एवढस पिल्लू... My bundle of joy
हसून म्हणालीस... त्यात तुझे efforts काय?
आईने वाढवलं... जन्माला घातलं!
तुझं नाव लावून
हातात तुझ्या दिलं...
आहेस तू... असणारच आहेस!
माझं सगळं तर आईच बघते आहे..
घर तू चालवतोस?... तुला चालवायचंच आहे!
आपापलं जगणं आपण जगतोच आहे!
खरंय पिल्ला... वेळ नाही दिला..
माझं नाव आणि फक्त पैसा दिला!
आई सांगत होती तुझं लडिवाळ वागणं
तिच्या डोळ्यात दिसत होतं तुझं मोठं होणं!
वाटलं होतं तुझ्याशी दोस्ती करीन
मन सारं कधीतरी मोकळं करीन
पिल्लू जसजसं मोठं झालं
आकाश त्याला बोलावू लागलं
बेटा आता मीपण थोडा मोठा झालोय
दमलो... थोडा बसिन म्हणतोय..
जमलंच तर कधी मागे बघ!
बाबा असेलच
त्याला किमान 'हाय-हॅलो' म्हण;
खरच केली कायम धावपळ..
आसुसलो तुझ्या प्रेमाला मी पण..
काय करू पण 'बाबा' झालो
तुझ्या जन्माने जवाबदार झालो
शापित असतं हे बाबा असणं..
पिल्लाचं मन आईतच असतं!
प्रतिक्रिया
31 Jul 2017 - 7:41 pm | संदीप-लेले
व्वा, मनातलं बोललात !
"वाटलं होतं तुझ्याशी दोस्ती करीन"
...
"शापित असतं हे बाबा असणं..
पिल्लाचं मन आईतच असतं!"
अगदी खर !
31 Jul 2017 - 7:59 pm | ज्योति अळवणी
धन्यवाद
31 Jul 2017 - 10:03 pm | दशानन
थोडे निगेटिव्ह वाटत आहे, मुलगी बापाची व मुलगा आईचा असेच पाहत वाढलो, देव दयेने मला पहिली मुलगी आहे ;)
बाप म्हणून जबाबदारी कमी असते / नसते असे नसते हो.
लिहले असते पण काय "मी"पणा दाखवत आहात असा आरोप होईल म्हणून गप्प बसतो.
31 Jul 2017 - 11:17 pm | ज्योति अळवणी
दशानन जी,
वाढत्या वयातली मुलं कसं दुखावतात वडिलांचं मन आणि अनेकदा स्त्री इतकं मोकळेपणी मनातल्या भावना सांगता न आल्याने दुःखी झालेल्या बाबाच मन इतकंच सांगायचा प्रयत्न केला आहे मी.
1 Aug 2017 - 1:35 am | पद्मावति
खुप छान लिहिलंय.
1 Aug 2017 - 8:31 am | टर्मीनेटर
छान...
1 Aug 2017 - 8:18 pm | योगेश लक्ष्मण बोरोले
मोजक्याच पण उत्तम शब्दात मांडलीत. मनाला भिडली कविता.
2 Aug 2017 - 10:03 pm | ज्योति अळवणी
मनापासून धन्यवाद
3 Aug 2017 - 8:33 am | सौन्दर्य
बाबा एक बाजू सांभाळत असतो, कित्येक वेळा त्याला भावना असूनही भावनाविवश होता येत नाही, मनातले मोकळेपणाने सांगता येत नाही. आई जातायेता मायेचं पांघरूण घालते, पिल्लाला सांभाळून घेते म्हणून कदाचित आईशी मुलांची जवळीक जास्त होते. हे सर्व कवितेत छान मांडलं आहे. कविता आवडली.
13 Aug 2017 - 10:46 am | ज्योति अळवणी
धन्यवाद सौंदर्य