नमस्कार,
आज सकाळची बातमी आपल्या सगळ्यांनाच हलवून गेली आहे. २२ बळी! आणी अनेक जखमी. परेल-एलफिंस्टनचा ब्रिज म्हणजे साक्षात यमाने टाकलेला फासच होता आज.
मुळात ही दोन्ही स्टेशन्स ब्रिटिशकालीन आहेत. सदर पूल हा सुद्धा खूप जुना आहे. या दोन्ही स्टेशनचा फलाट आपण बघितला तर तो आयलंड प्लॕटफाॕर्म आहे. ( परेल ला तर आहेच आहे) अशा परिस्थितीत दोन्ही फलाटांवर गाड्या आल्या तर पुलावर खूपच गर्दी होते.
त्यात आज पाऊस होता. त्यामूळे लोकं पुलावरुन हललेच नाहीत. पुलाचा पत्रा तुटला. त्याचा मोठ्ठा आवाज झाला. आणी मग पळापळी सुरु झाली. त्यात लोकांचा चेंगरुन जीव गेला.
रेल्वेचा हा गलथानपणा आहेच. पण रेल्वेच्या बाकी प्रोजेक्टस् ना विरोध करणे किती योग्य आहे.? आपली मते सांगा
या वर रेल्वे खालील उपाय करु शकते.
१-नवीन ब्रिज बांधणे.
२-परेलचा दुसरा ब्रिज एलफिंस्टला कनेक्ट करणे.
३- परेलला होम प्लॕटफाॕर्म उपलब्ध करुन देणे.
हे उपाय नक्की होऊ शकतात.
परेलच्या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत त्यांना श्रधांजली
प्रतिक्रिया
29 Sep 2017 - 9:56 pm | स्रुजा
हा एक मेसेज आलाय - कितपत तथ्य आहे त्यात?
नेमकं काय घडलं?
• सकाळी 9.30 च्या सुमारास पावसाची मोठी सर आली.
• त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या.
• त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलावर गर्दी झाली.
• त्याचवेळी पत्रा कोसळल्याचं सांगण्यात आलं.
• गर्दीच्या वेळी मोठा आवाज झाल्याने गैरसमजातून धावपळ सुरु झाली.
• ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले
• एकमेकांना तुडवत लोकांची धावपळ सुरु
• सकाळी 10.30 च्या वेळी थेट जखमी आणि मृतांचा आकडा समोर आला. तिघांचा मृत्यू.
• जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
• काही क्षणांत मृतांची संख्या 15 वर पोहोचली
परेल आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांवर सकाळच्या वेळी कायमच प्रवाशांची गर्दी असते. अनेक ऑफिस या भागात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकरदार या भागात लोकलने येतात. गेल्या काही वर्षांत प्रवाशांची संख्या वाढलेली आहे, मात्र ब्रिजची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने काहीच प्रयत्न झालेले नाहीत.
उद्या दसरा असल्यामुळे अनेक जण खरेदीसाठी दादर आणि परिसरात जातात. सकाळच्या वेळेत असलेली गर्दी आणि त्यातच दोन्ही मार्गांवर लोकल आल्यास अचानक उडणारी झुंबड नेहमीची आहे. त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाल्याचं म्हटलं जात आहे.
प्रवाशांच्या तुलनेत ब्रिजची क्षमता कमी असल्यामुळे गर्दीच्या वेळी पुलावर ताण वाढतो, अशी ओरड नेहमीच प्रवाशांकडून होते. त्याकडे प्रशासनाकडून लक्ष न दिलं गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
दरम्यान, ब्रिज पडल्याच्या किंवा शॉर्ट सर्किटच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.
29 Sep 2017 - 10:09 pm | पिवळा डांबिस
घटनेबद्दल वाचून वाईट वाटलं...
29 Sep 2017 - 10:34 pm | दशानन
मुंबई - जे आज घडले ते घडायला नको होते, वाईट वाटले.. हकनाक 20-22 जीव गेले! ईश्वर त्यांना शांती देवो व जे सिस्टम संभाळत आहेत त्यांना सद्बुद्धी!
29 Sep 2017 - 10:43 pm | गामा पैलवान
अरे, वाईट कसलं वाटवून घेताहत लोकं? उलट दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतली गर्दी कमी झाल्याचा आनंद व्यक्त करायला हवा ना? मुंबई देशातल्या सर्वांची आहे म्हणून गळा काढणारे आज आनंदात असतील की नाही? मग त्यांच्या आनंदात सामील व्हायला काय हरकत आहे? मेले ते गेले. ते आपल्या रडण्याने परत थोडेच येणारेत? देशबांधवांच्या भल्यासाठी झटणाऱ्या संचारस्वातंत्र्याच्या स्वयंघोषित पाईकांसाठी वीसबावीस जीव म्हणजे कीस झाड की पत्तीच जणू. एव्हढा त्याग तर करायला पाहिजेच ना? अशा वेळेस मुंबई स्पिरीट दाखवलं तर काय बिघडलं? उगीच लोकं आसवं ढाळताहेत.
-गा.पै.
29 Sep 2017 - 11:19 pm | दशानन
अतिशय फालतू आणि निर्लज प्रतिसाद!
व्यक्तिशः हा अतिरेक आहे, तुम्हाला लिहायला जागा आहे म्हणून व आपलाच अजेंडा (तिकडचा किंवा इकडचा) चालू करून परत ते राजकीय धोरण पुढे पुढे करून आपलीच बाजू योग्य सांगणारा अभिनिवेश...
गेला व्यक्ती हा त्या किंवा त्या विशीष्ट विचारसरणी चा नसतो हो, प्लिज.
29 Sep 2017 - 11:32 pm | दोसत १९७४
एल्फिस्टन रोड ते परेल या दोन रेल्वे स्टेशनच्या दरम्यान जे झालं त्याला संपूर्णपणे रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे. ज्या ब्रिजवर ही घटना झाली तो ब्रिज खूप अरूंद आहे. आणि त्याशिवाय त्या भागात वाढलेल्या कॉर्पोरेट कार्यालयांची संख्या. साहेब लोक ही जरी कारने येणार असली तरी सर्वसामान्य नोकरदार मंडळी ही रेल्वे किंवा बसनेच येणार. हा विचार कॉर्पोरेट कार्यालयं बांधणाऱ्यांनी कधीच केला नसावा.
29 Sep 2017 - 11:33 pm | दोसत १९७४
एल्फिस्टन रोड ते परेल या दोन रेल्वे स्टेशनच्या दरम्यान जे झालं त्याला संपूर्णपणे रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे. ज्या ब्रिजवर ही घटना झाली तो ब्रिज खूप अरूंद आहे. आणि त्याशिवाय त्या भागात वाढलेल्या कॉर्पोरेट कार्यालयांची संख्या. साहेब लोक ही जरी कारने येणार असली तरी सर्वसामान्य नोकरदार मंडळी ही रेल्वे किंवा बसनेच येणार. हा विचार कॉर्पोरेट कार्यालयं बांधणाऱ्यांनी कधीच केला नसावा.
30 Sep 2017 - 10:24 am | भंकस बाबा
उपरोधाने लिहीलेलं आहे, म्हणजे गापै नाही लिहीत तर मीच टाकला असता, मुंबईवरचा ताण कमी करायचा म्हटला की सेक्युलरवादी गळे काढतात, आम्ही सर्व प्रकारचे कर भरून अधिकृतपणे राहणार आणि हे त्यात बांगलादेशी आणि रोहिग्याची भर टाकणार वर कोर्टात प्रतिवाद पण करणार
30 Sep 2017 - 10:54 am | औरंगजेब
अहो ते sarcasm स्टाईल मध्ये लिहिलं असेल हो. ह.घ्या.
29 Sep 2017 - 11:43 pm | सुबोध खरे
I'm sharing a post of one of the doctors who works at KEM ....very aptly worded .....
Let me get wet but eyes of others should not get wet..
Now that all patients are settled by our doctors, nurses, I thought I will reflect on today's unfortunate incident. Saw many posts, we don't want bullet train, we don't want Shivaji s statue. Give us basic facilities etc. I fully agree that basic facilities are necessary.
But I feel basic self discipline is also equally necessary. This is what happened -Suddenly it starts raining and no one is ready to come out of the station as no one wants to get wet. (Many of us would have done the same. So i request you to pledge with me). And there are a thousand passenger s on the bridge. And what happens next is few people slip on the bridge. And a stampede follows.... scare... panic... unfortunate... Some are stamped upon...some die..many were saved by KEM doctors....some made a video while stamping...and some started posting we do want bullet train..forget bullet train, we don't deserve local trains if we don't maintain discipline and people are killed in stampede on local stations..... Unfortunate event... My heartfelt condolences.
I pledge today that -
1. I will maintain discipline at public places
2. Will not block ways, especially in crowded places.
3. Will not panic and will not spread fear.
4. Will not rush unnecessarily.
When I saw the relatives of the dead and injured crying...I felt just because few people didnt want to get wet, so many eyes became wet... Guys few hundreds of you would have got wet and few of you would have got common cold. We doctors prefer treating that common colds than to painfully help the relatives identify the dead bodies. If we don't pledge today, every rainy season we will have a stampede..
So, i pledge today - let me become wet but let me not make anyone's eyes wet...
- Dr Bhosale
30 Sep 2017 - 7:08 am | योगेश लक्ष्मण बोरोले
आपल्याला स्वतःत काहीही सुधारणा करायला नकोत. आपण अपघात झाल्यावर रेल्वे, पोलिस व एकंदरीतच सरकारी आस्थापने व प्रशासनाला शिव्याच देण्यात ईतिकर्तव्यता मानत असलो तर अवघड आहे.
30 Sep 2017 - 10:01 am | अमरेंद्र बाहुबली
सहमत! शिस्त आपल्याला नाही. तेथे सरकार काय करणार?
30 Sep 2017 - 6:29 pm | अमरेंद्र बाहुबली
माझी प्रतिक्रिया चुकली बहुतेक. पुल अरूंद होता, गर्दी नेहमीचीच. रेल्वे प्रशासणाला निवेदन देऊनही दुर्लक्ष केले गेले. शासणच जबाबदार आहे.
30 Sep 2017 - 10:48 am | संजय पाटिल
+१०० डॉ. भोसले...
30 Sep 2017 - 11:45 am | राही
पावसाळा नसतानासुद्धा पश्चिम दादर भागात स्टेशनजवळ अतोनात गर्दी असते. डोक्यावरून फुलांच्या टोपल्या नेणाऱ्या हमालांकडून मलाही दोन तीन वेळा किरकोळ दुखापती झाल्या आहेत. एकदा चष्मा निसटून पायदळी तुडवला गेला आहे. या गर्दीत आपली वस्तू वाकून उचलणे हे अत्यंत धोक्याचे असते. पायाखाली दर क्षणाला तुडवलेल्या फुलांच्या कचऱ्याचा बुळबुळीत चिखल वाढत असतो. त्यातच फेरीवाली मुले धंदा करीत असतात . लोकांचा रेटा भयावह असतो . ठोक फूलबाजार एल्फिंस्टनला नेला तरी दादरची गर्दी हटायला तयार नाही . स्वयंशिस्त त्यातल्यात्यात आहे म्हणूनच हा बाजार दुर्घटनेविना चालू आहे. फंक्शनिंग ॲनर्की म्हणतात तसे. आणि हे अनेक ठिकाणी आहे. अंधेरी बोरिवली कुर्ला मालाड पश्चिम येथे स्थानकाबाहेर पडल्यावर जीव मुठीत धरून चालावे लागते. फेरीवाले आणि अनधिकृत पार्किंग हटवून रस्ते- फुटपाथ मोकळे केले तरी ही अनागोंदी बरीच कमी होईल आणि मुंबईकर मोकळा श्वास घेउु शकतील. निदान कोणी घुसमटून मरणार तरी नाहीं
30 Sep 2017 - 6:57 am | मनिमौ
भोसलेंच्या पोस्टला पूर्ण अनुमोदन
30 Sep 2017 - 11:09 am | चष्मेबद्दूर
स्वयं शिस्त आणि मूलभूत आवश्यक गोष्टी अशा दोन्हींची सांगड असेल तर आणि तरच अशा घटना घडणार नाहीत. त्या पुलावरून जाताना जर गुदमरायलाच होत असेल, रोज प्रत्येक वेळेला, तर शिस्त काय कामाची हो? प्रशासन आणि आपण असे दोन्ही या घटनेला जबाबदार आहेत.
30 Sep 2017 - 8:57 pm | पिलीयन रायडर
हेच म्हणायचे आहे.....
लोकांनाच काय दोष द्यायचा? त्यांना हौस होती म्हणून ते तिथे जाऊन उभे राहिले का? जिथे आवश्यक ती सोयच नाही तिथे गर्दी होणार नाही तर काय? लोक मूर्ख आहेतच असं म्हणलं तरी सोयी फाईव्ह स्टार आहेत असंही नाहीये.
30 Sep 2017 - 11:11 am | भाते
काल रात्री झी २४तास वर रोखठोकच्या शेवटी सांगितलेले डॉ. निरगुडकरांचे म्हणणे मला पटले. रेल्वे प्रशासकिय अधिकाऱ्यांना मलबार हिलमधल्या बंगल्यामधुन काढुन विरारला राहायला पाठवा आणि लोकलने प्रवास करून यायला सांगा.
शेवटचा रेल्वे प्रवास या अधिकाऱ्यांनी कधी केला होता? ते महाविद्यालयात शिकत असताना? ८०-९० च्या दशकात! त्याला आता २५-३० वर्षे झाली.
निवडणुकीच्या काळात प्रचार करताना, प्रसिद्धीसाठी आणि मिडिया बरोबर घेऊन आलेल्या मंत्र्यासोबत! सकाळी ११ वाजता चर्चगेट ते मुंबई सेंट्रल किंवा दुपारी ४ वाजता ठाणे ते घाटकोपर पर्यंतचा फर्स्ट क्लासने केलेला प्रवास!
यांची सर्वसामान्य जनतेची नाळ केव्हाच तुटलेली आहे. स्वत:ला प्रशासकिय अधिकारी आणि जनतेचे सेवक म्हणवणारी हि सर्वपक्षिय नेते मंडळी दक्षिण मुंबईत रहातात. झेड आणि झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत पुढेमागे पोलिसांच्या गाड्या घेऊन बुलेटप्रुफ आणि एसी गाड्यांमधुन हिंडणाऱ्या या लोकांना सर्वसामान्य माणसांचा रोजचा त्रास काय समजणार? काय करायची आहे यांना झेड आणि झेड प्लस सुरक्षा? कशाला जनतेच्या पैशांची नासाडी करता आहात? सुरक्षा व्यवस्थेची इतकीच हौस असेल तर खाजगी सुरक्षा व्यवस्था घ्या आणि स्वत:च्या पैशाने त्यांचे पगार द्या. जनतेचे सेवक आहात ना? जनतेने तुम्हाला निवडुन दिले आहे ना? मग सर्वसामान्य जनतेसारखे वागायची लाज वाटते का?
यांना दक्षिण मुंबईमधुन बदलापुर, आसनगाव, अंबरनाथ, उल्हासनगर इथे राहायला पाठवा. सरकारी किंवा खाजगी गाडी न वापरता रोज छशिमट पर्यंत रेल्वेने प्रवास आणि मग कार्यालयापर्यंत / मंत्रालयापर्यंत बसने प्रवास करायला यांना सांगा. म्हणजे यांना सर्वसामान्य माणसांचा त्रास समजेल.
30 Sep 2017 - 12:02 pm | राही
सहमत.
आज मुंबई सगळीकडून उकरलेली खणलेली आहे. पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूंचे मुख्य रस्ते - अगदी आवश्यक जीवनवाहिन्या प्रचंड खोळंब्याने ठप्प आहेत. सगळीकडे एकाच वेळी उत्खनन सुरू करणे यासारखा मूर्खपणा आणि हडेलहप्पी दुसरी नाही. काल रात्री साडेआठ वाजता दिंडोशी गोरेगाव पूर्व पासून मालाड पश्चिम या साडे चार किमी साठी दोन तास लागले. पूर्वी माजी पंप्र देवेगौडा यांना ओल्ड मॅन इन अ हरी असे म्हटले जायचे. आजचे पूर्ण सरकार घाईगडबडीचे महोत्सवाचे, नवी लांबलचक नावे दिलेल्या जुन्याच योजनांचे, घोषणांचे आणि चुकलेल्या/ फसलेल्या प्राधान्यक्रमांचे आहे
30 Sep 2017 - 11:18 am | साधा मुलगा
झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी होता...
मी स्वतः १ तास पूर्वी लोवर परेल (पुढचे स्थानक) स्थानकात उतरलो होतो, तिथेही पाउस सुरु झाल्यावर लोकांमध्ये गडबड गोंधळ, बाहेर पडायची घाई सुरु झालेली, तेव्हाच माझ्या डोक्यात विचार आलेला कि या देशाचं काही खरं नाही आणि तासाभरात अशी बातमी....
डॉ भोसले म्हणाले त्या प्रमाणे सार्वजनिक जीवनात शिस्त अतिशय महत्वाची आहे.
रेल्वे मधले हुल्लडबाज टपोरी लोक नवीन नाहीत, पण लोकांनाहि एवढी घाई असते कि अगदी दारात कडेला उभे राहून प्रवास करतात आणि मरतात, गाडीत आत शिरायला दुसऱ्याला ढकलून पुढे जायचं, आत शिरल्य्वर पण आपल्याला जागा कशी मिळेल, त्यासाठी मारामारी भांडाभांडी , तुझ्या आईची @#$% माझ्या आईची @#$ हे रोजचेच आहे.
वाढती लोकसंख्या पाहून नवीन पूल बांधेल, विस्तार केला पाहिजेत वगैरे रेल्वे प्रशासनाची हि जबाबदारी आहे, त्यात होणारी कुचराई सुद्धा अक्षम्य आहे.
पण या सर्वांसाठी जागा कुठे आहे??
मागे रेल्वेने नवीन ट्राक करण्यासाठी अतिक्रमण झालेली रेल्वेचीच जमीन पुन्हा कायदेशीररित्या परत मिळण्यासाठी प्रयत्न करत असताना आपले काही लोकप्रतिनिधी त्यात अडचणी आणत होते आणि आंदोलन करत होते.
शेवटी प्रसार माध्यमांना आणि विरोधकांना एक नवीन खाद्य मिळालं दुसरं काही नाही........
लोकांना विकास हवा आहे आणि बदल हवा आहे पण त्यात स्वतः सहभागी होण्यासाठी कोणी तयार नसतो, हेच भारताचे दुर्दैव आहे.....
30 Sep 2017 - 11:43 am | अभ्या..
चला, ह्या निमित्ताने तरी प्रतिसाद मिळाले बाबा एकदाचे.
30 Sep 2017 - 11:55 am | चौकटराजा
आपला देश महान आहे .आपल्या देशात सोन्याचा धूर निघत होता हे मला कधीच मान्य नव्हते पण मी अनेक देशाभिमान्यांच्या आवाजापुढे गप्प रहात असे. पण देशाची सीमा ओलांडून गेल्यावर आता मला " पाकिस्तानात चालते व्हा ... " असे म्हटले तरी मी अशाना फाट्यावर मारून आपल्या देशातील गलिच्छ पणावर टीका करीत असतो. आपला देश हा आळशी, फेस्टीव्हल खोर ,बेशिस्त व अप्रामाणिक लोकांचा देश आहे त्यात प्रचंड लोकसंख्या हेच आपले बल आहे असे भंपक विधान करणारे काही आपल्या इथे मानाची पदे पटकावून आहेत. कालच मी एक विडिओ पाहिला एअर पोर्ट ते ताजमहल होटेल अस तो प्रवास होता. मुंबई हे जगातील एक घाण असे शहर आहे यात शंका नाही हे त्यावरून सहज कळते. . द मुम्बई काहीशी बरी आहे आहे इतकेच. मोठ्या प्रमाणात कुंभमेळे साजरे करणे, प्रचंड गर्दीची तीर्थ यात्रा , विशिष्ट दिवसाला, विभूतीला तसेच स्थानमाहात्म्याला अति महत्व यातुन यात्रा, पुतळे, गर्दी खेचणारे उत्सव या विकृति पैदा व्हायला धार्मिक भारतीय वृत्ती कारणी भूत आहेच. यात वरच्या २२ आत्म्याना शांती कशी मिळणार ?
30 Sep 2017 - 12:03 pm | राही
सहमत
30 Sep 2017 - 12:03 pm | राही
सहमत
6 Oct 2017 - 4:42 pm | arunjoshi123
प्रजासत्ताक दिनाच्या परेडला देखिल खच्चून गर्दी असते. ( पण तिथे बजेट खूप असतं.) . अर्थातच अशी विकृती पैदा व्हायला राष्ट्रीय वृत्ती कारणीभूत असते.
6 Oct 2017 - 4:45 pm | arunjoshi123
जिथे कोणत्याही खिडकीतून कोणी कितीही गोळ्या घालू शकतो अशा धोकादायक इमारतीसमोर तमाशे करून ६० लोकांचे प्राण घालवणारी विकृती पैदा व्हायला अमेरिकन मनोरंजन संस्कृती कारणीभूत आहे.
6 Oct 2017 - 4:48 pm | arunjoshi123
घटनेतले धर्मस्वातंत्र्य नावाचे विकृत प्रकरण काढून टाकून फक्त सेक्यूलर असण्याचे स्वातंत्र्य इतकेच काय ते असू द्यावे.
30 Sep 2017 - 1:09 pm | गामा पैलवान
चौकटराजा,
असहमत. गर्दीच्या व्यवस्थापनात नियोजन कमी पडंत असेल तर त्याचा दोष धार्मिक वृत्तीकडे कसा काय जातो? भारतीय माणसाची धार्मिक वृत्ती नाहीशी केल्याने या अडचणी सुटणार नाहीयेत. त्या इतर पकारे व्यक्त होतील. उदाहरणार्थ : कालच्या परळ-प्रभादेवीच्या घटनेत धार्मिक वृत्तीचा कसलाही संबंध नव्हता.
आ.न.,
-गा.पै.
30 Sep 2017 - 1:19 pm | चौकटराजा
त्यात दसर्याचा पूर्वसंध्येला खरेदीची गर्दी असाही उल्लेख झालेला दिसला. दुसरे असे की सण म्हटले की हिंदुच्या सणावर टीका होणारच कारण जगात सण साजरे करण्यात हिंदुंचा हात जगात कोण धरू शकेल ? हज यात्रेत ही अशी चेंगरा चेंगरी झालेली आहे. त्यात स्थानमहात्म्याचा दोष विचारात घ्यावाच लागेल. गर्दी मग ती गणेश मिरवुणुकीची असो वा रिओ च्या कार्निवलची त्यात व्यवस्थापन करायला लोक ऐकतात का हे महत्वाचे असते. गेले अनेक वर्षे पुण्यात मिरवणूक कमीतकमी तासांत पूर्ण व्हावी म्हणून व्यवस्थापन काय कमी झाले..? दरवेळी सांस्कृतिक वारसा म्हणून व्यवस्थापन उधळून लावायचे प्रयत्न होत असतातच !
6 Oct 2017 - 4:55 pm | arunjoshi123
काहीही?? अहो, मुंबईच्या घाणेरड्या गर्दीत रोज रोज लोक जे आपल्या ऑफिसला जातात त्यामागेदेखिल भारतीय धार्मिक प्रेरणाच आहे. चौकटराजांना विचारा, कोणत्याही धर्मस्थानामधल्या गर्दिपेक्षा (डेन्सिटी म्हणतोय) लोकलमधली जास्त असते, तेव्हा ती प्रेरणा धार्मिकच!
घाणेरडी गर्दी ईश्वराला प्रिय असते हे मनुस्मृतीमधे लिहिलं आहे म्हणून असले प्रकार होतात भारतात.
30 Sep 2017 - 7:56 pm | सुबोध खरे
रात्रभर ठणाणा लाऊड स्पीकर आणि ढोल ताशे लावून गणपती विसर्जन करणे हा कुठल्या संस्कृतीचा वारसा आहे?
रात्री बारा वाजता सर्व मिरवणुकी बंद झाल्याचं पाहिजेत आणि आवाजाची मर्यादा न ओलांडता. कोणत्याही धर्माची असो
संस्कृतीच्या नावावर भंपक पणा बंद केला पाहिजे.
मी हिंदू आहे आणि त्याचा मला अभिमान आहे म्हणूनच हे असले चाळे ताबडतोब बंद झाले पाहिजेत असेच वाटते.
30 Sep 2017 - 9:46 pm | गामा पैलवान
खरे डॉक्टरांच्या संदेशाशी पूर्णपणे सहमत.
-गा.पै.
30 Sep 2017 - 11:00 pm | श्रीगुरुजी
मुंबईत माणसे अक्षरशः किड्यामुंगीसारखी राहतात. रोज मुंबईत नवनवीन लोंढे येत असतात. या स्थानकावर अजून एक पूल असता तरी तो पूलसुद्धा गर्दीने तुडुंब भरलेला दिसला असता. मुंबईत कितीही नवीन इन्फ्रस्ट्र्क्चर निर्माण केले तरी मुंबईच्या प्रचंड फुगलेल्या व सातत्याने फुगत राहणार्या लोकसंख्येला ते अपुरेच पडेल. माणसे सामावून घ्यायची मुंबईची क्षमता खूप पूर्वीच संपली. माणसे कितीही वाढली तरी त्यांच्यासाठी उपलब्ध असणारे पाणी, रस्ते, वीज इ. साधनसंपत्ती त्या प्रमाणात वाढत नाही. एखाद्या शहरात बाहेरून नवीन माणूस येतो, तेव्हा तिथल्या मूळच्या लोकसंख्येला उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीत वाटेकरी झालेला असतो. त्यामुळे आधीपासून तिथे रहात असलेल्या लोकसंख्येला उपलब्ध असणार्या साधनसंपत्तीमध्ये घट होते.
काल झाली तशा दुर्घटना सातत्याने होतच राहणार आहे. मुंबईची अवस्था येणार्या प्रत्येक दिवशी आदल्या दिवसाच्या तुलनेत वाईटच असणार आहे. मुंबई सुधारायची असेल तर तिथली किमान निम्मी लोकसंख्या बाहेर काढली पाहिजे. अर्थातच असे होणे व करणे अशक्य आहे. त्यामुळे मुंबईची परिस्थिती कधीही सुधारणार नाही.
अर्थात हे सर्वच शहरांना लागू आहे. पुणे वेगाने मुंबईच्या दिशेने निघाले आहे. पुण्याची अवस्था आधीच वाईट झालेली असूनसुद्धा इथे नवीन येणार्यांची आवक सुरूच आहे.
1 Oct 2017 - 10:35 am | रविकिरण फडके
मला येथे दोन गोष्टी अधोरेखित कराव्याशा वाटतात.
१) सेवेची पुरेशी किंमत आकारणे
रेल्वे प्रवासी म्हणून आपण रेल्वेच्या सेवेसाठी पुरेशी किंमत देतो का? आणि जर देत नसू तर रेल्वेच्या सेवा सुधारणार कशा?
उदा. भांडुप ते ठाणे (तीन स्टेशन्स) ह्या लोकल ट्रेन प्रवासाला मला किती खर्च येतो? जाऊन येऊन रु. १०/- फक्त! गर्दीच्या वेळा सोडल्यास माझा हा प्रवास आरामात, आणि फक्त १२-१३ मिनिटात, पूर्ण होतो.
खरी गोची ह्या प्रवासाच्या आधी आणि नंतर असते.
ठाणे स्टेशनवर गाडीतून उतरल्यानंतर स्टेशनच्या बाहेर पडणे हे बहुधा युद्धसदृश काम असते. जिन्यावरून चढताना उतरताना खूप धक्काबुक्की अपरिहार्य. त्यात पाऊस असेल, नाहीतर गाड्या उशिराने धावत असतील, तर विचारूच नका, धडधाकट माणसेच हे युद्ध जिंकू शकतात. ज्यांना हे झेपण्याजोगे नसते ते लोक बसचा पर्याय स्वीकारतात.
त्यांना खर्च किती येतो? रुपये ४४/- फक्त. म्हणजे रेल्वेच्या साडेचारपट.
ज्यांना बसही काही कारणामुळे शक्य नाही असे लोक रिक्षा घेतात. खर्च १५०-२०० रुपये, म्हणजे गाडीच्या पंधरा-वीसपट.
समजा रेल्वे प्रशासनाने ह्या भांडुप-ठाणे तिकिटासाठी १० ऐवजी ३०-४० रुपये माझ्याकडून घेतले, आणि वरचे २०-३० रुपये खर्च करून स्टेशनवरील पूल, बाहेर पडण्यासाठीचे मार्ग, फलाटांवरील छत, पंखे, फलाटांची उंची वाढविणे (गाडी आणि फलाट ह्याच्या गॅपमद्ध्ये पडून आजवर किती लोक मेले आणि किती जायबंदी झाले ते मोजले तर कालच्या दुर्घटनेत जे गेले त्यापेक्षा ती संख्या खूप जास्त भरेल), तिकिटांच्या खिडक्या, इत्यादी बाबी सुधारल्या, तर मला चालेल का?
ह्यावर माझे निसंदिग्ध उत्तर 'होय' असेच राहील.
काही लोकांना काही काळ ही भाडेवाढ जास्त वाटेल. पण त्याबदल्यात काय मिळाले/ मिळणार आहे इतका विचार तर सामान्य माणूस नक्कीच करू शकतो. मात्र ह्यासाठी उथळ व वाचाळ, आपल्या फायद्यासाठी लोकांना भडकावणाऱ्या पुढाऱ्यांचा सडेतोड बंदोबस्त करू शकणारे, असे प्रामाणिक व विश्वासार्ह राजकीय नेतृत्व पाहिजे. (अपेक्षा फारच जास्त होतेय का?) कारण, भाडेवाढ करायची म्हटली की त्याला कडाडून विरोध करणारे नेते विंगेत उभेच असतात. आणि हे सर्वच पक्षात असतात; ज्या पक्षाच्या सरकारने भाडेवाढ केली किंवा सुचवली आहे, त्याच्या विरोधी पक्षात हे असतात. कधीकधी त्याच पक्षातही असतात. मान्य, हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. आधी कोंबडी की अंडं अशातला आहे. लोक म्हणतात की इतक्या वाईट सर्विससाठी एवढे पैसे का मोजायचे? रेल्वे म्हणते, आधीच मुंबई उपनगरी वाहतूक तोट्यात चालली आहे, सुधारणा करण्यासाठी पैसे कुठून आणायचा? पण हे दुष्टचक्र भेदले नाही तर पुलांवर चेंगराचेंगरी होणार, प्रवासी गाडीतून पडून मरण पावणार, हे सर्व अटळ असेल. मला ह्यातील आकडेवारी माहीत नाही - म्हणजे, मुंबईत गाड्या चालविण्यासाठी किती खर्च येतो, उत्पन्न किती, म्हणून नुकसान किती, ते नुकसान कसे भरून काढले जाते, इ. इ. एक गोष्ट मात्र नक्की; मिळणाऱ्या सेवेसाठी आज आपण निश्चितपणे फार कमी किंमत मोजतोय. दहा रुपये? काय येते आजकाल दहा रुपयात? एक वडापावसुद्धा येत नाही. जास्तीत जास्त एक कटिंग चहा.
थोडीशी तुलना:
माझी कन्या अमेरिकेत मिनिओपोलीस ह्या शहरात राहते. तिथे बस / मेट्रोचे तिकीट दोन डॉलर आहे. हे तिकीट कुठेही म्हणजे बस व मेट्रो असे अडीच तास चालते. How does this compare to Mumbai? अमेरिकेत सरासरी मासिक उत्पन्न घरटी ५००० डॉलर्स असे धरले (स्रोत: विकिपीडिया) तर एका तिकीटाची किंमत म्हणजे मासिक उत्पन्नाचा २५०० वा अंश होतो. हेच गुणोत्तर मुंबईत लावायचे झाल्यास घरटी उत्त्पन्न रु. २५००० हवे. तेवढे ते आहे हे मान्य व्हायला मला वाटते हरकत नसावी. Forbes च्या एस्टीमेटप्रमाणे ते ३५००० रु. आहे. सरासरी ही फसवी असते हे गृहीत धरुनसुद्धा - आणि अन्य घटक, जसे अन्नपदार्थ, घर, इ. गोष्टींच्या किमती मुंबईत तुलनेने जास्त आहेत - आम्ही मुंबईकर रेल्वेचा प्रवास फार स्वस्तात करतो हे मान्य करण्यात अडचण नसावी.
२) सुसूत्रीकरणाचा अभाव
वर मिनिआपोलीसचे उदाहरण घेतले आहे. तिथे बस आणि मेट्रो ह्या दोन्ही, शहराच्या वाहतूकव्यवस्थेच्या एक integral भाग म्हणून गणल्या जातात, त्यांचा एकत्रित विचार होतो. तीच गोष्ट लंडनची. किंवा इतर अनेक शहरांची. लंडनमद्धे Transport for London ही एकच ऑथॉरिटी आहे, जी लंडनच्या सर्व वाहतुकीच्या management साठी जबाबदार असते. (त्यांच्या मिळकतीचा फक्त ४०% हिस्सा तिकीटविक्रीतून येतो, अशी माहिती त्यांनीच दिली आहे. पण त्याशिवाय, लंडनच्या मध्यवर्ती भागात प्रवेश करावयाचा झाल्यास मोटारगाडीला प्रतिदिन ११.५० पौंड्स द्यावे लागतात. त्यातून मिळणारे उत्पन्नसुद्धा लंडनची वाहतूक सुधारण्यासाठी पूर्णपणे वापरले जाते.) ह्या साईटला नुसती भेट दिली तरी एकूणच हा विषय किती गंभीरतेने घेतला जातो हे लक्षात येते. ह्याउलट मुंबईत? दादर स्टेशनचा फुलबाजाराकडे उतरणारा पूल महिनोन महिने बंद राहतो, कारण काय तर म्हणे त्याच्याखालची जी दुकाने आहेत त्यांच्यामुळे दुरुस्ती करता येत नाही. भिन्न भिन्न सिस्टिम्समद्धे एकसूत्रता नाही, डावा हात काय करतोय ते उजव्याला माहीत नाही. रेल्वे BMC ला मेमो पाठविते, त्यांची दखल महिनोन महिने घेतली जात नाही. उलटपक्षीही तसेच. जनतेला उत्तर द्यायला कुणीच बांधील नाही.
सारांश काय, प्राप्त परिस्थितीत काही positive फरक निदान नजीकच्या काळात तरी पडेल अशी आशा बाळगू नये.
1 Oct 2017 - 7:59 pm | मास्टरमाईन्ड
आपले विवेचन छानच आहे पण social discipline नावाचा पदार्थ आपल्यात (आपल्या समाजात) आहे का?
कारण समाजासाठी कितीही उत्तम योजना आणा, जर social discipline नसेल तर त्या योजनेचा कचरा व्हायला वेळ लागणार नाही.
साध्या साध्या गोष्टी पण आपण व्यवस्थित पाळत नाही. उदा. थुंकणे, रस्त्याकडेला लघवी करणे हे तर सो कॉल्ड सुशिक्षीत मध्यमवर्गीयांपैकी बरेच जण करतात.
अशी बरीच उदाहरणं देता येतील
परवाच्या दुर्घटनेत जे गेले ते वाईटच झालंय पण यापुढे असं होऊ नये म्हणून कोणीही व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात / वागणुकीत काही बदल करेल पर्यायानं समाज या गोष्टीची काही serious दखल घेईल असं कठीण आहे कारण जे काही बदल वगैरे करायचेत ते सरकारनं किंवा रेल्वे प्रशासनानं करणं अपेक्षित आहे (लोकांच्या मते - टीव्ही वरच्या आणि काही ब्लॉग्ज वरच्य प्रतिक्रिया वाचून).
बरंच लिहिता येईल, पण वेळ कमी आहे (लिहिण्यासाठी अन् वाचण्यासाठी पण)
2 Oct 2017 - 6:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुंबईत लोकलने प्रवास करणे कठीण काम आहे. महिन्या सहा महिन्यातून ठाण्यात येतो आणि घनसोली कडे जातो तेव्हा मरणाची गर्दी पाहतो तेव्हा जीव मुठीत घेऊन प्रवास करणे म्हणतात ते कळते. रेल्वेच्या दारातून लोक पुढे सरकत नाही, सतत मोठा बोळा तिथे लावल्यासारखा असतो तेथून आत घुसणे आणि बाहेर पडणे हे खरंच दिव्य आहे. उसाच्या चरकात उस घालावा तसे लोकांच्या गर्दीतून घुसावं लागतं. पुलावर तर गर्दीच असते. किरकोळ विक्रेते, भिकारी, यांनी रस्ता चिव्वळ होऊन जातो. लोक घड्याळीकडे आणि कोणती लोकल कुठे लागते याकडे पाहात असतात आणि काही वर तोंड करुनच चालतात. असे लोक धक्का देऊन आपला रस्ता करुन घेतात. काहींचा मुक्काम पुलावरच असतो. कोणती रेल्वे कुठे येतेय म्हटलं की तिकडे धावतात. येणार्या रेल्वेतील लोक पुलावरुन मॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धकाप्रमाणे गर्दी करतात. घरी लवकर पोहोचायचं आहे किंवा अन्य कारणाने होणारी गर्दी पाहिली की असे अपघात घडणारच असे वाटायला लागते. आमच्या सारख्या सटी सहामाही येणारे जाणारे गुदमरुन जातात. दररोजचे प्रवास करणार्या बिचार्यांबद्दल खरंच सहानुभूती वाटते.
प्रवाशांची स्वयंशिस्त, मोठे पूल, पर्यायी प्रवास व्यवस्था, रेल्वेप्रशासनाची जवाबदारी, असे विविध घटक जरी अशा घटनांना जवाबदार असले तरी येता काळ अजून कठीण आहे, असेच वाटते.
-दिलीप बिरुटे