याआधीचे भाग येथे वाचता येतील :
काही प्रसिद्ध / अल्प-प्रसिद्ध नेपाळी व्यक्तिमत्वांबद्दल थोडक्यात : -
अंतिम नेपाळ नरेश - राजे ज्ञानेंद्र
“स्वस्ति श्री गिरीराज चक्रचूडामणी नारायणेत्यादि विविध विरुदावली विराजमान
मनोन्नत
महेंद्रमाला
बिरेन्द्रमाला
परम-नेपाल-प्रताप-भास्कर
परम-ओजस्वी-राजन्य
परम-गौराबमया-तेजस्वी-त्रिभुवना-प्रजातंत्र-श्रीपाद
परम-उज्ज्वला-किर्तीमया-नेपाल-श्रीपाद
परम-प्रोज्ज्वला-नेपाल-तारा
परम-पवित्र-ओम-राम-पट्ट
परम-महा-गौराबमया- सुप्रदिप्ता-बिरेंद्र-प्रजातंत्र-भास्कर
परम-ज्योतिर्मय-सुबिख्याता-त्रिशक्ती पट्ट
परम सुप्रसिद्ध प्रबल गोरख दक्षिण बाहू
परमाधीपती अतिरथी
परम सेनाधिपती
श्री
श्री
श्री
श्री
श्री
श्रीमान महाराजाधीराजा ग्यानेंद्र बीर बिक्रम शाह देव
जंगबहादूर शाह
बहादूर शमशेरजंग
देवानां सदा समरविजयीनाम
नेपाल नरेश”
अशी प्रचंड मोठी बिरुदावली मिरवणारे राजे ग्यानेंद्र हे एक असामान्य प्रारब्ध घेवून जन्माला आलेले व्यक्तिमत्व आहे यात कोणालाही शंका राहू नये इतक्या विचित्र आणि योगायोगाच्या घटना त्यांच्या आयुष्यात घटल्या आहेत. ज्ञानेंद्र ह्यांचा जन्म ७ जुलै७१९४७ चा. राजा त्रिभुवन यांच्या या द्वितीय नातवाचा जन्म झाल्याझाल्या दरबाराच्या नियमाप्रमाणे तत्कालीन राणा पंतप्रधान मोहन शमशेर जंगबहादूर राणा यांच्या उपस्थितीत राजकुमाराची कुंडली बनवण्यात आली. त्यात म्हणे ह्या नवजात बाळापासून पिता आणि आजोबा यांना धोका आणि मृत्युयोग असल्यामुळे पाच वर्षे ह्या पुत्राचे मुखदर्शन करू नये असा सल्ला राजज्योतिष्यांनी दिला आणि एक महिन्याचे असताना त्यांची रवानगी काठमांडूच्या बाहेर त्यांच्या आजोळी झाली. आजीनी प्रेमपूर्वक सांभाळ केला खरा पण आपण राजकुलोत्पन्न असून पितृप्रेमापासून वंचित राहिलो ही खंत त्यांना कायम राहिली ती राहिलीच. पुढे जेव्हा राजे त्रिभुवन राणांच्या नजरकैदेतून निसटून भारतात गेले तेंव्हा त्यांनी राजगादीचे सर्व वंशज सोबत नेले होते. घाईघाईत हाच एक राजकुमार ग्यानेंद्र (वय वर्षे तीन) चुकून मागे राहिला आणि त्याला औटघटकेचे 'नेपाळ नरेशपद' मिळाले.
मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल काही प्रवाद लोकांत असतातच. ज्ञानेंद्र सुद्धा अपवाद कसे असतील? काहीसा रागीट, हट्टी आणि हेकेखोर स्वभाव, एकलकोंडेपणा, मग्रुरीकडे झुकणारा स्वाभिमान, देवावर आणि दैवावर नितांत श्रद्धा, व्यापारउदीमात विलक्षण गती, तीक्ष्ण बुद्धिमत्ता अश्या गुणांचा संगम ग्यानेन्द्रांच्या ठायी आहे हे त्यांचे शत्रू सुद्धा मान्य करतील. २००१ ते २००८ पर्यंत दुसऱ्यांदा नरेशपद भोगून, सर्वाधिक अलोकप्रिय नरेश ठरून अत्यंत अपमानास्पद परिस्थितीत त्यांना देश सोडावा लागला. निसर्गप्रेमी, संगीत मर्मज्ञ, संस्कृतचे विद्वान, शेली आणि किट्स सारख्या इंग्रजी कवींच्या कविता मुखोद्गत असलेले, उच्च अभिरुचीपूर्ण जीवनशैली जगणारे असे त्यांचे एकूण व्यक्तित्व. सध्या ते सहपरिवार सिंगापूरला स्थायिक झाले आहेत आणि जगभर प्रवास करीत आपले निवृत्त जीवन व्यतीत करताहेत.
* * *
तेनझिंग नोर्गे तथा शेर्पा तेनझिंग - २९ मे १९५३ रोजी सर एडमंड हिलरी सोबत माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला मानव. तेनझिंग नोर्गे हा टाईम नियतकालकाच्या २० व्या शतकावर सर्वाधिक प्रभाव पाडणाऱ्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवणारा पहिला नेपाळी. त्याचा एव्हरेस्ट मोहिमेमुळेच जगभरात आणि मुख्यत्वे आशियात हिमालयातील गिर्यारोहणाचे आकर्षण निर्माण झाले. शेर्पा लोकांमध्ये एवरेस्टचे शिखर मातेसारखे आदरणीय आणि परमपवित्र असल्यामुळे सर्वोच शिखर चढूनही तेनझिंग माथ्यावर पाय ठेऊ धजला नाही, एव्हरेस्टच्या सर्वोच्च बिंदूपर्यंत पोहोचणारा पहिला मानव म्हणून सर एडमंड हिलरी त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध पावले.
* * *
आदिकवी भानुभक्त आचार्य - १८१४ मध्ये एका छोट्या नेपाळी खेड्यात जन्मलेल्या भानुभक्तांनी संस्कृत भाषेवर लहान वयातच प्रभुत्व मिळवले आणि रामायणाचा संस्कृतमधून नेपाळी भाषेत अनुवाद केला. इतरही बरेच साहित्य-काव्य प्रसवणाऱ्या भानुभक्तांना नेपाळी लोकांनीं उस्फूर्तपणे 'आदिकवी' पदवी बहाल केलेली आहे.
* * *
अनुराधा गुरुंग कोईराला - कुंटणखान्यात लोटल्या गेलेल्या अनेक निष्पाप नेपाळी मुलीची ही आई. गेल्या ३० वर्षात जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकललेल्या जवळपास १२००० अल्पवयीन नेपाळी मुलींना त्या नरकातून सोडवून स्वतःच्या पायावर उभे करणारी ही माउली. त्यांची मैती नेपाल (मैती = माहेर) ही संस्था भारत आणि नेपाळ सरकार, सीमेवर असलेले दोन्ही बाजूचे पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांचा सहयोगाने नेपाळमध्ये प्रचंड प्रमाणांत होत असलेल्या लहान मुलींच्या खरेदी-विक्री व्यवहारावर लक्ष ठेवून निष्पाप मुलींना सोडवते, त्यांना त्यांच्या पालकांपर्यंत सुखरूप पोहचवते. ते शक्य नसेल तर त्यांच्या शिकण्याची आणि सक्षमीकरणाची काळजी घेते. मितभाषी कर्मयोगी असलेल्या अनुराधाजी २०१० च्या CNN Hero Of The Year ह्या पुरस्काराच्या मानकरी आहेत. २०१४ मध्ये मदर तेरेसांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
* * *
उदित नारायण - हिंदी चित्रपटासाठी पार्शवगायन करणारा उदित नारायण हा नेपाळी कलाकार गेली २५ वर्षे तो हिंदी चित्रपट सृष्टीत बऱ्यापैकी नाव, यश मिळवून आहे.त्याची नेपाळी भाषेतील गाणीही नेपाळमध्ये बरीच लोकप्रिय आहेत.
* * *
मनीषा कोईराला हे नेपाळी नावही हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्यापैकी यश मिळवून होते. कर्करोगाशी लढत देत सध्या काठमांडूला स्थायिक होऊन कोईराला कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे चालवण्यासाठी धडपडत आहे.
* * *
महाबीर पुन - हा पोखरा जिल्ह्याच्या अति दुर्गम भागातल्या निरक्षर गुराख्याचा मुलगा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने नेटाने शिक्षण पूर्ण केले. अमेरिकेत उच्चशिक्षण आणि काही काळ नोकरी केल्यावर स्वतःच्या गावात परतून शाळा स्थापन केली. समविचारी शिक्षित देशी-विदेशी मित्रांची, काही हौशी पर्यटकांची मदत घेऊन नेपाळच्या अति दुर्गम भागात कॉम्पुटर शिक्षण पोचवले. कोठल्याही सरकारी मदतीशिवाय तुटपुंज्या साधनांनी दुर्गम खेड्यांना वायरलेस तंत्राने जोडून संपर्क क्रांती करणारा महाबीर पुन हा अवलिया नेपाळी जनतेच्या गळ्यातील ताईत आहे. २००७ चे मॅगसेसे अवॉर्ड आणि अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान त्याला मिळाले आहेत. सध्या त्याच्या 'राष्ट्रीय अविष्कार केंद्रातर्फे' पर्यावरणपूरक विकासाचे मॉडेल तयार करण्याचे त्याचे काम जोरात सुरु आहे.
* * *
दिचेन लॅचमन - ही नेपाळकन्या सध्या ऑस्ट्रेलियात तेथील चित्रपटात दिग्दर्शिका-अभिनेत्री म्हणून धडपडत आहे. तिच्या फाड-फाड इंग्रजी-जर्मन-फ्रेंच बोलण्याचे तिच्या नेपाळी मित्रांना आणि चाहत्यांना कोण कौतुक आहे !
* * *
बांबू - स्कूल चा प्रणेता उत्तम संजेल. हा माणूस खरे तर सिनेमात हिरो किंवा दिग्दर्शक व्हायचा. तो मुंबईला नशीब काढायला आला. त्याने आपल्या अधिकारी बंधूंसाठी एक टी व्ही मालिका पण दिग्दर्शित केली पण एकूण काही जमले नाही म्हणून नेपाळला परत गेला. २००१ मध्ये त्याने काठमांडू शहराजवळ गरीब आणि अनाथ मुला-मुलींकरता पहिले बांबू स्कूल (खरेतर एक झोपडीत शाळा) सुरु केले. आज नेपाळच्या ४२ जिल्ह्यात बांबू-स्कूल आहेत आणि जवळपास ४०००० विद्यार्थ्यांना फक्त १०० नेपाळी रुपये दरमहा फीमध्ये बारावीपर्यंत उत्तम शिक्षण देत आहेत. माओवादी हिंसाचाराच्या दिवसात हजारोच्या संख्येत ग्रामीण माणसे बेघर झाली आणि काठमांडूजवळच्या तुलनेने सुरक्षित भागात स्थायिक झाली - ह्यात अनेक अनाथ आणि गरीब मुले होतीच. त्या मुलांना उत्तमच्या बांबूस्कूल ने आश्रय तर दिलाच पण जगण्याची, शिकून भविष्य घडवण्याची उमेदही दिली.
* * *
आनी छोन्ग डोल्मा - द सिंगिंग नन
तिबेटमधून निर्वासित होऊन नेपाळमध्ये नेपाळला आलेली ही मुलगी. दारुड्या बापाची मारहाण रोजचीच पण एक दिवस बापाने तिला शस्त्राने भोसकले आणि १३ वर्षांची ही मुलगी त्रासाला कंटाळून बौद्ध मठाच्या आश्रयाला गेली. दीक्षा घेऊन साध्वी झाली. तीक्ष्ण बुद्धी, गोड गळा आणि लाघवी स्वभाव अशी त्रिवेणी तिच्या व्यक्तिमत्वात जुळून आली आहे. एका अमेरिकन गिटारिस्टने तिचे तिबेटी-नेपाळी मंत्र प्रार्थना म्हणतांना रेकॉर्डिंग केले आणी जगाला एका लुप्त होत आलेल्या संगीताचा ठेवा नव्याने गवसला. तिच्या 'छो' आणी 'सेल्वा' ह्या दोन संग्रहांना जगभरातील संगीत मर्मज्ञानी पसंती दिली आहे. नेपाळी तरुण वर्गासाठी आनी छोन्ग डोल्मा म्हणजे द रॉकस्टार नन ऑफ नेपाल !
संदर्भ सूची :
माझे नेपाळबद्दलचे वाचन अनेक वर्षे सुरूच आहे, त्यामुळे संदर्भ ग्रंथाची सूची तयार करणे हे किचकट आणि वेळखाऊ काम आहे आणि मी ते निगुतीने केले नाही :-). पण काही उल्लेखनिय स्रोत खालील प्रमाणे:-
Referances (Not a complete list) :
01. A Collection of Treaties, Engagements and Sanads relating to India and Neighbouring Countries Vol. XII and XIV (1929 and 1931), Government of India by Aitchison, C.U.
02. K.C., Surendra, Diplomatic History of Nepal (in Vernacular-1989), Sabita Publication, Taplejung.
03. Boundary of Nepal (in Vernacular) by Shri. Buddhi Narayan Shreshtha
04. The Rana Resonance by Mr. C. K. Lal
05. Democratic Innovations in Nepal: A Case Study of Political Acculturation (1966) by Shri Bhuwan Lal Joshi and Mr. Leo E. Rose
06. The Challenge to Democracy in Nepal by T. Louise Brown
07. The history of Ancient & Medieval Nepal by Mr. D.B Shreshtha and Mr. C.B.Singh
08. The Rana Rulers of Nepal - By J. Michael Luhan
09 Hidden Tibet - History of Indipedence and Occupation by Sergius L. Kuzmin and Dimitry Bennett
10. Gurkhas: Nepalese warriors in World War I by Srinivas Mazumdaru
11. Antiquar Journal of Socio-Historical Research - Nepal Studies by Dr. Jagadish C. Regmi
12. Shree Panch Bada Maharajdhiraj Prithivi Narayan Shah ko Sanxipta Jiwani by Baburam Acharya
13. Nepal ko Ekikaran (in Nepali) by Manandhar Triratna
14. Nepal under Jang Bahadur, 1846-1877 by Prof. Krishna Kant Adhikari.
15. Nepal Almanac - Book of Facts by Shri. Yuba Raj Singh Karki
16. The Orders, Decorations and Medals of Royal Nepal by Col. Ishwari Prasad
17. A Chronicle of Rana Rule by Shri R. Rana Nepal
18. Some important marriages of the Royal Family and the Ranas by Kumar Bahadur Bhatta
19. History of Nepal As Told by Its Own by Bikrama Jit Hasrat
20. Nepal Under the Ranas by Col Adrian Sever
21. Aspects of Modern Nepal by Col Adrian Sever
22. Prithvinarayan Shah-Founder of Modern Nepal by Tulsi Ram Vaidya
23. Letters from Kathmandu: the Kot Massacre by Mr. Ludwig F. Stiller
24. Nepalko Sanchipta Parichaya by Shri. Baburam Acharya
25. Multiple Research Papers by Research Centre for Nepal and Asian Studies, Tribhuvan University Kathmandu
(नेपाळी भाषेत लिहिलेल्या पुस्तकांचे / संदर्भांचे तत्परतेने भाषांतर करून देणाऱ्या माझ्या मित्रमंडळाचे आभार मानावे इतके त्यांचे माझे संबंध औपचारिक नाहीत, म्हणून त्यांचा उल्लेख इथे करत नाही.)
ही लेखमाला लिहिण्याची सुरवात करतांना १-२ भाग प्रति देश असे मनात ठरवले होते, पण पहिला देश नेपाळ निवडला आणि थोडा वाहवत गेलो. नेपाळबद्दल अजून वाचायला आवडेल अश्या प्रतिक्रियांनी ही १-२ भागांची मर्यादा वाढत वाढत १०००० शब्दांपलीकडे कधी गेली ते मलाच समजले नाही. त्यात बहुतेक भागात 'थोडे अवांतर' ह्या शेपटीची भर ! लांबणीबद्दल क्षमस्व.
माझ्याकडे असलेले दुर्मिळ फोटो आणि नकाशे अनेक प्रयत्न करूनही शेवटपर्यंत योग्य प्रकारे प्रकाशित न करू शकल्याची खंत आहे. वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार .
समाप्त.
प्रतिक्रिया
26 Jun 2017 - 9:22 pm | राघवेंद्र
अनिंद्य , खूप सुंदर झाली ही लेखमाला.
बऱ्याच गोष्टी नवीन समजल्या.
पुढील लेखमालेसाठी शुभेच्छा !!!
3 Jul 2017 - 12:51 pm | अनिंद्य
@ राघवेंद्र,
आभार !
26 Jun 2017 - 9:28 pm | मुक्त विहारि
पण बहुतेक लेखमालांचे होते, तसेच ह्या लेखमालेचे पण होते की काय? असे वाटले (लेखमाला मध्येच मान टाकतात. आमच्या पण लेखमाला अशाच अर्धवट राहिल्या आहेत.)
पण तुम्ही चिकाटीने ही लेखमाला पूर्ण केल्या बद्दल धन्यवाद.
आता पुढील देशाच्या अपेक्षेत.
बादवे,
इथे (मिपावर) किती प्रतिसाद मिळाले? ह्यावरून लेखाची किंमत न करणेच उत्तम.
3 Jul 2017 - 1:13 pm | अनिंद्य
@ मुक्त विहारि (मुक्त विहारी लिहिण्याचा मोह होतो आहे),
आभार !
तुम्ही म्हणताय तसे लेखमाला अर्धवट राहण्याची भीती मलाही होती. काम / आळस / प्रवास / कंटाळा / मराठीत लिहिण्याचा पहिलाच अनुभव / पटकन न सुचणारे मराठी प्रतिशब्द अशी भरपूर कारणे हाताशी होती :-)
'इथे (मिपावर) किती प्रतिसाद मिळाले? ह्यावरून लेखाची किंमत न करणेच उत्तम.'
शेजाऱ्याचा डामाडुमा ही लेखमाला म्हणजे माझा मराठीत लिहिण्याचा पहिलाच प्रयोग आहे. वेगळा आणि काहीसा रटाळ वाटू शकणारा विषय असूनही बऱ्याच लोकांनी मालिका वाचली, लेखन आवडल्याचे सांगितले त्याचे समाधान आहे.
26 Jun 2017 - 11:14 pm | अमितदादा
लेख मालिका खरंच उत्तम होती, धन्यवाद.
लेखामध्ये पुष्पा दहल उर्फ प्रचंडा ह्या माओवाद्यांच्या महामेरू चा उल्लेख राहिला ... गेल्या अनेक वर्षांपासून नेपाळ मधील माओवादी चळवळीत महत्वाची भूमिका निभावणारा नेता , लोकशाही मध्ये सामील होऊन दोनदा पंतप्रधान होणारा नेता , कधी भारत वादी कधी चीन वादी भूमिका स्वीकारणारा नेता नेपाळ मध्ये नक्कीच प्रसिद्ध आहे .
इतर हि प्रसिद्ध नेते असतील, पण मला आठवणारे इतर नेते म्हणजे बाबूराम भट्टराई (भारत प्रेमी ) आणि केपी ओली (चीन प्रेमी ).
पुढील भागाच्या प्रतीक्षेत ..
3 Jul 2017 - 1:31 pm | अनिंद्य
@ अमितदादा
नेपाळमधील राजकारण्यांनी प्रचंड निराश केले आहे, त्यामुळे कोठल्याच 'नेत्या'बद्दल मी लिहिले नाही. कोईराला बंधूंचा उल्लेख हा त्यांच्या विक्रमामुळे आला आहे आणि राजे ज्ञानेंद्र (आता फक्त श्री ज्ञानेंद्र शाह) हे 'नेते' नक्कीच नाहीत, त्यामुळे त्यांचाही थोडा उल्लेख आहे.
वेळोवेळी प्रतिक्रिया देऊन तुम्ही उत्साह वाढवलात, आभारी आहे.
- अनिंद्य
27 Jun 2017 - 12:02 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर लेखमालिका. मालिकेच्या लांबीची काळजी करू नका. इतके छान लेखन शब्दसंखेने बंदिस्त करू नका.
मिपावर चांगल्या लेखाची वाचने खूप होतात, मात्र कधीकधी कमी प्रतिसाद येतात. तिकडे दुर्लक्ष करा. तुमचा लेखानाचा आनंद जास्त महत्वाचा. शिवाय, तुमचा एक खास वाचकवर्ग इथे निर्माण झाला आहे, हे पण महत्वाचे आहे.
वर अमितदादा यांनी म्हटल्याप्रमाणे प्रचंडचा अनुल्लेख जरासा खटकलाच. त्याच्या डाव्या विचारसरणीबद्दल ममत्व असले-नसले तरी, नेपाळच्या नजिकच्या परिवर्तनकाळात या माणसाच्या कार्किर्दीचा एक महत्वाचा अध्याय आहे, हे नाकारता येणार नाही. जर शक्य झाले तर, अजून एक लेख लिहून, ही कमी भरून काढावी अशी गळ घालत आहे.
3 Jul 2017 - 1:52 pm | अनिंद्य
@ डॉ सुहास म्हात्रे,
मला ही लेखमाला लिहितांना खूप आनंद मिळाला. मुख्य म्हणजे मराठीत लिहिता झालो, हेच विशेष. इथे मिळालेल्या प्रतिसादांबद्दलही समाधान आहे कारण विषय सर्वांना आवडेलच असा नव्हता, मला तर सर्वांना फार बोर होईल असे वाटले होते, तसे घडले नाही :-)
तुमच्या एका प्रतिक्रियेमुळे ऑटोमान साम्राज्याबद्दलचे केमाल कफादारचे पुस्तक पुन्हा मागवले, त्याबद्दल तर तुमचे खूप खूप आभार !
- अनिंद्य
3 Jul 2017 - 2:05 pm | अनिंद्य
प्रसिद्ध / अप्रसिद्ध नेपाळी व्यक्तिमत्त्वांच्या यादीतून राजकारणी लोक जाणीवपूर्वक बाहेर ठेवले आहेत. As it is, politicians hoard all the limelight, leaving little space for other contributors to a country’s being - त्याऐवजी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अन्य अल्पद्यात लोकांची ओळख करून द्यावी हे जास्त योग्य वाटले.
'पुष्प कुमार दहल उर्फ प्रचंड' हे व्यक्तिमत्व एका पुस्तकाचा विषय आहे, माझ्या आवाक्याबाहेरचा. तसेही सध्या सुमारे ५ लेखक त्यांच्यावर पुस्तके लिहीत आहेत, मी काय लिहिणार?
-अनिंद्य
27 Jun 2017 - 8:49 am | औरंगजेब
पुढचा भाग कुठल्या देशावर लिहीताय.
3 Jul 2017 - 2:13 pm | अनिंद्य
बहुदा मालदीव किंवा बांगलादेश. बघू काय जमतंय ते.
-अनिंद्य
27 Jun 2017 - 9:48 am | धर्मराजमुटके
संपुर्ण मालिका वाचली ! मस्त झालीय. पुढचे देश पाकीस्तान आणि चीन घ्यावेत. ह्यांच्याबद्द्ल जितकी ऑथेंटीक माहिती असेल तितकी जास्त चांगली.
27 Jun 2017 - 11:35 am | वरुण मोहिते
बस लिखते रहो.
27 Jun 2017 - 9:20 pm | शलभ
खूपच सुंदर लेखमाला. कोणत्यातरी पेपर मधे देउ शकाल. अजूनपर्यन्त न ऐकलेली माहिती. तुमचे लेख लिहिण्यामगचे कष्ट जाणवतात. एवढी छन माहिती आमच्यापर्यन्त पोहोचवल्याबद्दल धन्यवाद.
4 Jul 2017 - 10:41 am | अनिंद्य
@ शलभ
........कोणत्यातरी पेपर मधे देउ शकाल.......
कोणत्या ? :-)
बाकी हे लेखन 'स्वान्त-सुखाय' होते. सर्व भाग वाचणाऱ्या आणि आवर्जून प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांमध्ये तुमचा नंबर वरचा होता, अनेक आभार !
- अनिंद्य
27 Jun 2017 - 10:08 pm | दशानन
अत्यन्त सुंदर अशी लेखमाला, मिपाने किमान काही दिवस प्रमुख पानावर स्थान द्यावे एवढी उत्तम.
4 Jul 2017 - 10:54 am | अनिंद्य
@ दशानन,
- आभार !
28 Jun 2017 - 10:24 am | सतीश कुडतरकर
लेख मालिका खरंच उत्तम होती, धन्यवाद.
28 Jun 2017 - 9:51 pm | विजुभाऊ
नानासाहेब ( शेवटचे पेशवे) हे नेपाळ च्या आश्रयास गेले होते अशी वदंता आहे.
कितपत खरे आहे कोण जाणे.
21 Aug 2017 - 12:21 pm | अनिंद्य
@ विजुभाऊ
तुम्ही ह्या लेखमालेचा एकही भाग वाचला नाही, खरे ना ? :-)
29 Jun 2017 - 7:54 am | प्रीत-मोहर
सुरेखच झाली ही लेखमाला.
पुलेप्र
29 Jun 2017 - 8:14 pm | बबन ताम्बे
नेपाळ या शेजारी राष्ट्राबद्द्ल खूप काही माहीती समजली.
तुमच्या कष्ट आणि चिकाटीला सलाम.
30 Jun 2017 - 3:18 am | बांवरे
माहितीत भर पडली. पुढे विचारांनाही चालना मिळाली !
लिहीत रहा !
30 Jun 2017 - 6:30 am | पहाटवारा
सुरेख लेखमाला !
तुमचा अभ्यास, मेहनत जाणवते आहे .
असेच आजून वाचायला आवडेल
-पहाटवारा
30 Jun 2017 - 11:54 pm | सौन्दर्य
ही संपूर्ण लेखमाला अतिशय छान झाली आहे, त्या मागचे तुमचे कष्ट आणि चिकाटी जाणवल्याशिवाय राहत नाही. तुमची भाषा अगदी साधी, सोपी आणि सरळ असल्यामुळे वाचताना कोठेही अडखळल्यासारखे वाटत नाही. तुमच्या हाय लेखमालेमुळेच शेर्पा तेनझिंगने एव्हरेस्ट माथ्यावर पाय ठेवला नाही हे कळले.
तुमच्या पुढील लिखाणाच्या प्रतीक्षेत.
6 Jul 2017 - 12:32 pm | अनिंद्य
@ सौन्दर्य
अनेक लोकांनी मालिका आवडल्याचे सांगितले पण मला सर्वाधिक आनंद तुमच्या ह्या प्रतिक्रियेमुळे झाला आहे. कारण एक तर मराठीत मी पूर्वी कधीच लिहिले नाही (अपवाद फक्त पहिली ते सातवीपर्यंत शालेय जीवनात जे असेल ते) आणि दुसरे मराठी ही माझी 'मातृ'भाषा नाही, ती मी प्रयत्नपूर्वक शिकलो आहे. त्यामुळे भाषा आवडल्याचे वाचून खरंच खूप आनंद झाला.
अनेक आभार !
-अनिंद्य
6 Jul 2017 - 9:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
अरे वा ! मग तर, तुमचे लेखन नक्कीच कौतुकास्पद आहे. कारण मराठी तुमची मातृभाषा नाही, हे ओळखणे कठीण आहे इतके उत्तम तुमचे लेखन आहे !
26 Jul 2017 - 3:12 pm | अनिंद्य
कौतुकाबद्दल आभार डॉ सुहास म्हात्रे !
भाषाप्रेमी तर मी आहेच, त्यात मराठी भाषेची गोडी विशेष :-)
3 Jul 2017 - 4:26 pm | एस
उत्तम संजेल वगळता इतर फोटोंच्या लिंका दुरुस्त केल्या आहेत. उत्तम संजेल यांचा फोटो विकिमिडीया कॉमन्सवर नसल्याने इथे टाकता आला नाही.
3 Jul 2017 - 6:53 pm | अनिंद्य
@ एस,
उत्तमचे फोटो पाठवले आहेत, कृपया निरोपवही बघा.
ह्या लेखमालिकेत तांत्रिक कामासाठी मला तुमची मोलाची मदत झाली. फोटो-नकाशे टाकणे, मी चुकवलेल्या लिंक्स दुरुस्त करणे अशी मदत तुम्ही नेहेमी तत्परतेने केली, तुमचे आभार मानावेत तेव्हढे कमीच.
अनिंद्य
4 Jul 2017 - 10:26 am | अनिंद्य
वा, आता सर्व फोटो दिसताहेत :-)
4 Jul 2017 - 10:34 am | अनिंद्य
@ धर्मराजमुटके - आभार, बघू काय जमतंय ते. 'डामाडुमा' म्हणजे काय हा प्रश्न सर्वप्रथम तुम्हीच विचारला ते लक्षात आहे :-)
@ वरुण मोहिते - कोशिश जरूर करूंगा !
@ सतीश कुडतरकर
@ प्रीत-मोहर
@ बबन ताम्बे
@ बांवरे
@ पहाटवारा
- सर्वांचा आभारी आहे.
4 Jul 2017 - 12:24 pm | उपेक्षित
अतिशय सुंदर लेखमाला, बरेच माहित नसलेले पैलू तुमच्यामुळे समजले.... धन्यवाद.
5 Jul 2017 - 5:27 pm | दीपक११७७
लेख मालिका खरंच उत्तम आहे,
तुमच्या चिकाटीला सलाम. _/\_
धन्यवाद.
6 Jul 2017 - 10:44 pm | वीणा३
मस्त लेखमाला, पुढच्या देशाच्या प्रतीक्षेत :)
10 Jul 2017 - 9:31 pm | अनिंद्य
@ उपेक्षित
@ दीपक११७७
@ वीणा३
- अनेक आभार.
21 Jul 2017 - 5:40 pm | पैसा
फारच सुरेख मालिका झाली. मराठी तुमची मातृभाषा नाही हे वाचून विश्वास बसू नये इतके सहजसुंदर लिहिले आहेत.
आता पुढच्या शेजार्याचा डामाडुमा बघायची उत्सुकता लागली आहे. जरूर लिहा. वाट बघेन.
26 Jul 2017 - 3:07 pm | अनिंद्य
@ पैसा,
आभार!
बहुभाषक भाषाप्रेमी परिवार आणि गोतावळा असल्याचा हा मोठा फायदा :-)
........आता पुढच्या शेजार्याचा डामाडुमा बघायची उत्सुकता लागली आहे. जरूर लिहा. वाट बघेन.....
होय, लवकरच पुढच्या देशाची सुरुवात करावी म्हणतो.
30 Jul 2017 - 1:06 am | बॅटमॅन
अरे काय!
या लेखमालेचा मला पत्ताच नव्हता, पण देर आये दुरुस्त आये. नक्की वाचतो ही लेखमाला, अनेक धन्यवाद या वेगळ्याच विषयावर लिहिल्याबद्दल.
31 Jul 2017 - 11:26 am | अनिंद्य
जरूर वाचा.
एकूण ११ भाग आहेत, पण ८व्या नंतरचे भाग अनुक्रमणिकेला जोडलेले नाहीत, तेवढे एक राहिले आहे.
21 Aug 2017 - 12:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असेच म्हणतो. पुढील लेखनावर लक्ष असेलच. शुभेच्छा...!!!
-दिलीप बिरुटे
21 Aug 2017 - 1:06 pm | अनिंद्य
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार
_/\_
31 Jul 2017 - 11:25 am | अनिंद्य
@ बॅटमॅन
जरूर वाचा.
एकूण ११ भाग आहेत, पण ८व्या नंतरचे भाग अनुक्रमणिकेला जोडलेले नाहीत, तेवढे एक राहिले आहे.
29 Sep 2017 - 1:23 am | रुपी
सुरेख!!!
ही मालिका खूप सुंदर झाली. घाईत न वाचता एकाग्रतेने वाचावी म्हणून मी सगळे भाग वाचायला बराच वेळ घेतला. या मालिकेसाठी तुमचे आभार. नेपाळबद्दल फार कमी माहिती होती. बाकी देशांवरही येऊ द्या .. आणि १-२ भाग न लिहिता असेच सविस्तर लिहा.
तुमची लेखनशैली छान आहे.. मराठी प्रयत्नपूर्वक शिकून इतके उत्तम लिहिणे खरंच कौतुकास्पद आहे!
3 Oct 2017 - 1:09 pm | अनिंद्य
@ रूपी,
सगळे भाग एकाग्रतेने वाचून लेख मालिका आवडल्याचे कळवलेत, आभारी आहे.
बाकी देशांवरही येऊ द्या .. आणि १-२ भाग न लिहिता असेच सविस्तर लिहा............
मनात आहे, कागदावर (म्हणजे स्क्रीनवर खरेतर) उतरवायचे बाकी आहे, बघू कसे कधी जमते ते.
-अनिंद्य
28 Dec 2017 - 7:07 am | स्मिता.
मला राजकारणात ना रस ना गती! त्यामुळे ही लेखमाला तसलीच कंटाळवणी असावी असा पूर्वग्रह करून घेवून मी वाचलीच नव्हती.
मालदिवची लेखमाला वाचून मग खास शोधून ही लेखमाला वाचायला घेतली आणि एका बैठकीत वाचून काढली एवढी उत्तम झाली आहे!
भाषेचं म्हणाल तर मराठी ही तुमची मातृभाषा नाही यावर तुम्ही सांगूनही विश्वास बसत नाहीये (पितृभाषा असावी का?).
28 Dec 2017 - 4:57 pm | अनिंद्य
@ स्मिता.,
आधी तुम्हाला ही लेखमालिका राजकारणावर वाटली हा कदाचित शीर्षकाचा दोष असावा.
सगळे भाग वाचून लेखन आवडल्याचे कळवलेत, अनेक आभार!
अनिंद्य
9 Feb 2020 - 12:07 am | diggi12
कृपया अफगानिस्तान वर पन लिहा