रमलखुणांची भाषा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
19 Sep 2017 - 11:44 am

जरी तुटले आतून काही, तरी नकोस ओळख देऊ
जाताना थांबून थोडे, तू नकोस मागे पाहू

दिसतील अनाहूत इथल्या, सावल्या गडद होणाऱ्या
हुरहुरत्या संध्याप्रहरी, पावलांत घुटमळणाऱ्या

खोरणात तेवत असता, फडफडेल इथली दिवली
मग उरेल काजळमाया, शोषून स्निग्धता सगळी

ते वादळ येईल फिरुनी, पण सावर तोल जरासा
ओठींचे स्मित लपवूदे, श्वासातील खोल उसासा

ते विसर उमाळे इथले, पुसताना प्राक्तनरेषा
उलगडेल अवचित अवघी, मग रमलखुणांची भाषा.....

माझी कवितामुक्तक

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

19 Sep 2017 - 12:04 pm | यशोधरा

काय सुरेख! सुंदर!

पुंबा's picture

19 Sep 2017 - 12:05 pm | पुंबा

अहाहा!!
खुप सुंदर

चांदणे संदीप's picture

19 Sep 2017 - 1:56 pm | चांदणे संदीप

भारीच!

Sandy

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Sep 2017 - 2:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

एस's picture

19 Sep 2017 - 5:00 pm | एस

खोरण म्हणजे काय?

अनन्त्_यात्री's picture

20 Sep 2017 - 9:23 am | अनन्त्_यात्री

वड/पिंपळ वगैरे झाडांच्या बुंध्यापाशी पणती, दिवा वगैरे नीट ठेवता यावा म्हणून एखाद्या दगडात खोदून केलेला कोनाडा. हा शब्द कोकणात प्रचलित आहे.

धन्यवाद. कविता छान आहे. तालावर म्हणून पाहिली.

अनन्त्_यात्री's picture

25 Sep 2017 - 11:20 am | अनन्त्_यात्री

मनःपूर्वक आभार.

जेडी's picture

20 Sep 2017 - 9:34 am | जेडी

वाह! सुंदर

राघव's picture

20 Sep 2017 - 9:54 am | राघव

ते वादळ येईल फिरुनी, पण सावर तोल जरासा
ओठींचे स्मित लपवूदे, श्वासातील खोल उसासा

सुंदर! :-)

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Sep 2017 - 1:32 pm | माम्लेदारचा पन्खा

बहारदार . . . .

अनन्त्_यात्री's picture

21 Sep 2017 - 10:45 am | अनन्त्_यात्री

मनःपूर्वक धन्यवाद !