बोल

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
6 Mar 2009 - 2:34 pm

काहीच का रे कळत नाही तुला प्रेमातल ?
नेहमीच ते पुस्तकात नाक खुपसून बसायच !
डोळ्यांत उतरवायची ती दुसर्‍यांची आत्मचरित्र नी कथा
जाणशील तरी कधी तू माझ्या मनातली व्यथा ?
मला म्हणे रोमॅन्टीक बोलता येत नाही
रोजच्या वाचनात एक वाक्य पण येत नाही ?
पुस्तकांतल्या कथांमध्ये कोणी प्रेमच करत नाही ?
म्हणे बोलायला कशाला हव ? समजायच असत ते !
काय समजू मी की तुझ प्रेम मुक आहे ?
चंद्र तारे तोडायच नको बोलू ते सर्व काल्पनीक आहे
पण माझे तुझ्यावर प्रेम आहे हे वाक्य काय अवघड आहे ?

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

दशानन's picture

6 Mar 2009 - 4:29 pm | दशानन

डोळ्यांत उतरवायची ती दुसर्‍यांची आत्मचरित्र नी कथा
जाणशील तरी कधी तु माझ्या मनातली व्यथा ?
मला म्हणे रोमॅन्टीक बोलता येत नाही
रोजच्या वाचनात एक वाक्य पण येत नाही ?
पुस्तकांतल्या कथांमध्ये कोणी प्रेमच करत नाही ?
म्हणे बोलायला कशाला हव ? समजायच असत ते !
काय समजू मी की तुझ प्रेम मुक आहे ?

सुंदर, मनातील भावना उत्तमपणे कवितेत उतरल्या आहेत... अभिनंदन !

आवडली मला कविता !

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

प्रमोद देव's picture

6 Mar 2009 - 7:42 pm | प्रमोद देव

आवडली कविता!

क्रान्ति's picture

6 Mar 2009 - 8:58 pm | क्रान्ति

सौतन चश्मा बीचमे आये, नैन मिले कैसे?
क्रान्ति

जागु's picture

9 Mar 2009 - 11:13 am | जागु

प्रमोद, राजे, क्रांती तुमच्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Mar 2009 - 11:39 am | परिकथेतील राजकुमार

मला म्हणे रोमॅन्टीक बोलता येत नाही
रोजच्या वाचनात एक वाक्य पण येत नाही ?

क्या बात है !
आवडली तुमची तक्रार ;)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य

अडाणि's picture

9 Mar 2009 - 12:01 pm | अडाणि

एवढं लडीवाळपणे तक्रार केल्यावर रोज एक वाक्य नाहीतर ऊताराच येणार डायरेक्ट ...

अफाट जगातील एक अडाणि.