वदनि पेग घेता ....

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
20 Aug 2017 - 3:52 am

सध्याच्या नवप्रथे प्रमाणे .....
© चामुंडराय, मिसळपाव.
(कृपया नशापाणी न करता, वारुणीला साथीला न घेता हे काव्य वाचू नये.
अतिबाल्य आणि अतिसंवेदनशील तसेच हे कंबख्त मैं पीता नही अश्या व्यक्तींनी हे काव्य वाचू नये.
विसू: Drink responsibly, Drive sober)
.
.

वदनि पेग घेता
चव घ्या चखण्याची ।

सहज किक बसते
मिळता पिण्या फुकाची ।

सातत्ये करि मैफिल
दारू हि झिंगब्रह्म ।

सुरापान नोहे
जाणिजे नशाकर्म ॥१॥

पेगवर पेग घेता
नाम घ्या साकियाचे |

पिताना स्मरण ठेवा
आम्हा बांधवांचे |

रम जीन व्हिस्की
सोनेरी पेय्य चषकात |

त्रास चिंता काळजी
विसरा या नशेत ॥२॥

वारुणी हि वैरिणी
असे जे सांगतात |

बियर वाईन टकिला
वर्ज्य मानतात |

स्मरण करुनी त्यांचे
दारू प्या खुशाल |

सुरापान करील
चित्तवृत्ती विशाल ॥३॥

अभंगविडंबन

प्रतिक्रिया

एस's picture

20 Aug 2017 - 4:10 am | एस

खी खी खी खी!

वारुणी उतरे आत।
करी घशा जळजळ।।
घेता अति - अतिकॉन्फिडन्से।
मग होई मळमळ।।
फिकर नका करू।
जनहास्यक्षोभकारुण्याची।।
वारुणी देई वृद्धा।
किक तारुण्याची।।
प्रतिभेस येई बहर।
रिचविता नीट।।
उचकी देत सुरादास।
पडे येऊनि झीट।।

जय जय वृद्ध संन्यासी समर्थ!

टवाळ कार्टा's picture

20 Aug 2017 - 4:45 pm | टवाळ कार्टा

मूळकवी आणि तुम्ही....धन्य =))

पगला गजोधर's picture

21 Aug 2017 - 4:36 pm | पगला गजोधर

बसुया

श्री चामुंडराये (पेग) भरवियले । श्री पगलाराये सुत्ताले गटकवियले ।

असं काहीसं करा.

उल्तानं's picture

21 Aug 2017 - 11:35 am | उल्तानं

आवडली हो ....

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Aug 2017 - 4:32 pm | ज्ञानोबाचे पैजार

दोन्ही कविता आवडल्या..
(बुढे बाबा का डायहार्ड फैन...)पैजारबुवा,

धर्मराजमुटके's picture

20 Aug 2017 - 12:50 pm | धर्मराजमुटके

कृपया नशापाणी न करता, वारुणीला साथीला न घेता हे काव्य वाचू नये.

हे न करता रचना वाचली आहे त्याबद्द्ल माफ करा.

पुंबा's picture

21 Aug 2017 - 12:44 pm | पुंबा

चीयर्स!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2017 - 12:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त जमलंय...!

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Aug 2017 - 1:50 pm | अमरेंद्र बाहुबली

वा वा वा! लई म्हणजे लईच फालतू!!

चामुंडराय's picture

22 Aug 2017 - 4:09 am | चामुंडराय

हे हे ... प्रतिसादाची सुरवात पहिल्या पेगला पूर्ण शुद्धीत असताना केली आहे आणि शेवट मात्र शेवटच्या पेगला वकार युनूस होउन लोळत असताना केला कि काय असे वाटते आहे :)

चामुंडराय's picture

26 Aug 2017 - 10:21 pm | चामुंडराय

एस -
वाव्वा सुरेख, धन्यवाद एक्का सर
आणखी कडवी वाढवा आणि एक जिल्बी येऊ देत.

टवाळ कार्टा, उल्तानं, सौरा, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे -
सगळ्यांचे आभार्स

पगला गजोधर -
भविष्यात संधी मिळाली तर जरूर बसू

श्री चामुंडराये पेग भरवियले । श्री पगलाराये सुत्ताले गटकवियले ।
श्री पक्षी-तीर्थ कट्टा करवियले I आमंत्रित सकल मिपा अभिजन I

धर्मराजमुटके -
हरकत नाही फक्त "रचना" आवडली का ते कळवा.

ज्ञानोबाचे पैजार -
बुढे बाबा का डायहार्ड फैन...
म्हणजे आपण दोघे एकाच पंथातले कि - जय हो बुढे बाबा मिपाडेरा पंथ.

जय जय पिवूबिअर स्मिर्नोफ्