भूल

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
7 Mar 2009 - 8:03 am

पांघरायला विस्मरणांची झूल नको आता!
आठवायला काटे पुष्कळ! फूल नको आता

हवे करीअर, हवे प्रमोशन्, माडी अन् गाडी
हवी 'मजा' प्रणयातसुधा, पण मूल नको आता

मिटक्या मारत गिळून घेताना ओव्हनमधले,
मऊभात, भाकरी ...?... धूर अन् चूल नको आता

लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो,
पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता

गंधित वारा तुझ्या गावचा - पण मी गुदमरतो
(मिणमिणत्या श्वासास तुझी चाहूल नको आता)

सुदैव माझे कुणी पळवले मलाच ना पत्ता,
उरलेलेही लुटायचे तर भूल नको आता!

मिठीत घे रे, कुशीत घे, विठ्ठला जरा आता
नाळ जिण्याशी घट्ट करे तो पूल नको आता

गझलप्रतिभा

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

7 Mar 2009 - 8:05 am | घाटावरचे भट

टरन मारला है मधीच....मस्त!

सहज's picture

7 Mar 2009 - 8:09 am | सहज

विकांताला व्हायचे फूल टु ठरवून
का होतो लाडवा रे गूल बरे आता

सटासट शिंका आल्यासारखी विडंबने / काव्य बेला? :-)

पिवळा डांबिस's picture

7 Mar 2009 - 8:33 am | पिवळा डांबिस

लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो,
पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता
क्या बात है!!!
आवडलं!
जियो!!!!

मदनबाण's picture

7 Mar 2009 - 8:57 am | मदनबाण

पांघरायला विस्मरणांची झूल नको आता!
आठवायला काटे पुष्कळ! फूल नको आता
व्वा..

लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो,
पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता
सॉलिड्ड... :)

मदनबाण.....

Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

अवलिया's picture

7 Mar 2009 - 9:14 am | अवलिया

लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो,
पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता

जबरा!
मस्तच !!
जोरदार आहे.. :)

--अवलिया

प्राजु's picture

7 Mar 2009 - 10:14 am | प्राजु

लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो,
पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता

खास शेर!!! लाजवाब!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

7 Mar 2009 - 10:19 am | शितल

मिठीत घे रे, कुशीत घे, विठ्ठला जरा आता
नाळ जिण्याशी घट्ट करे तो पूल नको आता

मस्तच विडंबन :)

बेसनलाडू's picture

7 Mar 2009 - 10:21 am | बेसनलाडू

=))
(प्रश्नांकित)बेसनलाडू

शितल's picture

7 Mar 2009 - 10:25 am | शितल

बर कविता :)
पण जे काही आहे ते आवडले. :)

क्रान्ति's picture

7 Mar 2009 - 8:00 pm | क्रान्ति

शेवटची कलाटणी अगदी वेगळी, प्रगल्भ! खूप छान!
क्रान्ति

लवंगी's picture

7 Mar 2009 - 8:24 pm | लवंगी

एकदम आवडली.

राघव's picture

8 Mar 2009 - 10:54 am | राघव

एक से एक शेर आहेत सगळे..

हवे करीअर, हवे प्रमोशन्, माडी अन् गाडी
हवी 'मजा' प्रणयातसुधा, पण मूल नको आता

मिटक्या मारत गिळून घेताना ओव्हनमधले,
मऊभात, भाकरी ...?... धूर अन् चूल नको आता

लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो,
पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता

मिठीत घे रे, कुशीत घे, विठ्ठला जरा आता
नाळ जिण्याशी घट्ट करे तो पूल नको आता

हे खास आवडलेत.. :)
मुमुक्षु

अनिल हटेला's picture

8 Mar 2009 - 11:11 am | अनिल हटेला

सहमत !!!

सुरेख कविता !!! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..