ये शिंच्या कार्टा.. मला मारायचा प्लान केला हायस काय रे - पिडाआ रागाने माझ्या कडे धावून येत म्हणाले.
मी काय केलं ओ - मी घाबरुन म्हणालो
लेका, हे फळ तुला कुठं मिळाल - एक पिवळंस बोरासारखं फळ माझ्या डोळ्यासमोर नाचवत पिडा ओरडले.
अरे, हे तुम्हाला कसं मिळालं, हे तर दुस-याच उपयोगासाठी आणलं होतं - असं म्हणून मी पटकन ते फळ त्याच्या हातातून काढून घेतलं.
कसलं आहे रे ते फळ - नाना पाठीमागून हळूच म्हणाला.
अबे, ते तेच फळ आहे जे बाहुबली मध्ये - मी डोळा मारत म्हणालो.
समजलं समजलं, पण ह्याचं करणार काय तू - नाना डोळे मिचकावत म्हणाला.
देख ते रह ना, साला कोन आपल्याशी लफडा करेल त्याच्या ताटात हेच - मी सातमजली हास्य करत म्हणालो.
अबे, खुळा झाला कारं तु बाल्या - ब्रिटिश मागून माझ्या अंगावर येत म्हणाला.
अरे भावड्या, तुला नाय देणार काळजी नं गं करु - मी हसत म्हणालो.
**
च्या** ह्या कार्टाच्या, मला वाटलंच हुतं हो काय तरी लफडा करणार - देशपांडे काका तुंबाकु चोळत म्हणाले.
बट यु नो, आय थिंक.. त्याचा प्लान चांगलाच आहे -टिंग्या आकाशाकडे पाहत दार्शनिक अंदाजात म्हणाला.
ते फळं चारायचा? - असं म्हणत प्रभु पण त्यांच्या चर्चे मध्ये सामील झाले.
फळ - देशपांडे काका व टिंग्या दोघे दचकले.
कुठे आहेत फळे.. आम्हाला मिळालीच नाहीत अजून - टिंग्या व देश-काका दोघे म्हणाले.
जा, त्या कार्ट्याकडे आहेत बघा - असे म्हनून प्रभु परत समाधिस्त झाले.
**
सर्वांनी मिळुन जर आपण प्रयत्न केले तर आपण काही तासात झोपड्या उभ्या करु शकतो- सामंत काका आपला चष्मा संभाळत म्हणाले.
बरोबरं आहे तुमचं - एक सुरात दोनच-चार जणच म्हणाले.
जेव्हा मी प्राध्यापक **** ह्याच्या बरोबर चर्चा करत होतो तेव्हा..... - सामंत काका पुन्हा म्हणाले.
सुंदर, एकदम मनाला हात घातलात काका, +१ - असे दोनचार जण म्हणाले हे पहाताच तात्या नीं डोळे वटारले.
**
तात्यांनी डोळे वटारलेले बघता तो कंपु गायब झाला.
तुम्ही मला सांगता का, मीच त्या निलकांत ला सांगून झोपड्यापण डिझाइन करुन घेतो - तात्या हसत म्हणाले.
तात्या, ते कोण आहेत हो.. डबल बॅरल दुनाळी घेऊन फिरत आहेत, शिकारी आहेत का - सामंत काका निरागसपणे म्हणाले.
ते व्ह्यं.. अहो ते आपले बिरुटे साहेब, ओ बिरुटे सर या इकडं - देशपांडे काकांनी महत्वपुर्ण माहीती पुरवली व त्यांना बोलवले.
काय राव, तुमची बंदुक इकड पण का - हॅ हॅ हॅ हसत देशपांडे काका म्हणाले.
अहो हि नॉन डिटॅचेबल आहे, एकदम फिक्स - हा हा हा सात मजली हास्य करत बिरुटे साहेब म्हणाले.
णमस्कार डिलीट साहेब, स्वारी स्वारी बरं का.. चुकलं बिरुटे सर - टार्या केकाटला मागूनच.
एक बटन दबाया, तेरा प्रतिसाद खल्लास. समजलास का टार्या, नाद नाय करायाचा त्यांचा - डॉन्या आपली गंजलेली देशी पिस्तुल दाखवत म्हणाला.
अरे गप्प बसा रे, माझी समाधी लागत नाही आहे कधी पासून - एक डोळा उघडत प्रभु म्हणाले.
सगळे तिथून पसार झाले, हो उगाच काय तरी क्रिप्टिक टाकलं प्रभु ने तर डोक्याचे राहीलेली केसं पण उडायची.
**
अय्या, मिंटे तुझ्या ड्रेसचा रंग एकदम ह्या वातावरणाशी मॅच होतो आहे नै - नयनी ने डोळे मिचकावत मिंटीला विचारले.
अगं, मी तर मुद्दाम घेतला हा ड्रेस, अमितेच क्रिडिट कार्ड पडले होते माझ्याकडे तो विसरला होता - हिहिहि हसत मिंटी म्हणाली.
तरीच मी म्हणत होतो, हिशोब का लागत नाही आहे माझा, आन बँग बघू करत एकदा बॅलन्सशीट चेक करतो - अमित डोकं खाजवत म्हणाला.
आदितीताई अवखळकर पाटीलांचा विजय असो विजय असो - डोन्या चिरक्या आवाजात वरडला, पण कुणाचीच साथ लाभली नाही हे पाहून यमीने आपली बँग+ दुर्बीन+ काही पुस्तकांचा संच + लिनिक्सवाला लॅपोटॉपो+ इतर सामान (अंदाजे २ टन) डॉन्याकडे फेकले. पण भार न पेलवल्यामुळे डॉन्या चारीमुंड्याचीत. लगेच मी, नाना, टार्या त्याच्या मदतीला गेलो तेव्हा कुठे तो उभा राहीला.
ह ल क ट - डॉन्या स्पष्टपणे काहीतरी असेच पुटपुटला. पण अदिती आपली जिमची पावती सापडते का ती शोधत होती त्यामुळे तीच्या ते लक्ष्यात आलं नाही, त्यामुळे डॉन्या वाचला, महाजालावर लिहणे व समोरसमोर बोलणे ह्यातला फरक त्याला कळाला नसावा.
अरे बस येवढंच सामान - डॉन्या हसत म्हणाला, व आपले कपडे झाडू लागला.
दुखः पण कसे हसावे हे ह्याच्या कडे शिकावे - खिखिखि हसत..धम्याने डॉन्याच्या पाठीत रप्पाटा मारला व कुणाला तरी मारलाच आज ह्या आनंदात शिटी वाजवत पुढे निघाला.
ये दा, ये राज दा - मागुन स्पृहा आली.
तु पण आली का ? - मी डोक्याला अट्या घालत म्हणालो.
कारे मंद , तुला नाही आवडले मी आलेली, - स्पृहा हसत म्हणाली.
मंद म्हणालीस, माझ्या समोरच म्हण, त्या नयनी व मिंटे समोर नको, माझे आई - मी जवळ जवळ साष्टांग नमस्कार घालत म्हणालो.
समोर बुट्टी भर फळे, थंडगार नदीचे पाणी व दहा-बारा बायका... गप्पाचा फड रंगला, अगं ती पाककृती मध्ये मिठच कमी पडले, पण मी काय म्हणते संस्कृती नावाची काही चीज आहे की नाही, चित्रपट म्हणजे माझा जिव की प्राण, तीचे नखरे पाहीले का ?, अय्या सोन्याची चेन, अगं बाई माझे मॅचिंग संन्डेल राहिले वाटतं, अगं तु कुठला सेंट वापरतेस, मी केलेले जेवन त्यांना आवडतच नाही, आमचे हे म्हणजे अगदी हेच आहेत.... इत्यादी इत्यादी - वरुन देव म्हणाला असेल आज कळाले मंदी का आली ती आमच्या भारतवर्षामधे ;)
**
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं, जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. - विजुभाऊ काही तरी पुटपुटु लागले.
समोरच नदी आहे, व त्याच्या जवळच पर्वत जा तिकडे - कुचकट पणे कोणी तरि बोललं पण विजुभाऊ हिरवळ, नदी व पर्वतामध्ये गुंग होते, त्यामुळे काही रिएक्सन आली नाही.
मी काय म्हणतो, आपण सर्व जण मिळून एक पार्थना म्हणून या - टिग्या म्हणाला.
कश्याला उगाच देवांना ह्या हिमालयातून पण पळून लावायचं रे बाबा राहु दे, आपण अंताक्षरी खेळू या. - विजुभाऊ म्हणाले.
पहिले अक्षर मी देतो, हे घे.. इजाजत चाहता हुं, तुम्हारे पास आने की.. तमाचा खाता हूं.. - असे काही तरी म्हणाले विजुभाऊ.
आलोच आलो, ये डॉन्या आलो - असे म्हणुन टिंग्या पसार झाला.
**
नाना, टिंग्या, धम्या, डॉन्या, अन्या व बाकीची मंडळी चला जंगलात चला - मी जरा जोराताच बोलवलं सगळ्यांना.
जंगलात का म्हनून मी नाय येणार - डॉन्या जंगलाकडे बघ म्हणाला.
ये, माझ्या नावातच बैल आहे पण मी लै हुशार, मी येतो चल. - अन्या लगेच तयार होत म्हणाला.
चल, चल. - नाना, टिंग्या व धम्या म्हणाले व डॉन्याला पकडून चालू लागले.
पण काय करायला चाललो आहोत आपण - डॉन्या परत हळू आवाजात म्हणाला.
अरे लेका अजून दिवस आहे, रात्री झोपण्याची सोय नको करायला, चार लाकडं गोळा करु मस्त पैकी फायर कँम्प करु- नाना म्हणाला.
**
तुम्ही लोकं येथे फिरायला नाही आला आहात, सर्व लाभ व लोभ सोडून तुम्ही आला आहात - सहज "तेच" पुस्तक संभाळत म्हणाले.
बरोबर सहज राव, आता कसं बोललात बघा - मागून कोणी तरी म्हणाले.
अरे पण तो शिंच्या कार्ट कुठ आहे, त्याला मारावं वाटत आहे खुप - पिडाआ मुठी आवळत म्हणाले.
का हो, त्याला का मारणार तुम्ही - समाधीतून उठत प्रभु म्हणाले.
नाही ओ, त्याला हे हिमालय सोडून.. खाली मध्य भारतात कुठे नाही जागा मिळाली आश्रमासाठी.- पिडाआ म्हणाले.
मध्य भारतात म्हणजे खजोराहो जवळ कां - हॅ हॅ हॅ.. नाना डोळा मारत हसत म्हणाला.
कुणाला कश्याची काळजी नाही आहे, आपल्या भगिनी / मैत्रीणी बरोबर आहेत, त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायचे सोडून कसल्या मिटिंगा घेत बसला आहात, मला शरम वाटते तुमची - वरुन आकाशवाणी व्हावी असा अवाज आला व सगळे पटापटा पळाले, खाण्यापीण्याचे सामान शोधण्यासाठी.
**
क्रमश : - लै दिवसाने क्रमशः हा शब्द लिवला लै भारी वाटलं बघा...
**
टिप : हे सर्व फक्त विनोदी अंगाने आहे, वर उल्लेख केलेली नावं फक्त नावं आहेत त्या व्यक्ती नाहीत, महाजालावरील त्यांचे लेखन व प्रतिसाद ह्यातील भाषा बघून मी अंदाज केला आहे, काही मला आदरणिय आहेत, काही माझ्या पेक्षा मोठे आहेत त्यांचा अनादर करण्याची माझी काहीही मनिषा नाही आहे, जे लहान आहेत माझ्या पेक्षा त्यांनी उंकाचू केले तर बघा... आवाज नाय पाहीजे.. काय ;) , हा फक्त व फक्त विनोद आहे कुणाची भावना दुखवण्याचा ह्यात काही ही उद्देश नाही आहे, ज्यांना असं वाटतं की ह्यात माझं नाव नसावे त्यांनी मला खरडावे अथवा व्यनी करावे, मिपा प्रशासनाला ह्यात काही वागवे वाटले तर कृपया योग्य ति सुचना द्यावी. अजून काही आपेक्ष असेल तर व्यनी अथवा खरडा मला. कुणाला काहीच अडचण नसेल तर मग पुढील भाग पटापटा टाकेन व सलग टाकेन ही मी माझ्या विझत असलेल्या शिगरेटाची शपथ घेऊन सांगतो =)) .
प्रतिक्रिया
5 Mar 2009 - 12:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=))
लय भारी हो राजे, चालू द्या ...
आणि डानराव आमचे राजकीय कोलॅबोरेटर असल्यामुळे त्यांना नाही हो काही सामान उचलायला लागणार!
अदिती(ताई अवखळकर दुर्बिटणे)
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
5 Mar 2009 - 2:49 pm | छोटा डॉन
राजे, लै भारी धागा चालु केला आहे.
हा लेख धमाल ( मुलगा नव्हे ) जमला आहे, एक मोठ्ठी प्रतिक्रिया ( नेहमीप्रमाणेच ) द्यायची आहे पण व्यवस्थीत वेळ मिळेना ...
तुर्तास एवढेच ...
ही जागा प्रतिसादासाठी राखुन ठेवत आहे.
तोवर चालु द्यात ...!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
5 Mar 2009 - 12:09 pm | शेखर
माझा पार्ट का कापला?
ते फळ तुलाच खायला घालतो बघ ;)
शेखर
6 Mar 2009 - 3:10 pm | सँडी
>>माझा पार्ट का कापला?
शेखरराव काळजी घ्या हो! ;)
- सँडी
झगड्या रामोशी
5 Mar 2009 - 12:09 pm | अवलिया
हम्म... लेका भलताच अभ्यास दांडगा आहे तुझा...
संकेतस्थळांचे ऐतिहासिक दस्तावेज बरेच दिसताहेत तुझ्याकडे... लेखनिक होतास काय कधी काळी इतिहासाचार्यांकडे? :?
--अवलिया
5 Mar 2009 - 12:26 pm | दशानन
:D
पुढे पुढे पाहत रहा... ;)
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
5 Mar 2009 - 12:11 pm | मिंटी
=)) =)) =)) =))
लै भारी राजे !!!!!!
लगे रहो....!
जाता जाता : अमितकडे क्रेडीट कार्ड नाही ;)
5 Mar 2009 - 12:13 pm | सुक्या
लय भारी राजे . . लगे रहो. ते आश्रम बांधुन झाला की कळवा . . म्या पन आलोच.
:B
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
5 Mar 2009 - 1:20 pm | टारझन
राजे हिमालयात घेऊन चाललेत .. चंद्रावर नाही =))
-ओल्या (बाभळीचा फोक)
आम्ही आमंत्रणाशिवाय कुठेही जात णाही
5 Mar 2009 - 2:30 pm | सुक्या
चंद्रावर जायचे मार्ग आश्रमातुनच तर सुरु होतात. पोलिसाचं भ्या पण नाय. मांडी ठोकुन दमदार झुरका मारायचा एक .. डायरेक्ट चंद्रच. 8}
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
5 Mar 2009 - 12:40 pm | घाशीराम कोतवाल १.२
राजे मी पण येतोय कधि ऍन्ट्री करु बोला 8> 8> 8>
सध्या लोकल ट्रेन सारखा लटकत आहे बसला
मग कधी वो का आमास्नी जागा न्हाय तिकड !!! :''( :? :/
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
5 Mar 2009 - 12:44 pm | दशानन
तु बी येणार हायई दम घे जरा.. वाईच...
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
5 Mar 2009 - 12:13 pm | अमोल खरे
=)) राजे फुल फॉर्मात.........मस्तच लेख आहे.
5 Mar 2009 - 12:18 pm | परिकथेतील राजकुमार
हिमालया सारखा परीसर, वेळोवेळी येणारे जंगलाचे वर्णन पण येव्हडे असुन सुद्धा एकाही लेखात 'दाही दिशांनी वाहणार्या वार्याचा' उल्लेख का नाही ? आम्ही राजेंच्या ह्या 'दुटप्पी' प्रवृत्तीचा जाहिर निषेध करतो !!
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
5 Mar 2009 - 12:25 pm | दशानन
नाही यार.. सगळ्यांची एकदा इंन्ट्री होऊ दे मग.. धमाल करु.. काही प्लान नाही आहे.. जे सुचत आहे तेच लिहीत आहे
:)
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
5 Mar 2009 - 12:21 pm | अवलिया
का रे राजा... हिमालयात असुन वेष पालटुन येणारे यक्ष दिसत नाहीत तुझ्या कथेत...
--अवलिया
5 Mar 2009 - 4:15 pm | दशानन
दिसतील दिसतील... त्यांचे बोळे निघू देत.. मग घेतो त्यांना....
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
5 Mar 2009 - 12:28 pm | निखिल देशपांडे
देशपांडे काका तुंबाकु चोळत म्हणाले.
चालु दे मित्रा..... लै भारी लिवलस......
5 Mar 2009 - 12:30 pm | टारझन
=)) =)) =))
5 Mar 2009 - 12:58 pm | विनायक प्रभू
रोल माझ्या प्रतिमेला शोभत नाही.
5 Mar 2009 - 1:13 pm | दशानन
जरा ओळख करुन देत आहे.. मग क्रिप्टीक टाकतो तुमचं =))
* अहो मी कही मोठा लेखक नाही आहे.. उगाच काय तरी टिपी करायची म्हनून चालू आहे ;)
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
5 Mar 2009 - 1:21 pm | टारझन
मास्तर ... हिमालयाच्या थंडी गारठ्यात तुमचा रोल अंमळ बठरून गेला असावा
=)) =)) =))
5 Mar 2009 - 1:30 pm | विनायक प्रभू
कुठे आहात हो डॉन राव. जरा तुमचा स्वेटर चा स्टॉक ढीला करा. माझा रोल गरम होईल.
5 Mar 2009 - 1:15 pm | सहज
भारी आहे!
:-)
5 Mar 2009 - 1:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त चालू आहे ! हिमालयात खोदकाम केले तर लेखनासाठी आणखीही मंडळी सापडतील !!!
5 Mar 2009 - 2:01 pm | दशानन
कचा माल दिल्याबद्दल आश्रमवासी आपले धन्यवाद करत आहेत.. एवढ्या शुभेछा आल्या आहेत की विदा लोड पडल्यामुळे मी येथे देत नाही आहे सर्व ;)
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
5 Mar 2009 - 2:19 pm | मृगनयनी
अय्या, मिंटे तुझ्या ड्रेसचा रंग एकदम ह्या वातावरणाशी मॅच होतो आहे नै - नयनी ने डोळे मिचकावत मिंटीला विचारले.
अगं, मी तर मुद्दाम घेतला हा ड्रेस, अमितेच क्रिडिट कार्ड पडले होते माझ्याकडे तो विसरला होता - हिहिहि हसत मिंटी म्हणाली.
तरीच मी म्हणत होतो, हिशोब का लागत नाही आहे माझा, आन बँग बघू करत एकदा बॅलन्सशीट चेक करतो - अमित डोकं खाजवत म्हणाला.
=)) =))
मिन्टीने मोठ्या विश्वासाने मला सांगितलेले शिक्रेट तुमी वोपनलं राजे!
;)
आदितीताई अवखळकर पाटीलांचा विजय असो विजय असो - डोन्या चिरक्या आवाजात वरडला, पण कुणाचीच साथ लाभली नाही हे पाहून यमीने आपली बँग+ दुर्बीन+ काही पुस्तकांचा संच + लिनिक्सवाला लॅपोटॉपो+ इतर सामान (अंदाजे २ टन) डॉन्याकडे फेकले. पण भार न पेलवल्यामुळे डॉन्या चारीमुंड्याचीत. लगेच मी, नाना, टार्या त्याच्या मदतीला गेलो तेव्हा कुठे तो उभा राहीला.
ह ल क ट - डॉन्या स्पष्टपणे काहीतरी असेच पुटपुटला. पण अदिती आपली जिमची पावती सापडते का ती शोधत होती त्यामुळे तीच्या ते लक्ष्यात आलं नाही, त्यामुळे डॉन्या वाचला, महाजालावर लिहणे व समोरसमोर बोलणे ह्यातला फरक त्याला कळाला नसावा.
अरे बस येवढंच सामान - डॉन्या हसत म्हणाला, व आपले कपडे झाडू लागला.
दुखः पण कसे हसावे हे ह्याच्या कडे शिकावे - खिखिखि हसत..
=)) =)) =)) =)) =))
राजे..... तुम्ही पक्षांतर्गत कलह निर्माण करताय!!!!!!
माझ्या माहितीप्रमाणे ( फोटो त पाहिल्यानुसार) डौन्या राव... इतकेही तकलादू नसावेत!!!
धम्याने डॉन्याच्या पाठीत रप्पाटा मारला व कुणाला तरी मारलाच आज ह्या आनंदात शिटी वाजवत पुढे निघाला. =)) =)) =))
अग्गाआईए ग्ग!...... "धम्या" ऑलरेडी इन्ज्युअर्ड आहे हो......
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं, जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. - विजुभाऊ काही तरी पुटपुटु लागले.
समोरच नदी आहे, व त्याच्या जवळच पर्वत जा तिकडे - कुचकट पणे कोणी तरि बोललं पण विजुभाऊ हिरवळ, नदी व पर्वतामध्ये गुंग होते, त्यामुळे काही रिएक्सन आली नाही.
=)) =)) =)) =))
ते 'कुणीतरी' बहुधा "शेखर"किन्वा 'आर्या' असावे! ;)
कारे मंद , तुला नाही आवडले मी आलेली, - स्पृहा हसत म्हणाली.
मंद म्हणालीस, माझ्या समोरच म्हण, त्या नयनी व मिंटे समोर नको, माझे आई - मी जवळ जवळ साष्टांग नमस्कार घालत म्हणालो.
=)) =)) =)) =)) = )) =)) =))
का वो मन्द मोर.... आम्ही काय डिन्डोरा पिटवणार होतो का?
:-?
___________________________
लय भारी!... राजे..... अजून येऊ देत... मागच्याच्या मागच्या --दारं खिडक्या पुर्णे पणे बन्द केलेल्या सुगंधी बसमध्ये काय घडले... ते वाचण्यासाठी मी उस्स्स्सुक आहे! ;)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
5 Mar 2009 - 2:35 pm | शेखर
>>ते 'कुणीतरी' बहुधा "शेखर"किन्वा 'आर्या' असावे!
एवढे कमी कु़जकट मी णाही बोलत. माझे कु़जकट बोलण टार्याच्या शेंगदाण्याच्या पेक्षा जास्त खवाट असते. ;)
शेखर
5 Mar 2009 - 2:39 pm | मिंटी
अग्गाआईए ग्ग!...... "धम्या" ऑलरेडी इन्ज्युअर्ड आहे हो......
:( हम्म...... पण जास्त लागलेलं नाहीये असं म्हणत होता......
ते 'कुणीतरी' बहुधा "शेखर"किन्वा 'आर्या' असावे!
नयने नयने अगं अशी सिक्रेट का ओपन करतीयेस ? ;)
का वो मन्द मोर.... आम्ही काय डिन्डोरा पिटवणार होतो का?
=)) =)) =)) =))
5 Mar 2009 - 5:06 pm | ब्रिटिश टिंग्या
चालु द्यात!
वाचतो आहे! ;)
सग'ळ्यांना नेणार का हिमालयात :?
5 Mar 2009 - 5:09 pm | दशानन
हो सगळ्याना पण घेऊन जाऊच म्हणतो आहे... ;)
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
5 Mar 2009 - 6:06 pm | टारझन
सग'ळ्यांना नेलं तर ९०% पब्लिक नाही येणार राजे , लिहून देतो , ते हिमालय क्रॉस करून नेपाळ मधे जातील ..
तिकडे चांगल्या विषिश्ट सुविधा मिळतात असे ऐकून आहे,
5 Mar 2009 - 6:37 pm | शितल
राजे,
लै भारी लिहिले आहे! :)
5 Mar 2009 - 8:30 pm | खडूस
एक नवीन अनोळखी व्यक्ती म्हणून
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
5 Mar 2009 - 9:31 pm | देवदत्त
चांगले चालले आहे :)
तिकडेही मिपा कट्टा का? ;)
9 Mar 2009 - 4:00 pm | अनिल हटेला
हिमालय एक्सप्रेस !! ;-)
जमलाये हा भाग पण !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..