क्रिकेट
इंग्रज गेले पण गुलामगिरी ची सवय भारतीयांत भिनवून.
याचं ऊत्तम उदाहरण म्हणजे क्रिकेट.
बाकी जगात नाही पण भारतीय ऊपखंडात हा खेळ अगदी डोक्यावर घेतला जातो.कामधंदे सोडून क्रिकेट मँच बघत बसणारे फक्त नी फक्त भारतातच सापडणार. जगातले ईन मीन अकरा देश हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतात. पण भारतीयांच्या बूध्दीवर काय गारूड केलंय ह्या खेळाणे देव जाने. ह्याचा फायदा Bcci सारख्या संस्थांनी उचलुन तिथल्या अधीकार्यांनी रग्गड कमाई केली. व करताहेत. आम्हा 125 कोटी भारतीयांना आँलीम्पीक मध्ये सुवर्णपदक न मिळाल्याची, फुटबॉल मध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा न भेटल्याची कोणतीच खंत नसते. पण भारत पाकिस्तान बरोबर हारला तर......हाय हाय. जसं स्वताच्या घरात कोणी मेल्यासारखं सुतंक पाळतील. बर ठीक आहे समोर पाकिस्तान होता म्हणून वाईट वाटलं वैगेरे पण ईतर खेळात पाकिस्तान सोबत हारल्यावर कसे ईतकं दुःख होत नाही???
मागे मारीया शारापोव्हा who is sachin tendulkar?? बोलल्यावरून तर कहरच झाला. समाजमाध्यमात यथेच्छ शिव्यांची लाखोली वाहिली गेली. पण क्रिकेट ला भारतीय उपखंडा बाहेर कोणी कुत्र विचारत नाही ह्यात तीची काय चुकी???...
शेवटी अतीक्रिकेट मुळे भारतात ईतर खेळांकडे दुर्लक्ष होतंय का?
आणि ह्या दुर्लक्षा मुळे 125 कोटी लोकसंख्येचा भारत आँलम्पीक सारख्या जागतीक स्पर्धांमध्ये पदकं मिळवायला कमी पडतोयं का?? मीपाकरांच मत??
क्रिकेट
गाभा:
प्रतिक्रिया
16 Aug 2017 - 10:57 pm | अभिजीत अवलिया
याचा
याच्याशी काय संबंध? जरा स्पष्टीकरण द्यावे ही विनंती.
16 Aug 2017 - 11:01 pm | विशुमित
तुमचे क्रिकेट बद्दलचे विचार पूर्वगृह दूषित आहेत असे वाटते.
तुम्ही वर दिलेल्या तोट्यांबरोबर फायदे पण खूप झाले आहेत.
16 Aug 2017 - 11:05 pm | अमरेंद्र बाहुबली
कोणते फायदे झाले??
18 Aug 2017 - 3:50 pm | विशुमित
हा घ्या क्रिकेटचा एक फायदा. प्रतिकूल परस्थितीत असून सुद्धा मेहनतीमुळे क्रिकेट ने त्यांना सर्व काही दिले. त्यांनी ही देशाची शान वाढवली आहे.
आय पी एल मुळे आणखी खेळाडूंना संधी मिळत आहे.
http://www.loksatta.com/krida-news/5-indian-cricketers-who-were-poor-and...
18 Aug 2017 - 8:19 pm | अमरेंद्र बाहुबली
अहो हे वयक्तीक फायदे झाले..... देशाचा काय फायदा झाला???
18 Aug 2017 - 8:56 pm | विशुमित
तुसी बहुत मजाकीया हो प्रा..!!
18 Aug 2017 - 9:00 pm | दशानन
तुम्ही देशासाठी काय केले? / करत आहात ते समजले तर आम्ही पण तेच करू, सांगा.
18 Aug 2017 - 9:13 pm | विशुमित
गोट्या देशी खेळ आहे का?
----------------
श्रीकृष्ण खेळत होता बरका गोट्या.
------------------
(बाळ सगुण गुणाचे तान्हे ग ..या गवळणीत आहे आहे उल्लेख.)
18 Aug 2017 - 9:17 pm | दशानन
तुम्हाला मिपाचे कमेंट फॉर्मेशन माहिती आहे का?
वरील माझा प्रतिसाद तुम्हाला नाही आहे, धाग्याकर्ता लेखकाला आहे, असो. त्यामुळे उत्तर देण्यास बांधील तसा ही नाही व असा ही नाही.
18 Aug 2017 - 10:39 pm | विशुमित
माहिती आहे हो.
समजा करो भाईजान...
18 Aug 2017 - 11:50 pm | अमरेंद्र बाहुबली
ऊगाच विषयबदल नको. हव तर माझ्या देशभक्ती बद्दल वेगळा धागा काढा. पण माझ्या वरील प्रश्नांची उत्तरे द्या.
16 Aug 2017 - 11:13 pm | अमरेंद्र बाहुबली
माझे क्रिकेट बद्दल मत पुर्वग्रहदुषीत नाहीत. मलाही क्रिकेट खेळायला आवडतं. व खेळतोही ऊत्तम. पण एखाद्या खेळाचा किती स्तोम माजवायचा याला काही मर्यादा??
16 Aug 2017 - 11:04 pm | अमरेंद्र बाहुबली
क्रिकेट हा खेळ भारतात कोणी आणला??
इंग्रज भारतात येण्याआधी भारतात क्रिकेट खेळलं जायच का??
क्रिकेट हे मानसिक गुलामगिरीचच प्रतिक.
17 Aug 2017 - 6:34 am | अभिजीत अवलिया
मग त्या हिशोबाने रेल्वे, पोस्ट आॅफिस सुध्दा मानसिक गुलामगिरीचे लक्षण मानले पाहिजे. नाही का?
17 Aug 2017 - 10:28 am | अमरेंद्र बाहुबली
का? इंग्रज येण्याआधी भारतात पत्र पाठवत नव्हते का??
17 Aug 2017 - 11:51 am | अभिजीत अवलिया
पत्र पाठवत होते पण ते पोस्ट खात्यामार्फत नाही. पोस्ट खाते माझ्या माहितीप्रमाणे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने सुरु केले.
19 Aug 2017 - 7:24 pm | पगला गजोधर
"सती प्रथा इंग्रजांनी बंद केली", व ती अजूनही बंद आहे, हे मानसिक गुलामगिरिच प्रतीक मानावे का ?
19 Aug 2017 - 8:04 pm | गामा पैलवान
सतीप्रथा? हे काय असतं?
-गा.पै.
19 Aug 2017 - 8:36 pm | पगला गजोधर
कित्ती कित्ती निरागस प्रतिसाद ?
गा पै, म्हणजे मिपावरचा "पाठकबाईंचा राणाचं" जणु
20 Aug 2017 - 1:03 am | गामा पैलवान
प.ग.,
अहो, आहेच मुळी मी निरागस. सती नामे कोणतीही प्रथा वैदिक परंपरेत अंतर्भूत नाही. अहल्या‚ द्रोपदी‚ कुंती, तारा आणि मंदोदरी या पंचकन्यांपैकी कोणीही सती गेल्या नव्हत्या. तुम्हाला विधवा जाळून तिची संपत्ती हडप करण्याविषयी काही म्हणायचं आहे का? पण त्याचा सतीशी कसलाही संबंध नाही.
आ.न.,
-गा.पै.
20 Aug 2017 - 8:16 am | पगला गजोधर
अहिल्या‚ द्रोपदी‚ कुंती, तारा आणि मंदोदरी या पंचकन्या, यांच्या उगम / निष्पति वैदिक परम्परेत आहे, है आपल्याकडून जाणून धन्य ज़ाहलो.
आणि
सतीप्रथा
वैदिक परंपरेत अंतर्भूत नसताना हजारो भारतीय स्त्रियांना धर्माच्या नावाखाली जाळणारे आणि
तुमच्या महान वैदिक संस्कृतिल काळीमा फसणारे, इतिहासातील हे धर्मरक्षक को ? हे शोधणे
तुमच्या हातून होईल का ? का सतीप्रथा सुद्धा इंग्रजांनी सुरु केली ???
20 Aug 2017 - 10:33 pm | गामा पैलवान
प.ग.,
फक्त वैदिक परंपरा म्हणजे हिंदू धर्मातच या पंचकन्यांना पुजतात. उत्पत्ती निष्पत्ती बिष्पत्ती वगैरे कुठून उगवली?
बाकी धर्माच्या नावाखाली अत्याचार करून धर्माला बट्टा लावणारे जे कोणी असतील त्यांना सरळ करायला आम्ही समर्थ आहोत. आपण वृथा चिंता करू नये. मात्र आपण दाखवलेल्या आस्थेबद्दल धन्यवाद.
आ.न.,
-गा.पै.
16 Aug 2017 - 11:04 pm | अमरेंद्र बाहुबली
क्रिकेट हा खेळ भारतात कोणी आणला??
इंग्रज भारतात येण्याआधी भारतात क्रिकेट खेळलं जायच का??
क्रिकेट हे मानसिक गुलामगिरीचच प्रतिक.
16 Aug 2017 - 11:08 pm | विशुमित
इंग्रज भारतात येण्याआधी भारतात क्रिकेट खेळलं जायच का??
==> कालिया मर्दन च्या वेळेस श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांबरोबर क्रिकेट खेळत होता, ही कथा ऐकली होती.
भारतातील क्रिकेटचा जनक आणि प्रसारक कोण होता/होते हे नाही माहित.
16 Aug 2017 - 11:18 pm | अमरेंद्र बाहुबली
तसं असतं तर देशी खेळात क्रिकेटचाही समावेश असता.
17 Aug 2017 - 3:48 pm | mayu4u
श्रीकृष्ण? क्रिकेट?
बरोबर आहे मग, समर्थ रामदास नक्कीच आदिलशाहाचे हेर असल्याचं तुम्ही वाचलं असणार!
17 Aug 2017 - 5:02 pm | विशुमित
आळंदीच्या संस्थेत शिकवून पढवून धाडलेल्या कीर्तनकारांनी ह्याच स्टोऱ्या सांगितल्या आहेत आम्हाला लहानपणापासून. कथा अशी होती-
कालिया नाग मग्रूर झाला होता. त्याला धडा शिकवण्यासाठी श्रीकृष्णाने यमुने काठी चेंडू फळीचा डाव मांडला. कृष्णाने मुद्दाम चेंडू जोरात मारला आणि तो ढोहात गेला. मग त्याने कदम वृक्ष वरून पाण्यात उडी घेतली. पुढे काय झाले हे सर्वाना माहित आहे. ते कीर्तनकार मग आम्हाला आवर्जून सांगायचे, त्यावेळेस पण क्रिकेट होते बरका (त्या पुष्पक विमानासारखं). आम्ही नुसतं माना हालवायचो.
आम्ही कशाला श्लोक आणि ओव्या धुंडाळायला गेलोय म्हणा.
(अवांतर : एकदा आमचे अगदी चांगले संबंध असलेल्या कीर्तनकारांना सहज म्हंटले 'खरंच तुकाराम महाराज विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले होते का?'
ते म्हणाले "तु आम्हाला लोकांचे जोडे खायला लावणार दिसतेय'. म्हंटले ' जे सांगत आला आहात तेच सांगा लोकांना, शेवटी तुमची रोजी रोटी त्यावरच चालू आहे)
18 Aug 2017 - 10:43 am | mayu4u
... सामान्यांचा बुद्धिभेद केल्याबद्दल एवढी शिक्षा व्हायलाच हवी.
17 Aug 2017 - 7:19 pm | तेजस आठवले
मी पण चेंडू -फळी आणि विटी -दांडू हे दोन खेळ श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांबरोबर खेळत असताना चेंडू / विटी डोहात गेली अशी दोन्ही कथानके ऐकली आहेत. ख खो दे जा.
17 Aug 2017 - 8:06 pm | अभ्या..
असणार असणार, कान्हा असणार.
त्याच्यावरुन तर टीम इंडीयाचा कलर ब्ल्यु घेतला असणार.
19 Aug 2017 - 7:16 pm | पगला गजोधर
चला
तेजस आठवालेंनी, चेंडू फळी ला दुजोरा दिला नं,
म्हणजे ख़रच बुद्धिभेद वैगरे काही नसनार.
16 Aug 2017 - 11:23 pm | थॉर माणूस
खेळांकडे दुर्लक्ष होतं खरं. हेच बघा ना, भारतातल्या सर्वात लोकप्रिय खेळाविषयी देखील तुम्हाला नीटशी माहीती दिसत नाही, इतर खेळांची अवस्था याहून बिकटच असणार.
बाकी, इतर देशात क्रिकेटसाठी नसले तरी दुसर्या खेळांसाठी वेडे लोक आहेत आणि ते सुद्धा कामधंदे सोडून घरी किंवा स्पोर्टस बार मधे बसून खेळ पहातात बरं. तिथल्या संस्थांनी बीसीसीआय प्रमाणेच रग्गड कमाईसुद्धा केलेली आहे. आणि त्यांना सुद्धा इतर खेळांमधल्या कामगीरीची फारशी खंत नसते. (फूटबॉलसारख्या खेळात तर देशापेक्षा क्लबशी बांधीलकी जास्त असते, देशाला पाठींबा फिफा टूर्नामेंटस मधे)
पुर्वीच्या काही अनुभवांमुळे अशी टीका करणार्यांना मुळात इतर खेळातल्या भारतीय खेळाडूंविषयी प्रत्यक्ष विजय मिळून प्रसिद्ध होण्याआधी किती माहीती किंवा ममत्व असते याविषयी मला नेहमी शंका वाटते.
सो चील्ल माडी... आपल्याला जो आवडतो त्या खेळाची मजा लुटावी आणि आनंदी रहावं. उगाच नको तिथे अतीदेशप्रेम घुसवून त्रास करून घेऊ नये. :)
16 Aug 2017 - 11:39 pm | अमरेंद्र बाहुबली
खेळांकडे दुर्लक्ष होतं खरं. हेच बघा ना, भारतातल्या सर्वात लोकप्रिय खेळाविषयी देखील तुम्हाला नीटशी माहीती दिसत नाही, इतर खेळांची अवस्था याहून बिकटच असणार.
??
आपल्याला जो आवडतो त्या खेळाची मजा लुटावी आणि आनंदी रहावं. उगाच नको तिथे अतीदेशप्रेम घुसवून त्रास करून घेऊ नये.
माझा प्रश्न होता ईतर खेळांकडे दुर्लक्ष होत का??
व आँलंपीक मध्ये पदकं मिळवण्यात भारत कमी पडतोय का??
ह्याची ऊत्तरे न देता. ऊगाच मी अतिदेशप्रेमी आहे वैगेरे......
माझं वैयक्तिक जाऊद्या. तुमचं क्रिकेटप्रेमही समजू शकतो.पण क्रिकेट मुळे होणार्या ईतर खेळांच्या नुकसानाबद्दल काय??
महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणारा भारतं एका सुवर्ण पदका साठी तरसतो. ह्या बद्दल तुम्हाला काहीच वावगं नाही वाटतं??
17 Aug 2017 - 12:12 am | थॉर माणूस
होतंच ना... मी फक्त असं दुर्लक्ष होतं ते तुमचेच उदाहरण देऊन दाखवले इतकेच. क्रिकेटबद्दल केवढे टीपीकल विचार दाखवलेत तुम्ही. अहो जगात शेकडो खेळ आहेत, म्हणून काय सगळेच बघायचे आणि सगळ्याच खेळात देशाने पदके मिळवली पाहीजेत असा हट्ट करायचा का? जर एखाद्या खेळाबद्दल लोकांना आकर्षण नसेल वाटत तर राहीलं, आपल्याला तर वाटतं ना? मग आपण पहायचे ते खेळ आणि खेळाडूंना पाठींबा द्यायचा. बाकीचे पहात नाहीत पाठींबा देत नाहीत म्हणून काय उपयोग?
आणि आँलिंपीकचं म्हणाल तर इथे शहरे आयोजक बनायला सुद्धा कचरत आहेत आजकाल, होणारा खर्च बघून. मान्य आहे की ही पदके खेळाडूच नव्हे तर देशासाठीसुद्धा गौरवाची बाब असते. पण म्हणून लोकांवर ते पहाण्याची जबरदस्ती तर नाही ना करु शकत? तुम्हाला तरी माहिती होती का हो आपल्या ऑलिंपीक चमूतल्या सर्व खेळाडूंची नावे? का तुम्ही सांगू शकत होतात कुठले खेळाडू कुठल्या फेरीपर्यंत मजल मारू शकतील? त्यातल्या किती खेळाडूंना तुम्ही आधीपासून फॉलो करत होतात?
इतक्या हिरीरीने विषय मांडतो आपण, पण किती खेळांच्या सामन्यांना आपण प्रत्यक्ष क्रिडांगणावर जाऊन हजेरी लावतो? कितीवेळा या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी धडपडतो? आपल्या मुलांना अशा दुर्लक्षीत खेळांमधे करीयर करायला असल्या कमेंट देणार्यांपैकी किती लोक प्रोत्साहन देतील? आणि यातल्या फारशा गोष्टी आपण करत नसू तर नुसतं वावगं वाटून काय उपयोग?
बाकी मी क्रिकेटप्रेमी आहे हा शोध कसा लागला ते माहिती नाही, पण क्रिडाप्रेमी आहे. शालेय संघांमधे क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, कबड्डी, फूटबॉल खेळून झालंय. आजही शक्य असेल तेव्हा वेगवेगळे खेळ खेळत असतो, उलट मित्रांमुळे टेबल टेनीस, लॉन टेनीस, स्नूकर सारख्या खेळांची भरच पडली आहे. त्यामुळे असेल कदाचित पण कुठल्या एका खेळाविषयी अतीप्रेम किंवा आकस कधी निर्माण नाही झाला. हार जीत हा खेळाचा भाग आहे आणि जोवर खेळाडू आपले सर्व कौशल्य लावून खेळतोय तोवर त्याला दाद दिलीच पाहीजे इतकेच मला कळते.
17 Aug 2017 - 2:25 am | रामपुरी
मलाही क्रिकेट अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा मला रेड्याबरोबर कुस्ती खेळायला आणि धबधब्यातून गिर्यारोहण करायला आवडते.
तुम्हाला कुठला खेळ आवडतो?
17 Aug 2017 - 11:02 am | अमरेंद्र बाहुबली
मला तलवारबाजी व कुर्हाडबाजी आवडते.
17 Aug 2017 - 8:45 am | अत्रे
क्रिकेटकडे दुर्लक्ष करायचे असेल तर मग दुसऱ्या खेळावर धागे काढा :) क्रिकेटवरच किती चर्चा करणार?
17 Aug 2017 - 10:09 am | अमरेंद्र बाहुबली
क्रिकेट मुळे ईतर खेळांकडे दुर्लक्ष होतय. एक हरीयाणा राज्य सोडलं तर किती राज्ये ईतर खेळांकडे लक्ष देतात??
ईतर खेळातील खेळाडूंची अवस्था बघा.
आम्ही तर ईतके निर्लज्ज की हाँकी चे जादुगार मेजर ध्यानचंद ऐवजी सचीन तेंडुलकरांना भारतरत्न द्यायला निघतो. का तर क्रिकेट लोकप्रिय खेळ आहे म्हणून. पार नियम मोडून बदलून रगडून......
17 Aug 2017 - 10:09 am | अमरेंद्र बाहुबली
क्रिकेट मुळे ईतर खेळांकडे दुर्लक्ष होतय. एक हरीयाणा राज्य सोडलं तर किती राज्ये ईतर खेळांकडे लक्ष देतात??
ईतर खेळातील खेळाडूंची अवस्था बघा.
आम्ही तर ईतके निर्लज्ज की हाँकी चे जादुगार मेजर ध्यानचंद ऐवजी सचीन तेंडुलकरांना भारतरत्न द्यायला निघतो. का तर क्रिकेट लोकप्रिय खेळ आहे म्हणून. पार नियम मोडून बदलून रगडून......
17 Aug 2017 - 10:52 am | गॅरी ट्रुमन
लोकांना क्रिकेट सोडून इतर खेळ आवडलेच पाहिजेत अशी सक्ती कशी करता येईल? कुठल्या का कारणामुळे असेना, भारतात क्रिकेटच सर्वात लोकप्रिय आहे हे कसे नाकारणार? जर का उद्या लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आणि पाच-तीन-दोन ला सध्या क्रिकेटला आहे तशी लोकप्रियता मिळाली तर बी.सी.सी.आय भिकेला लागेल आणि ५-३-२ चे बोर्ड अतीश्रीमंत होईल.
क्रिकेटची लोकप्रियता ही सगळी जाहिरातींची करामत आहे असेही म्हणता येणार नाही. उद्या कितीही जाहिराती केल्या तरी बाली बेटावरील केकाक नृत्य भारतात लोकप्रिय होईल असे मानायचे काही कारण नाही. त्यातूनही क्रिकेटपेक्षा जास्त चांगला पर्याय सापडला तर त्यालाही लोकप्रियता मिळेलच.
दुसरे म्हणजे केवळ भारतीय उपखंडात क्रिकेट जास्त लोकप्रिय आहे (वेस्ट इंडिजमधले देश दक्षिण अमेरिका खंडातही आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड हे भारतीय उपखंडात येत नाहीत. तरीही असोच) आणि इतर जगात क्रिकेटला कोणी विचारत नाही हे आपल्याला क्रिकेट का आवडतो हा प्रश्न पडायचे कारण असू नये. आपण आपल्याला आवडते ते करायचे की इतरांच्या तालावर नाचायचे? या बाबतीत अमेरिकन लोकांना मानले. त्यांच्या अमेरिकन फुटबॉलला अमेरिकेबाहेर फार कोणी विचारत नाही . तरीही ते तो खेळ अगदी जल्लोषात खेळतात. विद्यापीठात जर आपले विद्यापीठ विरूध्द दुसरे विद्यापीठ अशी अमेरिकन फुटबॉलची मॅच असेल तर अगदी जल्लोषाचे वातावरण असते. आपल्याला आवडते ना मग ती गोष्ट करायची. इतर लोक गेले तेल लावत.
मला स्वतःला तरी सायबाची भाषा आणि सायबाने दिलेला हा खेळ या दोन्ही गोष्टी खूप आवडतात. भले मग ते कुणाला गुलामगिरीचे प्रतिक वाटो.
17 Aug 2017 - 11:00 am | अमरेंद्र बाहुबली
मी कुठे म्हटलय की क्रिकेट आवडू देऊ नका असं?? माझा प्रश्न हा आहे की ईतर खेळांकडे आम्ही का ईतक दुर्लक्ष करतोय. लोकांच्या करमणूकी साठी क्रिकेट ठीक आहे. पण जिथे देशाला सन्मान मिळतो अशा स्पर्धात आपण आज कुठे आहोत?? याला कारण अतीक्रीकेट हे नाही का??
17 Aug 2017 - 12:50 pm | दुर्गविहारी
क्रिकेट हा खेळ बहुंताशी जिथे ईंग्रजांच्या वसाहती तिथेच रुजला हे सत्यच आहे. पण ती गुलामगिरीची निशाणी नक्कीच म्हणता येणार नाही. कारण ईंग्रज गेल्यानंतर सत्तर वर्षे क्रिकेट खेळण्याची आपल्यावर कोणीही सक्ती केलेली नाही. मी त्या काळात नसल्यामुळे नक्की सांगता येणार नाही, पण सुरवातीला क्रिकेट नक्कीच आत्ताईतके लोकप्रिय नसावे. नाही म्हणायला पंचरंगी सामने, विजय हजारे, कर्नल सि.के. नायडू ह्यांच्या विषयी वाचायला मिळते. पण बाकी खेळही तितकेच लोकप्रिय होते. पण एखादा खेळ लोकप्रिय व्हायला हिरो लागतो, १९८३ ला वर्ड कप जिंकल्यानंतर भारतीय मातीत क्रिकेट खरे रुजले, त्या आधी हॉकी असेल. पण एकीकडे क्रिकेट्चा अतिरेक म्हणत असताना दोन महिन्यापुर्वी आपण आपल्या महिला क्रिकेट टिमधल्या मुलींची नावे तरी माहिती होती का? त्या फायनलला पोहचल्या आणि मुख्य म्हणजे मिडीयाने त्यांना उचलून धरले आणि जरी त्या उपविजेती ठरल्या असल्या तरी एका रात्रीत कोट्याधीश झाल्या. आता यामुळे क्रिकेट कोचिंग क्लबमधे मुलींच्या अॅडमिशन वाढल्याचे सांगलीच्या स्मॄती मांधनाने सांगितले. तेव्हा खेळ लोकप्रिय व्हायचा असेल तर हिरो पाहिजे.
आणि बाकीच्या खेळाकडे दुर्लक्ष होयत हे मला तरी पटत नाही. प्रो-कब्बडी लिगमुळे कब्बडीला ग्लॅमर आलेच कि. कब्बडीमधे करियर करायचा खेळाडू विचार करताहेत. सायना नेहवाल, पी. सिंधु यांच्यामुळे बॅडमिंग्टनला लोकप्रियता लाभलीच कि. विश्वास बसणार नाही पण बॅड्मिंगट्नचा शोध पुण्यात लागलाय, पण त्या खेळात आज चीनचे खेळाडू किती पुढे आहेत ते सांगायची आवश्यकता नाही. भारतातच हिमाचलप्रदेशात शोध लागलेल्या टेबल टेनिस मधे आपली अवस्था काय आहे? पण एखादा खेळाडू चमकेल आणि ते ही लोकप्रिय होईल अशी आशा करूया. आधी किती लोक जिम्नॅस्टिक बघायचे, पण दिपा कर्माकरमुळे निदान हे करीयर असू शकते हे समजलेच कि नाही. आज सांगलीसारख्या छोट्या शहरात बुध्दीबळाच्या उत्तम दर्जाच्या स्पर्धा होतात. सायकलिंगसारखे खेळात बरेच मि.पा.करही सामिल आहेत. मेरी कोम आणि विजेंदर मुळे बॉक्सिंगकडेही युवा वर्ग वळतोय. नरसिंह यादव, सुशील कुमार आणि फोगट भगिनीमुळे कुस्ती हा रोजीरोटीसाठी चांगला पर्याय होउ शकतो हा संदेश खेडोपाडी गेला आहे. तेव्हा सारेच दिप मंदावले म्हणायचे कारण नाही. हळुहळु पण निश्चितपणे ईतर खेळांची लोकप्रियता वाढते आहे. नेमबाजी हे त्याचे उत्तम उदाहरण.
बाकी क्रिकेटविषयी बोलायचे तर ज्या पध्द्तीने आपण चॅम्पीयन ट्रॉफित पाकिस्तान विरुध्द हरलो आणि नंतर कुंबळे प्रकरण, यामुळे त्यानंतर भारतीय पुरुष संघाची एकही मॅच बघीतली नाही. खेळाडू खेळापेक्षा मोठे होत असतील तर र्हास नक्की. बघुया काय होते आहे.
17 Aug 2017 - 1:48 pm | अमरेंद्र बाहुबली
नक्कीच दुवि सर.... क्रिकेट च्या अतीरेकीकरणामुळे आता खेळाडू प्रशिक्षक ठरवायला लागलेत. खेळा पेक्षा खेळाडू मोठे होताहेत.स्वतः मेरी कोम पेक्षा प्रियंका चोप्रा ने सिनेमा बनवून जास्त पैसे कमावले.... ईतर खेळातील खेळाडूंची आर्थिक स्थिती पाहिली तर कोणते पालक आपल्या पाल्याला ईतर खेळात भविष्य घडवायला सांगतील??
17 Aug 2017 - 1:50 pm | वकील साहेब
इंग्रजांनी क्रिकेट हा खेळ आणला त्या वेळची कारणे आणि परिस्थिती वेगळी असेल. दोन भिन्न संस्कृतीच्या लोकांची भेट झाल्यावर संस्कृतींच आदान प्रदान होणे हे अपरिहार्य ठरते. तसे ते होतच राहते. (थंड हवेच्या ठिकाणी वास्तव्यास म्हणून इंग्रज महाबळेश्वर ला जायचे तेव्हा त्यांनी तेथे स्ट्रॉबेरी ची लागवड केली होती म्हणे आणि तेव्हा भारताला स्ट्रॉबेरी कळली होती असे म्हणतात खरे खोटे त्या इंग्रजांनाच माहीत) त्या अर्थाने क्रिकेट भारतात आले रुजले बास इतकेच.
पण ते वाढले फोफावले ते वेगळ्या कारणामुळे. क्रिकेट या खेळात प्रचंड पैसा आहे आणि त्यासाठी लोक वेडी होतात हे कळल्यावर तो एक खेळ न राहता त्याच प्रचंड व्यापारीकरण सुरू झाल. जे आजच्या रूपात आपल्याला दिसत आहे.
इतर खेळ आहेत हे मान्य आहे पण त्याला राजाश्रय आणि ग्लॅमर (वलय की काय म्हणतात ते ) नसल्याने आपल्या देशातली तरुण पिढी त्याकडे जास्त वळत नाही. परवाच दही हंडी चे उंचच उंच थर बघतांना मनात विचार आला होता की केवळ 10 -11 लाख रूपयांकरिता आपला जीव सूध्द्धा धोक्यात घालणारी ही पोर ऑलिंपिक मधले साहसी खेळ करून स्वत: च आणि त्या बरोबरीने देशाच नाव उज्ज्वल का करत नाही ? त्यांच्यात तेवढी धमक असते. पण इतर खेळांना या देशात दही हंडी इतकही प्रोत्साहन दिल जात नाही. ते तस शासकीय पातळी वरून का दिल जात नाही तर त्यामुळे लोकांचं क्रिकेट कडे दुर्लक्ष होऊ शकत म्हणून. आणि त्यामुळे पैशाचा स्त्रोत कमी होऊ शकतो म्हणून. आता कबड्डीला उचलून धरलं जातंय. काही वर्षांनी याचे परिणाम दिसायला लागतील. पोर गल्ली गल्लीत रस्त्यावर कबड्डी खेळायला सुरवात करतील. आणि मग जेव्हा कबड्डी फुल्ल फॉर्म मध्ये येईल तेव्हा मा. शरद पवार BCKI (Board of Control for Kabbadi in India) चे अध्यक्ष होतील.
आपल्याला आवडत म्हणून आपण क्रिकेट पाहण यात काहीच गैर नाहीये पण एक गोष्ट लक्षात घेण्या सारखी आहे की आपल्याला तेच आवडत जे आपल्याला सातत्याने दाखवलं जात. आपल्या मुलांना छोटा भीम आवडतो आणि मिकी माऊस कडे ते ढुंकूनही बघत नाही आणि आपल्या लहानपणी आपण मिकी माऊस वरून जीव ओवाळून टाकत होतो. का तर आपल्याला तोच जास्त दाखवला जात होता म्हणून. आपण तेच वाचतो जे आपल्याला वाचायला दिले जाते याच धर्ती वर आपण असे म्हणू शकतो की आपण तेच बघतो जे आपल्याला बघायला दिले जाते.
कुणी म्हणेल ठीक आहे तसे का असेना पण तो एक खेळ च तर आहे. परंतु फक्त एकाच खेळाकडे लक्ष दिल्यामुळे 125 कोटी भारतीया मधून केवळ 11 जणांनाच आपले कसब दाखवण्याची संधी मिळते. बाकीच्या लोकांपैकी काहींना गोळा फेकीत गती असूनही प्रोत्साहन, निकोप वातावरण आणि उज्ज्वल भविष्य नसल्याने ते ती कला माळावरती म्हशी वळण्या साठी अमलात आणत आहेत.
17 Aug 2017 - 2:51 pm | अमरेंद्र बाहुबली
अगदी सहमत वकील साहेब. क्रिकेट हा खेळ उरला नसून तो एक व्यापार झालाय. क्रिकेट लोकप्रिय आहे म्हणून दाखवला जातो असं नसून त्याचा सातत्याने भडिमार केला जातो म्हणून तो प्रसिध्द आहे. आपली समर्थनात पहीली प्रतिक्रिया धन्यवाद.
18 Aug 2017 - 8:46 am | फारएन्ड
बाहेर नसेल कुत्र विचारीत, भारताने का फिकीर करावी? आपल्याला आवडतो खेळ तर खेळावा, बघावा. फुटबॉल असा काय भारी खेळ आहे की भारताने इण्टरेस्ट नसताना त्यात पडावे? भारत खेळत नाही, अमेरिका खेळत नाही, चीन नक्की काय खेळतो कोणालाच माहीत नाही. अर्धी लोकसंख्या इथेच झाली. बाकी लोक काय खेळतात आपण कशाला चिंता करावी?
आता क्रिकेट वाल्यांनी ऑलिम्पिक वाल्यांना रोखले आहे का चांगला परफॉर्मन्स देण्यापासून? सरकारचे क्रीडा खाते आहे ना त्यांच्याकरता? क्रिकेट तर सरकारवरही अवलंबून नाही. ऑलिम्पिक मधल्या बेकार कामगिरीचे कारण आयओसी मधले राजकारण, खुजे लोक आणि भ्रष्टाचार आहे. क्रिकेटचा काही संबंध नाही.
बाकी मारिया कोण लागून गेली आहे? सचिन माहीत नसलेल्या लोकांपेक्षा मारिया माहीत नसलेले लोकच जास्त असतील.
बाय द वे क्रिकेट हा फुटबॉल खालोखाल जगातील नं २ चा लोकप्रिय खेळ आहे.
18 Aug 2017 - 12:13 pm | अमरेंद्र बाहुबली
असं कोण सक्ती करतयं की क्रिकेट बघु नका. मी एवढच म्हणतोय की क्रिकेट कडे जास्त लक्ष दिल्याने बाकी खेळांकडे दुर्लक्ष होतंय. आपण ईतर खेळातील खेळाडूंना पायाभूत सुविधा पुरविण्यात अपुरे पडतोय. व त्यामुळे आँलंपीक सारख्या स्पर्धेत कमी पडतोय. अमेरीकेत फुटबॉल लोकप्रिय आहे म्हणून त्यांनी बाकी खेळांकडे आपल्यासारखंच दुर्लक्ष केलयं का??
18 Aug 2017 - 10:11 pm | थॉर माणूस
हो. :)
अमेरीका अजुनही फूटबॉलमधे मागेच आहे, क्रिकेटमधे मागेच आहे, फिल्ड हॉकीमधे मागेच आहे, टेबल टेनिस मधे मागेच आहे, बॅडमिंटन मधे मागेच आहे, अनेक खेळ आहेत ज्यात ते पहिल्या दहा मधे दिसत सुद्धा नाहीत. ऑलिंपीक हा प्रतिष्ठेचा विषय निव्वळ कोल्ड वॉरमुळे बनला आणि सर्व ऑलिंपीक विजेत्यांना फार मोठे स्टारडम मिळत नाही, काही ठराविक जणांनाच मिळते.
बाकी, क्रिकेट हा जगातल्या पहिल्या ३ खेळात येतो बरं लोकप्रियतेत. आणि अधिकृत रित्या १०७ देश दरवर्षी कुठल्या ना कुठल्या स्पर्थेत आपल्या डिवीजन मधुन वरच्या डिवीजन मधे येण्याचा प्रयत्न करत असतात, एक दिवस आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी.
कुणा लोकांचे एका खेळाकडे लक्ष दिल्याने इतरांकडे दुर्लक्ष होत असेल तर सुधारणेची गरज अशा लोकांना आहे.
18 Aug 2017 - 1:18 pm | गामा पैलवान
अमरेंद्र बाहुबली,
मला वाटतं की क्रिकेटच्या प्रत्येक तिकिटावर व/वा अन्य उत्पन्नाच्या बाबीवर देशी खेलोत्तेजनार्थ १% कर बसवावा.
आ.न.,
-गा.पै.
19 Aug 2017 - 7:20 pm | पगला गजोधर
जी एस टि, नंतर असं, वेगळा टॅक्स लावता येईल मोदीजी / जेटलीजी यांना ????
19 Aug 2017 - 8:34 pm | अमरेंद्र बाहुबली
बरोबर गा.पा. साहेब! आणी देशी वाहीणीवर क्रिकेट दाखवणे ही बंद व्हावे!
20 Aug 2017 - 10:51 am | दुर्गविहारी
अश्या रितीने क्रिकेटच्या धाग्याने अर्धशतकी मजल मारल्याबध्ध्ल अमरेंद्र बाहुबली यांनी गदा, आपलं बॅट उंचावून मि.पा.करांना धन्यवाद द्यावा.
20 Aug 2017 - 2:22 pm | अमरेंद्र बाहुबली
हा हा हा! :-)
20 Aug 2017 - 2:26 pm | पगला गजोधर
50 निम्मित
कट्टप्पाच्या टपरिवारिल 1 कटिंग देऊन अभिनंदन
2 Aug 2024 - 5:17 pm | अमरेंद्र बाहुबली
१४० कोटीच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या देशाची पदकासाठी वणवण अजूनही सुरू आहे. पदतालिकेत एक दोन कांस्य रौप्य सह भारत ४४ व्या स्थानावर आहे. ह्याला कारण फालतू खेळ क्रिकेट नी भारतीयांचे मूर्ख क्रिकेटप्रेम आहे हे अजूनही भारतातील लोकांना उमगले नाहीये.
5 Aug 2024 - 7:05 pm | नठ्यारा
अमरेंद्र बाहुबली,
या बाबतीत तुमचं बरोबर दिसतं आहे. मात्र यावर क्रिकेट हाच उपाय असू शकतो. क्रिकेटच्या प्रत्येक तिकिटावर व प्रक्षेपणाच्या प्रत्येक व्यवहारावर क्रीडाकर बसवून तो पैसा इतर खेळांच्या विकासासाठी वळवता येऊ शकेल. काय म्हणता?
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
7 Aug 2024 - 8:03 am | चौकस२१२
हे बरोबर आहे , तसे असेल हि कोणाला माहिती आहे का? पण मुळातच मैदानी खेळासाठी सरकार बरोबर जनतेत हि काहीतरी असले पाहिजे नुसते सरकार वर ओरडून काय होणार ?
पोषक वातवरण सगळ्याच खेळांना सगळ्याच देशात समानतेने कसे होईल , युनाइटेड किंग्डम मध्ये फुटबॉल जेवढा प्रसिद्ध आहे तेवढा त्यांची वसाहत म्हणून सुरु झालेल्या ऑस्ट्रेलियात किंवा कॅनडात नाही !
निसर्ग म्हणा किंवा .....
असो ... मूळ धागा कर्त्याला चर्च ऐवजी राळ उठवण्यात जास्त रस दिसतोय
7 Aug 2024 - 9:22 am | कॉमी
खेळ आनंदासाठी असतो. जर लोकांना क्रिकेट मध्ये आनंद मिळत असेल तर ते क्रिकेटच बघणार. ऑलिम्पिक मेडल नही मिळाले तर नही मिळाले. इतका त्रागा करण्यासारखे त्यात काय आहे?
7 Aug 2024 - 10:05 am | अमरेंद्र बाहुबली
लोकाना जाणून बुजून फक्त क्रिकेट दाखवलं जातं, इतर खेळातील खेळाडूंकडे सरकार लक्ष देत नाही त्यामुळेच मेडल्सची वानवा आहे. क्रिकेटर्स वर सरकार दौलतजादा करत असते पण इतर खेळाडूना लाथडले जाते, धनराज पिल्लेना सरकारने जाहीर करूनही घर दिले नव्हते, सरकारी ऑफिसमध्ये अनेक चकरा मारल्या त्यांनी. ऑलिम्पिक गाजवणारे महान खेळाडू मेजर ध्यानचंद ह्यांच्या जागी सचिन तेंडुलकर सारख्याला भारतरत्न देण्यात आला. असे भेदभाव करणारे हरा* सरकारे भारतात असतील तोपर्यंत इतर खेळात मेडल मिळवायची आशा सोडून द्यावी.
8 Aug 2024 - 6:12 am | चौकस२१२
हे बरोबर आहे , तसे असेल हि कोणाला माहिती आहे का? पण मुळातच मैदानी खेळासाठी सरकार बरोबर जनतेत हि काहीतरी असले पाहिजे नुसते सरकार वर ओरडून काय होणार ?
पोषक वातवरण सगळ्याच खेळांना सगळ्याच देशात समानतेने कसे होईल , युनाइटेड किंग्डम मध्ये फुटबॉल जेवढा प्रसिद्ध आहे तेवढा त्यांची वसाहत म्हणून सुरु झालेल्या ऑस्ट्रेलियात किंवा कॅनडात नाही !
निसर्ग म्हणा किंवा .....
असो ... मूळ धागा कर्त्याला चर्च ऐवजी राळ उठवण्यात जास्त रस दिसतोय
5 Aug 2024 - 8:18 pm | कर्नलतपस्वी
व्वा अबा हे मात्र बाकी खरं. क्रिकेट गायरान आहे. चरायला भरपूर ......
7 Aug 2024 - 6:13 am | चौकस२१२
हा प्रश्न विचारात घेण्यासारखा आहे , पण त्यात काही नवीन नाही , जसे पुण्यात दोन प्रकारचे लोक असतात एक चितळेंना त्यांचे उत्पादन ना बघता बहिषकर घालणारे आणि दुसरे चितळे जे काही विकतील त्यावर डोळे झाकून विस्वास ठेवणारे आणि घेणारे
तसेच क्रिकेट बद्दल भारतात आहे , हे टोक नाही तर ते टोक
काही देशात फक्त एका खेळावर सगळं नसते त्यामुळे ऋतू प्रमाणे खेळ असतो तिथे असे दिसत नाही
एकूणच मैदानी खेळ या बाबत भारतात आनंदच आहे हे हि सत्य आहे ( त्याला अनेक का रणे आहेत काही योग्य काही अयोग्य )
पण म्हणून क्रिकेट चा दुस्वास करावं हे हि योग्य नाही
इतर अनेक देशात हि एकाच खेलाकडे लक्ष दिले जाते उदाहरण छोटा सा कतार किंवा सौदी तिथे सॉकर / फूट बॉल / कॅनडात आईस हॉकी ( कानडा आणि युनाइटेड स्टेट्स वसली ती ब्रिटिशांमुळेच तरी तिथे क्रिकेट उगवले नाही भारत त्याचे पीक आले ..
सामोआ सारखा छोटा देश रग्बी डोकयावर घेतो
आई पी एल हा एक करमणुकीचा खेळ आहे (जसे प्ऑस्ट्रेल्यात पॅकर सर्कस सुरु झाली तसे ), त्यातून भारतातही उलाढाल वाढ हली तर चांगलेच आहे कि ....
सरकारने कोणता खेळ जोपसण्यावर पैसे खर्च करावा हा वेगळं प्रश्न आहे हे मान्य