गुलामीची १२ वर्षे..

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
2 Apr 2018 - 9:50 pm

नमस्कार !

बर्‍याच प्रयत्नांनंतर मी एक पुस्तक अ‍ॅमॅझॉन किंडलवर टाकले आहे. पुस्तकाचे नाव आहे... गुलामीची १२ वर्षे. मूळ लेखक आहे सालोमन नॉरथप आणि मी त्याचा अनुवाद केला आहे. पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. पहिलाच प्रयत्न असल्यामुळे जरा समजून घ्यावे.

...हा इतिहास मोठा विचित्र आहे. त्यातील सत्य हे काल्पनिक गोष्टीपेक्षा ही अद्भुत आहे. जरा विचार करा, तीस वर्षे या माणसाने स्वातंत्र्यात काढली. साधे का होईना त्याच्या डोक्यावर छप्पर होते ज्यातून त्याला हाकलण्याचा कोणालाही अधिकार नव्हता. दुर्दैवाने त्यानंतर १२ वर्षे तो गुलाम झाला, दुसर्‍याची मालमत्ता झाला. अक्षरश: एखादे खेचर, घोडे असतात तसे आणि त्याचा दर्जा त्यांच्यापेक्षाही हीन होता. त्यांनी त्याला त्याच्या घरादारापासून तोडले, त्याच्या बायकापोरांपासून तोडले. त्यांच्या तोंडातील घास हिरावून घेतला व दक्षिणेत भाजत्या उन्हात, शेतात, ज्याचा शून्य मोबदला मिळतो अशा कष्टप्रद कामाला जुंपले आणि ते सुद्धा एका क्रूर मालकाच्या चाबकाखाली. भयंकर ! अशी माणसे जगात असतात हे वाचून तुमचे रक्त तापेल...
-फ्रेडरिक डग्लस.(१८१८-१८९५)

.... हे पुस्तक वाचल्यावर वाचकांना प्रश्न पडेल की सॉलोमन नॉरथपचे पुढे काय झाले. खरे सांगायचे तर त्याचा मृत्यू हे शेवटपर्यंत रहस्यच राहिले. त्याच्या पत्नीचा, मुलांचा शोध लागला पण सॉलोमन नॉरथपच्या थडग्याचा साधा उल्लेखही कुठे सापडला नाही. आश्‍चर्य म्हणजे त्याचा अमेरिकेत त्या काळात झालेल्या जनगणनेत ही उल्लेख सापडत नाही. पण सुटल्यानंतर तो अमेरिकेत सगळीकडे गुलामगिरीच्या विरुद्ध भाषणे देत हिंडत होता. शेवटी तो कॅनडात गेला होता. तेथे त्याच्या सभेत काहीतरी गोंधळ झाला . त्यानंतर मात्र त्याचा पत्ता लागला नाही....
- जयंत कुलकर्णी.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे पुस्तक येथे उपलब्ध आहे.

आपला,
जयंत कुलकर्णी.

तसेच मागच्या महिन्यात मला जो पुरस्कार मिळाला त्याचे छायाचित्र खाली देत आहे. हे जोडायचे कारण माझी जी ओळख त्यांनी दिली आहे त्यात "मिसळपाव'' चे नाव आहे. . ते ही खाली देत आहे. मला खात्री आहे आपल्या येथे अनेक लेखक असलाच कुठलातरी पुरस्कार मिळवतील किंवा मिळवले ही असतील.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

स्पार्टाकस's picture

2 Apr 2018 - 9:53 pm | स्पार्टाकस

क्या बात है सर! जिओ!

शाम भागवत's picture

2 Apr 2018 - 10:15 pm | शाम भागवत

असच म्हणतो.

पगला गजोधर's picture

2 Apr 2018 - 10:18 pm | पगला गजोधर

हार्दिक अभिनंदन.

अभ्या..'s picture

2 Apr 2018 - 10:27 pm | अभ्या..

अरे वा जयंतकाका,
आप तो रोशन हैही, हमकोभी रोशन कर दिया.
आमच्या जयंतकाकांची उचित दखल घेतल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार.

चांदणे संदीप's picture

2 Apr 2018 - 11:08 pm | चांदणे संदीप

जयंतकाका अभिनंदन!

तुमचा हा पुरस्कार मिपावरच्या अनेक होतकरू लेखक/कवींना प्रेरणा देईल यात शंका नाही! :)

Sandy

पद्मावति's picture

2 Apr 2018 - 11:18 pm | पद्मावति

मन:पूर्वक अभिनंदन.

थॉर माणूस's picture

2 Apr 2018 - 11:36 pm | थॉर माणूस

वाह! अभिनंदन!

अतिशय आनंद झाला. अभिनंदन!

कपिलमुनी's picture

3 Apr 2018 - 12:48 am | कपिलमुनी

तुमच्या लेखनाचे फॅन आहोतच !
मिपाचे नाव वाचल्याने आनंद द्विगुणीत झाला

manguu@mail.com's picture

3 Apr 2018 - 2:54 am | manguu@mail.com

अभिनंदन

डाम्बिस बोका's picture

3 Apr 2018 - 3:51 am | डाम्बिस बोका

आपले लिखाण नेहमीच आवडते. त्रिवार अभिनंदन. असेच चांगले लेख लिहित जा. आपले लिखान नेहमिच अवदते

प्रचेतस's picture

3 Apr 2018 - 8:35 am | प्रचेतस

मनःपूर्वक अभिनंदन काका.

सुमीत भातखंडे's picture

3 Apr 2018 - 11:09 am | सुमीत भातखंडे

मनापासून अभिनंदन सर.

इरसाल कार्टं's picture

3 Apr 2018 - 11:19 am | इरसाल कार्टं

अभिनंदन काका

दुर्गविहारी's picture

3 Apr 2018 - 11:40 am | दुर्गविहारी

अभिनंदन जयंत कुलकर्णी काका !.

श्री. जयंत कुलकर्णी यांचे मनापासुन अभिनंदन

सस्नेह's picture

3 Apr 2018 - 12:27 pm | सस्नेह

जयंत काका यांचे मन:पूर्वक अभिनंदन...पुन्हा एकदा !!

जावई's picture

3 Apr 2018 - 1:51 pm | जावई

अभिनंदन काका

अभिजीत अवलिया's picture

3 Apr 2018 - 2:20 pm | अभिजीत अवलिया

अभिनंदन ...

आबा पाटील's picture

3 Apr 2018 - 4:37 pm | आबा पाटील

काका, अभिनंदन !

या विषयावर आधारित चित्रपट पण छान आहे.
https://en.wikipedia.org/wiki/12_Years_a_Slave_(film)
http://www.imdb.com/title/tt2024544/

अर्धवटराव's picture

3 Apr 2018 - 6:38 pm | अर्धवटराव

आम्हि तसंही आपल्या लिखाणाचे फॅन आहोत.
जय हो.

गामा पैलवान's picture

3 Apr 2018 - 7:39 pm | गामा पैलवान

जयंतरावांचं अभिनंदन. अशीच घोडदौड चालू राहूदे!

-गा.पै.

पैसा's picture

3 Apr 2018 - 9:06 pm | पैसा

मस्त!!

मित्रहो's picture

4 Apr 2018 - 6:48 pm | मित्रहो

अभिनंदन आनंद झाला वाचून.

सुबोध खरे's picture

4 Apr 2018 - 7:50 pm | सुबोध खरे

जयंतराव
आपले मनापासून अभिनंदन.
आपले लेखन उत्कृष्ट असते यात शंकाच नाही पण आता त्याला सरकार दरबारी मान्यताही मिळाली यामुळे आनंद द्विगुणित झाला.
आपल्याकडून असे सकस लेखन होत राहो आई आमच्या सारख्या सामान्य वाचकांचे प्रबोधन होत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

रामदास२९'s picture

4 Apr 2018 - 9:03 pm | रामदास२९

हार्दिक अभिनंदन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Apr 2018 - 9:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

हार्दीक अभिनंदन !

नाखु's picture

5 Apr 2018 - 9:50 am | नाखु

अभिनंदन

अखिल मिपा हसतं खेळतं जिंदादील ठेवा आणि ठेवण्यासाठी सदोदित प्रयत्न करा संघाचा किरकोळ सदस्य नाखु

किसन शिंदे's picture

5 Apr 2018 - 1:46 pm | किसन शिंदे

मनःपूर्वक अभिनंदन काका.! वरील पुस्तक किंडलवर फ्री आहे कि पेड?

दीपक११७७'s picture

5 Apr 2018 - 2:37 pm | दीपक११७७

हार्दिक अभिनंदन काका..!

जयंत कुलकर्णी's picture

5 Apr 2018 - 5:16 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

अभिनंदन करण्याची परत संधी दिल्या बद्धल तुमचे विशेष अभिनंदन ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोहराच्या दारावर कैर्‍या मागनं... [ * काय बाई एका-एकाच वागनं ] :- बबन

विनोद१८'s picture

7 Apr 2018 - 4:14 pm | विनोद१८

मा. जयन्तराव आपले हर्दिक अभिनन्दन, चेपुवर बातमी मिळाली होतीच.

आता एका नवीन देरसुच्या प्रतिक्षेत आहोत.

उत्तम व दर्जेदार लिखणा / अनुवादाबद्दल धन्यवाद.

महामाया's picture

13 Apr 2018 - 3:03 am | महामाया

मनापासून अभिनंदन सर.

नो वन's picture

1 May 2018 - 2:18 am | नो वन

मनःपूर्वक अभिनंदन!!!