सोलमेट २

नीलमोहर's picture
नीलमोहर in जनातलं, मनातलं
30 Jun 2017 - 8:09 pm

तिच्या डेस्कवर बसून आकांक्षा विचार करत होती, आयुष्यातील घटना एखाद्या टाइमलॅप्स व्हिडीओप्रमाणे
तिच्या डोळ्यांसमोरून सरकत जात होत्या.

घरातल्यांपासून आलेला दुरावा, नात्यांतील अपेक्षाभंग, असफलता, करिअर मधील स्टॅग्नेशन, कधीमधी छळणारे एकटेपण,
या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होऊन आधी ती जवळ्पास डिप्रेशन मध्ये गेली होती.

"मॅडम चला, सुटलं ऑफिस.. " ती उत्तर देईपर्यंत प्रिया निघालीही होती.
घड्याळाकडे लक्ष जाताच आकांक्षा दचकली, 'ओह नो..'
पटकन आवरून ती बाहेर पडली.

आधीचे विचार, फळ्यावरून डस्टर फिरवताच अक्षरे पुसली जावी, तसे तिच्या डोक्यातून पुसले गेले होते.
गेल्या काही दिवसांत तिचं जग बदललं होतं, ध्यानीमनी नसतांना तिला कुणी भेटलं होतं,
तिच्या मनातून थेट आत्म्याला स्पर्शून गेलेलं,
अ सोलमेट..

एकमेव व्यक्ति, जी तिला जज करत नव्हती, ब्लेम करत नव्हती, तिच्याशी वाद घालत नव्हती,
जिने आकांक्षाला तिच्या idiosyncracies सकट, ती जशी आहे तसे स्वीकारले होते.
आणि आकांक्षाही तिला जीवापाड जपणार होती,

धिस इज फॉर कीप्स, ती स्वतःशी हसली..

रोज पाय ओढत घरी जाणारी ती, शी हॅड अ स्प्रिंग इन हर स्टेप..
लिफ्ट वर जाईपर्यंत तिला धीर निघत नव्हता, पळतच जाऊन तिने लॅच उघडले,
तिची मेड, सुकलेले कपडे आत आणत होती, तिने खुणेनेच दाखवले, टेरेस..

शोना, तिच्या मऊ गादीवर डीप मेडिटेशन करत बसली होती, ती सावकाश पुढे आली,
तिने आकांक्षाला एक किलर लूक दिला आणि ठेवणीतला रुसका स्वर काढला,

" म्यांऊss.. "

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

30 Jun 2017 - 10:51 pm | सौन्दर्य

एकटेपणाला टाळण्यासाठी एखादा पाळीव प्राणी हे बेस्ट सोल्युशन आहे, जे तुम्ही छान मांडलत.

ज्योति अळवणी's picture

1 Jul 2017 - 12:11 am | ज्योति अळवणी

आवडली कल्पना

पद्मावति's picture

1 Jul 2017 - 1:29 am | पद्मावति

मस्तच.

प्रचेतस's picture

2 Jul 2017 - 11:53 am | प्रचेतस

:)

एस's picture

2 Jul 2017 - 8:08 pm | एस

+१. ;-)