रानभेदी..!!

विशुमित's picture
विशुमित in जे न देखे रवी...
13 Apr 2018 - 5:55 pm

रानभेदी वाहतो वारा
सांजवेळी सुन्न उंबरा..!!

परसात आली गाई
वासरू फोडते हंबराई
कुशीत घेते त्याला
कुशीत घेते त्याला
दूध पिण्या करते इशारा
रानभेदी वाहतो वारा
सांजवेळी सुन्न उंबरा..1

झोप लागत नाही
सल काळजात बाई
दरवळली दारी जाई
दरवळली दारी जाई
मातीचा गंध बरा
रानभेदी वाहतो वारा
सांजवेळी सुन्न उंबरा...2

दुःखाचा डोंगर
कळकटलेला पाझर
रीत-रिवाजाची वाघर
रीत-रिवाजाची वाघर
वरून नियतीचा मारा
रानभेदी वाहतो वारा
सांजवेळी सुन्न उंबरा...३
===================================

भावकविताकविता

प्रतिक्रिया

मनाला भिडली, आवडली म्हणवत नाही..
:(

एस's picture

14 Apr 2018 - 10:47 am | एस

कविता आवडली.

पैसा's picture

14 Apr 2018 - 12:52 pm | पैसा

अर्थवाही शब्दकळा

दुर्गविहारी's picture

16 Apr 2018 - 11:53 am | दुर्गविहारी

खुपच खिन्न करणारी कविता आहे. तो मुड अचुक पकडलाय.

नाखु's picture

3 May 2018 - 7:35 am | नाखु

दिसांनी अस्सल मराठी शब्द वाचले, शब्दकळा अचूक मांडले आहे

नितवाचक नाखु

विशुमित's picture

3 May 2018 - 8:44 am | विशुमित

धन्यवाद नाखू जी...!!