कवि गाडीत बसून आहे
गाडी सुसाट धावते आहे
गाडी माणसांना तुडवते आहे
हाडांच्या चिंध्या करते आहे
शब्द हवेत फेकते आहे
कल्पनांचे भुंगे सोडते आहे
कवि गाडीत बसून आहे
गाडी सुसाट धावते आहे
'शब्द बापुडे केवळ वारा'
म्हणून गेला एक येडा
त्या येड्याला काय ठावी
जालाची किमया नाही गावी
आता वाराही न दवडावी
फुकटात 'काव्ये' प्रसिद्ध व्हावी
कवि गाडीत बसून आहे
गाडी सुसाट धावते आहे
प्रतिक्रिया
28 Apr 2018 - 12:04 pm | पैसा
जेसीबी आहे तो!! पुन्हा काही बोलले तर फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची!
29 Apr 2018 - 9:50 am | जव्हेरगंज
एक टायर तुटला आहे
हेडलाईट फुटला आहे
बंम्पर ठोकला आहे
धुराळा उठला आहे
तरीही,
कवि गाडीत बसला आहे
29 Apr 2018 - 8:22 pm | एस
गाडी कवीवर बसली आहे
कवी सुसाट धावतो आहे.
30 Apr 2018 - 7:01 pm | नाखु
तोच चंद्रमा आहे फक्त हौस म्हणून गाडी रणगाडा ते जैसीबी व्हाया डंपर बदलत आहे.
गाडी सुसाट वेगाने पुढे जात आहे, सांडलेल्या शब्दांतून नवकविता (ऊ) जुळून येत आहे
प्रेक्षक नाखु
2 May 2018 - 1:06 pm | खिलजि
मस्तय गाडी,,, जेसीबी डंपर ट्रक आणि बरंच काही
सिद्धेश्वर विलास पाटणकर
2 May 2018 - 3:17 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्तय गाडी किवा जेसीबी किवा ट्रक किवा डंपर
आमच्यासारख्या फुकट्या वाचकांचे मनोरंजन चाललेय जोवर