मुळ प्रेरणा गोखलेसाहेबांची सुरेख कविता व गुत्यातील सहपेताडांनी असेच चढवले म्हणून
मी प्यायला घाबरत नाही
बिन्धास्त पितो..!
चढली मला जास्ती, तर
खुशाल लटपटतो..!
लुडकणे आहे तसा,
प्राणिजात स्वभाव
सोबर रहावे वाटणे
हा खोटा अहंभाव
विदेशातली पिण्यासाठी
असते अपुली धडपड
त्यात झाली भाववाढ
तर वाढते कि हो तडफड
असेल जर हे खरे तर
कशास लाजायचे
मिळाली पहिल्या धारेची
तरच व्होट द्यायचे
घोट घेता हळुहळू
डोळे मिटुन घेतो
मावळताच रविराजा
मी फुल्ल आउट होतो
सुर्याने मावळावे
म्या पामराने लुडकावे
याला काय गड्यानो,
कोणी पाप म्हणावे...?
पेताडांच्या हो जीवनाचा
चिरंतन स्वभाव
चैतन्याचा अभाव
तिथे दारुचा ठेहराव
पित नाही मद्याला तर,
जगता कशाला...?
रोज कमावताना शिल्लक
बघता कशाला?
जमेल तेवढी प्यायला
नशेनी जगायचे
पिण्यासाठीच जन्म आपुला
का, कोरडे मरायचे....???
म्हणोत कोणी नशेबाज
परि नाही लाजायचे..
हो हो! ढोसतो मी, असे
छाती ठोकुन सांगायचे...
बिन्धास प्यायचे....!!!!
प्रतिक्रिया
8 Mar 2009 - 1:44 pm | सुनील
हे म्हणतो.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
8 Mar 2009 - 1:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मूळ कविता मस्त आहेच वर सहजरावांचे विंडबनही सुंदर.
सहजराव भासतात तितके सहज नाही.
म्हणोत कोणी नशेबाज
परि नाही लाजायचे..
हो हो! ढोसतो मी, असे
छाती ठोकुन सांगायचे...
इथे पैकीच्या पैकी गुण दिले :)
अवांतर : वृत्त,मात्रा, पाहावे लागेल :?
8 Mar 2009 - 2:09 pm | अवलिया
१० पैकी १० गुण विडंबनाला
छुपे रुस्तुमगिरि म्हणुन ५ गुण वजा
कंपुतले म्हणुन अधिक ३ गुण
परत स्वतःतील विडंबकाला मारणार नसल्याची कबुली दिल्याने अधिक २ गुण
एकुण गुण १०
:)
--अवलिया
8 Mar 2009 - 2:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>कंपुतले म्हणुन अधिक ३ गुण
हे असे असेल तर आम्ही उत्तर पत्रिका तपासणार नाही.
वृत्त / मात्रे यांना गुण नाही दिलेत ?
-दिलीप बिरुटे
(कोणत्याच तंबूत ,सॉरी कंपूत नसलेला )
8 Mar 2009 - 2:18 pm | अवलिया
ते ३० चे ३५ करतात ना तसे आहे.... प्राध्यापक साहेब तुमचे बरे आहे. इथे आम्हाला संस्था (पक्षी : कंपु ) चालवायची आहे. समजुन घ्या !!!
--अवलिया
8 Mar 2009 - 2:50 pm | चन्द्रशेखर गोखले
अफलातुन्... सहज सुंदर विडबन..!!
ओरिजिनल पेक्षा सुंदर !!!!!!!
तुमच्या विडंबना मुळे मला भरपूर प्रतिसाद मिळाले...
धन्यवाद.....
8 Mar 2009 - 3:11 pm | लिखाळ
हा हा.. गोखलेसाहेबांचा प्रतिसाद मस्त :)
सहजरावांची कविता छानच..
आता बिन्धास्त प्यावे म्हणतो ;)
-- लिखाळ.
8 Mar 2009 - 3:23 pm | सर्केश्वर
दारु ही वाईट असते, घरादाराला बरबाद करते.
8 Mar 2009 - 5:06 pm | चन्द्रशेखर गोखले
म्हणुनच आम्ही बारमध्ये जाउन पितो आणि रस्त्यावर लुडकतो .... !!!!
8 Mar 2009 - 3:31 pm | विनायक प्रभू
आणkhI एक विडंबनकार
लय भारी
8 Mar 2009 - 3:46 pm | बेसनलाडू
केशवसुमार विद्यालयात आणखी एक दाखला का?
प्राचार्य खूश होणार!
(शिपाई)बेसनलाडू
8 Mar 2009 - 4:04 pm | वेताळ
मस्तच विडंबण केले आहे.
वेताळ
8 Mar 2009 - 4:11 pm | प्रमोद देव
सहजरावांनी अगदी त्यांच्या नावाइतके सहज विडंबन केलेय.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
8 Mar 2009 - 4:21 pm | प्रकाश घाटपांडे
सहज राव सहज "टाकताय"वाटतं.
म्हनुन म्हंतो गांधीजींना स्मरुन 'स्वदेशी' वापरा
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
8 Mar 2009 - 4:29 pm | आपलाभाउ
वा वा वा..................लयी भारि........कधि बसायच बोला
9 Mar 2009 - 9:06 am | दशानन
लै भारी !!
ज्याच्या कडे बाटली आहे... व जो 'सहज'पणे ती रिचवू शकतो तोच असे विडंबन लिहू शकतो ... नाय तर आम्ही लिहायला बसतो कविता तयार होते हत्या.... आम्ही लिहायला बसतो पाककृती.. पोहचतो हिमालयात.... =))
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D