सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
8 Mar 2009 - 12:45 pm | सुनील
सुंदर. रंगांच्या विविध छटा!! अप्रतिम!!
हे ठिकाण कुठले?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
8 Mar 2009 - 1:25 pm | सहज
सुंदर! कुठूनतरी बासरीचे सुर आले असे वाटले.
अप्रतिम!
8 Mar 2009 - 1:37 pm | देवदत्त
सुंदर प्रकाशचित्र :)
कुठे काढले हो हे चित्र?
अवांतर: भिंगाने पाहिल्यास त्या फुलांमध्ये यश राज फिल्मस् च्या एखाद्या सिनेमाचे नायक नायिका गाणे गाताना दिसतील असे वाटते ;)
8 Mar 2009 - 2:50 pm | क्रान्ति
खूपच सुन्दर!
क्रान्ति
8 Mar 2009 - 6:20 pm | स्वाती२
वा! खूपच सुंदर. सर्वसाक्षी, माझ्या लेकाने परवानगी विचारलेय हे चित्र desktop background साठी वापरायला.
8 Mar 2009 - 6:52 pm | श्रावण मोडक
सु रे ख!!! रंगमंच हे शीर्षक तर अगदी समर्पक.
स्थळ वगैरे लिहिले असते तर थोडी माहितीत भर पडेल.
8 Mar 2009 - 7:17 pm | भडकमकर मास्तर
फार सुंदर...
उत्तम फोटो..
चौकशी : हल्ली चांगल्या फोटोंमध्ये असे काही दिसले की विश्वास ठेववत नाही... फोटोशॉपमध्ये काही फेरफार तर नाहीत केलेले??' ....असे सतत वाटत राहते... कलियुग कलियुग ते हेच असावे...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
8 Mar 2009 - 11:09 pm | रेवा
फोटोशॉपमध्ये काही फेरफार तर नाहीत केलेले??' ....
>>>विशेषतः आकाश आणि जांभळ्या रंगांचे डोंगर..
8 Mar 2009 - 7:23 pm | विनायक प्रभू
मल्टीकलर
8 Mar 2009 - 10:01 pm | गणपा
एकाच चित्रात डोंगरांच्या सहा वेग वेगळ्या छटा बघुन वेडा झालो.
एकदम समर्पक नाव.
8 Mar 2009 - 10:50 pm | प्राजु
सुरेख..!
ठिकाण सांगा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Mar 2009 - 9:11 am | दशानन
लै भारी साक्षी साहेब,
पण हाय कुठ ही जागा वाईच सांगा बरं... आपल्या इंडीया मध्येच हाय नव्हं... नाय आजकाल भारतात जाणं जरा वाईच कमी झालं हाय ;)
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
9 Mar 2009 - 9:36 am | विसोबा खेचर
सु रे ख...
9 Mar 2009 - 10:28 am | सर्वसाक्षी
नमस्कार मिपाकरहो,
१) ठिकाण आहे लुडविक टोक - महाबळेश्वर; मधल्या डोंगरात कोरलेली नागमोडी रेष म्हणजे पोलादपूरला उतरणारा घाट, पल्याड सह्याद्रीच्या रांगा. हे चित्र पावसळा संपता संपता अखेरच्या पावसाचा ओसरा व धुके या सुंदर वातावरणात टिपेले आहे. या भागातल्या दर्या खोर्यात पावसात रंगलेली हिरवी गवती जमीन नाजुकश्या ,जमिनीलगत फुललेल्या पिवळ्या फुलांनी बहरु लागली की समजावे, नवरात्र जवळ आले.
२) फोटोशॉप - भडकमकर मास्तरांनी ताडल्यानुसार फोटोशॉप वापरले आहे, मात्र रंग बदलणे वा चमत्कृति या अंगाने न वापरता किरकोळ फेरफार म्हणजे विरोधाभास, हरवलेले रंग थोडे हस्तगत करण्यासाठी वापरले आहे. डोंगर दर्या जर धुके निवळताना, प्रकाश योग्य रितीने वापरुन टिपले तर जांभळ्या निळ्या छटा टिपता येतात, एका विशिष्ठ अंगाने टिपल्यास आकाश गडद दिसु शकते वा अगदी फिकेही दिसु शकते - गाळण्या वा फोटोशॉप न वापरताही.
३) स्वाती२ वा अन्य कुणालाही हे चित्र आवडले असल्यास संगणकावर डकवण्याची पूर्ण मुभा! दाखविलेल्या सौजन्याचे कौतुक वाटले.
सर्व मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.
9 Mar 2009 - 1:15 pm | स्वाती दिनेश
मस्त.. चित्राइतकेच शीर्षकही आवडले.
स्वाती