भूल पडली सागराची चंद्रवर्खी रातीला
बंधने उधळून सारी ती निघाली भेटीला
चांदण्याचे माप ओलांडून अलगद उतरली
बावरी नव परिणिता जणु प्रियकराला बिलगली
सावळ्या सखी-साजणाचा नूर होता आगळा
मत्स्यगंधा रात्र झाली, अन् धुके चहूबाजुला
यामिनीचा मग रुपेरी साज हलके उतरला
धुंदले आकाश होते चंद्र होता साक्षीला
शांत झाली गाज तरीही गोड हुरहुर राहिली
का निशेची पैंजणे लाटात त्या रेंगाळली
रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले
अन् तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले
जयश्री अंबासकर
प्रतिक्रिया
5 Mar 2009 - 3:06 pm | मदनबाण
भूल पडली सागराची चंद्रवर्खी रातीला
बंधने उधळून सारी ती निघाली भेटीला
झक्कास्स्स्स्स्स...
भूल पडली मला
नेत्र तिचे पाहताच
राहिलो ना माझाचं मी
दर्शन तिचे घडताच
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
5 Mar 2009 - 3:20 pm | नीधप
छान गं जयूताई!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
5 Mar 2009 - 5:00 pm | दिपक
>>रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले
अन् तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले..
सुरेखच ! :)
5 Mar 2009 - 6:02 pm | दत्ता काळे
कविता फार आवडली . . .
रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले
अन् तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले
कल्पना आणि शब्दबंधाला सलाम !
5 Mar 2009 - 8:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले
अन् तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले
क्या बात है ! नेहमीप्रमाणेच सुंदर कविता...और भी आने दो !
-दिलीप बिरुटे
5 Mar 2009 - 8:44 pm | क्रान्ति
खूपच सुन्दर! शेवटच्या ओळी खरच खूप मोहक आहेत. अगदी मनाला भिडतात.
क्रान्ति
6 Mar 2009 - 1:05 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
5 Mar 2009 - 9:10 pm | प्राजु
अतिशय नाजूक शब्दांनी नटलेली कविता... एकदम सुरेख!
रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले
अन् तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले
शेवट तर अप्रतिम!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Mar 2009 - 10:46 pm | शितल
जयवी ताई,
खुपच गोड कविता.
तुझी प्रत्येक कविता मनाला खुप भावते. :)
5 Mar 2009 - 11:53 pm | सुवर्णमयी
जयश्री , कविता फार सुरेख आहे. खूप आवडली.
सोनाली
6 Mar 2009 - 2:46 am | बिपिन कार्यकर्ते
सुंदर कविता. मस्त आहे.
बिपिन कार्यकर्ते
6 Mar 2009 - 8:03 pm | जयवी
सगळ्यांचे मनापासून आभार हो :)
6 Mar 2009 - 11:24 pm | नंदन
रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले
अन् तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले
- क्या बात है!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
6 Mar 2009 - 11:49 pm | चतुरंग
काय भन्नाट कल्पना आहे! जियो जयवी!!
सुंदर कवितेबद्दल अभिनंदन! :)
चतुरंग
7 Mar 2009 - 4:41 am | घाटावरचे भट
असेच म्हणतो...
12 Mar 2009 - 9:37 am | प्रमोद देव
Get this widget | Track details | eSnips Social DNA
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
12 Mar 2009 - 1:39 pm | सहज
चाल छान आहे. कुठला राग म्हणायचा?
12 Mar 2009 - 2:43 pm | जयवी
देवकाका........ तुम्ही माझ्या कवितेचा सन्मान केलात :) मनापासून धन्यवाद !!
मस्त झालीये चाल !! तुमचं खरंच फार कौतुक वाटतं हो.....!!
12 Mar 2009 - 1:32 pm | जागु
शांत झाली गाज तरीही गोड हुरहुर राहिली
का निशेची पैंजणे लाटात त्या रेंगाळली
खुप छान.
12 Mar 2009 - 2:44 pm | जयवी
सगळ्यांचे मनापासून आभार :)