बिन्धास भ्या !!!!

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
8 Mar 2009 - 10:30 am

मी भ्यायला घाबरत नाही,
बिन्धास भितो...!
वाटली मला भिती ,तर
खुशाल लटपटतो..!

घाबरणे आहे तसा,
प्राणीजात स्वभाव.
भिती वाटते नाकारणे,
हा खोटा अहंभाव..

सुरक्षित जगण्या साठी
असते आपुली धडपड
त्यात झाली गडबड
तर वाढते कि हो धडधड

असेल जर हे खरे, तर
कशास लाजायचे..?
उडाली घाबरगुंडी, तर
खुशाल घाबरायचे..!!

बोट लावता लाजाळु,
पान मिटुनी घेते
मावळतो रवीराजा
अन फुल कोमेजते

लाजाळुने लाजावे
अन ,फुलाने कोमेजावे
याला काय गड्यानो,
कोणी पाप म्हणावे...?

हा तर आहे जीवनाचा,
चिरंतन स्वभाव..
चैतंन्याचा आभाव,
तिथे मृत्युचा ठेहराव..!

भीत नाही मृत्युला तर,
जगता कशाला...?
रस्ता ओलांड्ताना सिग्नल
बघता कशाला....??

जमेल तेवढे मृत्युला
टाळुनी जगायचे,
जगण्यासाठी जन्म आपुला
का, फुकाच मरायचे....???

म्हणोत कोणी डरपोक ,
परि नाही लाजायचे..
हो ! घाबरतो मी, असे
छाती ठोकुन सांगायचे...

बिन्धास भ्यायचे....!!!!

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

राघव's picture

8 Mar 2009 - 10:46 am | राघव

छान लिहिलेत!
एकदम वेगळा विचार.

लाजाळुने लाजावे
अन ,फुलाने कोमेजावे
याला काय गड्यानो,
कोणी पाप म्हणावे...?

भीत नाही मृत्युला तर,
जगता कशाला...?
रस्ता ओलांड्ताना सिग्नल
बघता कशाला....??

हे विशेष! मस्त!! शुभेच्छा :)
(भित्रा) मुमुक्षु

प्रमोद देव's picture

8 Mar 2009 - 10:50 am | प्रमोद देव

आवडली.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

अडाणि's picture

8 Mar 2009 - 10:55 am | अडाणि

अफाट जगातील एक अडाणि.

अनिल हटेला's picture

8 Mar 2009 - 11:05 am | अनिल हटेला

म्हणोत कोणी डरपोक ,
परि नाही लाजायचे..
हो ! घाबरतो मी, असे
छाती ठोकुन सांगायचे...
:-)

आवडली कविता !!

(१ नंबरचा डरपोक ) ;-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

क्रान्ति's picture

8 Mar 2009 - 11:23 am | क्रान्ति

चैतन्याचा आभाव तिथे मृत्यूचा ठहराव
खास! कल्पना एकदम नवीन आहे. आवडली.
क्रान्ति

मराठमोळा's picture

8 Mar 2009 - 11:52 am | मराठमोळा

जमेल तेवढे मृत्युला
टाळुनी जगायचे,
जगण्यासाठी जन्म आपुला
का, फुकाच मरायचे...आवडले.

छान लिहिलेत आणी खरे आहे. कुठेही निर्भीडपणा दाखवून चालत नाही आजकाल. मृत्यू तर दुरच हातपाय मोडला तरी महिनाभर बोंबलत बसावे लागते..

अनिल हटेला's picture

8 Mar 2009 - 1:26 pm | अनिल हटेला

क्या बात है !! :-)

(१ नंबरचा बेवडा) ;-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सुनील's picture

8 Mar 2009 - 1:22 pm | सुनील

झक्कास!! मूळ कविता मस्त आहेच वर सहजरावांचे विंडबनही सुंदर.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2009 - 1:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मूळ कविता मस्त आहेच वर सहजरावांचे विंडबनही सुंदर.

असेच बोल्तो..हे सहजराव भासतात तितके सहज नाही.

म्हणोत कोणी नशेबाज
परि नाही लाजायचे..
हो हो! ढोसतो मी, असे
छाती ठोकुन सांगायचे...
इथे पैकीच्या पैकी गुण दिले :)

विनायक प्रभू's picture

8 Mar 2009 - 3:36 pm | विनायक प्रभू

कविता छानच आहे.

पक्या's picture

8 Mar 2009 - 3:53 pm | पक्या

छान कविता. आवडली. येऊ द्यात अजून अशा वेगळ्या कविता.

अवलिया's picture

8 Mar 2009 - 4:49 pm | अवलिया
गणपा's picture

8 Mar 2009 - 8:51 pm | गणपा

काव्य हा माझा प्रांत नाही, नानाच्या विडंबनातुन या कवितेचा दुवा मिळाला.
अन्यथा इतक्या छान कवितेकडे लक्षच गेल नसत.

धनंजय's picture

9 Mar 2009 - 6:55 am | धनंजय

भारी कल्पना आहे.
छाती ठोकून घाबरायचे - रम्य विरोधाभास आहे.

(जोपर्यंत जिवंत आहे तोवर मी "स्थितप्रज्ञ" नाही. मरणानंतर सर्वांसारखाच स्थितप्रज्ञ असेन.)

अडाणि's picture

9 Mar 2009 - 9:24 am | अडाणि

बाकी विडंबनांपेषा हिच कवीता जास्त आवाड्ली ...

अफाट जगातील एक अडाणि.

दिपक's picture

9 Mar 2009 - 9:26 am | दिपक

एकदम फट्टू कविता आहे. :)