सर्वसामान्य जनता भावूक असते
राजकारण्यांना ती मुभा नसते..
समोर होणारा अपघात बघूनही
चाकरमानी पळतात..
लेटमार्कच्या भिती पुढे हृदय गहाण ठेवतात!
त्यांच्या असहाय्यतेचे कौतुक होते...
राजकारण्यांच्या उशीराचे वाभाडे निघते...
हृदयशून्य... भावनाहीन...
राजकारणी असतात...
जणूकाही त्यांच्याकडे मनं नसतात!
निवडून दिलंय तुम्हाला...
तुमच्या प्रत्येक क्षणावर हक्क...
कराच तुम्ही चूक...
अपमानाचा चाबूक तुमच्यावर!
म्हणतात ना हृदयशून्य...
मग तसंच जगावं...
तुमची मुलं... तुमचं कुटुंब...
प्रायोरिटी कधीच नसावं....
म्हणून वाटतं माणसाने
राजकारणी नसावं...
किमानपक्षी राजकारणात
भाऊक नसावं!!
प्रतिक्रिया
11 Feb 2018 - 4:15 pm | सुखीमाणूस
जरा अशक्य वाटतय
12 Feb 2018 - 1:43 pm | ज्योति अळवणी
का? ती माणसं नसतात?
16 Feb 2018 - 4:54 pm | हतोळकरांचा प्रसाद
सहमत! सगळ्याच सार्वजनिक व्यक्तिमत्त्वांच्या बाबतीतच हेच घडत असावं! हे आपल्या माध्यमांमुळे जरा जास्तच फोफावलंय असे वाटते.