प्रतिशोध भाग : 3
आम्ही जेव्हा बारावीला होतो तेव्हा अकरावीला new admission घेतलेल्या मुलांची रैगिंग करायची fashion आली होती..अनु पण आमच्याच ग्रुप मध्ये असायची..कॉलेजमध्ये एक नवीन चेहरा दिसला आम्हाला..अकरावीची नवीन विद्यार्थीनी...कस्तुरी.....
कथा पुढे सुरू..
कस्तुरी दिसायला तशी साधीच होती.
पण बोलतात ना साधेपणातच खूप सौंदर्य असतं.पण तुझे हे मानलेले भाऊ त्यांनी शेवटी तिची पण रैगिंग केलीच.रागवलो होतो तेव्हा या सर्वांवर.
पण हळूहळू आम्हाला समजल की कस्तुरी अभ्यासात खूप हुशार तर होतीच शिवाय तिला सुध्दा आमच्यासारखी ट्रेकिंगची आवड होती.
कॉलेजमध्ये शांत राहायची ती.
मला तिच्या बद्दल अजून जाणून घ्यायच होत मग कुमारची मदत घेतली.
कॉलेज मध्ये त्याचा दबदबा असल्याने माहिती मिळवायला वेळ नाही लागला.
हे चुकीचे होतं पण ....
तुला तर माहित आहे मला जे हवं ते मी काहीही करून मिळवतो.जवळपास तीन महिन्यानंतर कस्तुरी आमच्या ग्रुप मध्ये आली.खुप कमी वेळात आमच्या गँगमध्ये ती रुळली.
ती कॉलेजच्याच हॉस्टेल मध्ये राहायची. तिला एक भाऊ होता. पण आम्ही त्याला कधी बघितलं नाही.मी
कस्तुरीच्या सर्वात जवळचा मित्र असूनही तिने मला सुध्दा त्या भावाबद्दल जास्त काही सांगितल नाही.
तिला आईवडिल नव्हते म्हणूनच काय जेव्हा जेव्हा आम्ही सुट्टीच्या दिवशी कुमारकडे जायचो तेव्हा ती कुमारच्या कुटुंबात सर्वांसोबत गप्पा मारायची आणि आम्हाला विसरायची.
मी तिच्यामध्ये हळूहळू गुंतलो होतो.
मी तिला प्रपोज करायच ठरवलं.ग्रुप मध्ये सर्वांना हे माहित होतं.पण कदाचित नियतीच्या मनात काही वेगळच होतं.
अचानक कस्तुरी गायब झाली.कशी, कुठून काहीच माहित नाही. आम्ही तक्रार नोंदवली पण काहीच फायदा नाही झाला.काही दिवसानंतर कुमारच्या पप्पानी आम्हाला सांगितल की कस्तुरी आता जिवंत नाही. तिचा मृतदेह मिळाला, पण माझ नशीब बघ ना मला तिला शेवटच बघता नाही आलं.
सर्व विसरून एक नवी सुरुवात करत होतो पण तू..
तु मला कस्तुरीच वाटते. अगदी तिच्यासारखीच आहेस.
काव्या..कस्तुरी माझा भूतकाळ होती..
बस..."
कोणाला काय बोलाव सुचत नव्हत.
काव्या काहीच न बोलता निघाली.मनात विचारांच वादळ तयार झालेलं.
सियालने सांगितलं तस जर कस्तुरी मेली आहे तर मग कुमारला कोण दिसलं?आणि फक्त त्यालाच का??की कस्तुरी मेलीच नाही..
काहीच सुचत नव्हतं...फक्त अनुत्तरीत प्रश्न होते..
काव्या गेल्यानंतर कुमारच्या घरी हॉल मध्ये बाकी सर्वजण बसले होते. पण कोणीच बोलत नव्हत.
"बबलु , कुमारला खरच भास झाला असेल का रे?"अनुने विचारलं.
"कमॉन यार अनु,कस्तुरी आता या जगात नाही हे आपल्या सर्वांना माहित आहे.कुमारच्याच पप्पांनी हे प्रकरण बंद केल आठवतयं ना?नाहीतर एक मुलगी अचानक गायब होऊन नंतर तिची बॉडी मिळते ही बातमी न्यूजवाले सोडणार का ..काका होते म्हणून कॉलेजच नाव नाही आलं कुठे, आणि मोजक्याच लोकांना कस्तुरी गायब झाली हे माहित आहे. कुमार तिला बहिण मानायचा म्हणून त्याला झाला असेल भास,ड्रिंक केल असेल काल त्याचा परिणाम हा.उगाच काहीही विचार नको करू."बबलु बोलला.
"अच्छा मग फक्त तोच तिला बहिण मानायचा का?तुम्ही नाही?ती तुम्हाला पण दादाच बोलायची .
सियाल तू गप्प का आहेस??
काव्या काही न बोलता निघून गेली म्हणून की कस्तुरीचा विषय आला म्हणून??"
"मी घरी जातोय.सॉरी गाईज..कुमारची काळजी घ्या.. उद्या भेटू",एवढ बोलून सियाल घरी गेला.
अनु,बबलु , श्री आणि सँडी पूर्ण दिवस कुमार जवळच थांबले.
प्रतिक्रिया
11 Aug 2017 - 5:24 pm | संग्राम
प्रतिशोध भाग : १ आणि २ कुठे आहेत
11 Aug 2017 - 5:40 pm | मराठी कथालेखक
मला वाटतं भाग ३ चा दुवा भाग २ वर देता यावा (आणि तसेच भाग २ चा भाग १ वर) असं काहीतरी लेखक/लेखिकेच्या मनात असावं म्हणून सुरुवात भाग ३ पासून केली असावी!!
11 Aug 2017 - 6:49 pm | माम्लेदारचा पन्खा
आधीच्या लेखन"प्रती शोध"असं आवाहन असावं कदाचित !
11 Aug 2017 - 10:53 pm | सुखीमाणूस
कोटी जमलीय
12 Aug 2017 - 9:07 pm | टर्मीनेटर
लै भारी प्रतिसाद माम्लेदारचा पन्खा
काहीतरी इंटरेस्टिंग वाचायला मिळेल म्हणून वरील मजकूर वाचला पण घोर निराशा झाली....
12 Aug 2017 - 12:59 pm | वकील साहेब
कोटी ला कोटी कोटी प्रणाम
13 Aug 2017 - 12:36 am | ज्योति अळवणी
अजून लेखक/लेखिकेने प्रतिसाद वाचलेले दिसत नाहीत.
भाग 3 छान. पण एकूण लिंक लागत नसल्याने त्रिशंकू वाटते आहे
14 Aug 2017 - 8:33 am | टर्मीनेटर
आता भाग १ आणि २ वाचल्यावर लिंक लागत आहे...चांगलं वाटतंय वाचायला.