Making of foto and status : १. गंप्या आणि झंप्या

सचिन काळे's picture
सचिन काळे in जनातलं, मनातलं
8 Oct 2017 - 8:59 am

प्रस्तावना :
तीन वर्षांपूर्वी आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर पूर्ण शंभर दिवस मी एक मालिका चालवली होती. मी रोज माझ्या प्रोफाइल फोटोमध्ये एक फोटो डकवत असे, आणि स्टेटसमध्ये त्या फोटोसंबंधी काही चविष्ट लिहीत असे.

प्रोफाइल फोटो मी कुठूनही मिळेल तिथून घेत असे. काही फोटो आंतरजालावरून घेई, तर काही मी स्वतः काढलेले असत. तसेच काही स्वतःचे, कुटुंबाचे आणि मित्रांचे असत. फोटोबाबत असा काही विधिनिषेध नव्हता. बस! फोटो मनात कुठेतरी क्लिक व्हायला हवा. मग मी तो माझ्या संग्रहात ठेवायचो आणि रोज एक फोटो घेऊन पाऊण तासाच्या माझ्या लोकल प्रवासात त्यावर स्टेटस लिहायचो.

स्टेटस लिहिण्याकरिता फक्त एकशेचाळीस इंग्रजी अक्षरांची मर्यादा होती. अर्थात मराठी करिता त्याहून कमी. कारण इंग्रजीतील दोन ते तीन अक्षरांची जागा फक्त एक मराठी अक्षर घेते हे आपणांस माहीतच आहे. मी स्टेटस लिहिताना १४० अक्षरं बसतील एवढाच गाळा दिसायचा, पुढे लिहिताच येत नव्हते. त्यामुळे स्टेटस कधी फार मोठं व्हायचं, तेव्हा काही शब्द गाळावे लागायचे. त्याने वाक्याचा अर्थ बदलून जायचा. मनासारखं व्हायचं नाही. मग पुन्हा लिहिणे आले. तसेच, इतर वेळी लेख वगैरे लिहिताना आपण कॉमा आणि प्रश्न चिन्ह वगैरेंचा मुक्तहस्ते वापर करत असतो. पण १४० अक्षरांच्या जागेमध्ये स्टेटस बसवताना कधी कधी अक्षरशः एखादा कॉमा किंवा प्रश्नचिन्ह टाकण्याची गरज असायची. पण जागाच शिल्लक उरलेली नसायची. आणि नाही टाकला तर स्टेटसच्या अर्थाचा अनर्थ व्हायची शक्यता निर्माण व्हायची.

प्रोफाइल फोटो आणि स्टेटस टाकण्याकरिता वर्तमानपत्रवाले पाळतात तशी मी डेडलाईन पाळायचो. रोज बरोबर सकाळी सात वाजता मी ते प्रसिद्ध करायचो. वेळ पाळण्याकरिता मी दोन चार फोटो आणि स्टेटस ऍडव्हान्समध्ये तयार करून ठेवत असे. अशा पद्धतीने मी विनाखंड शंभर दिवस ती मालिका चालवली होती. लोकांनाही ते फोटो पहायची आणि स्टेटस वाचायची एव्हढी सवय झाली होती, की ते माझी फोटो आणि स्टेटस टाकण्याची वाट पहात असत.

नमनाला घडाभर तेल वाहून झालेय. आता मूळ मुद्द्यावर येतो. हिंदी सिनेमावाले आपला सिनेमा प्रदर्शित करताना एक छोटीशी फिल्मही बनवतात. ते त्यात तो मूळ सिनेमा बनवतानाची संपूर्ण प्रक्रिया दाखवतात. उदा. Making of chennai express किंवा Making of bahubali वगैरे. काही दिवसांपूर्वी माझे फोटो आणि स्टेटस मी पुन्हा पहात असताना माझ्या मनात विचार आला, की त्याच धर्तीवर माझ्या काही निवडक २० फोटो आणि स्टेटसवर Making of foto and status लिहून पाहिलं तर कसं वाटेल!!? अर्थातच मराठीतून. आणि एक नवीन प्रयोगही केल्यासारखे होईल.

तर त्याला अनुसरून मी आजपासून ह्या मालिकेला सुरवात करत आहे. या प्रयोगाला मात्र वेळेचे बंधन नसेल. जसजसे माझे लिखाण पूर्ण होईल तसतसे मी ते प्रसिद्ध करेन. तसेच आपल्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरूनसुद्धा २० Making of foto and status ची मालिका पूर्ण करायची की नाही हे अवलंबून असेल. काही चुकभुल झाल्यास आपण सांभाळून घ्यालच याची खात्री आहेच. तरी कुठल्याही क्षणी आपणांस कंटाळा आला तर मला फक्त एक hint द्या. मी ते प्रसिद्ध करायचं थांबवेन.

तर ह्या मालिकेतलं पहिलं पुष्प मी खाली देत आहे. आपणांस आवडल्यास नक्की सांगा. आणि न आवडल्यास तेही कळवा हं!!!!


गंप्या : हे सर्व आपल्याकडे एवढे घुरून घुरून का बघतायत रे ?
झंप्या : अरे, आपल्या चेहर्यात ते त्यांचा पुर्वज शोधतायत. खी:, खी:, खी:, खी:,

Making of foto and status :
हा फोटो मला आंतरजालावर मिळाला. ह्या फोटोने माझे लक्ष वेधून घेण्याचे कारण म्हणजे कलाकाराने त्यात साधलेली भडक रंगसंगती! लालजर्द माकडं, हिरवंगार झाड आणि पार्श्वभूमीला असलेला गडद पिवळा रंग! बरं ही दोन माकडं इतर सर्वजण सर्वसाधारणपणे रेखाटतात त्यापेक्षा फारच वेगळी आणि cute दिसताहेत. पहा ना! त्यांच्या शरीराचा दिसणारा एकंदर गोल गरगरीतपणा, त्यांच्या डोक्यावरचे उभे राहीलेले छोटुकले केस, त्यांचं चमकणारं डोकं, त्यांची उघडी तोंडे आणि त्यातून दिसणारे त्यांचे शुभ्र दात, त्यांची छोटी छोटी आणि गोल गोल पोटं! तसंच त्यांची छोटुकली उंची पहा, जशी लहान बाळंच जणू!! ह्या फोटोने मला स्टेटस लिहिण्याकरीता लगेच मोहात पाडलं.

मी विचार करू लागलो की काय लिहिता येईल बरं!! आणि तेव्हढ्यात मला त्या दोन माकडांच्या चेहऱ्यावरचे मिश्किल भाव दिसले. मला असं जाणवलं की उजवीकडचा माकड समोर पाहून टिंगल केल्यासारखं काही तरी सांगतोय आणि ते ऐकून डावीकडील माकड खदाखदा हसतोय.

बस्! मी त्यांच्या बोलण्यावरच स्टेटस लिहायचं ठरवलं. माकडांच्या जीवनाशी, त्यांच्या आयुष्याशी संबंधित बरेच लिहिता आले असते. पण मला असे लिहायचे होते, की त्यात मानव आणि माकड या दोघांचा संदर्भ यायला हवा होता. आणि मला पट्कन आठवलं. आपण पूर्वीपासूनच शाळेत शिकत आलोय की माकड हे मानवाचे पूर्वज होते. मग मी कल्पना केली की काही माणसं अभयारण्यात प्राण्यांचे निरीक्षण करायला आलेत. आणि फिरताना त्यांना झाडावर नेमकी हीच दोन माकडं दिसतात. त्याचवेळी ती माकडंही त्या माणसांकडे पहात असतात. त्या दोन माकडांची नांवेही मी काय ठेवलीयत पहा! गंप्या आणि झंप्या!! तर, त्यातले एक माकड मानवांना पाहून दुसऱ्या माकडाला विचारते, गंप्या : हे सर्व आपल्याकडे एवढे घुरून घुरून का बघतायत रे ! झंप्या : अरे, आपल्या चेहर्यात ते त्यांचा पुर्वज शोधतायत. खी:, खी:, खी:, खी:,
हा! हा!! हा!!!

--- सचिन काळे.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

मौजमजामाध्यमवेध

प्रतिक्रिया

आवडाबाई's picture

8 Oct 2017 - 11:14 am | आवडाबाई

फोटो : ७/१०
स्टेटस: ०/१० ( घुरून घुरून ? रिअली? )

सॉरी !!

सतिश गावडे's picture

8 Oct 2017 - 11:33 am | सतिश गावडे

अतिशय बाळबोध. घुरुन घुरुन हे तर घुर घुरकेचं हिंदी सारख्या शब्दप्रयोगाचे बळेच केलेलं मराठी रूपांतर आहे.

सचिन काळे's picture

8 Oct 2017 - 11:56 am | सचिन काळे

@ आवडाबाई, प्रतिसादाकरिता आभार. दहा पैकी मार्क द्यायची कल्पना आवडली. माझी मेकिंगचे मार्कसुद्धा पहायची इच्छा होती.

@ सतीश गावडे, अतिशय बाळबोध.

घुरुन घुरुन हे तर घुर घुरकेचं हिंदी सारख्या शब्दप्रयोगाचे बळेच केलेलं मराठी रूपांतर आहे.

>>> बरोबर ओळखलंत. माझं बाळ (मुलगी) आज पंचवीस वर्षाची आहे. त्यांची पिढी असंच हिंदी मिश्रित मराठी बोलते. तेच मी स्टेट्समध्ये वापरलं.

सतिश म्हेत्रे's picture

8 Oct 2017 - 12:41 pm | सतिश म्हेत्रे

हिंदी मिश्रित मराठी? इंग्रजी मिश्रित मराठी म्हणाल तर ठीक आहे. पण हिंदी मिश्रित मराठी फक्त मुंबईत बोलत असतील इतर महाराष्ट्रात नाही (रच्याकने मी पण 20 वर्षां चा आहे. पण मी शुद्ध मराठी (कोल्हापूरी पद्धतीने हिंदी ची भेसळ न करता) बोलतो )

सचिन काळे's picture

8 Oct 2017 - 12:07 pm | सचिन काळे

आणि मलाही रोखून पाहताहेत किंवा टक लावून पाहताहेत ह्यापेक्षा घुरून घुरून पाहताहेत हा शब्द झकास वाटला. मजा वाटली लिहिताना.

सतिश गावडे's picture

8 Oct 2017 - 12:14 pm | सतिश गावडे

तुम्ही स्वतःच स्वतःचे कौतुक करून घ्यायचे ठरवले आहे त्यामुळे अधिक काही न लिहीणे हे उत्तम. :)

चारण्याची कोंबडी, रूपायाचा मसाला.
काहीही लिहायचे अन स्वतः:च कौतुक करायचे, करवून घ्यायचे दिवस आलेत फेसबुकमुळे. भोगा.

सतिश म्हेत्रे's picture

8 Oct 2017 - 12:35 pm | सतिश म्हेत्रे

'चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला' असे आहे ते.

Ranapratap's picture

8 Oct 2017 - 12:24 pm | Ranapratap

मालिका पूर्ण करा

अभिजीत अवलिया's picture

8 Oct 2017 - 12:47 pm | अभिजीत अवलिया

ह्या फोटोने माझे लक्ष वेधून घेण्याचे कारण म्हणजे कलाकाराने त्यात साधलेली भडक रंगसंगती! लालजर्द माकडं, हिरवंगार झाड आणि पार्श्वभूमीला असलेला गडद पिवळा रंग

हा फोटोच इतका टुकार आणि फोटोशॉप्ड आहे की त्याच्यावर आधारित स्टेट्स ठेवला जाऊ शकतो ह्याबद्दल कौतुक करतो.
बाय द वे, झाड हिरवेगार आहे असे वाटत नाही.

सचिन काळे's picture

8 Oct 2017 - 1:04 pm | सचिन काळे

@ अभिजित, धन्यवाद!!

झाड हिरवेगार आहे असे वाटत नाही.

>>> अगदी खरंय!!! मी लिहिण्याच्या flow मध्ये लिहून गेलो. माफी असावी.

नेत्रेश's picture

8 Oct 2017 - 1:33 pm | नेत्रेश

काळेभाउ, आपल्याला तुमचा प्रयोग आवडला.
तुम्ही इतरांकडे जास्त लक्ष देउनका व लिहीत रहा.
पुढच्या भागाला शुभेच्छा!

पद्मावति's picture

8 Oct 2017 - 2:10 pm | पद्मावति

प्रयोग आवडला. पु.भा.प्र.

सचिन काळे's picture

8 Oct 2017 - 2:18 pm | सचिन काळे

@ नेत्रेश, पद्मावती आपले आभार!!

संग्राम's picture

8 Oct 2017 - 3:05 pm | संग्राम

पु ले शु

संजय पाटिल's picture

8 Oct 2017 - 3:38 pm | संजय पाटिल

एकाच फोटो वरून परिक्षण लिहायला नको... एवूदेत अजून..

Rahul D's picture

10 Oct 2017 - 12:14 am | Rahul D

पुलेशु

सचिन काळे's picture

10 Oct 2017 - 4:59 am | सचिन काळे

@ Rahul D, धन्यवाद!

सचिन काळे's picture

8 Oct 2017 - 3:44 pm | सचिन काळे

@ संग्राम, धन्यवाद!!

@ संजय पाटिल, एकाच फोटो वरून परिक्षण लिहायला नको... एवूदेत अजून.. >>> धन्यवाद!!!

सरनौबत's picture

8 Oct 2017 - 7:14 pm | सरनौबत

असं स्वतःला चॅलेंज घेऊन १०० दिवस रोज स्टेटस टाकणं अवघड आहे. पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे. येऊ देत

सचिन काळे's picture

8 Oct 2017 - 8:04 pm | सचिन काळे

@ सरनौबत, आपण देत असलेल्या प्रोत्साहनाकरिता धन्यवाद!!

सुमीत भातखंडे's picture

9 Oct 2017 - 11:08 am | सुमीत भातखंडे

प्रयोग इंटरेस्टीइंग वाटतोय, पण खरी छायाचित्र हवीत. असली फोटोशॉप्ड नकोत.
पुभाप्र.

दीपक११७७'s picture

9 Oct 2017 - 4:08 pm | दीपक११७७

अगदी मला पण हेच वाटलं

फोटो Natural हवाय तरचं काही मजा येईल

सचिन काळे's picture

9 Oct 2017 - 4:57 pm | सचिन काळे

OK! पुढचा natural टाकतो. पाहून प्रतिसाद द्या बरं का!!!!

सचिन काळे's picture

9 Oct 2017 - 11:46 am | सचिन काळे

@ सुमीत भातखंडे, धन्यवाद!

खरी छायाचित्र हवीत. असली फोटोशॉप्ड नकोत. >>> मला वाटते असे केल्याने आपल्या फोटो निवडीवर मर्यादा येईल.

सुचिता१'s picture

9 Oct 2017 - 2:14 pm | सुचिता१

स्टेटस वाचायला। निश्चीतच आवडेल. पण फोटोची एवढी चिकी त्सा कंटाळवाणी वाटली.
घुरुन हा शब्द खुप च खटकला़ .

सचिन काळे's picture

9 Oct 2017 - 3:11 pm | सचिन काळे

@ सुचिता१, पण फोटोची एवढी चिकी त्सा कंटाळवाणी वाटली. >>> मी त्या दोन आकर्षक आणि गोंडस माकडांच्या एवढा प्रेमात पडलो होतो, की उत्स्फूर्तपणे मी त्यांचे वर्णन केलेय. वर्णन वाचून माझ्या नजरेनेही काहींनी त्यांच्याकडे पुन्हा नक्कीच पाहिले असेल.

असो, नोंद घेतली आहे. प्रतिसादाकरिता धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Oct 2017 - 5:47 pm | अत्रुप्त आत्मा

वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा... !
कित्ती कित्ती ते भन् नाट लेखन, प्रतिभा संपन्न मांडणी, स्फूर्तीदायक आशय, नाwinयपूर्ण विषय..! तुम्ही तर महाराष्ट्राचे अव्वल लेखक.. तुमची लेखणी चालो टकाटक.. शब्द असेच बाहेर येवोत बकाबक!
आपलाच:~
आत्मुपकापक.
(अध्यक्ष)
फेस'बुक्की नवलेखक संघ

अभ्या..'s picture

9 Oct 2017 - 5:56 pm | अभ्या..

वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा.. वाहुव्वा... !
कित्ती कित्ती जब्बरदस्त प्रतिसाद. असेच प्रतिसाद देत राहा. सर्वांनाच प्रोत्साहन देत राहा.
आपलाच:~
अभ्याझकपक
(अध्यक्ष)
अखिल मिपा लेखनफेस नवप्रतिसादक संघ

सचिन काळे's picture

9 Oct 2017 - 5:59 pm | सचिन काळे

:स्मित:

पुढील भाग उद्या रविवारी सकाळी ९ वाजता टाकतोय. आपणां सर्वांस आग्रहाचे निमंत्रण आहे. पाहण्या आणि वाचण्यासाठी नक्की या. आणि आपली प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका बरं का!!! :स्मित:

मनिमौ's picture

14 Oct 2017 - 9:40 pm | मनिमौ

प्रयत्न. चांगला आहे. पुढचे फोटो आणी स्टेटस वाचायची उत्सुकता आहे. पण हा फोटो मात्र फारसा आवडला नाही. तुम्ही स्वता काढलेले फोटो असते तर अजून मजा आली असती

सचिन काळे's picture

14 Oct 2017 - 11:14 pm | सचिन काळे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद, मनिमौ!

मी इथे स्पष्ट करू इच्छितो, की वर सांगितल्याप्रमाणे साधारण तीन वर्षांपूर्वी निवडलेल्या फोटोवर मी स्टेटस लिहिले आहेत. आता मी पुन्हा त्यांच्यावर नव्याने फक्त मेकिंग लिहून प्रसिद्ध करीत आहे. त्यामुळे तेव्हा निवडलेले फोटो आता बदलणे शक्य नाही. तरी मी स्वतः काढलेले काही फोटो पुढच्या काही भागात येणार आहेत.