देव पाप्यांशी धार्जिणा
जैसी गाय कसाबाशी
पुण्यवान कष्टती जगी
दर्शन भासेही न पावती
रावणे राम पाहिला
शिशुपाले कृष्ण जैसा
कंस तो भाग्यवान
कालिया सहजी उद्धरला
संभ्रमात साधुजन
व्हावे पुण्यनिष्ठ की पापनिष्ठ ?
भेटे देव तामसियांशी
सर्वाआधी .....
सामान्य जन तीर्थाशी जाती
लक्ष्मिचा अपव्यय करिती
संसार व्यवहारी कष्टती
अकारण जन्मोजन्मी
गंगाधरसुत म्हणे प्राधान्य तिमिराशी जगी
मैत्री वाढवावी घट्ट तयाशी
प्रतिक्रिया
15 Aug 2017 - 2:44 pm | धर्मराजमुटके
कवितेची रचना उत्तम आहे पण आशयाशी सहमत नाही. कवितेत उल्लेखिलेल्या सर्व दुष्टांचे पाप जास्त झाल्यावर भगवंताने त्यांचे निर्दालन केले आहे. शिवाय यातील बहुतेक खलनायक एकेकाळी उत्तम भक्त होते मात्र नंतर ते मदोन्मत्त झाले तेव्हा त्यांचा संहार झाला आहे.
'जैसी गाय कसाबाशी' हे वाक्य तुम्हाला जैसी गाय कसायाशी' असे लिहायचे होते का ? किंवा कसायालाच काही ठिकाणी 'कसाब' म्हणतात काय ? माझा बोलीभाषांचा तितकासा अभ्यास नाही म्हणून छोटीशी शंका.
लिहित रहा !