विचार

प्रशांतकवळे's picture
प्रशांतकवळे in जनातलं, मनातलं
6 Feb 2008 - 2:55 pm

हे लिखाण माझे नाही, मुळ लेखक / विचारवंत पण माहीत नाही.

१. ज्यांनी रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चाताप होतो, त्यांनी सरळ दुपारी उठावे.
२. माणसाने नेहमी स्पष्ट बोलावे, म्हणजे ऐकणार्‍याला स्पष्ट ऐकू जाते.
३. मूलभूत राजकीय पक्ष दोनच: सत्ताधारी, सत्ताकांक्षी
४. दोन जोडपी समोरासमोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या, दागिने बघतात, तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
५. मुलगा व नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
६. प्रेम आंधळे असतं, लग्न डोळे उघडतं.
७. देवा मला वाट पहाण्याची शक्ती दे..... आज, आत्ता, ताबडतोब!
८. काही माणसे जिवंत असतात, कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
९. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो.

लेखक्/विचारवंत - अनामिक.

मुक्तकसुभाषिते

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

6 Feb 2008 - 5:10 pm | विसोबा खेचर

विचार आवडले! वाचून अंतर्मूख झालो.. :)

तात्या.

प्राजु's picture

6 Feb 2008 - 8:27 pm | प्राजु

सकाळमध्ये ग्रॅफिटी मध्येही वाचलेले आहे.

- प्राजु

याच सारखे..
Practice makes man perfect. But no one is perfect .. the why practice???

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Feb 2008 - 9:59 pm | llपुण्याचे पेशवेll

काही अप्रतिम ग्राफीटी इथे द्यायचा मोह आवरत नाही.

तरुणांनो झाडांवर प्रेम करा . झाडाखाली नको..
तरुणांनो दारू सोडा, दारू आणि सोडा नको.

पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

7 Feb 2008 - 12:50 am | विसोबा खेचर

तरुणांनो दारू सोडा, दारू आणि सोडा नको.

हे आवडले..:)

आपला,
(बुधवार-शनवारचा वारकरी) तात्या.