जरी अज्ञात देशाचा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
25 Oct 2017 - 11:22 am

जरी अज्ञात देशाचा
किनारा गाठला होता
तरी वारा शिडामधला
जरा खंतावला होता

दूरवरचे दिवे तिथले
झळाळून पेटले होते
तरी अंधार हटवादी
जरा रेंगाळला होता

वितळत्या चंद्रबिंबाने
दशदिशा भारल्या होत्या
तरी त्या चांदरातीचा
कवडसा गोठला होता

माझी कविताकविता

प्रतिक्रिया

वा! खूप छान आहे कविता. पण किमान दोन कडवी अजून असायला हवी होती. कवितेचा अर्थ पूर्णांशाने पोचत नाही किंवा कविता अपूर्ण वाटतेय असे जाणवले.

'दिवे तिथले' मध्ये 'दिवे तेथले' असा बदल करून पाहा. गेयता वाढेल.

अनन्त्_यात्री's picture

25 Oct 2017 - 1:35 pm | अनन्त्_यात्री

...प्रतिसादांबद्दल व सूचनांबद्दल आभार !
जीवनातल्या अपूर्णतेबद्दलच ही कविता लिहिली असल्याने ती अपुरी वाटत असतानाच थांबलोय.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Oct 2017 - 10:44 pm | अत्रुप्त आत्मा

प्लस वन टू एस.

अजून एक. 'किनारा गाठला होता' ह्या गद्य भासणाऱ्या ओळीत 'गाठला किनारा होता' असे केले तर पद्यमय वाटेल.

सॉरी! न विचारताच आगंतुकपणे सल्ले देतोय. :-)

अनुपम's picture

26 Oct 2017 - 11:17 am | अनुपम

व्वा!

मदनबाण's picture

27 Oct 2017 - 11:50 pm | मदनबाण

सुंदर !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Haye Ni Haye Nakhra Tera Ni, High Rated Gabru Nu Maare... ;) :- High Rated Gabru Official Song

अनन्त्_यात्री's picture

30 Oct 2017 - 10:19 am | अनन्त्_यात्री

...प्रतिसादांबद्दल आभार !

सत्यजित...'s picture

1 Nov 2017 - 12:54 am | सत्यजित...

अतिशय सुंदर कविता!आपल्या सर्वाधीक आवडलेल्या कवितांपैकी एक!
मोहाच्या प्रवाहात,अगदी योग्य ठिकाणी 'गोठलेली' कविता!!

अनन्त्_यात्री's picture

1 Nov 2017 - 8:48 am | अनन्त्_यात्री

मर्मग्राही प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !