्त राहिल्या. दरम्यान, फार्मसी म्हणजेच औषधनिर्माणशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं दिसत आहे. इंजिनियरिंगमधील घसरणीचं मूळ हे कॉलेजच्या बाहेर आहे, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मिळणाऱ्या अपुऱ्या संधींमध्ये आहे. पण या स्थितीवर सरकारने तूर्तास काही उपाययोजना आखलेल्या आहेत नव्याने सुरु होणाऱ्या इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांना स्थगिती देण्याची विनंती एआयसीटीईला करण्यात आली आहे. ज्या खाजगी संस्थांनी इंजिनियरिंग कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी अभ्यासक्रमात बदल करुन प्रात्यक्षिकांवर भर देऊन व्यवसायाभिमुख शिक्षणाला भर दिला जाणार आहे.
  • Log in or register to post comments
  • 108445 views

प्रतिक्रिया

Submitted by विशुमित on Tue, 05/15/2018 - 10:23

Permalink

कर्नाटक मध्ये भाजपची मुसंडी.

कर्नाटक मध्ये भाजपची मुसंडी. भाजपला देवे गौडांची मदत घायचा प्रश्नच निर्माण होणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Tue, 05/15/2018 - 10:30

Permalink

सध्याच्या ट्रेंडनुसार निकाल.

सध्याच्या ट्रेंडनुसार निकाल. भाजपा : ११२ कॉंग्रेस : ०६६ जेडीएस : ०४२
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Tue, 05/15/2018 - 10:30

Permalink

हॅपी इंजिनीयर्स डे

देणाऱ्या पोरांना 'तलाठी भरती' चे फॉर्म सुटायची आस लागणे दुर्दैवी होय
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Tue, 05/15/2018 - 10:38

Permalink

बिचारा NDTV !! खुप यातना होठ

बिचारा NDTV !! खुप यातना होठ असतील!!
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Tue, 05/15/2018 - 10:39

Permalink

रविश कुमारच तोंड पडलेल आहे !

रविश कुमारच तोंड पडलेल आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Tue, 05/15/2018 - 10:42

Permalink

भाजप काठावर पास. सहिष्णू

भाजप काठावर पास. सहिष्णू पक्षांचा नैतिक विजय. २०१९ ला भाजप चा पराभव निश्चित.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 05/15/2018 - 10:46

In reply to भाजप काठावर पास. सहिष्णू by sagarpdy

Permalink

मतदानयंत्रात घोटाळे

मतदानयंत्रात घोटाळे केल्यामुळेच भाजप विजयी :)
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Tue, 05/15/2018 - 10:52

Permalink

चल्ला

इव्हीएम मशीन, खोटे/बनावट मतदार यांची कंबक्ती भरली म्हणायची. (त्याला नका जावु द्या रे प्रचाराला जिथे निवडणुक असते तिथे.......दरवेळेस असच कायतरी रिझल्ट आणतयं तोंडावर पाडुन)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Tue, 05/15/2018 - 10:59

Permalink

कर्नाटकात भाजपाला संपूर्ण बहुमत.

भाजप : १२० कॉंग्रेस : ०५९ जेडीएस : ०४१ --- तथाकथित निधर्मांध व पुरोगाम्यांच्या तोंडावर हि चा
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Tue, 05/15/2018 - 11:02

Permalink

लिंगायत समाजाला वेगळ्या धर्म

लिंगायत समाजाला वेगळ्या धर्म बनवण्याचा कॉंंग्रेसचा प्रयत्न फेल गेलाय !!
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on Tue, 05/15/2018 - 11:19

Permalink

कसलीही कारणे न देता मोदींचे

कसलीही कारणे न देता मोदींचे या निखळ यशाबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Tue, 05/15/2018 - 11:19

Permalink

भाजप काठावर पास. सहिष्णू

भाजप काठावर पास. सहिष्णू पक्षांचा नैतिक विजय. २०१९ ला भाजप चा पराभव निश्चित. === 2019 ला कॉंग्रेस निश्चित !!
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 05/15/2018 - 11:29

Permalink

अभिनंदन

भाजपचे अभिनंदन ! विजय हा विजय असतो. काँग्रेसने नेतृत्वाबद्दल गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे किंवा हा २०१९ काँग्रेसचा अंत असेल . असे झाले तर भारतात १९५२ - ७७ जसा कालखंड होता ( सबळ राष्ट्रीय विरोधी पक्ष) तसा काल्खंड येइल .
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 05/15/2018 - 11:52

In reply to अभिनंदन by कपिलमुनी

Permalink

गडबड ?

कपिलमुनी, या विधानात गडबड झालेली वाटते. काँग्रेस जर २०१९ साली नामशेष झाली तर सबळ विरोधी पक्ष कोणता? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 05/15/2018 - 12:09

In reply to गडबड ? by गामा पैलवान

Permalink

गडबड झालि

भारतात १९५२ - ७७ जसा कालखंड होता ( सबळ राष्ट्रीय विरोधी पक्ष नसलेला) तसा कालखंड येइल . असे वाचावे.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Tue, 05/15/2018 - 12:15

Permalink

भारतात १९५२ - ७७ जसा कालखंड

भारतात १९५२ - ७७ जसा कालखंड होता ( सबळ राष्ट्रीय विरोधी पक्ष नसलेला) तसा कालखंड येइल . अश्या कालखंडाच स्वागत च होईल !! धर्माधारीत , जातीमध्ये देशाला वाटण्या ऐवजी देशाला विकासच्या दिशेला नेण्यासाठी ह्याची नितांत गरज आहे. श्री मोदीजी अजुन १५ वर्ष पं प्र असु देत, भारताची विजय पताका जगात फडकु दे !!
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 05/15/2018 - 12:19

Permalink

कर्नाटक निवडणुकांचा धागा थंड

कर्नाटक निवडणुकांचा धागा थंड का पडलाय? निकालांचा वेगळा धागा येणार का?
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Tue, 05/15/2018 - 12:24

Permalink

निल्सन नुसार

Image removed. चुरशीच्या लढ्यात, मतमोजणीच्या जितक्या फेऱ्या होतात तितक्या क्लीन स्वीप मध्ये होत नाहीत. ११६ वरून ११२ (लेटेस्ट १०८) वर उतरली आहे भाजप. घटलेल्या सीट्स वरील आघाडी काँग्रेसच्या पारड्यात पडून त्यांची आघाडी ६८ सीट्सची झाली आहे. जेडी/एस गाळात जात असून त्यांची पीछेहाट ४३ वरून, ३९ झाली आहे. भाजपने लवकरच परत मॅजिक फिगर गाठून ती लीड किमान अडीच-पावणे तीन वाजेपर्यंत मेंटेन ठेवायला हवी. म्हणजे सगळं कसं नीट होईल, हँग असेंम्बली मध्ये मजा नाय राव काहीच.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 05/15/2018 - 12:28

Permalink

कर्नाटकातल्या लिंमुद समूहाचा कल व कौल

कर्नाटकातल्या लिंगायत, मुस्लिम व दलित या तीन समूहाचा कल निश्चित कोणाकडे झुकेल ते माहित नव्हतं. मात्र या तिघांनी भाजपला दिलेला कौल स्पष्ट आहे : https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/karnataka-elections-2018-bjp-gains-massive-lead-in-lingayat-dominated-seats/articleshow/64170396.cms लिंगायतांना अल्पसंख्य म्हणून वेगळा दर्जा द्यायचा काँग्रेसी विभाजनवादी बनाव कुणाच्यातरी थोबाडावर सणकून आपटून पार फुटला आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Tue, 05/15/2018 - 13:13

In reply to कर्नाटकातल्या लिंमुद समूहाचा कल व कौल by गामा पैलवान

Permalink

लिंगायत सामाज्याने आपल्या

लिंगायत सामाज्याने आपल्या "येडियुरप्पासाठी काही पण" हे ट्रम्प कार्ड खेळलेले दिसतंय. आणि लिंगायत समाजाची भीती दाखवून 'हिंदू खतरे मे' ही भाजपची चाल यशस्वी ठरली आहे असा माझा प्राथमिक अंदाज आहे. (बेळगावच्या एका मित्राकडून साभार). बाकी सविस्तर विश्लेषण उद्या पेप्रात वाचायला मिळेलच.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Tue, 05/15/2018 - 12:30

Permalink

अभिनंदन

कर्नाटकात भाजपाच सत्तेवर येणार असे दिसते आहे. राहूल गांधीनी कर्नाटकात जेथे जेथे सभा घेतल्या तेथे काँग्रेस पिछडीवर आहे.. राज ठाकरे ह्यांनी 'ई.व्ही.एम.' चा विजय असो असे म्हंटले आहे. मग जिकडे काँग्रेस जिंकत आहे व्व जिंकणार आहे, त्या मतदारसंघांबद्दल काय? की तिकडे विजय काँग्रेचा? .
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Tue, 05/15/2018 - 12:32

Permalink

एकदा

एकदा विश्वेश्वरैया नाय बोलता आलं म्हणुन कोणी असं करत व्हय ??............(नाव सांगायची गरज आहे का?)
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Tue, 05/15/2018 - 12:56

Permalink

या धाग्यावर

मोडिविरोधी हुकमी एक्के नाही आले अजून ! विश्लेषण करत असतील बहुतेक
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Tue, 05/15/2018 - 13:05

In reply to या धाग्यावर by भंकस बाबा

Permalink

मोडिसमर्थक हुकमी एक्के पण

मोडिसमर्थक हुकमी एक्के पण नाही आले अजून ! === चिल्ल्ड झाले असतील बहुतेक.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Tue, 05/15/2018 - 13:43

In reply to या धाग्यावर by भंकस बाबा

Permalink

ह्या धाग्यावर यायचं तुमचंच प्रयोजन कळलं नाहीये!

मोदी विरोधकांना नथीतून तीर मारणे? का आपली भाजप जिंकते आहे त्याचा आनंद साजरा करणे? का निव्वळ मोदींविरोधक म्हणून कोणाला किंवा कोण्या समूहाला वैयक्तिक टार्गेट करणे? काहीतरी सकारात्मक काँट्रिब्युट करा की राव. असल्या वैयक्तिक होण्यानेच भाजप अन पर्यायाने मोदींजींना कमीपणा येतो हे समजायला काही रॉकेट सायन्स शिकायला लागत नाही. (डोळस भाजप चाहता) वांडो
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Tue, 05/15/2018 - 13:39

Permalink

भाजपचे जिंकण्याचे आकडे आश्वासक आहेत

Image removed. ह्या आकड्यांनुसार, भाजपचे 'लीड टू विन कन्व्हर्जन ऑफ सीट्स' जवळपास ८०% आहे, काँग्रेसच्या ६८ लीड्स पैकी फक्त वीस कन्व्हर्ट झालेल्या आहेत, एकंदरीत लीड टू विन कन्व्हर्जन ऑफ सीट्स ३३.३३% वगैरे म्हणता येईल ढोबळमानाने. भाजपचा लीड कांसोलिडेशन स्पीड असाच राहिला तर मजाच आहे, खराखुरा जनादेश!. अर्थात आत्ता १३४० वाजलेत, ही पेस किमान अडीच पावणेतीन पर्यंत मेंटेन ठेऊन भाजपच्या लीड्स सीट्स मध्ये कन्व्हर्ट झाल्या की बेस्ट काम होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Tue, 05/15/2018 - 13:41

Permalink

सुंभ

सुंभ जळला तरी पीळ जात नाहीए.:;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Tue, 05/15/2018 - 13:47

Permalink

निवडणुक आयोगाचे सध्याचे आकडे

निवडणुक आयोगाचे सध्याचे आकडे ------------ Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Tue, 05/15/2018 - 13:53

In reply to निवडणुक आयोगाचे सध्याचे आकडे by प्रसाद_१९८२

Permalink

भाजपची लीड

वाढावी अन बहुमतावर मेंटेन राहावी हीच प्रार्थना.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Tue, 05/15/2018 - 13:54

Permalink

पण मग

ऑल इंडिया रेडिओ आणि आयोगाच्या आकडेवारीत इतका फरक कसा आला असेल?
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Tue, 05/15/2018 - 14:01

Permalink

भाजप अर्ध्या हळकुंडाने पिवळी

भाजप अर्ध्या हळकुंडाने पिवळी होताना दिसतेय. नंबर्स फेवर मध्ये नसताना उगाच का गोंधळ घालत आहेत? सगळे निकाल निघेपर्यंत पण दम निघत नसेल का? ---------------------------- १०५- १०६ च्या आसपास राहण्याची शक्यता दिसत आहे. अशा परिस्थितीत भाजपकडे काय पर्याय राहतात? मलातरी वैयक्तिकरित्या कुमारस्वामींना लॉटरी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Tue, 05/15/2018 - 14:10

In reply to भाजप अर्ध्या हळकुंडाने पिवळी by बिटाकाका

Permalink

मला ऑल इंडिया रेडिओचे आकडे पाहून

कन्व्हर्जन फॅक्टर वर भाजप मजबूत वाटत होती, तोवर प्रसाद भाऊ आयोगाचे आकडे घेऊन आले. आता माझा बेंबट्या झालाय कारण दोन सरकारी संस्थांच्याच आकडेवारीत जबरी तफावत दिसते आहे. कुमारस्वामींकडे जर किंगमेकर रोल आला तर ते आपले उपद्रवमूल्य पणाला लावून किमान उपमुख्यमंत्री पद तरी पदरात पाडून घेतीलच. अर्थात जेडी-एसची लीड पूर्ण कन्व्हर्ट झाली तर त्यांच्याकडे हाच पाट काँग्रेस सोबत लावायचा पर्याय असेलच. आता आपण २०१९ चा विचार करू, ह्यात मला एक मूलभूत माहिती नाहीये, ती म्हणजे जेडी-एसच्या केंद्रात काय इच्छाआकांक्षा आहेत? कारण तिसरी आघाडी नाव असलेली मोट बांधायची झाली तर जेडी-एस त्या आघाडीची कन्नड फ्रेंचाईजी असेल, अश्या परिस्थितीत ते आत्ता राज्यात सत्ता स्थापन करायला काँग्रेसला सोबत घेण्यात झुकते माप देतील. कारण कर्नाटकात जर भाजपशी संग केला तर तिसऱ्या आघाडीत पत उरणार नाही, पण जर केंद्रातील इच्छाआकांक्षा नसल्या तर ही युती शक्य होऊ शकेल, त्यांना केंद्रातही एनडीए घटकपक्ष व्हायला जर मोदी शहांनी आमंत्रण दिले तर काय ही शक्यता मी अजून विचारात घेतलेली नाहीये हे स्पष्ट करतो
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Tue, 05/15/2018 - 14:18

In reply to मला ऑल इंडिया रेडिओचे आकडे पाहून by जेम्स वांड

Permalink

मला वाटते निवडणुक आयोगाची

मला वाटते निवडणुक आयोगाची http://eciresults.nic.in/ ही साईट, ऑल इंडीया रेडीओच्या तुलनेत खुपच स्लो असावी, म्हणुन दोन्ही सरकारी एजन्सीच्या आकड्यात तफावत दिसत असावी. --- सध्याचे आकडे खालील प्रमाणे आहेत. -- Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Tue, 05/15/2018 - 14:10

In reply to भाजप अर्ध्या हळकुंडाने पिवळी by बिटाकाका

Permalink

अगदी सहमत

तो येडाअप्पा तर मुख्यमंत्रीपदाचे बाशींग, घुढग्याला बांधून दिल्लीकडे यायला निघालाय. शिवाय दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन, भाजपा स्वत:ला विजयी घोषीत करणार आहे, अशी बातमी सध्या सुरु आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Tue, 05/15/2018 - 14:20

In reply to अगदी सहमत by प्रसाद_१९८२

Permalink

काँग्रेसने कुमारस्वामींना

काँग्रेसने कुमारस्वामींना मुख्यमंत्री करण्यास तयारी दाखवल्याची बातम्या येत आहेत. तिकडे निर्मला सीतारामन म्हणत आहेत कि काँग्रेसने कितीही लास्ट मिनिट हालचाली केल्या तरी सरकार आम्हीच बनवू. मघाशी राम माधव म्हणाले कि चिंता नसावी, आपल्याकडे अमित शाह आहेत. अवघडंय!
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Tue, 05/15/2018 - 14:23

In reply to काँग्रेसने कुमारस्वामींना by बिटाकाका

Permalink

पीडीपी भाजप कडबोळे

पाहिल्यापासूनच राम माधव ह्यांच्यावर विश्वास ठेवावा वाटत नाही. उगा एक हात लाकूड चार हात ढलपी बोलणे!. प्रत्येक ठिकाणी काय अमित शहा आहेतचा जप करायचा राव!
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Tue, 05/15/2018 - 14:30

In reply to पीडीपी भाजप कडबोळे by जेम्स वांड

Permalink

बीजेपी तोंडावर पडणार नक्की.

बीजेपी तोंडावर पडणार नक्की. जेडीएस ने काँग्रेसचा प्रस्ताव स्विकारल्याच्या बातम्या आहेत. कुमारस्वामी मुख्यमंत्री, काँग्रेस-जेडीएस उद्या राज्यपालांना भेटणार.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Tue, 05/15/2018 - 14:29

In reply to काँग्रेसने कुमारस्वामींना by बिटाकाका

Permalink

सध्याची परिस्थिती पाहाता

सध्याची परिस्थिती पाहाता कॉंग्रेस-जेडी(एस) एकत्र सत्ता स्थापन करणे सहज शक्य वाटतेय. येत्या काही तासात चित्र स्पष्ट होईलच. -- भाजपा : ३९-६७-१०६ कॉंग्रेस : १०-६३-७४ जेडी(एस) : ०४-३५-३९ अशी सध्याची स्थिती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Tue, 05/15/2018 - 14:37

In reply to सध्याची परिस्थिती पाहाता by प्रसाद_१९८२

Permalink

जनता दलाच्या

फक्त चार सीट्स कांसोलिडेट? च्यायला हे लैच हाय टेन्शन इलेक्शन होतंय! मजा आली, लोकशाहीचा विजय असो, ह्याला म्हणतात अस्सल निवडणूक!
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Tue, 05/15/2018 - 16:24

In reply to जनता दलाच्या by जेम्स वांड

Permalink

२०-२० आय पी एल सारखा चालू आहे

२०-२० आय पी एल सारखा चालू आहे. दिनेश कार्तिक ब्याटिंग करतोय असे फील येतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Tue, 05/15/2018 - 16:25

In reply to जनता दलाच्या by जेम्स वांड

Permalink

२०-२० आय पी एल सारखा चालू आहे

२०-२० आय पी एल सारखा चालू आहे. दिनेश कार्तिक ब्याटिंग करतोय असे फील येतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Tue, 05/15/2018 - 14:25

In reply to अगदी सहमत by प्रसाद_१९८२

Permalink

हा हा हा !!

हा हा हा !! ईव्हीएम चा निर्णय आपल्याच हातात असल्याने दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन, भाजपा स्वत:ला विजयी घोषीत करणार आहे अस दिसतय !
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 05/15/2018 - 14:39

Permalink

टाईम्स ऑफ इंडीयावरील हा

टाईम्स ऑफ इंडीयावरील हा कर्नाटक निवडणूक मॅप वेगवेगळ्या भूमिकांवर कन्नड जनतेने कल कसा दिला याचे रोचक प्रेझेंटेशन देतो . वेगवेगळ्या ड्रॉपडाऊन मेनुतील पर्याय निवडून अवश्य पहावे .
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 05/15/2018 - 14:45

Permalink

कल

कल बघून आनंद / दु:ख व्यक्त करणे व्यर्थ आहे . अजूनही कल येत आहेत , ते कधीही फिरू शकतात. त्यामुळे निकाल पुर्ण किती वाजता येणार आहे ? त्यावर अवलंबून आहे . मागच्या दोन निवडणूकीतून धडा घेत काँग्रेसने युतीच्या हालचालि लौकर चालू केल्या आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Tue, 05/15/2018 - 15:11

Permalink

सध्याची स्थिती आहे.

भाजपा : ५७-४७-१०४ कॉंग्रेस : ३०-४७-७७ जेडी(एस) : ११-२७-३८
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 05/15/2018 - 15:39

Permalink

final स्कोर ?

फायनल स्कोर
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Tue, 05/15/2018 - 15:57

In reply to final स्कोर ? by manguu@mail.com

Permalink

आत्ता जीव भांडयात पडला,

मला वाटलं कुठे गावकुसाबाहेर पिंपळाच्या झाडावर ...... जाउदे
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 05/15/2018 - 15:59

In reply to आत्ता जीव भांडयात पडला, by भंकस बाबा

Permalink

छान

पिंपळाला ब्राम्हण मुंजे लटकतात , आम्हाला खजुराचे झाड लागेल
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Tue, 05/15/2018 - 15:58

In reply to final स्कोर ? by manguu@mail.com

Permalink

फायनल स्कोर आता सांगणे कठीण आहे.

फायनल स्कोर आता सांगणे कठीण आहे. कारण मत मोजणी अजून सुरु आहे. --- सध्याची स्थिती. भाजपा :७५-२९-१०४ कॉंग्रेस : ४५-३३-७८ जेडी(एस) : २०-१७-३७ एकुण १४२-८०-२२२
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Tue, 05/15/2018 - 15:58

In reply to final स्कोर ? by manguu@mail.com

Permalink

@ १५:५३

भा ७५- २९ -१०४ काॅ ४५ - ३३ - ७८ ज २० - १७ - ३७
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com