कदाचित कोणतंच नियंत्रण नसल्यामुळं भारतीय न्यायपालिका रसातळाला गेलेली असू शकते. कदाचित इतर देशांच्या मानाने खूप चांगली असू शकते. कदाचित इतर अन्य संस्थांपेक्षाही बरबटलेली असू शकते. देशात न्याय आहे अशी सर्वसाधारण जनभावना केवळ एक चालत आलेली प्रथा म्हणून जीवंत असावी. तसं न्यायपालिकेच्या बाबतीत "संस्था विथ डिफरन्स" नावाचा काही प्रकार नसावा. मला इथे विक्षिप्त म्हणजे चांगल्या, वाईट, लॉजिकल, इल्लॉजिकल, परस्परविरोधी, आपल्याच अन्य न्यायालयाच्या वा बेंचच्या विरोधी, संविधानविरोधी, देशविरोधी, इ इ घटना अभिप्रेत आहेत.
===============
आदर्शतः न्यायधिशांच्या वर्तनांच्या काय सीमा आहेत नि त्या पाळल्या जातात का? त्यांच्या गुन्ह्यांस कशी शिक्षा होते. चुकीचे उत्तरदायित्व ते कसे नि कोणाला रिपोर्ट करतात?
त्यांची संस्थाच ठीक आहे का? त्यांची निवड कशी होते? ते निष्पक्ष आहेत हे ठरवायला कोणती चाचणी होते?
आरोप, प्रत्यारोप, पुरावे, साक्षीदार, वकील, वाद, कायदे, संविधान हे सगळे तेच असले तर न्याय द्यायला न्यायाधीश का लागतो? वा कोणत्याही न्यायाधीशाकडून तोच निकाल आला पाहिजे. मग तो का येत नाही?
=========================
न्यायाधीशांना ज्या विषयावर न्याय द्यायचा आहे त्या विषयाचं सखोल ज्ञान असतं का? कोणत्याही तज्ञाचे मत घेताना विषय योग्य निवडला आहे का, पार्श्वभूमी नीट माहीत आहे का, सर्व संभावनांचे निष्कर्ष काय काय असू शकतात, तज्ञाच्या चाचणीच्या रिलायेबिलिटिचे ज्ञान त्यांना असते का?
===============
केसेस कशा हाताळाव्यात याचे लॉजिस्टीक्स सांभाळायचे ज्ञान जजांना का नसते? सर्व पक्ष सर्व तयारी एकत्र करून केसेस हातासरशी का करत नाहीत? सारे निकाल जज स्वतःच्या हाताने टाइप करतात का? पेंडेंसी पाहता जजेस शिफ्टमधे का काम करत नाहीत?
================================
जज ज्या शिक्षा देतात त्या इतक्या अबसर्ड का असतात? हजार कोटीचा फ्रॉड करणारास १०००० रु दंड? आणि काही वर्षे जेल?
सरकारने मला जेलमधे घालून माझ्यावर अन्याय केला आहे असे म्हणण्याचे स्वातंत्र्य गुन्हेगारास असणे किती विचित्र आहे? याला सजा नको का?
==================================
न्याय मागण्यासाठी वरवरच्या जजांकडे जाण्याचे लॉजिक काय? ते काय शिक्षण आहे का मोठ्या शहरातल्या शाळेत नीट मिळते? आणि असेच असेल तर भारतीय सर्वोच्च न्यायालयात हारलेले खटले लंडन वा न्यू यॉर्क वा स्वितझर्लँड मधे न्यावेत. खालच्या जजाने चूक निर्णय दिला म्हणून त्याला कोणती शिक्षा होते? त्याला कोणते ट्रेनिंग मिळते?
=========================
जजेस पैसे खातात का? ते खाऊच नयेत अशी काय व्यवस्था केली आहे? का म्हणून विश्वास ठेवायचा कि त्यांनी खाल्लेच नाहीत? हे जज पूर्वाश्रमीचे वकील असतात नि त्यावेळी त्यांनी बर्याच वाईट लोकांची बाजू घेतलेली असते. जे लोक वाईटांना वाचवायचे वकिलीचे पैसे घेऊ शकतात ते न्यायदानात वाईट लोकांचे पैसे कशावरून घेणार नाहीत? भारतीय जजांच्या, नातेवाईकांच्या संपत्तींचा (आणि इकडे तिकडे चिटकल्याचा) सर्वे झाला आहे काय?
=============================
देशाचे जज कोण बनावे यात लोकांचा से का नसावा? असेंब्ली आणि एक्झिकूटिव ब्यूरोक्रॅटीक पद्धतीने आणि जजेस डेमोक्रॅटिक पद्धतीने का निवडू नयेत? वा दोन्ही?
नियंत्रण नसलेल्या पद्धतीने निवडलेल्या लोकांनी लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधिंनी काढलेला अर्थ खोडून काढावा याला काही अर्थ आहे का?
जजांना आपलं धुणं धुवायला वेळ नसताना ते नेहमी लेगिस्लेचरचे अधिकार का कमी कमी करत नेतात? हे असंच होत गेलं तर एखादं अतिबहुमत्तालं सरकार यांचे खूपसे आवश्यक अधिकार ही काढून घेईल.
============================
कोणत्याही केसच्या निर्णयानंतर न्याय होत आहे कि नाही हे न्यायपालिका कसे ठरवते. झालेली केस तर एक संक घटना असते. न्यायदान हे भविष्यात शिस्त राखण्यासाठी असते. पण केसेसच्या निर्णयांची पब्लिसिटी कुठे होते? सलमान, रामरहिम, आसाराम, इ केसेस सोडल्या तर लोकांना केस संपलीय कि चालू आहे हे देखील माहीत नसतं. झालेली घटना, झालेली केस, झालेला निर्णय, त्यावर दोन्ही पक्षांचं मत, न्यायालयांचं प्रेस नोटीस असलं काही नको?
================================
न्यायाधीश गीतेची शपथ का घेत नाही?
========================
हा केस लॉ कित्ती चुकीचा प्रकार आहे! न्यायालयाने दिलेल्या एका निकालाचा संदर्भ प्रचंड वेगळा असतो. तो संदर्भ लागू आहे कि नाही याची चर्चा जवळजवळ होतच नाही. तोच प्रकार दुसर्या देशाच्या कायद्याचा संदर्भ द्यायचा.
========================
न्यायाधीशांना स्पेशल सन्मान कशाला द्यायला हवा? मी जशी एक नोकरी करती तशीच तो देखील एक करतो. मग त्याला यूवर ऑनर, माय लॉर्ड, आल्यावर उभे राहणे, ऑर्डर ऑर्डर, हे काय आहे? न्यायाधिश एक साधा होमो सेपियनच असतो ना? कि काही ईश्वरतत्त्व, देवतत्त्व, राजतत्त्व असतं त्याच्या देहात जे आम्हा सामान्यांत नसतं? आम्ही आमची नोकरी जर व्यवस्थित करत असू तर आम्हालाही यूवर ऑनर म्हणायला पाहिजे. Giving justice is a just another job. This job has no intrinsic merit in it. It is considered a benevolent job only because the stakes are decided and generally without challenge.
=============================================================
हा लेख सर्व मिपाकरांसाठी न्यायपालिकेच्या विविध पैलूंवर आपापले मत मांडण्याचा, अनुभव मांडण्याचा, विचित्र बातम्या देण्याचा, विचित्र संदर्भ नि अभ्यास देण्याचा आहे.
======================================================================
एका व्यक्तिने कोर्टात संताप व्यक्त केला म्हणून कोर्टाने त्यास आपले तेवर दाखवत मेंटल हॉस्पिटलात टाकले. (संपादित)
https://www.financialexpress.com/india-news/72-year-old-delhi-man-sent-t...
Ram Kumar was on his own fighting a 10-year-long motor accident claim dispute, and on November 3 last year allegedly got into an altercation with the opposing side and used unparliamentary language during the proceedings.He was then sent to police custody to Dr Baba Saheb Ambedkar (BSA) Hospital for psychiatric evaluation on the orders of the Presiding Officer of the Motor Accidents Claim Tribunal (MACT). Later in the day, he was produced before a Metropolitan Magistrate (MM) who ordered that he be sent to the Institute of Human Behaviour and Allied Sciences (IHBAS) to be kept under observation for 24 hours.On November 5, 2017, his stay at IBHAS was extended by another 15 days by a duty magistrate.
प्रतिक्रिया
28 Apr 2018 - 2:35 pm | ज्ञानोबाचे पैजार
लेख आवडला काही मुद्दे पटण्यासारखे आहेत. उदा न्यायदानाच्या पध्दतिवर नियंत्रण हवे, न्यायदानाचे देखिल ऑडीट हवे, एकाच प्रकारच्या वादामधे वेगवेगळे निकाल दिले जाउ नयेत, न्याय न्यायाधिश सापेक्ष नसावा इत्यादी.
हा युक्तीवाद आवडला.... कदाचित बरोबर पण असेल.... पण मला तरी पटला नाही.
असे वागायचे शिक्षण शाळेतच दिले जाते. शिक्षक वर्गात आले की त्यांना "एकसाथ नमस्ते" करायचे असे शिक्षक स्वतःच आपल्याला शिकवतात.
याच न्यायाने शाळेतल्या शिक्षकांना सुध्दा गुरुजी, मास्तर, सर वगेरे न म्हणता ए कुलकर्ण्या किंवा अरे देशमुखा असे म्हणायला हरकत नाही. कारण शिक्षक देखिल एक साधा होमो सेपियनच का काय ते असतो ना?
पैजारबुवा,
29 Apr 2018 - 12:15 am | arunjoshi123
गुड मॉर्निंग सर हे अभिवादन आहे. हॅलो म्हटल्यासारखं. शिवाय शिक्षक संस्कार देखील देतात. वयाचा फरक असला तर मान देण्याची देशाची संस्कृती आहे.
न्यायाधीशांचे काय? नागरिक, आरोपी, फिर्यादी, वकील, साक्षिदार, पोलिस आणि न्यायाधीश एका फॅक्टरितल्या मॅनेजर, इंजिनिअर, कामगार अशा वर खालच्या रँकचे देखील नाहीत. ते सर्व समानच आहेत. फॅक्टरीत देखील इतकी आढ्यता चालत नाही.
=======================
तो जज इतका वर बसतो ते देखील चूक आहे. ते प्रचंड चूकीचा संकेत देतं. सत्य बोलणार्या साक्षिदारांनी, प्रामाणिक कर्तव्य करणार्या पोलिसांनी त्याच्यासमोर कटघर्यात का थांबावं? सगळे ऑफिसात टेबलावर बसून काम करतात तसे का करू शकत नाहीत? कोणत्या आदम बाबाच्या जमान्यातली प्रोसिजर आणि भाषा आज काय कामाची? राजाचा माणूस जी जरब असाअयची तिचा आज काय संबंध?
=========================================
कोण्याही माणसाला असला नाहक मान दिला तर त्याची स्वतःबद्दलची मतं काहीतरी हाय-फाय बनतात. तो स्वतःला सुपरमॅन समजू लागतो.
===============================
@उपेक्षित - यात काही चिखलफेक नाही.
29 Apr 2018 - 10:30 am | माहितगार
धागा लेखकाने एवढे सगळे मुद्दे एकत्र करून , एकाच लेखात ना टाकता लेखांचे विभाजन केले असते तर इतर वाचकांना अधिक सोईचे झाले असते . महत्वाचे म्हणजे धागा लेखात अनेकविध जाणवलेल्या त्रुटीं चा परामर्ष एकेक करून घेतला आहे .
दुसऱ्या राउंडची चर्चा करूच .
उत्तरदायित्वास नकार लागू
28 Apr 2018 - 4:31 pm | Topi
24 तास चालणारे आणि 3शिफ्ट असणारे न्यायालय ही खरंच खूप छान सूचना आहे
28 Apr 2018 - 5:27 pm | माहितगार
शेवटच्या किश्शात हायकोर्टाने माफी मागितली ; अशा वेळी हायकोर्टातच नाही तारा सरळ सुप्रीम कोर्टात हि पी आय एल टाकता येते हे आपण नमूद केले नाही . काही वेळा वृत्त माध्यमे नीट रिपोर्टींग करता नाहीत तर कधी नागरिकही गैरसमजात भरच पडत राहिला असे पाहतात का असे वाटते .
शिवाय या क्षेत्रात संगणनाची क्षमता बरीच वेगाने वाढते आहे . सरकार त्यात आर्थिक गुंतवणूक करेल तसे छोट्या केसेसच्या न्यायदानाचे मोठ्याप्रमाणावर ऑटोमेशन शक्य होईल . आणि जनतेचा जाच वाचेल .
29 Apr 2018 - 12:21 am | arunjoshi123
सर, आपण जिथे कुठे प्रतिसाद टाईप करता तिथे बरेच शब्द चूक टाईप होत आहेत. एक तर आपण अतिशय भिन्न, घन नि क्लिष्ट आशय मांडता. वर टायपिंगच्या चूका. कृपया पोस्ट करण्यापूर्वी एकदा प्रतिसाद वाचावात (सेल्फ रिव्हू) ही नम्र विनंती.
29 Apr 2018 - 12:23 am | arunjoshi123
हे अजूनही कळलं नाही.
29 Apr 2018 - 6:54 am | माहितगार
29 Apr 2018 - 1:06 am | arunjoshi123
माफी मागीतली मंजे उपकार केला नाही. माणूस रागावला तर मेंटल आहे हे डिक्लेअर जज कसे करू शकतो? (संपादित) माणूस मेंटल आहे कि नाही हे तज्ञ सांगणार ना? का जज?
------------------
आणि पी आय एल चं हे पहा.
https://www.thenewsminute.com/article/supreme-court-frivolous-pils-why-i...
हे
ही कोणती **** माणसं आपण जज बनवलीत?
================================================
कोहीनूर हिरा -
The second PIL that was indulged by the CJI was the one to bring back the Kohinoor diamond- seized by the British during colonial rule and is currently a part of the crown jewels of the British monarchy.
The issue of restitution of the Kohinoor is raised ever so often. While India has a political claim to the diamond, there is absolutely no legal basis in national or international law to claim restitution of the diamond. In other words, since there was no question of law. This was a perfect case for rejecting the PIL but the CJI once again issued notice to the government and the case is pending before the SC.
==========================
(संपादित)
=========================
इथे मराठीच वाचणारांसाठी भाषांतर -
जनहितयाचिकांच्या संबंधांतील न्यायप्रक्रियेची सद्य अवस्था अत्यंत भयावह आहे. एकाच कोर्टातील विविध बेंचेस जनहितयाचिका दाखल करून घेतीलच का वा (घेतल्यास) कसा प्रतिसाद देतील यांत किंचितही एकवाक्यता, सुसंगती वा निश्चितता नाही. हे सत्य आहे कि (या केसेसचं) बरंच काही (न्यायाधीशांच्या) वैयक्तिक आवडीनिवडींवर आणि दाखल्याच्या वेळेसच्या दोन न्यायाधीशांच्या मनोवस्थांवर अवलंबून राहतं नि म्हणून एक विश्वासार्ह व्यवस्था निर्माण करण्याची तसेच न्यायिक उत्तरदायित्व उत्पन्न करण्याची आवश्यकता आहे.
29 Apr 2018 - 1:34 pm | माहितगार
रागावणारा अशील पक्षकार जसा माणूस आहे तसाच न्यायाधीश सुद्धा माणूस आहे ना ? अरे ला कारे करणे प्रत्येकवेळी शहाणपणाचे लक्षण नाही हे सगळेच जाणतात तरीही काही मुमेंटना संयम पक्षकाराचा सुटू शकतो तसा न्यायाधीशाचाही सुटू शकतो . तरीही कायद्यात व्यवस्था नसलेल्या शिक्षा न्यायाधिषांना देता येत नाहीत असे काही झाले तर वरिष्ठ न्यायालय चुकीचे निर्णय फिरवतात .
आपल्या लिहिण्यातला संयम सुटला असे वाटले त तर मिपा संपादकाने आपला प्रतिसाद संपादित केलाच ना ? म्हणजे करेक्टिव्ह मेकेनिझम आहे . आपली चूक कबूल करून आपण माफी मागाल नाही मागाल इतरांचे समाधान होईल एवढी भरपाई द्याल नाही द्याल हे तुमच्या मनस्थिती वर अवलंबून असतेना जसे जरासा संयम सुटण्यावरून पक्षकारास अवाजवी शिक्षा होऊ नये तोच नियम माणूस म्हणून न्यायाधीशासही लागू होतो ना ! बरे समजा तुम्ही तुमचा संयम तुटण्याबद्दल माफी भरपाई असे काही केले नाही तरी तुमच्या सहकारी मिपाकराने , संपादकाने अथवा मिपा मालकांनी प्रसंगावधान दाखवून स्वतः: ना केलेल्या चुकी करता मोठ्या मनाने माफी मागितली तर माफी मागणाऱ्या त्रयस्थाशी उपकार केले का अशी उद्धट भाषा वाजवी ठरते का ?
राज्यघटनेतल मूलभूत आधिकाराच्या केसेस मध्ये लवकरात लवकर न्याय देता यावा म्हणून जनहित याचिका सरळ उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे
पण अर्जंट नसलेल्या जनहित याचिक सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस ना घेता उच्चंन्यायालयातून घेण्या बद्दल सर्वोच्च न्यायालयाने ठरवले पाहिजे असे वाटते . या बाबत आवश्यकता वाटल्यास संसदेला कायद्याचे बंधन घालून देता येऊ शकेल पण शक्यतोवर भर न्यायालयांच्या स्व नियंत्रणावर असलेला चांगला .
सद्य पद्धतीत समस्या आहेत या समस्यांचा अभ्यास करून विधीतत्व मीमांसा तज्ञानी सुधारणा साठी मार्ग सुचविण्याची गरज असावी हे जेवढे खरे तेवढेच उपरोक्त सरसकटीकरणाचे विधान प्रत्येक केस मध्ये काही वेगळे पण असल्यास ते बारकाईने तपासून केले असण्याचं शक्यता कमी आहे . न्यायदान करणारी न्यायाधीश माणसे आहेत -यंत्रे नव्हेत - प्रत्येक घटनेचे कलम , कायदा , केस स्टडी बद्दल प्रत्येक न्यायाधीशाचे विषय जाणकार या नात्याने मत वेगवेगळे असू शकते , निकाल वेगवेगळे येऊ शकतात असे दृष्टोत्पत्तीस पडले आणि पक्षकाराला समाधान वाटले नाही तर केस साठी रिव्ह्यू पिटिशन दाखल करता येते किंवा मोठ्या (संख्येच्या) बेंचाकडे नेता येते हि बाब उपरोक्त परिचछेद दुर्लक्षित ठेवतो असे वाटते . एनी वे संगणकांमुळेच या समस्या जशा सहज लक्षात येत आहेत त्या संगणक क्रांतीच्या मदतीने काळाच्या ओघात सोडवल्याही जातील . असा विश्वास वाटतो
अश्लीलता विषयक कायदा अस्तित्वात आहे , पी आय एल करणाऱ्याना कंडोम पाकिटावरील विशिष्ट छायाचित्रांमुळे लोकांची बुद्धी भ्रष्ट होऊन अत्याचारात वाढ होत आहे आणि म्हणून मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होते असा दावा करण्याचा अधिकार आहे , असा दावा आला तर तपासण्याची न्यायपालिकेची जबाबदारी आहे (अर्थात हे उच्च न्यायालयाने करण्यासारखे सर्वोच्च न्यायालयासाठी अति अर्जंट नसलेले काम आहे हे खरे ) पण लोकसंख्यावाढ आणि एडस नियंत्रण इत्यादि कारणांमुळे सरकारच कंडोम प्रसाराला प्रोत्साहन देते तेव्हा सॉलिसिटर जनरल च्य माध्यामातून सरकारचे मत मागवण्यात अत्यंत जबाबदारीचे पाऊल आहे , उलटपक्षी या बद्दल आक्षेप घेणारी व्यक्तीचे स्वतः:चेच दृष्टिकोन निष्पक्ष नसल्याचा हा परिणाम आहे किंवा कसे
न्यायाधीश स्वतः: सायंटिस्ट नसतात ना ? अशा विषयावर परस्पर विरोधी दृष्टिकोन असू शकतात , एका दृष्टिकोनाच्या व्यक्तीने केस टाकली तर तज्ञाचे मत न मागवता नाकारणे सुद्धा अन्याय्य होत नाही का ? अर्थात हि केस सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा वेळ घेण्या आधी उच्च न्यायालयात जावयास हवी .
हे खरंय कि हा मूलभूत अधिकारा बाबतीतला तातडीचा प्रश्न नाही आणि अशा याचिका पूर्व तपासणीसाठी उच्च न्यायालयाकडे द्यावयास हव्यात पण सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशांना भारतभरातील कोणतीही एखादी केस मध्ये त्यांच्या अधिकारात लक्ष घालण्याचा अधिकारच असू नये हि अपेक्षाही रास्त नाही. यात कायद्याचा प्रश्न माननीय न्यायालयाने कसा शोधला हे खरेच केसचा दुवा मुळातून वाचून शोधावे लागेल - कदाचित सार्वजनिक संपत्ती अथवा रणजित सिंघाचा वंशज असेल तर व्यक्तिगत संपत्ती म्हणून दावा टाकून बघण्याचा अधिकार असू शकतो हा पण ते उच्च न्यायालयात आधी जावयास हवे - . इन एनी केस एक राष्ट्र प्रेमी म्हणून कोहिनुर बद्दल तुमच्या माझ्या प्रमाणे माननीय न्यायाधीशाना सुद्धा सॉफ़्ट कॉर्नर असू शकतो आणि त्या बद्दल त्यांनी शासनाकडे विचारणा करण्याची मोकळीक घेण्याने तसे बिघडण्यासारखे अथवा इश्यू करण्यासारखे काही नसावे .
नाही या बाबतीत मी अगदी सरदार म्हणजे शीख समुदायाकडून आहे ,-विरोध विनोदांना नाही - अजो आपण स्वतः: ‘ब्र ‘ समाजाचे दिसता आपल्या समाजावर हकनाक टीका झाली कि आपले प्रतिसाद व्यथित होताना पाहिले आहे शीख समुदायाच्य लोकांना व्यथा होता नसेल काय ?- एखाद्या विशिष्ट व्यक्ती अथवा समूहाला लक्ष्य करून त्यांना हास्यास्पद बनवणे नैतिकतेने योग्य नाहीच पण भारतीय घटनेतील कलाम २१ ने दिलेल्या डिग्निटीने जगण्याच्या अधिकाराचे हनन आहे . भारतीय घटनेत अधिकतम अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण ते अनिर्बंध असणेही अभिप्रेत नाही .-कायदा बनवण्याची आणि अंमलबजावणीची जबाबदारी संसदेची आहे , आपल्या मतदारांना सुयोग्य मार्गदर्शन करून असे ना करण्याचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संसद सदस्य नेत्यांची आहे - त्यामुळे न्यायालयाचा अंतिम निर्णय मला स्वतः:स पटलेला नाही . या न्यायाने स्त्रियांना अथवा दलितांना कसेही बोलले जात असे त्या बद्दल कायदे अस्तित्वात आहेत तसे कायद्याचे संरक्षण पूर्वोत्तर भारतीय आणि शिखांना आणि अजून एखाद्या समूहास करून देण्याची जबाबदारी संसदेची आणि संसद करत नसेल
तर न्यायपालिकेची आहे हे निशचित
हा सगळा वांदा बऱ्याच उच्च न्यायालय सांभाळू शकेल अशा याचिका सरळ सर्वोच्च न्यायालयात्यांचात जात असल्यामुळे होतोय . अर्थात मुख्य न्यायाधीशांचे म्हणून काही प्रिरोगेटिव्ह असतात त्या पदाचा शक्य तेवढा सन्मान ठेवला गेला पाहिजे .
या सर्व चर्चेत एका गोष्ट राहून जाते आहे , - न्यायपालिका सुधारणा विषयक चर्चा व्हावयास हव्यात पण जाणीव पूर्वक न्यायालयाची प्रतिमा मालिन करण्याच्या प्रयत्नांमागे राजकीय हितसंबंध असू शकतातच पण त्या पलीकडे जाऊन भारतीय न्यायव्यवस्थेची प्रतिमा बदनाम करण्याचा सरळ लाभ परदेशी न्यायालयांमध्ये पळून गेलेल्या भारतीय गुन्हेगारांच्या एक्सट्रॅडीशन क्लेम नाकारले जाण्यात गुन्हेगारांना होऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे असे वाटते. असो .
29 Apr 2018 - 2:29 pm | arunjoshi123
मिपा संपादक मंडळींनी आजवर माझ्या लेखनाची जितकी संपादने (म्हणजे खोडणे) केली आहेत ती सर्वच्या सर्व भारतीय न्यायव्यवस्थेबाबत आहेत. यातच बरंच काही दिसून येतं. माझी भाषा त्यामानाने न्यायालयांकरिता सौम्य असते. अन्य ठिकाणी अत्यंत उग्र भाषा वापरूनही मिपा संपादकांस ती उडवावी वाटलेली नाही.
===============
संपादकांचे मते ते संस्थळाच्या आणि देशाच्या नियमांचे पालन करत आहेत. संस्थळावर कारवाई होऊ नये हा मुख्य उद्देश असावा. म्हणून ते सावध भूमिका घेतात. माझी विधाने अयोग्यच आहेत, वा भाषा अयोग्य आहे असं त्यांनी म्हटल्याचं वा पटवून दिल्याचं आठवत नाही. म्हटलं तरी मी असहमत असेन. संस्थळ चालवणं वेगळं आणि
एका विषयात सुयोग्य, सुस्पष्ट मत व्यक्त करणं वेगळं.
=======================
शिवाय माणसानं योग्य तिथे जहाल, उग्र, विखारी टिका केलीच पाहिजे. अंततः प्रश्न व्यवस्थाकारांच्या सन्मानाचा नसून देशातील जनतेच्या सौख्याचा आहे. किमान मुद्दा तरी उपस्थित केला पाहिजे.
29 Apr 2018 - 3:13 pm | माहितगार
खरे म्हणजे तुमच्या लेखनाचा नेमका कोणता भाग संपादीत झाला ते माझ्या लक्षातही आले नाही- मी सेन्सॉर पेक्षा मुद्दा खोडून काढण्यास प्राधान्य देतो. मी जहाल, उग्र, विखारी असे शब्द वापरणार नाही पण मी सुद्धा कठोर टिकेचा समर्थकच आहे , किंबहूना माझा पहिला मिपा धागा कठोर पण सभ्य टिका कशी करावी या संबंधाने आहे.
बेसिकली माझा उद्देश आपल्यावर व्यक्तिगत टिका करणे अथवा आपण अथवा मिपा संपादका पैकी चूक कोण हे ठरवणे नाही तर , चालू चर्चेत सहज पणे दर्शवता येईल असे एक पॅरेलल ड्रॉ करणारे उदाहरण म्हणून घेतले आहे. मुख्य चर्चेस महत्वाच काय की ,
पक्षकारा प्रमाणे न्यायाधिशाचाही संयम सुटू शकतो असे काही झाले तर करेक्टिव्ह मेकेनिझम उपलब्ध आहेत . जरासा संयम सुटण्यावरून पक्षकारास अवाजवी शिक्षा होऊ नये तोच नियम माणूस म्हणून न्यायाधीशासही लागू होतो . प्रसंगावधान दाखवून स्वतः: ना केलेल्या आपल्या सहकार्याच्या चुकी करता मोठ्या मनाने माफी मागितली तर माफी मागणाऱ्या त्रयस्थाशी उपकार केले का अशी उद्धट भाषा वाजवी ठरते नसावी . अजून एक उदाहरण देतो समजा तुमच्या कुटूंबातल्या एखाद्या सदस्या कडून - आपल्याला लहान मुल आहे का माहित नाही पण क्षणभरासाठी आहे समजा त्याच्या कडून किंवा समजा तुम्ही ज्याकोणत्या ऑफीस मध्ये काम करत असाल तेथील तुमच्या कलीग कडून- काही गफलत होऊन नकळत दुसर्यास मे बी धक्का लागला किंवा अजून काही झाले आणि ज्यास क्षती पोहोचली त्याची आपण माफी मागितली . आणि समोरच्याने अहो अजो माफी मागताय म्हणजे काय उपकार करताय का अशी परतफेड केली तर आपल्याला कसे वाटेल ? हा मुद्दा आहे . खूप महत्वाचा नाही लक्षात येणे अवघड गेल्यास सोडून दिलेत तरीही चालेल .
30 Apr 2018 - 10:03 am | सुबोध खरे
पक्षकारास अवाजवी शिक्षा होऊ नये तोच नियम माणूस म्हणून न्यायाधीशासही लागू होतो .
माहितगार साहेब
जरासा संयम सुटल्यावर माणसाला २० दिवस मनोरुग्णालयात ठेवले जात नाही/ जाऊ नये. त्यांना --जर त्यांची मुले उच्च न्यायालयात गेली नसती तर --२० जानेवारी पर्यंत मनोरुग्णालयात ठेवले गेले असते. https://www.indiatimes.com/news/india/72-yo-healthy-man-sent-to-mental-a...
आपण हा मुद्दा क्षुद्र आहे असे भासवताय (trivialisation).
On Thursday, in its final verdict, a bench of Justices S Muralidhar and I S Mehta apologised to the man, who is a heart patient, saying his case presented “a dismal failure of our system, which includes the police, the judiciary and the mental health professionals, to protect the fundamental rights of an individual”.
बातमी नीट वाचली तर एक लक्षात येईल कि हा माणूस हृदय रोगी आहे आणि Following his release, Kumar underwent a heart procedure on November 29. या कालावधीत या माणसाला हृदयरोगाचा झटका येऊन काही बरे वाईट झाले असते तर त्या न्यायिक अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला भरला असता का.
असे खटले डॉक्टरच्या निष्काळजीपणानंतर भरलेले मी आपणास डझनानी दाखवू शकेन.
१०० % नाही कारण लोकशाहीत सगळे लोक समान असतात पण काही लोक जास्त समान असतात.
उच्च न्यायालयाने हे २ लाख रुपये जबाबदार व्यक्तींच्या पगारातून वळते करून घ्या असा आदेश का दिला नाही?
अशी "चौकशी आणि कारणे दाखवा नोटीस" सरकारी नोकरांना शेकड्यानी दिली जाते.
याचाच अर्थ काय आपण एकदा न्यायपालिकेत अधिकारी झालात कि आपल्याला कायदा वेगळ्या तर्हेने लागू होतो.
आपल्या म्हणण्यानुसार खालच्या न्यायिक अधिकाऱ्याकडून झालेल्या अन्यायाबद्दल दाद मागण्यासाठी वरील न्यायालये उपलब्ध आहेत.
किती लोकांना ते आर्थिक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या परवडते हे पण एकदा सांगून टाका.
अशाच गोष्टींमुळे खालच्या न्यायिक अधिकाऱ्यांनी केलेले गैरवर्तन हे अतिशय गंभीरपणे घेतले गेले पाहिजे आणि अशा बाबतीत कठोरपणे या न्यायिक अधिकाऱ्यास चौकशी होईपर्यंत निलंबित केले गेले पाहिजे. आणि दोषी आढळले तर नॊकरीतून बडतर्फ केले पाहिजे
कारण असा भावनावश होणारा (impulsive) अधिकारी न्यायालयात निवड करण्यास लायक नाही असाच यातून अर्थ निघेल.
30 Apr 2018 - 10:58 am | माहितगार
एक मिनिट आपण दोन वेगवेगळ्या विषयांची गल्लत करत आहात !
१) संयम तुटण्यामुळे आपण मृत्यूची जी शक्यता वर्तवली आहे ती दोन्ही बाजूस सारखी लागू पडते ! पक्षकारांच्या संयम तुटण्या मुळे न्यायाधीशाच्या मृत्यू झाला असता तर जो नियम लागला असता तोच नियम न्यायाधीशाचा संयम तुटण्या मुळे पक्षकाराचा मृत्यू झाला असता तर लागू पडावा . आणि तसे झाल्यास ती केस वेगळी चालावी .
( न्यायिक अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला भरला असता का ? माझे तरी उत्तर होकारार्थी असेल पण हे जरा तर झाले , मनोरुग्णालयात मानसिक स्थिती आणखी बिघडू नये याची काळजी घेतली जाण्याची व्यवस्था सहसा असावी ती यशस्वी होते कि नाही हा भाग वेगळा , प्रश्न मानवाधिकाराचा मुद्दा नाकारायचा नाहीए प, ण साशंकता इश्यू आहे त्यापेक्षा मॅग्निफाय करण्याबद्दल आहे, एकच बाजू लक्षात घेण्या बद्दल आहे - इथे न्यायाधीशाची बाजू काय आहे हे लक्षात घेतले जात नाही आहे ट्रायल बाया मीडिया आणि ट्रायल बाया सोशल मीडिया होते आहे )
२) संबंधित पक्षकारांच्या मानवाधिकार उल्लंघना सा ठी संबंधित न्यायाधीशा विरुद्ध संबंधित पक्षकारास नुकसान भरपाई हवी असल्यास तशी कायद्यात तरतूद आहे का हे पक्षकाराने पाहून तरतूद उपलब्ध असल्यास वेगळा खटला भरावयास हवा , आणि तशी तरतूद सध्याच्या कायद्यात नसेल तर संसदेकडे अशी तरतूद करण्यासाठी मागणी केली जावी .
३) तो न्यायाधीश न्यायाधीश पदावरून गच्छंती करून हवा असल्यास बार खास्तीसाठी आवाहन सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशा मार्फत संसदे कडे जावे म्हणून त्यांना पत्र पाठवू शकता किंवा संसद सदस्यांना आवाहन करू शकता
४) मनोरुग्णालयात पाठवल्या पाठवल्या पहिली दाद उच्चं न्यायालयात मनोरुग्णालयातून सोडवण्या बद्दल मागितली जावयास हवी ती मागितली गेली , उच्च न्यायालयातील त्या न्यायाधीशाने मनोरुग्णालयातून मुक्तता करणे आणि आपल्या कनिष्ठ सहकाऱ्याकडून झालेल्या चुकीची माफी (स्वतः:हुन ) मागणे महत्वाचे . मुद्दा १, २, ३ साठी पक्षकारांनी स्वतंत्र खटले भरावे . पण मुद्दा चार मी इथे नंतर लिहिला असला तरी प्रत्यक्ष कार्यवाहीत आधी येतो . उच्चं न्यायालयातील वरिष्ठाने उद्दाम पणा दाखवला अथवा दुर्लक्ष केले असे काही केले नाही . मनोरुग्णालयातून सोडवणूक केली कि त्याचे अधिकृत दायित्व तेथे संपते . कनिष्ठांच्या चुकांची माफी मागणे हा त्याच्या स्वभावातील सकारात्मक भाग आहे . ज्या त्रयस्थपणे सकारात्मक पाऊल उचलले त्याला अरे तू उपकार नाही केले असे म्हणण्यात पॉईंट नाहीए . तोही उपकाराची भावना बाळगत नाहीए , इथे संबंध नसताना हि उपकाराची त्याने भाषा केलेली नसतानाही अशा त्रयस्थावर हकनाक अरे उपकाराची भाषा करू नको असे म्हणणे आहे आणि ते मला खटकते .
म्हणजे चांगले वागण्याचे क्रेडिट नको त्रयस्थास तुम्ही उपकार नाही केले हि भाषेचे आणखी उदाहरण देतो .
रस्त्यावर एका अपघात होतो जखमीला एका त्रयस्थ मदत करतो . आता तुम्ही मदत करणाऱ्या त्रयस्थाला (त्याने स्वतः: उपकाराची भावना ठेवली नसेल तरीही ) अहो तुम्ही मदत केली म्हणजे उपकार नाही केले म्हणणारा का ? धागा लेखक अजो लॉजिक मध्ये मुरले आहेत पण त्यांचे इथले -उपकाराच्या भाषेचे लॉजिक मला नीटसे उमगलेले नाही असो )
30 Apr 2018 - 11:48 am | सुबोध खरे
लॉजिक नीटसे उमगलेले नाही .
हे सत्य आहे.
श्री राम कुमार हे हृदय रोगी आहेत आणि मनोरुग्णालयातून सुटल्यावर लगेच त्यांच्यावर ( बहुधा) अँजियोप्लास्टी करायला लागली.
त्यांच्या मुलांना न सांगता त्यांना मनोरुग्णालयात पाठवले. तेथे त्यांचा हृदयविकार बळावून काहीही होण्याची शक्यता नक्कीच होती. त्याचा मनोविकाराशी संबंध नाही.
इथे न्यायाधीशाची बाजू काय आहे हे लक्षात घेतले जात नाही.
मी पाठवलेला दुसरा दुवा नीट वाचला का?
शिवाय उच्च न्यायालयाने काय म्हटले आहे/ यात ट्रायल बाय मीडिया कसे म्हणता येईल?
हे पक्षकाराने पाहून तरतूद उपलब्ध असल्यास वेगळा खटला भरावयास हवा ,
मुळात पहिला खटला इतका लांबवला गेला आहे कि त्याने जेरीस येऊनच श्री रामकुमार यांचा संयम सुटला त्यावर तुम्ही त्यांना अजून वेगळे खटले करायला सांगताय? कमालच आहे
आणि तशी तरतूद सध्याच्या कायद्यात नसेल तर संसदेकडे अशी तरतूद करण्यासाठी मागणी केली जावी .
हे म्हणजे एखाद्याला बैलाचे दूध काढायला बसवण्यासारखे आहे.
तो न्यायाधीश न्यायाधीश पदावरून गच्छंती करून हवा असल्यास बरखास्तीसाठी आवाहन सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशा मार्फत संसदे कडे जावे म्हणून त्यांना पत्र पाठवू शकता किंवा संसद सदस्यांना आवाहन करू शकता
पुन्हा चूक गृहीतक..
उच्च न्यायालय राज्य सरकारला अशा न्यायिक अधिकाऱ्यांच्या बरखास्तीची शिफारस करू शकते आणि करतातच. त्याला संसद आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्याची गरज नाही.
http://www.livelaw.in/compulsory-retirement-12-district-judges-jharkhand...
हा दुवा पूर्ण वाचून घ्या.
उच्चं न्यायालयातील वरिष्ठाने उद्दाम पणा दाखवला अथवा दुर्लक्ष केले असे काही केले नाही
परत चुकीचे गृहीतक
उच्च न्यायालयाने उद्दाम पण दाखवला असे मी कुठेही म्हटलेले नाही. परंतु हे २ लाख रुपये सरकारच्या तिजोरीतून जाण्याच्या ऐवजी या न्यायिक/ पोलीस/ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पगारातून कापून दिले असते तर परत असे करण्याच्या अगोदर सरकारी अधिकारी चार वेळेस विचार करतील. असे अधिकार सर्व लवाद, आयोग आणि उच्च न्यायालयांना असतात
http://indianexpress.com/article/cities/ahmedabad/violation-of-rti-act-i...
यात उपकाराची भाषा कुठे आणि कशी आली ते समजत नाही. न्याय नुसता करणे आवश्यक नाही तर तो दृश्य हि असला पाहिजे हे एक कायद्याचे मूलभूत तत्व आहे.
मूळ आपला संपूर्ण प्रतिसाद चुकीच्या माहितीवर आणि चुकीच्या गृहीतकांवर आधारित आहे म्हणून तो वेगळ्याच दिशेने गेला आहे.
30 Apr 2018 - 12:14 pm | माहितगार
मला जे म्हणायचे आहे ते हे की ,
१) चांगले वाईट भारतीय इतर व्यवस्थेत असतात तसेच न्यायपालिकेतही असतात
२) भारतीय न्यायपालिकेत सहसा जे करेक्टीव्ह मेकॅनीझम्स आहेत , ते सहसा वर्क होतात
३) जिथे करेक्टीव्ह मेकॅनीझम साठी कायद्याचे पाठबळ नाही अशी स्थिती असेल तर ती संसदेची जबाबदारी आहे, करेक्टीव्ह मेकीनीझम बाबतच्या कायद्यात त्रुटी असल्यास अथवा अनुपलब्धता असल्यास त्याची जबाबदारी संसदेची आहे .
४) अपवादावरुन नियम सिद्ध करु नयेत
५) न्यायपालिका संबंधीत बर्याच सुधारनांची जबाबदारी अप्रत्यक्ष पणे शासन आणि कायदे मंडळाची असावी त्याचे हकनाक खापर एकट्या न्यायपालिकेवर फोडून न्यायपालिकेस हकनाक बदनाम करु नये . टाळी एका हाताने वाजत नाही हे येथील विवीध प्रतिसादातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे
५) उपकारांचा प्रश्न आपल्या धागालेखक अजोंचे या धागाचर्चेतील मूळ संशोधन आहे, त्यांचे प्रशस्ती पत्र त्यांना घेऊ द्यावे :)
30 Apr 2018 - 1:33 pm | सुबोध खरे
१) चांगले वाईट भारतीय इतर व्यवस्थेत असतात तसेच न्यायपालिकेतही असतात
इथे प्रश्न तो नाही. इतर खात्यात झालेल्या अन्यायावर दाद मागण्यासाठी न्यायालये आहेत पण न्यायालयात झालेल्या अन्यायासाठी दाद मागण्याची कोणतीही परिणामकारक यंत्रणा नाही. यामुळेच न्यायपालिकेने जास्त जागृत राहणे हि जनतेची अपेक्षा आहे.
२) भारतीय न्यायपालिकेत सहसा जे करेक्टीव्ह मेकॅनीझम्स आहेत , ते सहसा वर्क होतात
सहसा काम करेपर्यंत कालापव्यय इतका आहे कि अंती सत्याचा जय होतो म्हणेस्तोवर सत्याचा अंत व्हायची वेळ आलेली असते.
३) जिथे करेक्टीव्ह मेकॅनीझम साठी कायद्याचे पाठबळ नाही अशी स्थिती असेल तर ती संसदेची जबाबदारी आहे, करेक्टीव्ह मेकीनीझम बाबतच्या कायद्यात त्रुटी असल्यास अथवा अनुपलब्धता असल्यास त्याची जबाबदारी संसदेची आहे .
परत बैलाचे दूध काढायला बसा
४) अपवादावरुन नियम सिद्ध करु नयेत
मी दिलेलं दुवे अपवाद नसून नियम आहेत समजून घ्या.
५) न्यायपालिका संबंधीत बर्याच सुधारनांची जबाबदारी अप्रत्यक्ष पणे शासन आणि कायदे मंडळाची असावी
न्यायपालिकेने न्यायाधीश नेमण्यापासून सर्वच्या सर्व अधिकार ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निकालान्व्ये स्वतःकडे घेतलेले आहेत. त्याच्या वर केलेली घटनादुरुस्ती सुद्धा ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ४-१ अशी रद्दबातल ठरवली आहे. या दोन्ही गोष्टी निदान ९ किंवा ११ किंवा १३ न्यायाधीशांच्या पूर्णपीठाने करायला हवी होती असे बऱ्याच वरिष्ठ कायदे पंडितांचे मत आहे.
तेंव्हा शासन आणि कायदेमंडळ यात सुधारणा करण्याचा प्रयत्न न्यायासनाच्या निष्पक्षतेची दुहाई देऊन हाणून पाडला आहे.
त्याचे हकनाक खापर एकट्या न्यायपालिकेवर फोडून न्यायपालिकेस हकनाक बदनाम करु नये . टाळी एका हाताने वाजत नाही हे येथील विवीध प्रतिसादातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
ते असताना न्यायासनाने आपल्या वस्त्रावर डाग पडला जाणार नाही याची अतीव काळजी घेतली पाहिजे. वरील केस मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे ज्यात श्री रामकुमार याना भरपाई मिळते आहे परंतु जे गुन्हेगार आहेत त्यांना शासन होताना दिसत नाही.
न्याय हा फक्त केला गेला पाहिजे असे नाही तर तो दृश्य असला पाहिजे हि एक कायद्याची मूलभूत संकल्पना आहे.
५) उपकारांचा प्रश्न आपल्या धागालेखक अजोंचे या धागाचर्चेतील मूळ संशोधन आहे, त्यांचे प्रशस्ती पत्र त्यांना घेऊ द्यावे :)
यावर पास
30 Apr 2018 - 2:52 pm | माहितगार
तुमच्या न्यायपालिकेवरील आक्षेपांचे एक महत्वाचे मूळ इथे आहे.
प्रथमतः: आपण हे मान्य कराल , कि कॉलेजियम पद्धतीत सुद्धा न्यायाधीशाची नेमणूक शासनाने प्रस्ताव स्वीकारल्या शिवाय होतानाही . (न्यायाधीश जोसेफ सध्याच्या सरकारला अद्याप सर्वोच्च न्यायालयात नको आहेत तो पर्यंत त्यांची नेमणूक होऊ शकत नाही हे आपण अभ्यासले असेलच .)
म्हणजे ‘शासनास हव्या त्या व्यक्ती न्यायासनावर नेमता येत नाहीत’ हे मुख्य दुखणे आहे . म्हणजे पूर्ण मोकळा हात दिला तर राज्यसभेवर राष्ट्रपती जसे १२ कोणत्याही व्यक्तींना नेमू दिले जाते तसे करू दिले तर शासन कर्त्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे . कॉलेजियम ने पाठविलेल्या नावापैकी फक्त आपल्याच पसंतीच्या न्यायाधीशाना पदावर नेमणुका मान्य करता गेले तर एक दिवस हेही करता येईल . या साठी केवळ आधीचे न्यायाधीश रिटायर होऊन आपल्या भूमिकेशी सहमत न्यायाधीश उरतील तो पर्यंत वाट पाहावी लागेल आणि तो पर्यंत पुन्हा पुन्हा बहुमताने निवडून यावे लागेल , किंवा निवडून कुणीही आले तरी प्रत्येक निवडून येणाऱ्या सरकारने भूमिकेत सातत्य पाळावयास हवे . म्हणजे भारतीय घटना वाकू शकते केवळ दोन एका दशके बहुमताचा सातत्याचा पाठिंबा हवा ,
आपणच लक्ष वेधता कि “न्याय हा फक्त केला गेला पाहिजे असे नाही तर तो दृश्य असला पाहिजे “ आणि या दृश्यतेसाठी न्यायालयाची निवडतील निष्पक्षता एक महत्वाचा निकष असू शकतो हे आपण लक्षात घ्यावयास नको का ? (कुणाला येऊ नाही द्यायचे हे तुमच्या हातात आधी आहेच , पण कुणा कुणाला आणता येईल यात राजकीय पक्षांना दार उघडले कि निष्पक्षतेचा बोजवारा वाजणार नाही का याची न्यायपालिकेची शंका आपल्या ठिकाणी वाजवी आहे हे लक्षात घेतले पाहिजे ) आता प्रश्न राहिला घटनादुरुस्ती रद्द केली , जर न्यायाधीश निवडीतील राजकीय हस्तक्षेप होऊन निष्पक्षतेस गालबोट लागण्या बाबतच्या न्यायपालिकेस वाटणाऱ्या काळजी बद्दल कायदामंडळे संवेदनशील असतील तर त्यांचे काळजीच्या मुद्द्यांची दखल घेऊन पुन्हा एक किंवा न्यायपालिकेने मान्य करे पर्यंत एकानंतर एका घटना दुरुस्त्या आणण्यासाठी कायदेमंडळ म्हणजे संसद आणि विधानसभांना कुणी थांबवले आहे का ? कुणीही थांबवले नाही पण एका पायरी हुकल्यानंतर दुसऱ्या पायरी ती हुकल्यास अजून एका पायरी हे करण्याची कायदे मंडळांची तयारी नसणे हा न्यायपालिकेचा प्रश्न नाही हा कायदे मंडळांचा प्रश्न आहे . किंवा मी आधी म्हणालो तसे सर्व न्यायाधीश तुमच्याशी सहमत होणारे उरे पर्यंत थांबावे लागेल .
आपल्या रूपकातील बैल विशेषण न्यायापालिकेस नक्कीच पोहोचत नाही , जबाबदारी संसदेची आहे . कायदे बनवणे आणि आर्थिक बजेटच्या तरतुदी करणे कायदे मंडळ आणि शासनाच्या जबाबदाऱ्या आहेत.-कायदे मंडळातील जनप्रतिनिधींना तिथे कायदे बनवण्यासाठीच निवडून दिलेले असते ना कि अजून कशासाठी ?, त्यांनी आपले काम पूर्ण क्षमतेने पार ना पाडण्याचे खापर न्यायपालिकेवर कशासाठी ?- त्यांना तुम्ही काय विशेषण देता आणि काय वाक्प्रचार वापरता याचे न्यायपालिकेस देणे घेणे असण्याचे काही कारण नाही . कायदे बनवणे आणि आर्थिक बजेटच्या न्यायपालिका आधुनिकीकरणासाठी लागणाऱ्या तरतुदी सुद्धा न्यायपालिका करू लागली तर तुम्ही म्हणाला अरेरे पहा पहा न्यायपालिका काय करते स्वतः:च्या जबाबदाऱयांच्या पलीकडे जाते . बेसिकली न्यायपालिका आपली ,आपल्या राज्यकर्त्यांची आणि आपल्या मीडियाची सहजपणे खापर फोडीचा खेळ खेळता येईल अशी एका सॉफ़्ट टार्गेट झाली आहे .
कालापव्यय होऊ नये म्हणून आधुनिकीकरणासाठी बजेटच प्रोव्हिजन करणे , न्यायाधीश निवड वेगवान होण्यासाठी न्यायालयास मान्य घटना दुरुस्त्या न्यायापालिकेस सॉफ़्ट टार्गेट करून ब्लॅकमेल न करता आणणे हि जबाबदारी कायदे मंडळाची म्हणजेच तुमच्या आमच्या जनप्रतिनिधींची आहे . -कायदे मंडळातील जनप्रतिनिधींना तिथे कायदे बनवण्यासाठीच निवडून दिलेले असते ना कि अजून कशासाठी , त्यांनी आपले काम पूर्ण क्षमतेने पार ना पाडण्याचे खापर न्यायपालिकेवर कशासाठी ?
न्यायालयात झालेल्या अन्यायासाठी दाद मागण्याची कोणतीही परिणामकारक यंत्रणा नाही
यंत्रणा परिणामकारक होऊ शकेल असे कायदे बनवण्याची आणि आर्थिक बाजू सांभाळली जाईल हे पहाण्याची जबाबदारी कायदे मंडळांची आहे . त्यासाठी लागणारा दबाव कायदे मंडळांवर तयार करणे हि जबाबदारी माध्यमे आणि सुजाण नागरिकांची आहे . असो.
30 Apr 2018 - 4:09 pm | arunjoshi123
माझे मते भारतीय न्यायालयांत पक्षकारांचा संयम तुटणे ही बाब हिंदी चित्रपटांत गाणी असण्याइतका सामान्य आहे. पण याने कधीही न्यायाधीशास काही नुकसान पोचत नाही, मृत्यू असोच, कारण पक्षकारास न्यायाधीशास शिक्षा देण्याचा कोणताही थेट अधिकार नाही. त्यामुळे न्यायाधीश चिल्ल असतात नि पक्षकार नेहमीच भयंकर त्रस्त असतात.
=========================
आपण इथे अन्यत्र पक्षकाराने संसदेकडे जाऊन आपले गार्हाणे मांडावे असा सुझाव दिला आहे. एकतर ही काँस्टीस्ट्यूअन्सी तितकी मोठी नाही, संघठीत नाही आणि न्यायिक सुधारांच्या प्रयत्नांस कधी कायदाभंगाचा शिक्का लागेल हे सांगता येत नाही. आणि मी हा धागा काढला आहे तो त्याच दिशेने एक कॅज्यूअल प्रयत्न आहे पण फार लोकांना त्यात काही रस दिसत नाही.
===========================
मिपावर वकील मंडळी नसावीत का? इथे कधी लॉ कमिशन किती झालेत नि आजवर प्रत्येक महत्त्वाच्या कमिशननी काय काय बदल केलेत यावर एकतरी चर्चा झाली आहे का? सामान्य भारतीय लोक एका अॅव्हरेज मिपाकरापेक्षा अजून कॅच्यूअल असणार म्हणून निवडणूक पलटावेल इतका मोठा मुद्दा हा व्यवहार्य दृष्ट्या होत नाही. माझं म्हणणं इतकंच आहे ही जज मंडळी दुनियाभराचा शहाणपणा मिरवतात आणि सगळ्यांच्या चूका काढतात तेव्हा स्वतःची अवस्था पाहायला नक्की घोडं कुठं अडतं?
30 Apr 2018 - 4:48 pm | माहितगार
.
पहात असणार ना, न पाहण्यास काय झाले ? अर्थात - न्यायाधीशांनी सर्वसामान्यपणे त्यांच्या निकालातून व्यक्त व्हावे असा सन्केत असतो - यातील पत्रकार परिषदा घेणारे बोलघेवडे अपवाद असतात कारण ती त्यांची सर्वसाधारण संस्कृती नसते . पब्लिसिटी प्रीय वकील सरळ राजकारणात जातात न्यायपालिकेत पोहोचणारी न्यायाधिश मन्डळी क्केस लढवण्यासाठी लागणारे अथवा राजकारणासाठी लागणारे नेटवर्कीन्ग स्कील नसल्यामुळे न्यायाधीश होणे पत्करत असावेत. यांच्या कडे अभ्यासपूर्ण लेखनाचे स्कील विकसीत होते त्यातील जे अभ्यासपूर्ण लेखन करनारे न्यायाधिश असतात ते लॉ जर्नल्स मधून लेखन करत असतात अर्थात यातील बहुतेक लेखन एक कॉपीराईट मुळे पडद्यामागे रहाते दुसरे ते लिगल जार्गन्सनी भरलेले असल्याने सर्वसामान्यांना त्यात कमी रस असतो म्हणून त्यान्चे लेखन पुढे येत नाही.
सोईचे जज पाहून फारतर आयोग अथवा राज्यपाल पदाच्या नियुक्त्या त्यांना मिळतात पण संसद आणि विधी मंडळात मंत्रीपदावर पायलिची पसाभर वकील मंडळी पोहोचत असताना संसद विधी मंडळे आणि मंत्रि पदांवर न्यायाधिश मंडळी सहसा दिसणार नाहीत म्हणजे पदावरुन शासनास कायद्यात बसणारे आदेश देण्यापलिकडे निवृत्त झाल्यावर संसदीय राजकारणावर त्यांचा इफेक्टीव्ह प्रभाव दिसत नाही.
अजो तुम्ही राजकारणात्वर प्रभाव टाकणार्या जनसमुहातून येत नसल्यामुळेतर तुम्हाला तसे वाटत नाही ना ? सर्वसामान्यांच्या प्रभावी लोकसमुहातून तुम्ही असाल तर संसदीय राजकारणावर प्रभाव नक्कीच असतो , एवढेच आहे की तुम्हाला जे विषय महत्वाचे वाटतात ते त्यांना प्रिऑरीटीचे वाटत नसावेत किंवा त्यांना फसवण्यात त्यांच्या प्रतिनिधींना यश येत असावे अशीही एक बाजू असू शकेल नाही का ?
नाहीत असेच समजून चला , मी तरी कायदा आणि न्यायपालिका विषयक चर्चात सहभागी होताना कुणाला फारसे पाहीले नाही हे एक दुसरे प्रयत्न करुनही आणू शकलो नाही हे दुसरे
एनी वे सरकारने कायम स्वरुपी लॉ कमिशन ठेवणे आणि त्यांच्या कडे अशा सर्व सूचना पाठवण्याची कायम स्वरुपी व्यवस्थेचा अभाव पुन्हा तीन बोटे राज्यकर्त्यांकडे असल्याचे सुचीत करतो .
असे मुळीच नाहीए . कंटेम्प्त ऑफ कोर्ट अॅक्टचा दुवा मी दिलेला आहे . त्यात सभ्य टिकेस पूर्ण वाव असल्याचे दिसते . आपण स्वतः तो कायदा वाचा आणि त्यात वावगे काय वाटते ते निदर्शनास आणावे .
असेच छोटे च्छोटे प्रयत्न व्हावयास हवेत.
सुपात पाखडले जाताना उड्या मारण्याचा आनंद मोठा असावा
मी वर उत्तर दिले आहेच जजेसचा प्रभाव तर सामान्यांपेक्षाही कमी असण्याचे कारणही नमुद केले आहे .
.
या थेट अधिकाराचे स्वरुप काय असावे त्याचे उत्तर द्यावे (=)) ) त्यापुढे मी प्रतिवाद करतो.
30 Apr 2018 - 4:39 pm | arunjoshi123
उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जाणार्या केसेस ह्या नाही म्हटले तरी थोड्याश्या नाविन्यपूर्ण, ज्यात किचकट अर्थनिणयन आवश्यक आहेत अशा, संविधानाचा अर्थ लावणार्या, वरच्या लेवलच्या, इ इ असतात. खालच्या कोर्टातल्या केसेस त्यातली त्यात टिपिकल असाव्यात. शिवाय संख्येने भरपूर.
खालच्या न्यायालयात काय झाले याची जबाबदारी सरकारने घेतलेली नाही नि वरच्या न्यायालयाने घेतली आहे हे इथे उल्लेखनीय आहे. म्हणजे एका अर्थानं करोडो लोकांच्या जीवनात महत्त्व असणार्या केसेस कशा चालाव्यात, सुयोग्य न्यायप्रदान कसं व्हावं याची बरीच जबाबदारी या उच्च नि सर्वोच्च न्यायाधीशांची आहे, सरकारची नाही. जेव्हा एखादं सरकार नुसतं वचनपूर्ती करण्यात कमी पडतं तेव्हा त्याच्यावर कडाडून टिका होते. तशीच टिका किमान उघड चूका केल्यावर तरी न्यायपालिकेवर व्हायला नको का?
ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांची माफी मागणारे न्यायाधीश अर्थातच व्यक्तिशः चांगले आहेतच. पण एक व्यवस्था म्हणून ही चांगली मंडळी कुचकामी आहेत. उपकार वाटावी अशी जाऊच द्या, खूप सबल वाटणारी अशीही जाऊ द्या, सामान्य वाटावी अशीही जाऊ द्या किमान खुद्दच अन्याय न करणारी व्यवस्था देण्यास ही चांगली मंडळी ७० वर्षे (वास्तविक त्याहून अधिक) अपात्र राहिलेली आहेत. म्हणून त्यांची माफी हा काही उपकार नाही. असले प्रकार बंद व्हायचे उपाय कराल तर उपकार.
30 Apr 2018 - 4:52 pm | माहितगार
मला वाटते डॉ. सुबोध खरेंना दिलेल्या उत्तरात याचा समावेश आहे . तुमच्याकडे नाण्याची एक बाजू आहे ती मी नाकारत नाहीए पण ती एकच बाजू आहे, नाण्यास दुसरी बाजूही आहे हे लक्षात घ्यावे असा माझा आग्रह आहे .
मी पण न्यायपालिकेतला काय वकील पण नाही :) तेव्हा या मुद्द्या पुरते इथेच थांबतो.
30 Apr 2018 - 3:36 pm | arunjoshi123
या विशिष्ट केसमधे अगदी हद्द झाली आहे. ते असो.
=======================
पण एरवीही न्यायालये धडकी भरवतात. निर्दोष लोकांना (सुद्धा) कोर्ट केसची प्रचंड भिती असते. एकदा केस चालू झाली कि जीवनात तणावाने लोकांचे जीवन दिनवाणे होते. चिंता, ताण, धाकधूक प्रचंड असते. असं का बरे व्हावं? यात अंततः दोष न्यायालयांचा नाही का? (निकाल अन्यायकारक असल्यावर काय होते हे सध्याला असो.)
निर्दोष लोकांना बिना टेंशनचे राहणे इतके का अवघड आहे?
स्वतःस निर्दोष सिद्ध करणे न्यायालयीन प्रक्रियेमधे इतके अवघड का असावे.? ती एक बिनघोर डिफॉल्ट अवस्था असायला हवी.
30 Apr 2018 - 4:16 pm | माहितगार
बाकी प्रतिवाद नंतर करतो तत्पुर्वी , उपरोक्त वाक्यातील " ...ती एक बिनघोर डिफॉल्ट अवस्था असायला हवी." यात आपल्याला नेमके काय अभिप्रेत आहे ? आरोपी बाय डिफॉल्ट बिनघोर निर्दोष सिद्ध व्हावेत ? :)
30 Apr 2018 - 5:04 pm | arunjoshi123
समजा मी एक आरोपी आहे. मला माहीत आहे की मी निर्दोष आहे. अर्थातच अपराध झाला आहे तेव्हा कोणी ना कोणी दोषी आहे. तो कोण आहे नाही मला माहीत असेल नसेल. मी दोषी आहे नाही हे न्यायाधीश धरून अन्य कोणास माहीत असेल, नसेल.
-----------------------
समजा मी एक आरोपी आहे. मला माहीत आहे की मी दोषी आहे. अर्थातच अपराध झाला आहे तेव्हा कोणी ना कोणी दोषी आहे. तो कोण आहे नाही मला माहीत असेल नसेल. मी दोषी आहे नाही हे न्यायाधीश धरून अन्य कोणास माहीत असेल, नसेल.
=======================
वरील दोन केसेसमधे पहिल्या केसमधला माणूस १००% बिनघोर असला पाहिजे.
30 Apr 2018 - 5:35 pm | माहितगार
अगदी अवश्य १०० % बिनघोर असण्यास काहीच हरकत नाही . कारण आधूनिक न्यायव्यवस्थेत १०० अपराधी सुटले तरी चालतील एका निर्दोषास सजा होऊ नये हे तत्वच आहे . आणि म्हणूनच आरोपींसाठी विवीध अधिकारांची तरतूद आहे.
स्वतःचा वकील परव्डत नसेल तर आरोपीस वकील उपलब्ध करुन दिला जातो . आरोप सिद्ध होईपर्यंत त्यास गुन्हेगार गृहीत धरले जात नाही. जामीन विषयक पुरेशा तरतुदी उपलब्ध आहेत. प्रतिपक्षास आरोपी विरुद्ध पुरावे शाबीत करावे लागतात, अशा पुराव्यांच्या साक्षींच्या उलटतपासणीचा अधिकार आरोपीस असतो. आणि त्रिस्तरीय न्यायव्यवस्थेत वरीष्ठ न्यायालयाकडे दाद मागता येते .
पोलीसांकडे येणार्या फार थोड्या केसेस मध्ये पोलीसांकडे कच्छे दुवे नसलेले पुरावे फार थोड्या केसेस मध्ये मिळतात, प्रत्य़षात फार थोड्या केसेस न्यायालया पर्यंत जातात, न्यायपालिकेतून आरोप सिद्ध न होता सुटणार्ञांचीच संख्या फार मोठी आहे. उलट कन्व्हीक्शन मधील पोलीसाम्चा यशाचा दर कमी असणे ही मोठ्या चिंतेची बाब आहे. अगदी प्रसिद्ध केसेस मध्येही अनेक आरोपी निर्दोष सुटत रहातात. वृत्तमाध्यमे प्रसिद्धी आणी टिआरपी वलयापलिकडे आणि वस्तुनिष्ठ वार्तांकन न करता अपप्रसिद्धीत भर पदेल असे वागते त्यामुळे एक फसवे चित्र लोकाम्च्या डोळ्यासमोर उभे रहाते ज्यात न्यायपालिकेस सॉफ्ट टार्गेट बनवून टिका केली जाते आणि निर्दोष लोकही या निर्माण केल्या गेलेल्या खोट्या प्रतिमे खाली रहातात.
निर्दोष व्यक्ती विरुद्ध खोटी केस उभी केली जाणे ह्यास खोटे आरोप करणारे जबाबदार आहेत , न्यायपालिका नव्हे हे लक्षात घेतले पाहीजे .
न्यायिक विलंब हा एक प्रकारे छळ आहे पण या विलंबांना केवळ न्यायपालिका कशी जबाब्दार नाही या बद्दल आधी करुन झालेल्या विवेचनाची पुर्नावृत्ती टाळतो.
28 Apr 2018 - 5:30 pm | माहितगार
सन्मान ब्रिटिश संरंजामी पद्धतीनेच द्यावा असा आग्रह नाही . पण न्याय व्यवस्थेचा किमान स्वरूपाचा मानसिक दरारा असणेही गरजेचे असावे असे वाटते
29 Apr 2018 - 1:14 am | arunjoshi123
ज्या कोणत्या कारणांसाठी आपणांस आवश्यक वाटतो तो -
==========================
१. दरारा पोलिसांचा हवा.
२. सैनिकांचा हवा.
३. संस्थांतील ज्येष्ठांचा हवा.
४. घरातल्या श्रेष्ठांचा हवा.
५. राजकारण्यांचा हवा.
६. सरकारचा असावा.
=================
जजचा दरारा कशाला पाहिजे? त्याचा दरारा असेल तर भितीने लोक खरे नाही बोलणार, त्याला आवडणार नाही ते बोलणार नाही.
28 Apr 2018 - 5:46 pm | माहितगार
अजो मानवात निव्वळ तर्कावर मांडणी खूप कमी जणांना जमते , तुमच्या माझ्यासारखे कमी असतात , तेच इतरांनी केलेल्या तर्कांचा आधार घेणे उद्धृत करणे बरेच सोपे जाते . न्यायाधीशाने केस लॉचा चुकीचा उपयोग/अर्थ लावला असे वादी अथवा प्रतिवादींच्या वकिलास वाटल्यास तो त्याच्या आशिलास आधी हाय कोर्टात सिंगल बेंच नंतर डिव्हिजन बेंच नंतर सुप्रीम कोर्टात आवाहन देण्यास सांगू शकतो . केस लॉ ने विश्वासार्हता सहसा वाढते . पूर्वी केस लॉ शोधणे अवघड होते आता नीर निराळ्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतः:सुद्धा केस लॉ बऱ्या पैकी तपासू शकता .
अर्थात केस लो जसा जसा पुढे जाईल तसे मुख्य कायदा अद्ययावत करण्याची जबाबदारी लोक नियुक्त कायदे मंडळांची म्हणजे संसद आणि विधान सभेची असते जेणे करून बेअर कायदा वाचुन सामान्य जनतेलाही योग्य निर्णय घेणे सोपे गेले पाहिजे . पण संसद आणि विधान सभा त्यात कमी पडत असतील तर त्याचे खापर न्यायपालिकेवर फोडण्यात पॉईंट नाही
30 Apr 2018 - 5:23 pm | arunjoshi123
https://www.financialexpress.com/india-news/daughters-born-before-2005-h...
विवाहित वा अविवाहित स्त्रीयांस वारसा संपत्तीत त्या कुटूंबाचा समान भाग आहेत म्हणून हिस्सा आहे.
-----------------------------------
http://indianexpress.com/article/india/man-doesnt-have-right-on-asset-in...
विवाहित स्त्रीच्या भावास तो तिच्या कुटुंबाचा भाग नाही म्हणून वारसा संपत्तीत अधिकार नाही.
30 Apr 2018 - 5:48 pm | माहितगार
पहिली अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो , वृत्तपत्रीय न्यायालयीन रिपोर्टींगवर विसंबणे सोडा, इंडिअयन कानून डॉट ऑर्ग वर अथवा सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरुन केस वाचून मग उधृत करा. आपण दिलेले सम्डर्भ वृत्तपत्रीय असल्या मुळे पूर्ण बातम्या वाचण्यात वेळ घालवलेला नाही पण इन एनी केस
या दोन वाक्यात मला कोणताच विरोधाभास दिसत नाही. तुम्हाला कोणता विरोधाभास दिसतो ते स्पष्ट करा म्हणजे या दोन वाक्या पुरता प्रतिवाद करतो . ( मूळ केसच्या दुव्या शिवाय उर्वरीत बातमी मी वाचणारही नाही आणि चर्चेसाठी दखलही घेणार नाही कारण वृत्तपत्रीय न्यायालयीन रिपोर्टींगवर माझा विश्वास नाही)
28 Apr 2018 - 5:49 pm | माहितगार
बसं का राव ?
गीतेची शपथ घेऊ शकतो .
The oath of office for Chief Justice of Supreme Court or High Court is as follows:
I, (name), having been appointed Chief Justice (or a Judge) of the Supreme Court of India, do swear in the name of God (or affirm) that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will duly and faithfully and to the best of my ability, knowledge and judgment perform the duties of my office without fear or favour, affection or ill-will and that I will uphold the Constitution and the laws.
— Schedule III, Constitution of India
28 Apr 2018 - 6:15 pm | माहितगार
आताचे नक्की माहीत नाही पण दुय्यम न्यायालयांच्या काही निर्णयांचे ऑडिट होण्याची ब्रिटिशकाळात तरी पद्धत होती असे ऐकून होतो चूभूदेघे. फाशी जन्मठेप या शिक्षास सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यावेच लागते चुंभदेघे
स्वतः पक्षकारांनी वरच्या न्यायालयात केस नेल्या शिवाय इतरांना न्यायदानात त्रुटी वाटली तरी सहसा नेता येत नाही हि त्रुटी ऑनलाईन कायदा अभ्यासक नेमून दूर करण्याची गरज असावी असे वाटते .
पण केसेसच्या निर्णयांची पब्लिसिटी कुठे होते? न्यायालयांच्या निर्णयावर किमान कॉपीराईट नसतो . काही मर्यादित खटले प्रकार सोडले तर बहुतांश केसेस उपस्थित राहणे आणि त्याचे वार्तांकन आणि प्रसिद्धीस खुली सूट असते . प्रसिद्धी अपुरी पडते बऱ्याचदा चुकीची असते हे खरे पण त्याचे खापर मीडियाच्या डोक्यावर फोडावयास हवे ना कि न्यायपालिकेच्या डोक्यावर . अगदी छोट्या छोट्या वृत्तपत्रांचे तालुका आणि जिल्हास्तरीय प्रतिनिधी सुद्धा असतात काही वकीलही उअपव्यवसाया म्हणून पत्रकारिता करतात , समजा प्रिंट एडिसनला जागेची कमतरता असेल तारा आजच्या काळात ऑनलाईन पर्याय आहेत मीडियाही कुठे कमी पडतो हे स्वीकारावयास हवे .
सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर सुद्धा किमान हायकोर्ट आणि सुप्रीमकोर्टाचे निर्णय उपलब्ध व्हावयास लागले आहेत पण यात अपलोड वेग अधिक हवा आणि शोधणे अधिक सुकर हवे अर्थात इंडियन कानून डॉट ऑर्ग शोधण्यास सोपी सुविधा मोफत पुरवते आहे . या केसेसची विश्लेषण होऊन एन्सायक्लोपेडिक दखल घेण्याचे काम वकील आणि कायद्याच्या अभ्यासकांनी करावयास हवे तेवढे सध्या पुरेसे होत नाही . जे होते त्यातील बहुतांश अत्यंत महागड्या पेड वॉल च्या मागे असते . (मनूपात्रा वगैरे नावाची पेड प्रकार आजकाल वकील मंडळी वापरतात म्हणे पण सामान्यांना ते उपलब्ध नाही हे खरे ) याचे एका कारण भारतीय वकील वर्ग आणि कायदा अभ्यासक त्यात कायद्याचे विद्यार्थी आणि प्राध्यापक आणि प्राचार्यही आले कायदा सजगते च्या गरजे बाबत पुरेसे संवेदनशील नसतात असे माझे व्यक्तिगत मत आहे
28 Apr 2018 - 7:31 pm | कंजूस
बरीच उत्तरे आहेत पण एवढं लिहू कसं?
थोडक्यात -
१) संसद ही ( लोकशाहीत )कायदा करते , ती सर्वोच्च असते. कायदा करणे तिचे काम.
२) न्यायदान व्यवस्था स्वतंत्र आहे परंतू तिचे कार्यक्षेत्र वेगळे. वादीने लावलेला दावा किंवा फिर्यादीचा आरोप खरा आहे का तपासणे, त्या आणि त्याच मुद्द्याचा खरेखोटेपणा तपासता येतो. स्वत: कायदा करता येत नाही, फक्त शासनास तसे करण्याचा आदेश देता येतो. खूप मर्यादा आहेत.
३) या दोन व्यवस्था एकमेकांना न छेदणारे सेट थिअरीतले सेट्स आहेत.
४) खुर्चीतला मनुष्य हा न्याय व्यवस्थेचा मूर्तीरूप धरला जातो, म्हणून आदर. बाकी मिलार्ड नको तर महाशय म्हणा.
५) नुकसान भरपाई, शिक्षेची मुदत जास्तीत जास्त किती ते संसदेने ठरवायचं आहे.
बाकी बरंच आहे. आता एवढंच.
28 Apr 2018 - 8:10 pm | अर्जुन
न्यायदान देऊ शकेल अशी संगणक प्रणाली विकसित करण्यात येत नाही? त्यामूळे निपक्षपाती निर्णय मिळण्याची खात्री असेल. तसेच निर्णय प्रक्रिया वेगवान होईल.
28 Apr 2018 - 11:12 pm | माहितगार
+ १०० % जनतेनी यासाठी पुरेसे फंड अलोकेशनसाठी शासनावर दबाव आणला पाहिजे .
2 May 2018 - 2:14 am | ट्रेड मार्क
न्यायदान देऊ शकेल अशी संगणक प्रणाली विकसित करण्यात येत नाही?
तो दिवस फार दूर नाही. आयबीएम वॉटसन हे सॉफ्टवेअर त्यासाठी तयार केले गेले आहे. सद्य स्थितीत वकीलाला बाजूला करून हे तंत्रज्ञान वापरावे एवढे प्रगत झाले नसले तरी अजून प्रगत बनवणे चालू आहे. Artificial Intelligence वा BOTs वापरून नुसता डेटा फीड केला की त्याचा relevant historical डेटा शोधून analysis ई मुळे येत्या काही वर्षातच बराच बदल बघायला मिळेल. अर्थात हे भारतात कधी होईल ते सांगता येणं अवघड आहे.
यातले मुद्दा नं. २ बघा - एका ब्रिटिश मुलाने पार्किंग तिकीटच्या केसेस लढण्यासाठी एक सॉफ्टवेअर फुकट उपलब्ध करून दिले आहे. तर मुद्दा नं. ३ आणि ४ हे पुढे जाऊन वकील आणि जज कसे कालबाह्य होतील याची थोडी माहिती देतो.
2 May 2018 - 6:27 am | थॉर माणूस
प्रयत्न सुरू आहेत. सध्या न्यायालयांशी संबंधीत अनेक कामे ऑटोमेट करण्यात येत आहेत. काही कंपन्यांनी काही कायदेशी प्रक्रीयांकरीता आणि दिवाणी खटल्यांकरीता आर्टीफिशीअल इंटेलिजन्सची मदत घेता येईल का त्याची चाचपणी सुरू केली आहे, काही प्रयोग सुरू देखील झाले आहेत. वेळ लागेल, पण एक ना एक दिवस नक्की होईल.
Would You Trust An Artificially-Intelligent Expert?
AI in Law and Legal Practice
Lawyer-Bots Are Shaking Up Jobs
28 Apr 2018 - 11:10 pm | माहितगार
यात बरीच दिशाभूल आहे , एक एक करुन बघू, ( लिहिताना माझी बैठक तुटली होती , कुठे गोंधळ झाला समजले नाही तर जरुर विचारावे हि विनंती)
हा शुद्ध गैरसमज आहे ; न्यायपालिका कायदेमंडळाने बनवलेल्या कायद्यात कायदेमंडळाला काय म्हणायचे असावे याचा अर्थ लावते, किंवा घटनासमितीस घटनेचे कलाम कसे अभिप्रेत असावे याचाअर्थ लावते त्याला खोडत नाही. तुमचे कायदे मंडळच घटनेला अग्रस्थानी ठेऊन कायदे घटनेच्या कसोटीवर तपासले पाहिजे म्हणते कारण तुमचे कायदे मंडळ घटनेने नेमून दिलेल्या परिघात तयार झाले आहे . आणि म्हणून घटनेच्या कसोटीवर ना टिकणारे कायदे खोडले जातात , न्यायालय केवळ घटनेचा अर्थ लावते . तुम्ही वर म्हणाल्या प्रमाणे बहुसंख्य विधानसभा आणि संसदेत सातत्याने २/३ बहुमत एखादा पक्ष ३० एक वर्षे टिकवू शकला तर त्यांना हवे तसेच अर्थ लावणारे न्यायाधीश येतील म्हणजे लोकांनी सॉलिड लोंगटर्म बहुमत दिले तर घटना बरीच लवचिक ठरते , आणि तेवढे सॉलिड बहुमत नसताना पुढच्या पिढयांची लोकशाही आम्हीच रिप्रेझेंट करतो आणि घटना हवी तशी बदलतो असे म्हणण्याचा नैतिक अधिकार शिल्लक राहात नाही.
तुमचे मुद्दे माझ्या खालील परिचछेदाच्या विरुद्ध दिशेने येतात असे वाटते दोन्ही चा एकत्र परामर्श घ्यावा म्हणून माझा संबंधित परिचछेद दुसर्या धाग्यातून
लोकशाहीतील न्यायव्यवस्था शक्य तेवढी स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही शेवटी
लोकशाही व्यवस्थाच लोक इचछेवर अवलंबून असते तेव्हा न्याय व्यवस्था अंतिमतः लोक इचछा शक्तीवरच अवलंबून असते (हे पुरेसे लक्षात घेतले जात नाही ) अवलंबित्व कसे ते बघा
न्यायव्यवस्थाही तीन पद्धतीने सत्ताधारी पक्षा वर अवलंबून असते एक) ज्याच्या आधारावर न्यायदान केले जातात ते कायदे लोक नियुक्त सत्तेच्या मनावर बऱ्या पैकी अवलंबून असतात दोन ) न्यायाधीशांच्या नियुक्तीत कुणाला येऊ द्यायचे नाही हे शासनास पहाता येते (-पण एकदा नियुक्ती झाल्या नंतर काढण्याची प्रक्रिया अति जटील असणे अभिप्रेत असते ) ३) संसदेत पुरेसे बहुमत असेल अथवा सत्ताधारी आणि पुरेशा विरोधी पक्षांची सहमती असेल तर न्यायाधीशाना बरखास्त करता येते आणि चौथे न्यायाधिषांनी जाहीर केलेल्या शिक्षा राज्यपाल अथवा राष्ट्रपतींच्या संमतीने माफ करता येतात .
वस्तूत: असे काहीही केले जात नाही . संसदेने बनवलेल्या घटनेने आणि बनवलेल्या कायद्यांचे अर्थ तेवढे न्याय व्यवस्था लावत असते . कायदा मंडळे म्हणजे संसद आणि विधी मंडळे , सरकारे , आणि बाबूशाही त्यांची त्यांची कर्तव्ये पार पाडण्यात कुठेतरी कमी पडतात हि या नाण्याची दुसरी बाजू आहे . घटनेने अथवा कायद्यानी दिलेलेच अधिकार प्रत्यक्षात येण्यास कमी पडले तेथेच न्याय व्यवस्था हस्तक्षेप करते अन्यत्र नाही. आपापल्या आळशीपणाचे अथवा राजकीय सोईचे खापर न्यायपालिकेवर फोडण्याचा प्रकार राजकारण्यांकडून बाबूंशाही कडून होतो ह्या बाबी कडे दुर्लक्ष करता येत नाही .
न्यायाधीशांच्या नियुक्तीत कुणाला येऊ द्यायचे नाही हे शासनास पहाता येतेच . अगदी अशात कॉलेजियम ने निवडलेल्या जोसेफ महाशयांना हिरवा कंदील देण्यास शासनाने टाळले - न्यायाधीशांवर गुप्तचर यंत्रणेस पाळत ठेवता येते आणि गुप्तचर यंत्रणेचे अहवाल न्यायाधीश नाकारण्यासाठी अथवा बारखास्तीसाठी वापरता येतात - नावे सुचविण्याचे काम न्याय पालिकेने केले तर त्यात खूप काही बिघडण्यासारखे नसावे . त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ निवडणे त्यांना सोपे जाते शिवाय निष्पक्ष नसलेला न्याय तुम्ही न्याय म्हणू शकता का ? -कायदे तसेही मेजॉरिटी बनवते , नको असलेले न्यायाधीश तुम्ही पदावर नेमणे टाळू शकता ; आणि तरीही पदावर आलेला न्यायाधीश सुद्धा निष्पक्ष नको म्हणता ?- निष्पक्ष नसलेला न्याय तुम्हाला स्वतः:ला चालतो का ? न्यायदानास लागणारी निष्पक्षता लोकशाहीतील मेजॉरीटीने कशी येईल ? आणि मेजॉरीटीने घेतलेल्या न्यायाला न्याय म्हणायचे तर न्याय पालिकेची गरजच नाही , न्यायदानाचे काम लोकसभेला द्या किंवा अध्यक्षीय निवडणूक घेऊन अध्यक्षाला द्या पण त्याला मग शुद्ध लोकशाही म्हणता येणार नाही , त्यास फारतर निर्वाचित राजेशाही /हुकूमशाही म्हणता येईल जो कायदे स्वतः: बनवतो आणि मन मुताबिका न्याय देतो !
28 Apr 2018 - 11:41 pm | माहितगार
एकूण समाजाची जी नीती मूल्ये आहेत तिच समाजाच्या इतरही भागात जशी रिफ्लेक्ट होतील तशीच ती न्याय व्यवस्थेतही होतील नाही असे नाही , असे मुळीच होणार नाही असे नाही पण -पहिले सरसकट सर्व न्याय यंत्रणेचे चित्रण तसे करता येत नाही असे न्याय विकत घेणे एवढे सोपे असते तर आसाराम सारख्या किंवा सहारा सारख्या केसेस केव्हाच विकल्या गेल्या असत्या - असो मुख्य म्हणजे अशा सर्व शक्यतांचा विचार करूनच त्रिस्तरीय न्याय पालिकेची घडी घातली गेली आहे , उच्च न्यायालये सहसा सुनावणी करत नाहीत (पी आय एल वगळता ) सुनावणी कनिष्ठ न्यायालयातच घेतली जाते . उच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालयाचा निकाल पडताळत असते म्हणजे सुनावणीत काय यावे आणि काय येऊ नये यावर उच्चं न्यायालयाच्या निर्णयास मर्यादा पडतात , नंतरची पडताळणी एका सदस्यीय उच्च न्यायालय त्याची पुर्नपडताळणी अधिक सदस्यीय उच्च न्यायालय , त्या नंतर सर्वोच्च न्यायालय , घटनात्मक अर्थ लावायचा तर त्यासाठी वेगळ्या पीठाकडे वर्गीकरण , एखाद्या केस मध्ये स्वतः:चे हितसंबंध असतील अथवा दबाव असतील तर स्वतःस रिक्युज करून घेणे अशा अनेक प्रथा पाळल्या जातात . डिफेन्स वगळता इतर कोणत्याही खात्यात प्रमोशन देताना गुप्तचर यंत्रणेचा अहवाल मागवला जात नाही पण न्यायाधिश बद्दलचे रिकामंदेशन स्वीकारण्यापूर्वी गुप्तचर यंत्रणेचा अहवाल चेक करून घेण्याची जबाबदारी शासनाची असते .
तरीही या विषयावर अधिक क्रॉस चेकची गरज नाही असे नाही दिलेल्या निवाड्या चे पिअर रिव्ह्यू अथवा ऑडिट होण्याची आणि पक्षकारांचा दावा नसेल तरी काही केसेस रँडम उच्च न्यायालय सुनावणी असे उपाय योजले जावयास हवे हे खरे . उत्पन्ना पेक्षा अधिक संपत्ती दिसल्यास ती निवृत्ती पर्यंत फ्रीज करुन मग न्यायाधीशाच्या निवृत्ती नंतर केस चालवून निकाल देण्याच्या व्यवस्थेची आवश्यकता असावी.
वरकड उत्पन्ना पेक्षा ही निवृत्ती उत्तर शासकीय पदांच्या उपलब्धता ह्या समस्येवर अद्याप हवा तसा उपाय माहित नाही असे वाटते.
29 Apr 2018 - 12:00 am | माहितगार
:} विनोदी प्रश्न आहे .
उच्चं आणि सर्वोच न्यायालयाची व्यवस्था एखादा पक्षकार आधीच्या न्यायालयात समाधानी नसेल तर साठी असते . प्रत्येक केस मध्ये उच्चं न्यायालयांच्या पायऱ्या चढल्याच पाहिजेत असे काही अवतान नसते . तुमचेच काही प्रश्न न्यायदानातील विश्वासार्हतेवर विविध [ प्रश्न चिन्हे उपस्थित करतात पण त्याचा विश्वासार्हतेच्या जोपासनेसाठी त्रिस्तरीय न्याय पालिकेची व्यवस्था आहे . जघन्य अपराध नसेल तर पोलिसांची अथवा न्यायालयांच्या पायऱ्या कुणी चढाव्यात अशी अपेक्षा हि नसते , तुम्ही तुमचे कॉर्पोरेट प्रश्न असतील त तर तुमचे आर्बिट्रेटर नेमा आणि प्रश्न आपापसात सोडावा ! हाकानाका .
दुसरे केवळ मोठ्या शहरात शिकलेली मंडळी उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात जजेस बनतात, अथवा न्यू यॉर्क वा स्वितझर्लँड मध्ये अधिक शिकलेले लोक असतात असे आपणास कुणी सांगितले ? -आणि असले तरी परदेशी लोकांचा आपल्या सार्वभौम देशाच्या न्यायपालिकेत दाखलंदाजीचे प्रयोजन काय ? (युरोपियन युनियन मधील देशातील सर्वोच्च न्यायालयातील काही खटले युरोपियन न्यायालयातील कोर्टात जातात आणि त्याचे निवाडे त्यांना बंधनाकारकही असतात इंटर्नेशन कोर्ट ऑफ जस्टीस वगैरे बाबी आहेत पण त्या देशांच्या सार्वभौमतेला आजतरी पूर्ण आवाहन देऊ शकता नाहीत ) पण असो मुख्य प्रश्नाच कडे येऊ न्याय निष्पक्ष आणि विश्वासार्ह असणे आणि एका पेक्षा अधिक स्तरावर पडताळाला जाणे संबंधित पक्षकारांना हवे असते . म्हणून न्यायालयाचे वरील स्टार असतात .
29 Apr 2018 - 7:33 am | माहितगार
याला सजा का हवी ? - इथेही आपली तक्रार काही गोष्टी फेअर नाहीत अशीच आहे ना ? आपल्या अन्यायाच्या पर्सेप्शनचे परिमार्जन आपल्याला शिक्षा देऊन होते ? कि गैरसमज दूर करून होते ?
समजा एखादी व्यक्ती तुमच्या या विचाराशी सहमत आहे . आणि समजा उद्या इतर कारणावरून जेल मध्ये गेली , त्याला व्यवस्था अन्याय्य आहे किंवा माझ्यावर अन्याय झाला म्हणावयाचे स्वातंत्र्य असावे कि नको ?
एखाद्या गोष्टी वरून कुणी शिक्षक , पालक फेअर नाही वागले तर लहान मुलांना सुद्धा खटकते अहो. - नोशनल असेल पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गरज बेसिक मानवी गरज आहे ती सरसकट नाकारता येत नाही - लोकमान्य टिळकांना - शेंगांची टरफले त्यांनी टाकली नसतानाही त्या बद्दल शिक्षकांचा ओरडा बसणे अन्याय्य वाटले - लोकमान्य टिळकांना जेल मध्ये टाकले त्यांना आणि जनतेला अन्याय्य वाटले . असे ते म्हणाले , अजून काही म्हणाले म्हणून शिक्षा अजून वाढवावी ? ! अन्यायाच्या पर्सेप्शनचे परिमार्जन शिक्षा देऊन होते ?
काही वेळा चूक असूनही लोक चूक कबूल करत नाहीत , साक्षी पुरावे आणि युक्तिवादानेच सिद्ध करावे लागते , त्याला काही पर्याय असतो का ? आज काल सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ऑन लाईन उपलब्ध असतात तरीही टीका करण्या पूर्वी किंवा टीका खोडण्यास ते वापरले जात नाहीत यात न्याय पालिकेची काय चूक आहे .
न्याय पालिकेवर चुकीचा आरोप / अवमान केला तर दंडित करण्याची व्यवस्था कायद्यात आहे , त्याचा अपवादानेच उपयोग केला जातो . आणि अगदी अलीकडे उच्च न्यायालयाच्या जजलाच त्या साठी जेल भोगावी लागली
29 Apr 2018 - 7:50 am | माहितगार
इथे एक मोठा गैर समज होताना दिसतो आहे . कोणत्याही गोष्टीसाठी किमान आणि कमाल शिक्षा काय असाव्यात याची तरतूद कायद्यात असते - शिक्षा देताना संबंधित कायद्यातील प्रोव्हिजन पलीकडे न्यायाधीशाला जाता येत नाही -. काही वेळा कायद्यातील तरतुदी अबसर्ड असतात , किंवा कायदे जुने होऊन कायदे मंडळानी अद्ययावत केलेले नसतात . अशा बाबतीत न्यायपालिकेवर खापर फोडणे सयुक्तिक होत नाही .
काही वेळा काही न्यायाधीश कायद्यातील तरतुदी पलीकडे जातात - न्यायाधीश माणसे आहेत , जो चुकारपणा किंवा काही वेळा त्यांचाही तात्कालिक उद्वेग असेल इतर मानवाप्रमाणे अशा मार्गाने बाहेर पडतो , पण हे अपवादच असतात - असे होऊ नये म्हणूनच त्री स्तरीय न्यायपालिकेची व्यवस्था आणि असे एखादा न्यायाधीश पुन्हा पुन्हा जाणीव पूर्वक करत असेल तर त्याची बदली करून बघणे , हातातील काम काढून घेणे या गोष्टी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालये त्यांच्या अंतर्गत प्रशासकीय जबाबदारी म्हणून पार पाडतात , केस फारच वाया गेली असेल तर, सर्वोच्च न्यायाधीश अशा न्यायाधीशांना बरखास्त करण्याची शिफारस शासना मार्फत संसदेस करू शकतात . पण संसदेने बरखास्त करे पर्यंत दुसरा काही तरणोपाय नसतो.
29 Apr 2018 - 8:19 am | माहितगार
एकाच केसवर वेगवेगळ्या शिफ़्ट मधून वेगवेगळ्या न्यायाधिशानी सुनावणी घ्यावी हे बहुधा आपल्यालाही अभिप्रेत नसावे . एकूण केसेसच्या संख्येची पेंडेंसी कमी करण्यासाठी शिफ़्ट मध्ये काम गरजेचे आहे , सोबतच अधीक प्रगत संगणकीकरणाची गरज आहे . खरेतर संगणन प्रणाली प्रगत केल्यास शिफ़्ट वगैरेंची आवश्यकताच भासणार नाही . या क्षेत्रात आणि विशेषतः भारतीय न्यायपालिकेत संगणन अद्ययावतता गरजे पेक्षा अत्यंत सावकाश होते आहे , दोन्ही गोष्टी शिफ़्ट असो वा संगणन बऱ्या पैकी जबाबदारी शासनाची आहे . पुरेशा न्यायाधीशांना नियुक्ती देणे आणि योग्य बजेटची तरतूद यात सर्व पक्षाच्या सरकारांकडून मोठी हेळसांड होत राहिली आहे.
संगणक उपलब्ध असलेल्या काळात काय होते ते नक्की माहीत नाही . पण नवीन पिढीतील बहुतेक न्यायाधीश संगणकावर स्वतः:च करत असावेत (पण त्यांना सहसा पुरेसा स्टेनो टायपिस्टचा स्टाफ उपलब्ध असतो ) त्या शिवाय निकाल देण्यातील वेळ वाचवण्यासाठी आणि दोन्ही पक्षकारांच्या वकिलांनी मांडलेल्या मुद्द्यांवर इतर जाणत्या वकिलांचे साहाय्य न्यायाधीश घेत असतात . आपला संकेत न्यायदानातील दिरंगाई कडे असेल तर अपवादात्मक केसमध्ये काही वेळा खरेच न्यायाधीशांची व्यक्तिगत कार्यशैली त्रुटी असतात , पण अधिक वेळ पक्षकारांचे वकील वेगवेगळ्या बहाण्याने खात असावेत .
त्या शिवाय कायदे विषयक सजगता नसणे आणि अशिलांना वकिलांकडून सुयोग्य मार्गदर्शन ना होणे अथवा अशिलांचा हातावादीपणामुळे ज्या केसेस न्यायालयात टिकणारच नाही त्या न्यायालयात दाखल असल्यानेही खटल्यांची संख्या मोठी असावी असे वाटते .
हे मला ही ना समजलेले कोडे आहे , पण वकील मंडळी जाणीव पूर्वक तसे करणे टाळत असण्याची शक्यता वाटते
हे कशाच्या आधारावर म्हणता आहात ?
29 Apr 2018 - 8:33 am | चौकटराजा
न्यायालय , पोलिस, आरटी ओ, सैनिक ई सर्व सेवा आहेत ती सेवा जनता नावाची " मालक" घेत असते व त्यासाठी त्याना पगार दिला जातो. त्यात बेअदबी कशी ? मात्र कायदा हा मालकानेच सामुदायिक रित्या निर्मिलेला असल्यानी त्याची बेअदबी केली असा युक्तीवाद होउ शकेल . असा कायदा रद्द करण्याचा अधिकार पुन्हा सामुदायिक रीत्याच वापरला जाऊ शकतो . एरवी अधिक कर्तव्य तत्परता दाखविल्यास या सर्व सेवात " गौरव" होण्याची सोय आहेच की ! एक आचार संहिता मानून कोर्टात न्यायाधीशा वर टीका टिपणी करू नये हे उचितच . पण त्यांच्या निवाड्यावर टीका म्हणजे कायद्याची बेअदबी असे म्हणणे चुकीचे .
29 Apr 2018 - 9:44 am | माहितगार
असे होत नाही. निवाड्यावर टिका करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते
29 Apr 2018 - 4:25 pm | चौकटराजा
अनधिकृत बान्धकाम पाडण्यावर स्टे नसेल व कमिशनर ती पाडण्यात टाळटाळ करीत असेल तर ती पाडावी असा निवाडा कोर्टाने दिला असल्यास ती कायद्याची अवज्ञा की कोर्टाची ?
29 Apr 2018 - 7:20 pm | माहितगार
The Contempt of Courts Act, 1971
उत्तरदायित्वासा नकार
29 Apr 2018 - 8:41 am | माहितगार
विषयवार केसचे अलोकेशन प्रणाली अद्याप म्हणावी तेवढी प्रगत नसावी -पण अशा गरजेची न्यायपालिकेस जाणीव असावी , सध्या कोणता न्यायाधीश कोणत्या विषय अधिक चांगला हाताळू शकेल ह्याचा विचार मुख्य न्यायाधीश करतात - यावरही ज्येष्ठतावादी न्यायाधीशांचे रुसवे फुगवे असतात जसे सध्या सर्वोच्च न्यायालयात चालू आहे .
अर्थात जसे एम बीए किंवा आय ए एस अधिकाऱ्यास प्रत्येक क्षेत्रातले ज्ञान असतेच असे नाही तसेच जजेसचे पण आहे पण इथेच त्यांचे त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य अनुभव पणास लागतो . - अनेक वकील आणि न्यायाधीश विविध क्षेत्रात ग्रॅज्युएशन करून मग वकिली शिकलेले असतात - वकिलांनी मांडलेल्या केस स्टडीज चे आधार इथे उपयुक्त ठरतात , पक्षकारांचे वकील विषय समजण्या साठी मदत करत असतातच , त्या शिवाय एमिकस क्युरी म्हणून तटस्थ जाणकार वकिलांचे साहाय्य घेता येते , पक्षकारांनि आणलेल्या तज्ञाच्या अहवालाची उलट तपासणी प्रतिपक्षाचा वकील त्याच्या तज्ञाच्या मार्गदर्शना खाली घेऊ शकतो , त्यावर तटस्थ तज्ञाचे अहवाल सादर करण्यास पक्षकारांना सांगता येते . तरीही एखादा विषय हाताळण्याचा आत्मविश्वास नसेल तर केस मधून रिक्युज करून घेता येते , किंवा उलट पक्षी न्यायाधीशास विषय समजत नाही असे वाटल्यास न्यायाधीश बदलून देण्याची मागणी मुख्य न्यायाधिशाकडे पक्षकार करू शकतात
29 Apr 2018 - 9:42 am | माहितगार
:) अगदी बरोबर मुद्दा आहे , योग्य तेच कायदे बनवणारी , स्वतः:हुन कायदे पाळणारी , गुन्हे ना करणारी , स्वतः:च्या चुका स्वतः:हून कबूल करणारी , प्रायव्हेट केसेस मध्ये योग्य निर्णय देणारी लवाद असलेली आणि असे लवाद निर्णय मनमोकळे पणाने स्वीकारणारी आदर्श समाज रचना अस्तित्वात असती तर न्यायपालिकेची आणि न्यायाधीशांची गरज आजिबात पडली नसती पण इथेच गोची आहे असे वाटतं नाही का ?
प्रगत संगणक प्रणाली अमलात आल्यास ते शक्य व्हावे असे वाटते पण मी आधीच्या एका प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे आपली केस वेगळी आहे असे भ्रम वकील तयार करतात किंवा आशिलात असतात. केवळ न्याय देणे नव्हे तर न्याय झाल्याची भावनाही महत्वाची असते आणि त्या भावनिक गरजे पोटी अनेक केसेस हकनाक कोर्टात दाखल होता असतात , आणि मानवाधिकार म्हणून केसेस दाखल करण्याचा त्यांचा अधिकारही पूर्णतः: बंद करता येत नाही .
त्यांची संस्थाच ठीक आहे का? म्हणजे नेमके काय म्हणावयाचे आहे ?
निवड भारतीय राज्य घटना , कायदे आणि निष्पक्षता टिकवण्यासाठी न्यायपालिकाही धडपड करत असते त्या आधारे होते . कुणाही मानवाची पूर्ण निष्पक्षता ठरवण्यासाठी कोणती चाचणी असू शकते ? :)
हितसंबंध असतील तर अशा केसेस मधून न्यायाधीश स्वतः:ला री क्यूज करून घेण्याची केस मधून स्वतः:च बाजूला होण्याची परंपरा सहसा पाळतात , हितसंबंधाच्या शक्यता वाटल्यास न्यायाधीश बदलून मिळण्याची अपील मुख्य न्यायाधिशाकडे करता येते . त्या शिवाय न्यायपालिका त्रिस्तरीय आहे , कोणत्याही पक्षकारास कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय समाधानकारक ना वाटल्यास वरच्या न्यायालयाकडे जाण्याच्या प्रत्येकी किमान एकेक संधी असतात (म्हणून कनिष्ठ न्यायालयाच्या वर दोन स्तर लागतात )
आदर्शतः न्यायधिशांच्या वर्तनांच्या काय सीमा आहेत नि त्या पाळल्या जातात का? त्यांच्या गुन्ह्यांस कशी शिक्षा होते. चुकीचे उत्तरदायित्व ते कसे ? नि कोणाला रिपोर्ट करतात?
प्रशासकीय रिपोर्टींग मुख्य न्यायाधीशा कडे असते मुख्य न्यायाधीशाचे रिपोर्टींग उच्च न्यायालयच्या मुख्यन्यायाधीशा कडे , उच्च न्यायालय मुख्यन्यायाधीशाचे प्रशासकीय रिपोर्टींग सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायाधीशाला असते . शासनाकडून मिळावयाच्या प्रशासकीय सुविधा साठी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कायदा मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांचे संपर्कांत असतात तर सर्वोच्च न्यायाधीश कायदा मंत्रालय आणि पंतप्रधानाच्या संपर्कात असतात .
त्यांच्या गुन्ह्यांस कशी शिक्षा होते ? मला नक्की माहीत नाही पण माझे पर्सेप्शन आहे तिथपर्यंत त्यांनी व्यक्तिगत जीवनात केलेले गुन्हे सर्वसामान्य व्यक्ती प्रमाणेच गृहीत धरले जातात केस चालू करण्यासाठी मुख्य न्यायाधीशांची अनुमती आणि काही प्रकारासाठी न्यायाधीशपदावरून रिटायरमेंट अथवा पदावरून बारखास्ती पर्यंत थांबावे लागत असावे (चुभूदेघे), पण त्यांची निष्पक्षता संपवण्यासाठी त्यांच्यावर केसेस टाकल्या जात नाहीत हे पाहण्यासाठी काय केले जाते या बद्दल जाणकारांनी अधिक लिहावे ,पण क्लिष्ट संसदीय प्रोसेस शिवाय त्यांना पदावरून काढता येत नाही हे निष्पक्षतेची बाजू अधिकतम स्वरूपात राखण्यासाठीचे प्रोव्हिजन आहे .
कामात कुचराई असेल तर हातातील काम आधी काढून घेतले जाते हा अधिकार मुख्य न्यायाधीशांचा असतो , पण बरखास्तीचा अधिकार संसदेचाच असतो
या वर अधिक अभ्यासपूर्ण माहितीची आवश्यकता असावी; आधीच्या प्रतिसादात लिहिल्या प्रमाणे सुधारणांना वाव असू शकतो, पण सध्याच्या व्यवस्थेत पुरेसे चेक्स आणि बेलॅन्सेस आहेत, अगदीच गई गुजरी आहे असेही नसावे .
29 Apr 2018 - 10:22 am | माहितगार
आपल्याला खरेच चांगली व्यवस्था हवी असेल तर पहिली गोष्ट तर प्रथमतः: आपापले अज्ञान पूर्वग्रह , एकांगी राजकीय दृष्टिकोन , बायस्ड वृत्त माध्यमांवर अवलंबून असलेली निष्कर्ष घाई टाळणे अगत्याचे असावे -कोणतेतरी वृत्त माध्यमाने काही तरी चित्र रंगवले , किंवा आपले तात्कालिक दृष्टिकणानी नि -जर्क रिएक्शन दिली असे होऊ नये - नाहीतर न्हाऊ घातलेल्या पाण्यासोबत न्हाऊ घालावयाचे बाळ हाताचे जाण्याचा धोका संभवतो हे लक्षात घेणे जरुरी असावे असे वाटते .
आपल्या देशातील न्यायाधीश आपल्याच देशाचे नागरिक आहेत त्यांच्या कायदे आणि घटना विषयक ज्ञान अनुभवावर देश आणि संविधान निष्ठेवर सरसकट अविश्वास प्रशस्त प्रस्तुत आणि वस्तुनिष्ठ नसून बायस्ड वृत्तमाध्यमावर आधारित पर्सेप्शन मधून झालेल्या नि -जर्क रिएक्शन ची संख्या अधिक वाटते आहे. अशाने केवळ आधी आपल्या न्याय व्यवस्थेचा आणि नंतर कळत ना कळत आपला बळी हितसंबंधी लोक घेतल्या शिवाय राहाणार नाहीत त्यामुळे चिकित्सा नक्कीच करावी पण नाण्याच्या इतर बाजू आणि बारकावे अगत्याने अभ्यासावे
तसं न्यायपालिकेच्या बाबतीत "संस्था विथ डिफरन्स" नावाचा काही प्रकार नसावा या विधानावरून आपणास किमान त्याची गरज प्रतीत होते आणि अभ्यासपूर्ण सुधारणा करण्यास हरकत नसावी .
हे विधान सब्जेक्टिव्ह आणि बघण्याच्या दृष्टिकोनांवर अवलंबून आहे . माझ्या मताने भारतीय न्याय व्यवस्थे पुढे महत्वपूर्ण आव्हाने असली तरी त्याचा गाभा बऱ्या पैकी रोबस्ट मजबूत आहे .
भारतीय न्यायपालिका अगदीच हाताच्या बाहेर गेली आहे अशी काही परिस्थिती नाही . दुसरे टाळी एका हाताने वाजत नाही . निजर्क रिएक्शन न करता अभ्यासपूर्ण सुधारणा संसदेच्या माध्यमातून करता येतात ती संसदेची आणि त्यासाठी आपल्या जनप्रतिनिधी वर योग्य दबाव टाकण्याची सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे.
29 Apr 2018 - 2:35 pm | arunjoshi123
ज्या लोकांना नेहमीच्या भक्त-पुरोगामी चर्चांचा कंटाळा आला आहे त्यांनी या धाग्यावर आपली मते मांडावीत.
================
नेहमीच जालावरच्या भांडणांचा वीट आला आहे, इ इ म्हणत बसण्यापेक्षा इथे काही अभ्यासपूर्ण मते मांडावीत.
==================
भारतीय न्यायव्यवस्थेचा नि आपला ऐकीवही संबंध आला नसेल तर धन्य आहात.
==========================
धाग्यातले नि चर्चांतले मुद्दे न्यायालयाची तौहिन वैगेरे नाहीत. संस्थात्मक प्रश्नांची चर्चा आहे. कोणत्या केसच्या निकालावर काही नाही.
29 Apr 2018 - 3:37 pm | पैसा
उत्तम चर्चा चालू आहे. आधुनिकीकरण तातडीने व्हायला हवे आहे. निकाल लागल्यानंतर टाईप होऊन हातात यायला कित्येक महिने लागतात.
माझा प्रश्न न्यायालयांना सुट्या असतात त्याबद्दल आहे. जुन्या काळात राजा न्यायदान करत असे त्यामुळे त्याला आदर दाखवणे इतरांना उभे करणे व मोठ्या उन्हाळी सुट्या असे होते. इंग्रजांना थंड हवेच्या ठिकाणी जायचे असायचे. आता या सुट्यांची गरज आहे का? इतर ऑफिसेस प्रमाणे न्यायालये सुद्धा एक रविवारची आठवडी सुटी व इतर नैमित्तिक सुट्या देऊन का चालवू नयेत?
29 Apr 2018 - 8:09 pm | गामा पैलवान
अजो,
तुम्ही अगदी योग्य विषयाला वाचा फोडली आहे. माझा न्यायव्यवस्थेशी कसलाही संबंध आला नाही त्यामुळे मी स्वत:स सुदैवी समजतो. जमेल तशी जमेल तेव्हढी न्यायव्यवस्थेस बगल द्यावी (=बायपास करावी) याकडे माझा कल आहे. कारण की सध्याची व्यवस्था केवळ वकिलांचं भलं करण्यासाठी झटंतेय असं माझं मत आहे.
पण तरीही घटनात्मक बाबी, लोकप्रतिनिधींवर वचक ठेवणे वगैरे बाबी हीच न्यायव्यवस्था सांभाळते आहे. नेमक्या याच कारणासाठी तूर्तास ती माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
माझ्या आणि इतर अनेकांच्या मते भारतीय न्यायसेवा ताबडतोब सुरू करायला हवीये. ज्याप्रमाणे भारतीय प्रशासकीय सेवा (=आयेये=), भारतीय पोलीस सेवा (=आयपीएस), इत्यादिंची अखिल भारतीय पातळीवर भरती होते तशीच भारतीय न्यायसेवांची व्हायला हवी. जेणेकरून विविध प्रकारची कौशल्ये असलेले तरुण न्यायसेवेकडे आकर्षित होतील.
सध्याच्या पद्धतीनुसार वकिलाचा न्यायाधीश होतो. ही अतिशय फालतू पद्धत आहे. प्रथितयश वकील कधीही आपला धंदा सोडंत नाही. सहाजिकंच न्यायाधीश होणारे वकील आपल्या क्षेत्रातले नावाजलेले व्यावसायिक असण्याची शक्यता कमी होते.
असो.
जसं सुचलं तसं लिहिलं आहे.
आ.न.,
-गा.पै.
29 Apr 2018 - 10:26 pm | मार्मिक गोडसे
एखादा गुन्हेगार गुन्हा कबूल करतो,त्यावर न्यायाधीश विश्वास ठेवतात, जेव्हा तो गुन्हा कबूल करत नाही, तेव्हा न्यायाधीश विश्वास ठेवत नाहीत. कुठल्या कायद्याचा आधार घेतला जातो असं ठरवताना?
30 Apr 2018 - 10:27 am | सुबोध खरे
एखादा गुन्हेगार गुन्हा कबूल करतो,त्यावर न्यायाधीश विश्वास ठेवतात, जेव्हा तो गुन्हा कबूल करत नाही, तेव्हा न्यायाधीश विश्वास ठेवत नाहीत.
पूर्ण गैरसमजावर आधारित वाक्य आहे.
https://www.ndtv.com/india-news/ashok-singh-was-driving-the-car-not-salm...
सलमान खानचा ड्रायव्हर गाडी चालवत होता हे त्याने गुन्हा मान्य हि केला होता तरीही पूर्ण खटला चालवला गेलाच ना?
30 Apr 2018 - 11:05 am | मार्मिक गोडसे
सलमान केस मध्ये प्रत्यक्ष गुन्हा कोणावर दाखल केला होता हे मला माहीत नाही. सलमान खाननं गुन्हा कबुल केला असता तर न्यायाधीशाने मान्य केलं नसतं का?
30 Apr 2018 - 11:22 am | प्रकाश घाटपांडे
तसे होत असेल तर अन्य व्यक्तिने केलेला गुन्हा काही लाभाच्या मोबदल्यात अथवा तत्वनिष्ठेसाठी स्वत:वर ओढवून तो कवूल करायचा व त्याची शिक्षा स्वीकारायची असे करणे शक्य होईल
30 Apr 2018 - 12:12 pm | सुबोध खरे
गोडसे बुवा
इतकं सोपं असतं तर बाहुबली लोक खून करून एखाद्या गरिबाकडून गुन्हा कबुल करवून राजरोसपणे अटक न होताही मोकळे फिरले असते.
किंवा दाबून पैसे खाऊन एखाद्या गरीबाला पैसे देऊन त्याच्याकडून गुन्हा केल्याचा कबुली जबाब देववून नाव निराळे राहिले असते.
धनदांडगे लोक तसे करतातच परंतु ते आपण समजता तितके सोपे नाही. पहचान कौन?
आपला जबाब फारच भोळेपणाचा किंवा बाळबोध वाटतो.
30 Apr 2018 - 2:56 pm | मार्मिक गोडसे
धनदांडगे लोक तसे करतातच परंतु ते आपण समजता तितके सोपे नाहीआपला जबाब फारच भोळेपणाचा किंवा बाळबोध वाटतो.
असेलही, मी तज्ज्ञ असल्याचा दावा कुठेही केलेला नाही. जिथं तिथं वैयक्तिक टिप्पणी करायलाच हवी का?
30 Apr 2018 - 6:15 pm | गामा पैलवान
मा.गो., तुमचा जबाब भोळेपणाचा किंवा बाळबोध आहे याचा अर्थ तुम्ही भोळसट/बाळबोध आहात असा होत नाही.
आ.न.,
-गा.पै.
30 Apr 2018 - 11:17 am | arunjoshi123
छान प्रश्न आहे. अर्थातच खाली सुबोधजी म्हणतात त्याप्रमाणे अपराध माथी घेण्यामागे अन्य प्रलोभन असू शकते हे पाहिले जात असावे, पण सर्वसाधारणपणे गुन्हा कबूलणे सत्य मानले जाते नि न कबूलणे असत्य. कोणत्याही संवादात अगदी असंच होतं.
साक्षीदार, सरकार धरून इतक्या संस्था, लोक इतके तर्क कुतर्क लढवत असतात. यातला नक्की कोण खरा आहे हे न्यायाधीश कसे ठरवत असावेत? एक सुसंगत कहाणी बनवून न्यायालयासमोर केलेला उत्कृष्ट अभिनय देखील कसा पकडायचा हे न्यायाधीशांना अनुभवाने कळत असावं का?
30 Apr 2018 - 11:31 am | मार्मिक गोडसे
छेडछाड, विनयभंग अशा केसमध्ये गुन्हेगाराने गुन्हा मान्य केल्यास न्यायाधीश काय निर्णय घेतो.
30 Apr 2018 - 12:01 pm | माहितगार
*भोपाळच्या एका विद्यार्थ्याचा या विषयाव्र एक ऑनलाईन पेपर दिसतो आहे .
(उत्तरदायकत्वास नकार लागू)
30 Apr 2018 - 6:48 am | कंजूस
बरेच मुद्दे घेतले आहेत एकाच लेखात असे माहितगार म्हटतात ते खरे आहे.
एक साधा कॅामन खटला - भाडेकरूला मालकाने जागा सोडण्यासाठी लावलेला दावा.
दुसरा - सोसायटीमध्ये पार्किंग कुणाला मिळाले, लीव लायसनवाल्यास तो हक्क पोहोचलो का?
य असे खटले बरेच सुनावणीत वर्षोंनवर्षे चालताहेत आणि। नवनवीन भर पडतेच आहे.
30 Apr 2018 - 2:24 pm | कंजूस
कबुलीजबाबावर दोषी निर्णय होत नसतो. सिद्धही करावं लागतं.
30 Apr 2018 - 2:45 pm | मार्मिक गोडसे
छेडछाड आणि विनयभंग गुन्हा कबुल केल्यास सिद्ध कसं करणार?
30 Apr 2018 - 2:32 pm | कंजूस
आरोपीला वाचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांत बनाव असल्यास असंबद्धपणा सापडतो.
30 Apr 2018 - 3:03 pm | माहितगार
+१
30 Apr 2018 - 10:22 pm | रविकिरण फडके
कितीही वादविवाद घाला. तर्कशास्त्र/ कायदे/ कॉमन सेन्स..कुणाच्याही साक्षी काढा, काहीही परिणाम होणार नाही.
कारण?
कुणालाही न्यायसंस्था सुधारण्यात रस नाही. ना आधीच्या सरकारला, ना आत्ताच्या. ना केंद्रातल्या ना राज्यातल्या. उलट, न्यायसंस्था दुबळी राहण्यात अनेकांचे हितसंबंध - vested interests - आहेत. चोरांना न्यायाला विलंब झालेला हवाच असतो. आणि जे चोर नाहीत, त्यांची इच्छा असली तरी, सुधारणा कशी करावी ह्याचे काडीमात्र ज्ञान त्यांना नाही.
एकंदरीतच, व्यवस्थेतील सुधारणा (systemic improvement) कशी घडवून आणावी ह्याचे काही वेगळे ज्ञान असते ह्याची तिळमात्रही जाणीव आपल्या नेत्यांना असल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवत नाही.
नोकरशाहीबद्दल काय बोलावे? IAS झालो म्हणजे आपल्याला जगातील यच्चयावत ज्ञान प्राप्त झाले असेच त्यांना वाटते. त्या भांडवलावर आयुष्य काढता येते.
कुणी सर्वोच्च न्यायमूर्ती म्हणे रडले भर सभेत, न्यायाला विलंब होतो म्हणून. आणि त्याचे कारण त्यांच्या मते काय, तर न्यायाधीश कमी आहेत. म्हणजे, उद्या सकाळी जर समस्त भारतात न्यायाधीश दुप्पट झाले तर खाडकन सगळे काही आलबेल होईल. असला अजब तर्क.
असो.
ज्या कुणाला system thinking म्हणजे काय हे समजते, ते अत्यंत अल्पमतात आहेत. (आणि त्यांना कुणीही विचारात नाही!)
वादविवाद घालायचे तर घाला पण निरपेक्षपणे - कर्मण्येवाधिकारस्ते, इ.इ. समजून घाला. त्यातून काही निघेल, आपला आवाज कुणी ऐकेल, अशा भ्रमात राहू नका. सुधारण्याकरिता दोन गोष्टी लागतात; समस्या आहे हे मान्य करण्याची तयारी आणि ती सोडविण्यासाठीचे ज्ञान (आपले किंवा भाड्याने घेतलेले). आमच्याकडे दोन्हींची वानवा.
30 Apr 2018 - 10:22 pm | रविकिरण फडके
कितीही वादविवाद घाला. तर्कशास्त्र/ कायदे/ कॉमन सेन्स..कुणाच्याही साक्षी काढा, काहीही परिणाम होणार नाही.
कारण?
कुणालाही न्यायसंस्था सुधारण्यात रस नाही. ना आधीच्या सरकारला, ना आत्ताच्या. ना केंद्रातल्या ना राज्यातल्या. उलट, न्यायसंस्था दुबळी राहण्यात अनेकांचे हितसंबंध - vested interests - आहेत. चोरांना न्यायाला विलंब झालेला हवाच असतो. आणि जे चोर नाहीत, त्यांची इच्छा असली तरी, सुधारणा कशी करावी ह्याचे काडीमात्र ज्ञान त्यांना नाही.
एकंदरीतच, व्यवस्थेतील सुधारणा (systemic improvement) कशी घडवून आणावी ह्याचे काही वेगळे ज्ञान असते ह्याची तिळमात्रही जाणीव आपल्या नेत्यांना असल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवत नाही.
नोकरशाहीबद्दल काय बोलावे? IAS झालो म्हणजे आपल्याला जगातील यच्चयावत ज्ञान प्राप्त झाले असेच त्यांना वाटते. त्या भांडवलावर आयुष्य काढता येते.
कुणी सर्वोच्च न्यायमूर्ती म्हणे रडले भर सभेत, न्यायाला विलंब होतो म्हणून. आणि त्याचे कारण त्यांच्या मते काय, तर न्यायाधीश कमी आहेत. म्हणजे, उद्या सकाळी जर समस्त भारतात न्यायाधीश दुप्पट झाले तर खाडकन सगळे काही आलबेल होईल. असला अजब तर्क.
असो.
ज्या कुणाला system thinking म्हणजे काय हे समजते, ते अत्यंत अल्पमतात आहेत. (आणि त्यांना कुणीही विचारात नाही!)
वादविवाद घालायचे तर घाला पण निरपेक्षपणे - कर्मण्येवाधिकारस्ते, इ.इ. समजून घाला. त्यातून काही निघेल, आपला आवाज कुणी ऐकेल, अशा भ्रमात राहू नका. सुधारण्याकरिता दोन गोष्टी लागतात; समस्या आहे हे मान्य करण्याची तयारी आणि ती सोडविण्यासाठीचे ज्ञान (आपले किंवा भाड्याने घेतलेले). आमच्याकडे दोन्हींची वानवा.
1 May 2018 - 12:14 pm | गामा पैलवान
रविकिरण फडके,
हा कोणाचा तर्क?
आ.न.,
-गा.पै.
1 May 2018 - 1:49 pm | रविकिरण फडके
मी माझी प्रतिक्रिया एकदाच प्रकाशित केली होती. काल (३०-०४-१८) रात्री.
आज सकाळीही ती मलातरी एकच दिसत होती.
पण आत्ता (मंगळवार दिनांक ०१-०५-१८, दुपारी १३:४५ वाजता) पाहतो तर तीच लागोपाठ दोनदा दिसते आहे.
काय झाले असेल?
3 May 2018 - 12:19 pm | झेन
माझ्या मते शिफ्ट सुरु करण्या आधी, प्रत्येक कोर्टाला कुठल्याही केस साठी टाइम फ्रेम फिक्स करावी. तसे "सिटीजन चार्टर फॉर जुड़ीशिअरी" मधे काहीतरी असेलच पण परिणामकारक दिसत नाही. केस ला होणाऱ्या विलंबामुळे नियमित गुन्हेगार, तारखा वाढवून गैरफायदा घेणारे वकील इतर घटक हे न्यायालयात(एकूण सिस्टम मधे) खुश असतात आणि ज्याच्यावर अन्याय होतो तो चक्रात अडकत जातो किंवा न्यायालयात जाणे टाळतो.
सामान्य माणसाला सिस्टिम वर विश्वास वाटत नाही आणि गैरफायदा घेणाऱ्यांचा विश्वास वाढतच जातो.
बाकी कर्मण्येवाधिकारस्ते... एकदम मान्य .
3 May 2018 - 12:30 pm | सुबोध खरे
प्रत्येक कोर्टाला कुठल्याही केस साठी टाइम फ्रेम फिक्स करावी.
स्कॉर्पियन पाणबुडीचा करार ४५००० पानांचा आहे. त्यावर सार्वजनिक हिताचा खटला भरला तर त्यातील महत्त्वाचे मुद्दे जरी वाचायचे ठरवले तरी किती वेळ जाईल याचा विचार करा. https://en.wikipedia.org/wiki/Scorpene_deal_scam
यासाठीच बऱ्याच वेळेस न्यायालये जर फौजदारी नसेल /दिवाणी दाव्यात न्यायालयाच्या बाहेर समेट करा म्हणून सुचवतात.
3 May 2018 - 5:29 pm | झेन
सर्वांना एकाच तरजुत तोलु नये पण काहीतरी आउटर लिमिट असायला पाहिजेच. आता ४५००० पानांचा स्कॉर्पियन पाणबुडीचा करार बनवताना पार्टीज काहीतरी टाइमफ्रेम ठेवूनच काम करत असतील त्यालासुद्धा अनएंडिंग लूपमधे ठेवू शकत नाही. प्रत्यक्षात सामान्य केसेस मधेही निर्णय देण्याचे काही बंधन दिसत नहीं. सुप्रीम कोर्टमधे कुणीही सीरियस इशू असल्याशिवाय पोचणार नहीं. तिथल्या केसची क्रमवारी, पुढे जाणाऱ्या तारखा. प्रत्येक दिवशी कितीही मिसलेनियस केसेस पुन्हा अगम्य लॉजिकनि पुढची तारीख. तिथे केसच्या निकालाची वाट बघताना किती खेपा किती वर्षे घालाव्या लागतील, तुम्ही भारताच्या कुठल्या कोपऱ्यातून या कोण सांगू शकत नाही. तितक्या वेळा वकिलांची फी ? भिक नको कुत्रा आवर असे होते.