नमस्कार मिपाकरहो!
सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या मिपाचा दिवाळी अंक आपण सादर करणार आहोत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या भरघोस प्रतिसादाचं आवाहन आम्ही करत आहोत.
गेल्या वर्षीपासून आपण मिपाच्या दिवाळी अंकात एका विशिष्ट विषयाला / साहित्यप्रकाराला वाहिलेला विभाग वेगळा करतो. गेल्या वर्षीच्या 'रहस्यकथा विभागा'ला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
यंदाचा 'विशेष विभाग' असणार आहे 'व्यक्तिचित्रे' या विषयाला वाहिलेला!
मराठी साहित्यातलं व्यक्तिचित्रांचं दालन इतर भाषांपेक्षा कदाचित जास्त समृद्ध आहे. 'व्यक्ती आणि वल्ली', 'माणदेशी माणसं', 'सारे प्रवासी घडीचे' अशी अनेक व्यक्तिचित्रं आपल्या सर्वांना माहीत आहेतच. तुम्हालाही अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक व्यक्ती भेटलेल्या असू शकतील. कदाचित तुम्हाला एखाद्या काल्पनिक व्यक्तीचंही शब्दचित्र रेखाटावंसं वाटू शकेल. यंदा मिपाच्या दिवाळी अंकाच्या माध्यमातून तुम्हाला भेटलेल्या (किंवा तुमच्या कल्पनेतल्या) व्यक्तींच्या शब्दचित्रांना प्रसिद्धी आपण देणार आहोत.
अर्थात सगळा अंकच व्यक्तिचित्रांना वाहिलेला नाही. अंक सर्वसमावेशक आहे. अन्य कथा, लेख, पाकृ, कविता, मुलाखती, चित्रं वगैरेंचंही स्वागतच आहे.
...आणि काही नियम/सूचना:
१) तुम्ही पाठवलेलं लेखन तुमची स्वतःची निर्मिती असावी. कशावर आधारित असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करावा. कोणत्याही प्रकारच्या वाङ्मयचौर्याचा ढका आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाला लागू नये ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे.
२) मिपाचा दिवाळी अंक दर्जेदार साहित्याने भरलेला असावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे, आणि त्यासाठी आम्ही दिवाळी अंक टीम आटोकाट प्रयत्नही करणार आहोत. आलेल्या साहित्याला नीट निवडून, टिपून, पारखून मगच दिवाळी अंकात स्थान दिलं जाईल. याचाच अर्थ काही साहित्य नाकारावं लागेल. समजा, तुमचं लेखन नाकारलं गेलं तर कृपया नाराज होऊ नका. आपणांला वाटल्यास ते स्वतंत्रपणे मिपावर नक्की प्रकाशित करा.
३) दिवाळी मंगलमय, आनंदाचा सण आहे हे आपण सगळेच जाणतो. तो सण साजरा करायच्या साहित्यिक मेजवानीत बीभत्सपणाचा आंबटरस असू नये. हा नियम व्यक्तिचित्रांसाठीही आहे. काही मदत/सल्ला/मार्गदर्शन हवं असल्यास साहित्य संपादकांशी संपर्क साधावा.
--x--
दिवाळी १६ ऑक्टोबर २०१७ ला सुरू होते आहे. तुमचं लेखन आल्यावर ते वाचून, मुद्रितशोधन करून, सजवून चकाचक करायला लागणारा वेळही जमेस धरावा लागेल. म्हणून, आपलं लेखन उशिरात उशिरा ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत साहित्य संपादक या आयडीला व्यनीने पाठवा. जर तुमचा मिपावर आयडी नसेल, तर तुम्ही तुमचं लेखन sahityasampadak.mipa@gmail.com या ईमेल पत्त्यावरही पाठवू शकाल.
त्याआधी किंवा त्यानंतर काही मदत लागल्यास आम्ही आहोतच!
- टीम दिवाळी अंक
प्रतिक्रिया
7 Sep 2017 - 8:07 pm | यशोधरा
आला का धागा? :)
7 Sep 2017 - 8:31 pm | एस
ज्यांना कोणाला हा उपक्रम कसा राबवावा यासंदर्भात काही सूचना करावयाच्या असतील त्यांनी इथेच त्या नमूद केल्यास आपल्या अनुभवाचा फायदा असे उपक्रम जास्तीत जास्त निर्दोषपणे राबविण्यात होईल. तसेच मिपाचे सर्व उपक्रम हे मिपाचे आणि पर्यायाने सर्व मिपाकरांचे असतात, त्याचे सर्व श्रेय सर्व मिपापरिवाराचे असते, ते कुणा आयडीच्या नावाने ओळखले जाऊ नयेत याची दक्षता घ्यावी अशी विनंती.
7 Sep 2017 - 9:08 pm | सस्नेह
म्हंजे वो काय ?
...जरा इस्कटून सांगा की !
7 Sep 2017 - 9:11 pm | बाजीप्रभू
१) सेलेब्रिटी व्यक्ती असल्यास चालेल का? कारण त्यांची बरीच माहिती आधीच आंतरजालावर आहे पण त्यांची माहित नसलेली बाजू लिहायचा प्रयत्न करेन.
उदा. माझी बहिण गौरी सावंत (ट्रान्सजेंडर) आणि मामी तृप्ती देसाई(भूमाता ब्रिगेड)?
२) व्यक्ती अभारतीय असल्यास चालेल का?
8 Sep 2017 - 12:02 am | आदूबाळ
दोन्हीसाठी: पळेल!
(तुमच्या आधीच्या लेखातून राजा भूमीबोल यांचं खूप चांगलं व्यक्तिचित्र रेखाटलं होतंत.)
8 Sep 2017 - 3:48 am | एमी
शुभेच्छा!
'माझी पापड लोणची करणारी आजी पणजी चुलतसासू मावशी' खेरीज इतर काहीतरी वाचायला मिळेल अशी अशा आहे ;)
8 Sep 2017 - 7:16 pm | ज्योति अळवणी
विषय तर मस्तच आहे.
त्याव्यतिरिक्तचे साहित्य.... प्रामुख्याने कथा स्वीकारल्या जातील हे वाचून आनंद झाला
8 Sep 2017 - 8:27 pm | भय्या नागपूरकर
हे बेस झाले.
9 Sep 2017 - 8:03 am | पिलीयन रायडर
हा एक महत्वाचा बदल आहे. मिपाकर नसतानाही खास दिवाळी अंकासाठी लेख देता येणे ही चांगली सुरूवात आहे. ह्या निर्णयासाठी सासंचे अभिनंदन!
चांगलं लिहीणार्या पण मिपाकर नसलेल्या लोकांना हे आवाहन पाठवते.
9 Sep 2017 - 8:46 am | पैसा
इ स 2013 पासून हे चालू आहेच.
9 Sep 2017 - 9:12 am | पिलीयन रायडर
हो? कधी लक्षात आले नव्हते ब्वॉ. म्हणजे इतर कुणी कविता उपलब्ध करून दिली वगैरे वाचलं होतं. पण आवाहनात ही ओळ मी तरी आजच नोटीस केली. बहुदा अशी स्पष्टपणे यंदाच लिहिलेली दिसतेय.
असो, उत्तमच आहे.
9 Sep 2017 - 8:05 am | ज्योति अळवणी
एका व्यक्तीला एकच लेखन देता येईल का?
9 Sep 2017 - 8:49 am | आदूबाळ
असं काहीही बंधन नाही.
अर्थात, एखाद्याने लेखकाने भाराभर लेखन दिल्यास ते कितीही उच्चप्रतीचं असलं तरी संपूर्णतः घेणं अस्थानी ठरेल, कारण बराचसा अंक त्या लेखनानेच भरून जाईल.
20 Sep 2017 - 3:48 pm | आदूबाळ
नमस्कार! लेखन यायला सुरुवात झाली आहे.
लेखन पाठवण्याच्या अंतिम तारखेला दहा दिवस राहिले आहेत म्हणून हे स्मरणपत्र.
20 Sep 2017 - 6:38 pm | दिनेश५७
फेसबुकवर प्रसिद्ध झालेले लेखन चालेल का?
की फ्रेश असलेपाहिजे ?
20 Sep 2017 - 7:08 pm | आदूबाळ
नाही, कुठेही - फेसबुकवरही - पूर्वप्रकाशित असलेलं लेखन चालणार नाही. नवं काही लिहून दिलंत तर त्याचं स्वागतच आहे!
26 Sep 2017 - 2:32 pm | अनन्त्_यात्री
पाठविलेले लेखन स्वीकारले की नाकारले हे सा.सं. मं. तर्फे किती तारखे पर्यन्त कळविले जाईल?
26 Sep 2017 - 7:26 pm | साहित्य संपादक
१ अक्टोबरपर्यंत नक्की कळवु. धन्यवाद.
27 Sep 2017 - 2:05 pm | वकील साहेब
काही शब्द मर्यादा आहे का ? कारण एक कथा लिहिण्याचा प्रयत्न करतोय पण फार दीर्घ होतेय की काय अस वाटतय
27 Sep 2017 - 2:41 pm | आदूबाळ
काही शब्दमर्यादा नाही. दीर्घ झाली तर दोन किंवा जास्त भागांत प्रकाशित करण्याबाबत विचार करता येईल.
27 Sep 2017 - 3:02 pm | वकील साहेब
धन्यवाद
7 Oct 2017 - 10:55 pm | साहित्य संपादक
मंडळी, दिवाळी अंकाला आलेल्या भरघोस प्रतिसादामुळे प्रत्येक लेखनाला स्वीकृती कळवणे अवघड आहे. पण अस्वीकृत लेखनाला तसं कळवलं आहे. त्यामुळे तुम्हाला व्यनी / ईमेल आली नसेल तर लेखन स्वीकारले आहे असे समजा.
9 Oct 2017 - 12:01 pm | सूड
कधी येतोय अंक?
16 Oct 2017 - 11:43 am | फुन्सुक_वान्गडू
??
16 Oct 2017 - 12:12 pm | एस
उद्यापासून.
19 Oct 2017 - 10:03 am | विनटूविन
अंक कधी वाचायला मिळेल?
19 Oct 2017 - 10:14 am | आदूबाळ
गेले दोन दिवस अंक प्रकाशित होतो आहे. बाहेर बोर्डावर 'दिवाळी अंक' टॅगचे धागे 17 तारखेपासून येत आहेत. मुखपृष्ठ, अनुक्रमणिका आणि संपादकीयही प्रकाशित झालं आहे.
तुम्हाला अंक म्हणजे काही वेगळं अपेक्षित होतं का?