बाल्यावस्था( वय १० ते १३)------
धर्म .....प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय.जगात म्हणे १०० पेक्षा जास्त धर्म आहेत. मला लहाणपणी सांगण्यात आले कि तू जन्माने हिंदू आहेस.हिंदू म्हणजे गणेशोत्सव काळात मोदक खाणारे असा माझा समज होता.पुढे दाढी वाढवणारे आणि टोपी घालणारे आपल्यापेक्षा वेगळे आहेत हे लक्षात यायला लागले.एकदा शाळेतून घरी येताना दोन तीन नग्न लोक काही गर्दीबरोबर चालत होते .ह्या लोकांचाही वेगळा धर्म आहे ही माहीती मित्राने पुरवली.
इयत्ता नववी---
इतिहासाच्या पुस्तकात आधुनिक मानवाचा जन्म माकडापासुन उत्क्रांत होऊन झाल्याचे कळले.होमो सेपियन्स हे आधुनिक मानव.आफ्रीकेत उत्क्रांत होऊन जगभर पसरले.
इयत्ता बारावी(विज्ञान शाखा)---
जग कुठल्या धर्म ग्रंथाचे आधारे चालत नाही.वेद,कुराण,बायबल हे कुठल्याही प्रकारे सत्य नाहीत हे वाचनावरुन कळाले.
वेदांमध्ये विज्ञान आहे,कुराणचा आदेश शेवटचा मानावा ,बायबलनुसार जग देवाने आठ दिवसात बनवले वगैरे गोष्टी लिहीणारे व सांगणारे बालबुद्धीचे आहेत हे लक्षात यायला लागले.
वाचन वाढत होते ,धर्म ही अफुची गोळी आहे हे कार्ल मार्क्सचे विधान मनोमन पटायला लागले .
२००१ --- ९/११ हल्ला--
ओसामा बिन लादेन या मुस्लिम दहशतवाद्याने अमेरीकेत हल्ला केला.हजारो लोक निष्प्राण.मुस्लिम दहशतवादाशी पहीली ओळख.कारण काय ,तर कुराणमध्ये काफीर संपवा असा संदेश आहे.हजारो वर्षापुर्वी लिहलेली बाडं, मग ते वेद असोत वा कुराण बायबल आजहि प्रचंड स्फोटक असल्याची जाणीव.
२००२गुजरात दंगल----
हिंदूनी भरलेली एक ट्रेन गोध्राजवळ मुस्लिम मॉबने जाळली.कारण काय तर ट्रेनमधले ते अयोध्येत राममंदिर बनवायला गेलेले कारसेवक होते.याची रिॲक्शन उमटली...हजारो मुसलमान घराबाहेर काढून मारण्यात आले.जाळण्यात आले.मुस्लिमबहुल भागात हिंदूंना मारण्यात आले.
आमचा केमिस्ट्रीचा पेपर पुढे ढकलण्यात आला व अभ्यासाला वेळ मिळाला.
हिंदू मरु देत वा मुस्लिम, वेळ मिळाल्याने आपला केमिस्ट्रीचा पेपर यामुळे नक्की सुटणार हा स्वार्थी विचार मनात आला.आपण निधर्मी होत आहोत याची पहील्यांदा झालेली जाणीव.
कॉलेज २००४--
फर्राट चर्चा घडवून आणायला लागलो.कॉलेज्च्या कट्ट्यावर नास्तिक निधर्मी अशी ओळख तयार झाली.चर्चांमध्ये तावतावाने भांडणाऱ्या मित्रांवरुन धर्म हा कॅन्सर कीती खोलवर रुजला आहे व माणसाची मती तो कशी हायजॅक करतो याचा अनुभव येत गेला.जग धर्ममुक्त झाले पाहीजे हा विचार बळावला.
२०१७ ,वय ३१----
Richard Dawkins foundation for reason and science शी संलग्न.धर्म या गोष्टीकड परतायची शक्यता शून्य.
टाईमलाईन समाप्त.
जग धर्ममुक्त झाले पाहीजे हा माझा विचार कसा बळावत गेला याची ही टाईमलाईन.
आपल्याला काय वाटते??
१. धर्म कालबाह्य झाले आहेत काय?
२.मुस्लिम दहशतवादाने जगभर मांडलेला हैदोस ,उगवता हिंदू दहशतवाद यावर जग धर्ममुक्त होणे हाच उपाय आहे काय?
३.तुमचा पाल्य निधर्मी विचारांचा व्हावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता?
प्रस्तुत लेख संस्थळाच्या नियमात बसत नसल्यास डिलिट करावा.
प्रतिक्रिया
16 Jul 2017 - 9:42 pm | एस
धर्म ही संकल्पना कालसुसंगत कधी होती? धर्म, देव, पाप, पुण्य, इत्यादी संकल्पना मूठभर लोकांनी समूहातल्या इतर लोकांवर अधिराज्य गाजवण्यासाठी निर्माण केल्या.
16 Jul 2017 - 9:53 pm | कानडाऊ योगेशु
हे एक दिवास्वप्न ठरेल. मध्यंतरी झाकिर नाईक चे काही विडिओज पाहिले होते त्यात त्याने एका मूर्ख स्वघोषित नास्तिकाला जवळजवळ मुस्लिम बनवले होते. त्याचे तर्कट तसे अजबच होते. म्हणजे मुस्लिमांची जी काही प्रार्थना आहे त्यानुसार जगात दुसरा कुठला देवच असू शकत नाही एक त्या सर्वशक्तिमान अल्लाशिवाय. त्यानुसार नास्तिक हे अर्धे मुसल्मान अगोदरच आहेत कारण त्यांच्यामते देव नाहीच आहे मग त्याचा आग्रह असा होता कि पूर्ण मुसलमान तरी बना ना.
हिंदूनी निधर्मी होणे ह्याचा साईड इफेक्ट फार धोकादायक होऊ शकतो. हिंदू म्हणुन नास्तिक राहणे हा निधर्मी राहण्याला चांगला पर्याय आहे. इथे तुम्ही जिवंत राहण्याची अपेक्षा ठेवु शकता. माझा एक शेजारी क्ट्टर मुस्लिम आहे व त्याला माझ्या मुलीच्याच वयाची मुलगी आहे आणि शैशव पातळीवरच्या संगोपनात धर्माची किती इन्वॉल्वमेंट आहे हे रोज पाहतो आहे. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
17 Jul 2017 - 12:16 am | गामा पैलवान
टफि,
धर्म हटवा म्हणता, तर मग शिवाजीमहाराज कशासाठी लढले म्हणायचे?
तुम्हाला वेद आणि कुराण सारखेच वाटतात. यावरून तुम्हाला वेदांची काडीइतकीही माहिती नाही हे उघड आहे. मग गप का राहत नाही तुम्ही? स्वत:च्या अज्ञानाचं इतक्या आग्रहपूर्वक प्रदर्शन कशास्तव?
आ.न.,
-गा.पै.
17 Jul 2017 - 11:44 am | चिर्कुट
>> धर्म हटवा म्हणता, तर मग शिवाजीमहाराज कशासाठी लढले म्हणायचे?
अतिशय निंद्य आणि अज्ञानमूलक विधान. शिवाजीमहाराज हिंदू धर्मासाठी लढले असं म्हणणं हा त्यांचा अपमान आहे.
17 Jul 2017 - 5:02 pm | अमरेंद्र बाहुबली
हो! शिवाजी महाराज हिंदू धर्मासाठीच लढले. म्हणून त्यांनी आपल्या राज्याचे नाव हिंदवी स्वराज्य असे ठेवले. , नेताजी पालकरांना पुन्हा शुध्द करवून घेतले. इतिहासाची चार बुक चाळा!
17 Jul 2017 - 8:45 am | नारायण नाड्कणि
धर्म .....प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय.जगात म्हणे १०० पेक्षा जास्त धर्म आहेत. मला लहाणपणी सांगण्यात आले कि तू जन्माने हिंदू आहेस. ( म्हणजे एका सकाळी उठून तू हिंदू आहेस एवडेच सांगितले). हिंदू म्हणजे गणेशोत्सव काळात मोदक खाणारे असा माझा समज होता. (MYOPIC. आपला समज आणि धर्मा बद्दल अज्ञान आणि त्यामुळे धर्मच नको?)
२०१७ ,वय ३१----
Richard Dawkins foundation for reason and science शी संलग्न. ( कोणा फक्त एकाचे तत्त्वज्ञान ऐकून TIMELINE समाप्त?) धर्म या गोष्टीकड परतायची शक्यता शून्य.
टाईमलाईन समाप्त.
आता जगातील थोर व्यक्ती, शास्त्रज्ञ, धर्माचे अभ्यासक काय म्हणतात ते जरा पाहूया.
(Now let us see what Intellectuals, Philosophers and Scientist say on Hinduisum worldwide.)
1. Annie Besant (1847-1933) was an active socialist on the executive committee of the Fabian Society along with George Bernard Shaw:
After a study of some forty years and more of the great religions of the world, I find none so perfect, none so scientific, none so philosophical and none so spiritual that the great religion known by the name of Hinduism. Make no mistake, without Hinduism, India has no future.
Hinduism is the soil in to which India’s roots are stuck and torn out of that she will inevitably wither as a tree torn out from its place. And if Hindus do not maintain Hinduism who shall save it? If India’s own children do not cling to her faith who shall guard it. India alone can save India and Hinduism are one.
2. George Bernard Shaw, (1856-1950) a Nobel Laureate in Literature:
The Indian way of life provides the vision of the natural, real way of life. Hinduism is so elastic and so subtle that the most profound Methodist, and crudest idolater, is equally at home with it.
3. Albert Einstein, (1879-1955) physicist:
When I read the Bhagavad Gita and reflect about how God created this universe everything else seems so superfluous.
4. Christopher W. B. Isherwood (1904-1986) Translator, biographer, novelist, and playwright:
"I believe the Gita to be one of the major religious documents of the world. If its teachings did not seem to me to agree with those of the other gospels and scriptures, then my own system of values would be thrown into confusion, and I should feel completely bewildered. The Gita is not simply a sermon, but a philosophical treatise."
5. Muhammad Dara Shikoh (1627-1658 AD) the favorite Sufi son of Moghul emperor, Shah Jehan:
"After gradual research; I have come to the conclusion that long before all heavenly books, God had revealed to the Hindus, through the Rishis of yore, of whom Brahma was the Chief, His four books of knowledge, the Rig Veda, the Yajur Veda, the Sama Veda and the Atharva Veda."
"The Quran itself made veiled references to the Upanishads as the first heavenly book and the fountainhead of the ocean of monotheism."
6. Stephen Cross, in his book on Hinduism.
"It is no secret that we in the West live in a time of spiritual crisis. Western civilization has been guided by Christianity. Now it appears that this period is drawing to a close. Both religious institutions and social structures are in disarray. A great many things that were considered basic assumptions of western thought are being challenged.
7. Robert R. C. Zaehner (1913-1974) British historian of religion:
"In the family of religions, Hinduism is the wise old all-knowing mother. Its sacred books, the Vedas, claim, ‘Truth is one, but sages call it by different names.’ If only Islam, and all the rest of the monotheistic ‘book’ religions, had learned that lesson, all the horror of history’s religious wars could have been avoided. Which other religion has its God say, as Krishna does in the Bhagavad Gita, ‘All paths lead to me.’
"If only the Church had the sense to allow so many different and seemingly contradictory approaches to God, how much saner its history would have been!"
8. Alan Watts (1915-1973) a professor, graduate school dean and research fellow of Harvard University:
"To the philosophers of India, however, Relativity is no new discovery, just as the concept of light years is no matter for astonishment to people used to thinking of time in millions of kalpas, (A kalpa is about 4,320,000 years).
9. Huston Smith born in China to Methodist missionaries, a philosopher, most eloquent writer, world-famous religion scholar who practices Hatha Yoga:
"In Hinduism, ‘The invisible excludes nothing’, the invisible that excludes nothing is the infinite – the soul of India is the infinite."
10. "The Vedic science movement began in 1893 when Swami Vivekananda (1863-1902) addressed the World Parliament of Religions in Chicago. In that famous address, he sought to present Hinduism not just as a fulfilment of all other religions, but also as a fulfilment of all of science. Vivekananda claimed that only the spiritual monism of Advaita Vedanta could fulfil the ultimate goal of natural science, which he saw as the search for the ultimate source of the energy that creates and sustains the world.
Vivekananda and Aurobindo lit the spark that has continued to fire the nationalist imagination, right to the present time. The Hindu literature of the 19th and early 20th centuries, especially the writings of Dayanand Saraswati, S. Radhakrishnan and the many followers of Vivekananda, is replete with celebration of Hinduism as a "scientific" religion.
10. Niels Henrik David Bohr (1885-1962) Danish nuclear physicist who developed the Bohr model of the atom:
I go into the Upanishads to ask questions.
11. Alfred B. Ford grandson of Henry Ford (founder of the Ford Motor), and Trustee member of Ford Motor Company:
For me the most important thing is to spread the Hindu knowledge about the soul. This is more important than any other knowledge and is my main priority. The older I get, the more Hindu I become.
12. Klaus L. Klostermaier, professor of Religious Studies at the University of Manitoba:
Hinduism has proven much more open than any other religion to new ideas, scientific thought, and social experimentation. Many concepts like reincarnation, meditation, yoga and others have found worldwide acceptance. It would not be surprising to find Hinduism the dominant religion of the twenty-first century.
17 Jul 2017 - 10:35 am | पुंबा
लेख आवडला. फक्त निधर्मी होणे म्हणजे संवेदनशीलता हरवू देणे नव्हे असे वाटते. धर्ममुक्त म्हणजे धर्माच्या जोखडापासून मुक्त, धर्माचा बाजार मांडणार्यांच्या, धार्मिक विद्वेष पसरवून निरपराधांचे प्राण घेणार्यांच्या विरोधात ठाम भुमिका घेणे आणि मुख्ह्य म्हणजे धार्मिकांबद्दल कटू भुमिका न ठेवता कृतीशीलपणे धर्माचा प्रभाव नष्ट करण्यासाठी योगदान देणे होय. करुणा, सहवेदना, विवेकवाद या सार्यांची सांगड असल्याशिवाय नुसत्या कोरड्या धर्मविरोधाला अर्थ नाही असे वैयक्तिक मत.
होय. जगाला कोणत्याही रिलिजनची गरज नाही.(धर्माने दिलेले तत्वज्ञान आणि सांस्कृतीक वारश्याची मात्र आहे.)
माणसाच्या इहवादी गरजा धर्मापासून वेगळ्या आहेत याची जाणिव व्हायला हवी. धर्माचा प्रभाव कमी होणे हा उपाय आहे.
तिसर्या प्रश्नाचा विचार करण्याची वेळ अजून आली नाही.
18 Jul 2017 - 10:05 am | पुंबा
१. सार्वजनीक जीवनात धर्माचे स्थान जमेल तितके कमी व्हावे.(सार्वजनीक कर्मकांडे, खंडणीखोरी, त्यासाठी व्यक्तिवर येणारा दबाव यामुळे सामाजिक बंध दृढ होण्याऐवजी अधिक विसविशीत होतात), धर्माच्या आधारे बहरलेली सांस्कृतीक लेणी मात्र जपावीत. जसे, वेरूळ, मेंदी, कव्वाली, भरतनाट्यम यांना केवळ त्यात धार्मिक प्रतिके आहेत म्हणून झिडकारू नये.
२. राजकिय आणि सामाजिक वर्तुळात मात्र संविधानाचेच प्राबल्य व सार्वभौमत्व असले पाहिजे आणि नागरी हक्क व कर्तव्यांच्या पुर्वनिर्धारीत काँट्रॅक्ट्च्या आधारे व्यक्तिला जज केले जावे.
३. व्यक्तिच्या मुलभूत अधिकारांवर धर्माचा होणारा जाच सरकारने कठोरपणे मोडून काढलाच पाहिजे. तिथे अल्पसंख्य अन तसले लाड नकोत.
४. शिक्षण हे सेक्युलरच हवे, सामाजिकिकरणाच्या प्रक्रियेत मुलांवर धर्मातित(पण निधर्मी नव्हे) नैतिकतेचे संस्कार व्हावेत. उगाच फुकाच्या कर्मकांडांना संस्कारांचे नाव देऊन कसला मुल्यहीन समाज निर्माण झालाय ते पाहतो आहोत आपण.
५. करूणा, सहवेदना, सामाजिक तसेच नागरी बंध जोपासणे, सचोटी ह्या सदगुणांच्या आधारे भविष्यात शांत, समृद्ध, इगॅलिटेरियन समाजाची निर्मिती आपण करू शकणार आहोत, धर्म अधिकाधिक रेलिगेट होत जाणारच आहे, त्यासाठी नास्तिकांचा नवा रिलिजन नकोय.
टीपः इथे धर्म हा शब्द रिलिजन या अर्थाने वापरला आहे, रिलिजियस प्रतिकांच्या आधारे झालेले ओर्गनाइझ्ड रिलिजन्स अपेक्षित आहेत.
19 Jul 2017 - 12:02 am | प्रतापराव
सौरा, प्रतिसाद आवडला। धर्माचे अवडंबर कमी केले पाहिजे.
17 Jul 2017 - 12:43 pm | अप्पा जोगळेकर
धर्म कालबाह्य झाले आहेत काय?
माहीत नाही. पण तुमचा आय डी कालबाह्य झाला आहे आता.
इतके दिवस झाले नविन अवतार कसा घेतला नाही अजून.
17 Jul 2017 - 2:52 pm | माहितगार
रुमाल टाकून ठेवतो
17 Jul 2017 - 4:22 pm | समीर वैद्य
"उगवता हिंदू दहशतवाद" हे जरा उलगडून सांगाल का?
17 Jul 2017 - 6:01 pm | सिद्धेश्वर विला...
टफीसाहेब, मी तुमचा भाऊ झफी..
आता झफीचा अर्थ मला माहीत नाही , तो तुम्ही सौराभाईंना विचारा .. त्यांनी या आंतरजालावर खुलासा केला तरी चालेल आपल्याला .. बरं ते जाऊ देत .. धर्माविषयी बोलू काही ..
हिंदू धर्म
माझे फार काही वाचन नाही पण जीवनात आलेल्या अनुभवरावरून माझी मते मांडत आहे ..
हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे जी ज्यात कैक संप्रदाय स्वतःहून समाविष्ट झालेले आहेत ... या धर्माची मूळ शिकवणच आपल्याला त्यापासून दूर होऊ देत नाही .. हा धर्म नसून एक महासागर असल्याचे मी मानतो ... असे कितीतरी जैन धर्मीय , शीख धर्मीय आणि इतर बरेच धर्माचे भाऊबंद .. अगदी उत्साहाने आपले सन साजरे करताना दिसतात ... जे कट्टर आहेत त्यांचा भाग सोडून द्यात ... आपण स्वतः कधी धर्म खिशात घेऊन फिरतो का ? मला वाटत बरेचसे हिंदू धर्मीय .. अगदी निष्ठेने स्वतःचा प्रपंच बघण्याचे काम करतात आणि सणासुदीला एकत्र येऊन मजा करतात ... कितीतरी मंदिरे तोडली .. किती हिंदूंनी आवाज उठवला ?.. अगदी फार कमी .. कारण आपण घरातल्या देवपूजेला प्राधान्य प्रथम देतो ना कि मंदिराला ... घरातले देव प्रथम पूजतो नंतर मंदिरात जाऊन दर्श घेतो व नवस करतो ... तुम्हाला हे निधर्मी होन्याचे बळ , हिंदू आहात म्हणून मिळाले हे विसरू नका ... तुम्ही हिंदू आहात ,म्हणून इतका चांगला विचार करत आहात हे लक्षात ठेवा .. मला वाटत ... तुम्ही तुमचे हे चांगले विचार स्वतःपुराते मर्यादित ठेवा ... या आंतरजालावर विवेकानंद बनायला जाऊ नका ... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ....
या जगाला जगायचं असेल .. तर हिंदू धर्माला जगावंच लागेल ... शुभम भवतु
18 Jul 2017 - 1:11 pm | अमरेंद्र बाहुबली
सहमत
17 Jul 2017 - 6:38 pm | ट्रेड मार्क
फक्त मुस्लिमच दहशतवादी नसतात हे दाखवण्यासाठी ओढून ताणून हिंदू दशहतवादी ही संज्ञा आणली गेली.
एखाद्याच्या अरेरावीला प्रतिकार करणे म्हणजे दहशतवाद नसतो. इतर धर्मियांनी हिंदू धर्म स्वीकारावा अशी जबरदस्ती कितीवेळा झालीये आत्तापर्यंत ते उदाहरणासहित दाखवा. हिंदू नाही म्हणून, एक तर हिंदू धर्म स्वीकार नाही तर मर अश्या किती घटना घडल्यात? हिंदूंनी कितीवेळा इतर धर्मियांची प्रार्थनास्थळे वा धार्मिक जागा उध्वस्त केल्यात? अगदी तुम्हाला ज्ञात असलेल्या इतिहासापासून आज पर्यंतचा कालावधी घेऊन तुलना करा.
यात तुमचा निर्देश गायींवरून होणाऱ्या मारहाण व खुनाकडे असेल तर तुम्ही फक्त ठराविक वृत्तपत्रे/ वाहिन्या बघता असं वाटतं. सध्या अश्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसतेय याचं कारण आता सहनशक्तीचा कडेलोट होतोय. बरेच वर्ष असंघटित असलेला आणि धार्मिक अत्याचाराला तोंड देत असलेला हिंदू आता संघटित होत असावा. याला पाठबळ मिळण्याचे कारण कदाचित "हिंदू विचारांचा" प्रभाव असलेले सरकार केंद्रात आहे हे असावे. तसंही बीफवरून होणाऱ्या मारामाऱ्या हे नक्की कोण करताय हे अजून उघड झालं नाहीये. तथाकथित "सेक्युलर" म्हणवणारे पण सत्ताभ्रष्ट झालेले लोकही केवळ सध्याचे सरकार डळमळीत करण्यासाठी हे उद्योग करत असतील. ज्याप्रमाणे मोदी निवडणूक प्रचारात काय बोलले हे आठवलं जातं त्याचप्रमाणे काँग्रेसजन काय बोलले हे पण लक्षात घ्या. मोदी पंतप्रधान झाले तर २२००० मुस्लिम लोक मरतील किंवा देशभर दंगे होतील. कशावरून हे बोलणं खरं करत नसतील? नुसतं एखादं भगवं वस्त्र घातलं किंवा हिंदू धर्माशी संबंधित घोषणा देत काही मारामाऱ्या केल्या की ते हिंदू दहशतवादी होतात का?
प्रत्येकाने धर्म आपापल्यापुरता ठेवावा आणि जे काही धर्माचरण करायचंय ते आपल्या घरात करावं ही मागणी योग्य आहे. माझा धर्म श्रेष्ठ किंवा दुसरे कुठले धर्मच नसावेत ही धारणा नसावी. पण म्हणून धर्मच मोडीत काढायचा की कल्पना चुकीची आहे. धर्माचरण आणि कर्मकांड यात फरक करणे आणि तो सगळ्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे.
19 Jul 2017 - 9:50 am | शब्दबम्बाळ
नुसतं कुराण हातात घेतलं किंवा अल्ला हू अकबर च्या घोषणा देत काही जणांचे मुडदे पाडले की ते मुस्लिम दहशतवादी होतात का?
दोन वाक्यात काही साम्य आढळतंय का हो??
असो चालूदे चर्चा...
19 Jul 2017 - 10:10 am | सुबोध खरे
काही मारामाऱ्या केल्या
आणि
काही जणांचे मुडदे पाडले
परत एकदा विचार करून पहा.
यात काहीच अंतर नसेल तर आपल्या प्रतिसादाबद्दल काहीच म्हणणे नाही.
हा प्रतिसाद "मानवतावाद्यांच्या " आद्यग्रंथात सुवर्णक्षरानी लिहून ठेवावा असा आहे.
19 Jul 2017 - 12:59 pm | महेश हतोळकर
नावाला जागलात
19 Jul 2017 - 10:02 pm | ट्रेड मार्क
भारतात किंवा जगात कुठेही हिंदू लोकांनी दहशतवादी हल्ला केला आणि तो कोर्टात सिद्ध झाला आहे असं एक तरी उदाहरण द्या. बहुतेक सगळे दहशतवादी हल्ले मुस्लिमांनी केल्याचं सिद्ध झालंय. दोन व्यक्तींमधल्या किंवा दोन छोट्या ग्रुप मध्ये एखाद्या गल्लीत घडणाऱ्या आपापसातल्या मारामाऱ्या म्हणजे दहशतवादी हल्ले नव्हेत. मुंबईतील बॉम्बस्फोट, भारतीय संसदेवरील हल्ला, ताजवर झालेला हल्ला इथपासून ते ट्वीन टॉवर वर झालेला हल्ला, पॅरिस मधील हल्ला आणि अजून बरेच हल्ले ही मुस्लिम दहशतवादाची उदाहरणे आहेत.
अभ्यास वाढवा एवढंच म्हणेन.
19 Jul 2017 - 10:51 pm | प्रतापराव
चांगला प्रतिसाद.
पण खुनि हल्ले, बाँम्बब्लास्ट म्हणजेच दहशतवाद हे पटत नाही.त्याचे अनेक प्रकार असु शकतात. सामाजिक, आर्थिक दहशतवादही असतो.
20 Jul 2017 - 1:48 am | ट्रेड मार्क
सामाजिक दहशतवादातसुद्धा हिंदू लोक मुस्लिमांच्या पासंगालाही पुरणार नाहीत. अगदी स्त्रियांच्या बुरख्यापासून ते इतर धर्मियांना व त्यांच्या चालीरीतीना यथोचित सन्मान देणे यात मुस्लिम फारच मागे आहेत. ते सोडून इतर सर्व काफिर आणि काफिरांना या ना त्या मार्गाने संपवणे हेच जर उद्दिष्ट असेल तर त्यांना प्रतिकार करण्याचा योग्य मार्ग कुठला उरतो? ज्यूंपासून ते पारशी, इराण्यांपर्यंत सर्व धर्माचे लोक हिंदुस्थानात आले व पिढ्यानपिढ्या सुखेनैव राहिले. त्यांना कोणी त्यांच्या धर्मापासून दूर केले नाही ना कोणी धर्मांतराचा आग्रह धरला. पण हेच मुस्लिम युरोपात आश्रयासाठी गेले तर काय उच्छाद मांडलाय बघा. जर्मनीसारख्या अत्यंत सुरक्षित देशात मुलींना सामूहिक विनयभंग सहन करायला लागतो. इंग्लंड मध्ये एका संपूर्ण परगण्यातील ९ वर्षांपुढील कमीतकमी १४०० मुली सामूहिक बलात्काराच्या शिकार झाल्या आहेत.. ही डॉक्युमेंटरी बघा. अजून अशीच एक घटना बघा. यावर अजून एक दुवा
आर्थिक दहशतवाद करायची ज्याची ताकद असेल ते बहुतेक सगळे करतात.
20 Jul 2017 - 8:15 pm | प्रतापराव
दलितांवरील अत्याचाराच्या घटना ह्या दहशतवादामध्ये मोडु शकतील का?
20 Jul 2017 - 9:13 pm | सुबोध खरे
दहशतवाद हा समाजाच्या सर्वच घटकांमध्ये दहशत माजवणे हा हेतू ठेवून असतो.
दलितांना झालेली मारहाण हा वैयक्तिक वैमनस्यातुन उद्भवलेली समस्या आहे.
हा प्रश्न वर्णद्वेष किंवा वंशद्वेषात मोडणारा आहे दहशतवादात नव्हे.
20 Jul 2017 - 9:21 pm | प्रतापराव
वर्णद्वेष किंवा वंशद्वेषामुळे ज्या घटना घडतात त्या दहशतवादात येत नाहित? हिटलरने ज्युंचे केलेले हत्याकांड ही दहशतवादात मोडणार नाही?
20 Jul 2017 - 11:45 am | शब्दबम्बाळ
माझ्या प्रतिसादात "मुस्लिम दहशतवाद अस्तित्वात नाही" असे म्हटलेलं दाखवा तुम्ही! स्वतः ठरवून टाकायचं आणि त्यावरच लिहायचं, गम्मत आहे! निदान माझ्या वाक्यात "मी मुडदे पाडतात" हि गोष्ट मान्य तरी केली आहे!
हे वाक्य तुमचं आहे, तुमच्या मते "दहशत"वाद म्हणजे फक्त बॉम्ब फेकणंच का हो? म्हणजे एखाद्या समूहाने जाणीवपूर्वक समोरच्याचा मुडदा पडला तर तो फक्त "सहनशक्तीचा कडेलोट" झाला म्हणून? आणि अशी प्रकरण कुठल्या वृत्तपत्राने छापली तर ते वृत्तपत्र वाचायचं सोडणे हा त्यावरचा उपाय का?
तुमच्या त्या वाक्यावर इथल्या "सगळं काही माहित असणाऱ्या" आयडींना काहीच आपत्ती नाही यातच सगळं काही आलं!
जेव्हा मुस्लिम दहशतवादी कुठेतरी हल्ला करतात तेव्हा सामान्य आयुष्य जगणारा मुस्लिम त्यापासून आपल्याला वेगळं राहता यावं म्हणून "हल्ला करणार्यांनी फक्त कुराण किंवा घोषणा दिल्या म्हणून ते खरे मुस्लिम होत नाहीत" असे म्हणून गप्प राहतो.
आता वरच्या प्रतिसादात तुमचा पवित्राही तोच दिसतोय, गोरक्षक "मारामाऱ्या"(दहशत नाही हा) करत आहेत पण म्हणून ते काय हिंदू दहशतवादी झाले का लगेच?
बर समजा चुकून हि लोक हाताबाहेर गेली आणि उद्या कत्तली होऊ लागल्या तर हे बालंट हिंदू धर्माच्या माथी मारायचं का? कारण केवळ काही डोकं फिरलेले आणि स्वतःला कट्टर हिंदू मानणारे लोक अमानुष गोष्टी करू लागले?
कट्टरता कुठल्याही धर्माची वाईटच!
बाकी अभ्यास वाढवा सारखे सल्ले कृपया स्वतःला पण कधीतरी देत जा, कदाचित फायदा होईल!
20 Jul 2017 - 9:47 pm | ट्रेड मार्क
हे वाक्य तुमचं आहे, तुमच्या मते "दहशत"वाद म्हणजे फक्त बॉम्ब फेकणंच का हो? म्हणजे एखाद्या समूहाने जाणीवपूर्वक समोरच्याचा मुडदा पडला तर तो फक्त "सहनशक्तीचा कडेलोट" झाला म्हणून? आणि अशी प्रकरण कुठल्या वृत्तपत्राने छापली तर ते वृत्तपत्र वाचायचं सोडणे हा त्यावरचा उपाय का?
मी या धाग्यात वर एक प्रतिसाद दिला आहे तो काही प्रमाणात याला लागू होतो. मी मुडदा पाडण्याचे समर्थन करत नसून वेगळा मुद्दा मांडतोय.
संपूर्ण प्रतिसाद नीट वाचलात तर कदाचित तुमच्या लक्षात येईल. स्वातंत्र्यानंतर बहुतांश काळ सत्ता हातात असलेल्या लोकांना सत्तेपासून एवढं दूर राहणं अवघड वाटत नसेल का? अगदी सत्तेत असतानासुद्धा त्यांनी संबंध नसताना "हिंदू दहशतवाद" ही संज्ञा जन्माला घातलीच. तर आता सत्ता परत मिळवण्यासाठी शक्य ते सर्व मार्ग वापरणं या लोकांना सहज शक्य आहे. कोणत्याही जातीधर्माशी संबंधित नसणारे समाजकंटक हाताशी धरून पैसे देऊन हिंदू लोकांसारखी वेशभूषा आणि घोषणा देत मारामारी किंवा "मुडदे" पाडा हे पण सांगणं ही पण शक्यता आहेच. वर आरडाओरडा करायला वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या हाताशी आहेतच.
अशी प्रकरण कुठल्या वृत्तपत्राने छापली तर ते वृत्तपत्र वाचायचं सोडणे हा त्यावरचा उपाय का?
तुम्हीच बघा बातम्या कश्या वनसायडेड येत असतात. जुनैदचे घरचे सांगत होते बीफचा काही संबंध नाही तर भांडण सीटवरून झालं. तरी पण २ दिवस बीफवरून हत्या झाल्याच्या बातम्या येतच होत्या. बंगालमध्ये एका १२ वीतल्या मुलाने चेपूवर केवळ एक पोस्ट टाकली म्हणून पीसफुल लोकांनी दंगल सुरु केली, घरं जाळली. पण याला जुनैद किंवा तत्सम दोन गटात होणाऱ्या मारामाऱ्यांपेक्षा कमी कव्हरेज मिळालं. अगदी जेव्हा अश्याच घटनेचा हिंदू मनुष्य बळी असतो तेव्हा बातमी होत नाही. उदा. अखलाकची हत्या वि प्रशांत पुजारीची हत्या. वृत्तपत्र वाचायचं सोडू नका पण नक्की काय झालं याची शक्य तेवढ्या स्रोतातून माहिती घेऊन मत बनवणे योग्य.
जेव्हा मुस्लिम दहशतवादी कुठेतरी हल्ला करतात तेव्हा सामान्य आयुष्य जगणारा मुस्लिम त्यापासून आपल्याला वेगळं राहता यावं म्हणून "हल्ला करणार्यांनी फक्त कुराण किंवा घोषणा दिल्या म्हणून ते खरे मुस्लिम होत नाहीत" असे म्हणून गप्प राहतो.
शिया मुस्लिम्स सुन्नी व इतर मुस्लिमांना खरे मुस्लिम मानत नाही आणि वाईस व्हर्सा. त्यात हे वाक्य सध्या ऐकू यायला लागलंय. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे सामान्य मुस्लिमसुद्धा धर्माच्या बाबतीत तेवढाच कट्टर आहे. बाकी तुमचा दहशत दाखवणे आणि दहशतवाद यात गोंधळ झालेला दिसतोय.
बर समजा चुकून हि लोक हाताबाहेर गेली आणि उद्या कत्तली होऊ लागल्या तर हे बालंट हिंदू धर्माच्या माथी मारायचं का? कारण केवळ काही डोकं फिरलेले आणि स्वतःला कट्टर हिंदू मानणारे लोक अमानुष गोष्टी करू लागले?
याच विचाराने आपण वर्षानुवर्षे गप्प रहात आलोय आणि अजूनही गप्पच राहावे का? मुस्लिम धर्माच्या नावाखाली हिंदूंच्या कत्तली करत रहातात आणि हिंदू मात्र पॉलिटिकली करेक्ट रहाण्यासाठी गप्प रहातात. एखादा दहशतवादी हल्ला ज्यात अचानक एक किंवा अनेक लोक मृत्युमुखी पडतात याची आणि जुनैदसारख्या प्रकरणात, जिथे सीटवरून भांडण चालू होऊन त्याचे पर्यवसान एका मृत्यूमध्ये झाले याची तुलना होऊ शकते का? गुजराथमध्ये २००२ च्या आधी वर्षातून एकदा तरी दंगल उसळत असे. २००२ मध्ये एकदाच धडा शिकवल्यावर पुढची १२-१३ वर्ष एक तरी दंगल झाली का? झाली असेल तर उदाहरणाने दाखवून द्या.
मुस्लिम देशांत इतर धर्मियांना मिळणाऱ्या वागणुकीला जरी बाजूला ठेवले तरी भारतासारख्या सेक्युलर देशात जर मुस्लिमांना वाटत असेल की इतर सर्व धर्मियांनी मुस्लिम धर्माप्रमाणे वागावे किंवा शरियाचा मान ठेवावा. तर मग मुस्लिमांनी सुद्धा इतर धर्मियांच्या भावनांचा आदर ठेवणे आवश्यक आहे. कॅनडासारख्या देशात तिथे स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांनी केवळ त्यांना चालत नाही म्हणून सर्व शाळांमध्ये डुकराचे मास विकू नये अशी मागणी केली. तिथे अजून जरा मुस्लिमांची संख्या वाढू दे, मग बघा काय होतंय.
बाकी अभ्यास वाढवा सारखे सल्ले कृपया स्वतःला पण कधीतरी देत जा, कदाचित फायदा होईल!
सल्ले आपले आपल्याला देत नसतात. सल्ले नेहमी दुसऱ्याला द्यायची गोष्ट आहे. तसा माझा अभ्यास चालूच असतो. पण तुमच्या प्रतिसादात तुम्ही माझं एक वाक्य उचलून प्रतिवाद करताय आणि तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी एकही उदाहरण देत नाही. म्हणून म्हणलं... भावना दुखावल्या असतील तर स्वारी बर्का.
21 Jul 2017 - 3:25 pm | शब्दबम्बाळ
हि तुमची अशी वाक्ये माझ्या पहिल्या प्रतिसादाशी सुसंगतच आहेत! आणि हेच मला दाखवायचं होत बाकी काही नाही...
आता हे तुमचे वाक्य इसिस किंवा अजून कुठल्या गटाला लावा मुस्लिमांच्या नजरेतून... ते पण हेच म्हणू लागतील कि, ते हल्ला करणारे अमेरिका रशिया यांच्याशी लागेबांधे असलेले आणि धर्माशी संबंधित नसलेले लोक आहेत त्यांना पैसे पुरवला जातो आणि मुस्लिमांसारखे दाखवले जाते... मीडियापण अमेरिकेच्याच हातात आहे!
याला समस्येकडे दुर्लक्ष्य करणे असे म्हणता येईल जेणे करून आपल्या धर्माला बोल नको लागायला.
तुमचा दंगल करणार्यांना पाठिंबा आहे का? दंगली मध्ये जे लोक मेले ते मारायलाच हवे होते हे तुमचे म्हणणे आहे का?
याला तुम्ही धडा शिकवणे म्हणता? आपल्या देशात कायदा सुव्यवस्था आहे गुन्हेगारांना कडक शिक्षा करायला.. तुमचा त्याच्यावर भरवसा नाही का? खेद वाटला असे वाक्य ऐकून...
असेही अमेरिकेत राहून कोणी कसा धडा शिकवायचा ते सांगायला काय जातंय नाही का?
संपादक मंडळ यांच्या प्रतिसादाकडे लक्ष देईल का?
शिकल्या सवरलेल्याना धर्माच्या नावावर इतक्या सहजपणे हिंसेच्या समर्थनार्थ वळवणे शक्य असेल तर अशिक्षित/गरजू लोकांना आपल्या बाजूने करायला कितीसा वेळ लागत असेल?
आणि हो माझ्या भावनांची इतकी काळजी नसावी कारण... जाऊदे
21 Jul 2017 - 8:09 pm | ट्रेड मार्क
मी हिंसेचं समर्थन कुठे करतोय. एखादी व्यक्ती जर रोज मला त्रास देत असेल आणि मी बरेच दिवस सहन केल्यावर एक दिवस धडा शिकवला. तर फक्त मी दोषी ठरेन? आपल्या मुलांना सुद्धा आपण सांगतोच ना स्वतःहून त्रास देऊ नकोस पण जर कोणी तुला त्रास देत असेल आणि समजावून सांगूनही ऐकत नसेल तर मात्र शांत बसू नकोस. गुजराथमध्ये जे झालंय तेच मी सांगितलंय. ज्या मोदींवर २००२ दंगलीबद्दल इतके आरोप झाले तेच मोदी सलग ३ टर्म्स मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. त्या काळात एकही दंगल झाली नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुजराथ मधील मुस्लिमांची संख्या २७% ने वाढली.
तुमच्या मते मुस्लिमांनी कितीही त्रास दिला, धर्माच्या नावाखाली कत्तली केल्या तरी हिंदूंनी मात्र शांत राहायचं. एकदा जरी हिंदूंनी प्रतिकार केला तरी हिंदू हिंसक ठरवले जातील. यालाच पुरोगामी मानसिकता म्हणतात. मी कुठेही हिंदूंनी स्वतः पुढाकार घेऊन इतर धर्मियांच्या कत्तली कराव्यात असं म्हणलेलं नाहीये. पण म्हणून कोणी त्रास देत असेल, डिवचत असेल तर तुमच्या मते काय करायचं? २००२ गुजराथ दंगल उसळायचं मुख्य कारण तुम्हाला माहित असेलच. २००२ नंतर गुजराथ मध्ये मुस्लिमांचं राहणं अशक्य झालंय असं तुम्हाला वाटतंय का? असेल तर उदाहरणांनी आणि आकडेवारीने सिद्ध करा. तुमच्या मते हिंदूंनी अत्याचार सहन करत राहावे का?
असो. मला तरी मी काही आक्षेपार्ह लिहिलंय असं वाटत नाही. त्यातूनही जर संपादक मंडळास काही आक्षेपार्ह वाटत असेल तर प्रतिसाद उडवला तरी चालेल.
बाकी अमेरिका मध्ये यायलाच पाहिजे का? मी कुठे राहतो याचा काय संबंध आहे?
17 Jul 2017 - 7:22 pm | Ranapratap
टफि साहेब तुमच्या सारखे विचार असणारे इतर धर्मातील 4 लोक गोळा करा, मग निधर्मी बणा. मुख्यतः असा विचाराचे मुस्लिम लोक शोधा.
17 Jul 2017 - 7:28 pm | सुबोध खरे
निधर्मी होण्याचं किंवा जाहीरपणे सांगण्याचं स्वातंत्र्य( लाड म्हणा हवं तर) अख्ख्या आशिया खंडात फक्त भारतात किंवा इस्रायल मध्ये आहे. मध्ये बाकी सर्व देशांत दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा दिली जाते. या स्वातंत्र्याचा "गैरवापर" करणारे निधर्मांध आपल्या देशात किती आहेत हे सांगण्याची गरज नाही. त्यात आपला चुकून समावेश होत नाही हे पाहणे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.
18 Jul 2017 - 1:50 pm | अत्रे
काहीही! किती आशियायी देशांचा अभ्यास आहे तुमचा?
17 Jul 2017 - 7:54 pm | प्रतापराव
लेख आवडला. धर्ममुक्त जग ही सुंदर कल्पना आहे.
17 Jul 2017 - 8:09 pm | संदीप-लेले
१. धर्म कालबाह्य झाले आहेत काय?
नक्कीच.
2.मुस्लिम दहशतवादाने जगभर मांडलेला हैदोस ,उगवता हिंदू दहशतवाद यावर जग धर्ममुक्त होणे हाच उपाय आहे काय?
मुळात आंतरराष्ट्रीय राजकीय आणि आर्थिक शक्तींना असे होणे मान्य आहे का हा कळीचा मुद्दा आहे. हा प्रश्न धर्मापेक्षा या शक्तींनी निर्माण केला आहे.
तरीही ... जग धर्ममुक्त होणे किंवा जगात एकच एक धर्म राहणे अशी परिस्थिती निर्माण झाली तर तो एक उपाय असू शकतो. पण याशिवाय, इतरही उपाय लागू होऊ शकतात.
३.तुमचा पाल्य निधर्मी विचारांचा व्हावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता?
धर्म मानणे वा न मानणे हे ज्याच्या त्याच्या भावनिक जडणघडणीवर अवलंबून असते. ही जडणघडण प्रामुख्याने जन्मजात असावी. ज्या व्यक्ती धर्माच्या / श्रद्धेच्या बाबतीत काठावर असतात, त्यांच्याच बाबतीत अनुभवानुसार त्यात बदल होण्याची शक्यता असते. जे लोक एका टोकाला [आस्तिक किंवा नास्तिक] आहेत, त्यांचे मतपरिवर्तन करणे दुरापास्त. निव्वळ श्रम आणि वेळेचा अपव्यय !
शिवाय आपली मते आपण दुसऱ्यावर लादू शकत नाही. लादूही नये.
त्यामुळे केवळ स्वत:च्या वागण्यातून उदाहरण घालून देणे एवढेच हाती राहते. त्याचा इष्ट परिणाम झाला तर उत्तम. नाही तर ७ अब्ज लोकात आणखी एकाची भर असे मानून पुढे चालत राहणे !
17 Jul 2017 - 8:18 pm | सचु कुळकर्णी
नेहमिप्रमाणे अत्यंत अभ्यासपुर्ण, निष्पक्ष, निस्पृह, निर्भिड, लिखाण.
हिंदू मरु देत वा मुस्लिम, वेळ मिळाल्याने आपला केमिस्ट्रीचा पेपर यामुळे नक्की सुटणार हा स्वार्थी विचार मनात आला. आपण निधर्मी होत आहोत याची पहील्यांदा झालेली जाणीव.
अच्छा ह्याला निधर्मी म्हणतात होय.
सारो छे ऐकदम चोक्कस.
18 Jul 2017 - 5:08 pm | दीपक११७७
हे वाक्य असे हवे होते का?
हिंदू मरु देत वा मुस्लिम, वेळ मिळाल्याने आपला केमिस्ट्रीचा पेपर यामुळे नक्की सुटणार हा स्वार्थी विचार मनात आला. आपण स्वार्थी होत आहोत याची पहील्यांदा झालेली जाणीव.
18 Jul 2017 - 12:35 pm | गामा पैलवान
टफि,
जग धर्ममुक्त झाले पाहिजे हा तुमचा विचार 'सगळ्यांनी खाणे थांबवले तर हागणदारी आपोआप बंद पडेल' या धर्तीवरचा आहे.
आ.न.,
-गा.पै.
18 Jul 2017 - 5:11 pm | दीपक११७७
हा हा हा लई भारी
18 Jul 2017 - 1:53 pm | अत्रे
धर्म कालबाह्य झाले आहेत काय?
नाही. बऱ्याच लोकांची नैतिक दृष्टी त्यांच्या-त्यांच्या धर्मातून येते.
18 Jul 2017 - 3:40 pm | धर्मराजमुटके
टाईमलाईन समाप्त झालेली नाहीये. तुमच्या जन्मदाखल्यावर तुम्ही "हिंदू' हा धर्म खोडून 'निधर्मी" लिहून घेतले आहे काय ? मनातल्या मनात निधर्मी होऊन काय फायदा ? कागदोपत्री पुरावा नको काय ?
18 Jul 2017 - 3:59 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
तुमच्या जन्मदाखल्यावर होमो सेपियन्स असा उल्लेख् आहे का?
नसेल तर तुम्ही स्वतः ला माणुस का समजता?
18 Jul 2017 - 4:04 pm | धर्मराजमुटके
नाही. पण माझ्या जन्मदाखल्यावर "हिंदु' असा उल्लेख आहे. :)
18 Jul 2017 - 6:21 pm | सुबोध खरे
ऑस्ट्रेलोपिथेकस, झिंझानथ्रोपस किंवा होमो इरेक्टस यांचे जन्म दाखले असल्याचे माहीत नव्हते.
(जन्म दाखले फक्त होमो सेपियन्सचेच असतात असे गृहीत आहे.)
19 Jul 2017 - 4:07 pm | स्थितप्रज्ञ
आपण टाईमलाईन मधून जाता जाता "निधर्मी" झालोत की "अधर्मी" याचा खोलवर जाऊन विचार करा. एक वेळ "निधर्मी" झालेलं परवडलं पण "अधर्मी" झालात तर स्वतःलाच मिट्ट काळोखाच्या गर्तेत अडकवून घेताय हे लक्षात घ्या. निधर्मी होणं इतकं सोपं नाही (नास्तिकत्वावर संदीप खरेंची कविता "एक खरा खुरा नास्तिक" ऐकली असेल तर समजून येईल). आपल्याला एखादी गोष्ट काळात नाही म्हणून ते बिनकामाची ठरवणे म्हणजे "पाण्याचा फॉर्मुला H2O कसा काय?" हे मला समजले नाही (किंबहुना मी समजूनच घेतले नाही) म्हणून पाणी (आणि पाणी असलेल्या सगळ्या वस्तू) निव्वळ थोतांड आहेत असं म्हणण्याइतपत हास्यास्पद आहे :D
बाकी वेदांना इतर पंथांच्या ग्रंथांबरोबर एकसमान तोलून ते (सगळेच ग्रंथ) किती बिनकामाचे आहेत हे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करून ते तुम्ही अजिबात वाचले (आणि समजून घेतले) नाहीत याची पावतीच दिली.
19 Jul 2017 - 7:29 pm | प्रतापराव
उगवता हिंदु दहशतवाद म्हणजे काय?
19 Jul 2017 - 7:29 pm | प्रतापराव
उगवता हिंदु दहशतवाद म्हणजे काय?
20 Jul 2017 - 9:15 pm | सुबोध खरे
श्री सुशीलकुमार शिंदे यांनी राजकीय स्वार्थासाठी निर्माण केलेले पिल्लू आहे. अत्यंत खालच्या वृत्तीने केलेले कार्य आहे.
21 Jul 2017 - 9:13 pm | कानडाऊ योगेशु
सुशीलकुमार शिंदे नाहीत बहुदा पी. चिदंबरांनी हा शब्द पहिल्यांद्या वापरला. सॅफ्रन टेरिरिझम म्हणुन.
सुशीलकुमार शिंदें आर.एस.एस व दहशतवाद ह्यासंबंधी काहीतरी बरळले होते.
20 Jul 2017 - 9:16 pm | सुबोध खरे
त्यावेळेपर्यंत अत्यंत सज्जन आणि सुसंस्कृत व्यक्ती अशी ओळख असणारे श्री सुशीलकुमार यानंतर मनातून कायमचे उतरले.