"स्त्रीयांना बहुदा विनम्र राहण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं.पण माझ्या जीवनाने माझी कसोटी भरपूर घेतली.मला वाटतं, माझ्यातला धीटपणा,आणि खंबीरपणा आणि त्याऊप्परही माझ्यात असलेला आपमतलबीपणा ह्याचा चांगल्यातर्हेने माझं मला
त्या कसोटीतून पार पडण्यात उपयोग झाला "
काण्यांच्या नलूला सर्व नेहमीच धट्टिंगण म्हणायचे.कारण मुलींपेक्षा ती मुलांतच जास्त वेळ घालवायची.पण त्यावेळी जरी सर्व असं म्हणत असले तरी ते तिचं वागणं धीटपणाचं होतं हे लक्षात येत नव्हतं.आता नलू एक मुलाची आई झाली असून आता ती एका कॉलेजमधे लेक्चरर म्हणून काम करते.
एकदा मी बसच्या लाईनमधे उभा होतो.माझ्या मागे नलू आपल्या मुलाला घेऊन उभी होती.चूळ्बूळ करणार्या आपल्या मुलाला ती काही तरी उपदेश करीत होती. ती तिची बोलण्याची ढब आणि तो तिचा आवाज मला जरा परिचयाचा वाटला.कुतूहल म्हणून मी तिला विचारलं,
"तुझं आडनांव काणे कां?"
ती पटकन तिच्या त्या स्टाईलमधे म्हणाली,
"हो माझं आडनांव काणे पण ते माहेरचं होतं,आता मी नलिनी भावे झाले."
मी क्षणभर विचार केला म्हणजे ही आता भावे जरी झाली तरी नलू हे नांव तेच आहे.
मी म्हणालो,
"म्हणजे तू पूर्वीची नलू काणे ना?"
तिने होय म्हणताच,मला तिला माझी ओळख करून द्दायला जास्त प्रयास लागला नाही.
तेव्हड्यात बस आली,आणि माझा रूट तो नव्हता पण नलूला त्या रूटने जायचं असल्याने ती लगबगीने बसमधे चढली आणि पटकन तीने आपल्या पर्समधून तिचं कार्ड माझ्या अंगावर भिरकावलं आणि मोठ्यानी म्हणाली,
"मला फोन करा"
मी ते व्हिझीटिंग कार्ड वाचताना विचार करू लागलो,तीच समयसुचकता,तोच धीटपणा ह्या मुलीने अजून जोपासून ठेवलाय.
मुंबई युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसच्या परिसरात- कालिनाला- ती राहत होती.
त्या पत्यावर मी एकदिवशी तिच्या घरी गेलो.गेल्या गेल्या आमच्या गप्पा सूरू झाल्या.
मी तिला म्हणालो,
"नलू तू आहे तशीच आहेस.त्या बसस्टॉपवर तुला पाहून माझी स्मृती तुझ्या लहानपणाच्या दिवसांची आठवण देत होती."
"अगदी बरोबर.आणि त्याचं कारण माझे बाबा.....नलू पटकन म्हणाली.
मी धीट राहणं,खंबीर राहणं आणि आपमतलबी राहण्यावर विश्वास ठेवते.ही विशेषता मी माझ्या बाबांकडून शिकले.धीटपणा हा प्रथम येतो.मी माझ्या बाबांची एकूलती एक मुलगी.मी व्यायाम करायची.मी धावण्याच्या शर्यतीत मुलांच्या पूढे असायची.
पायाला दुखापत झाली तरी मी लंगडत का होईना खेळायची.माझे बाबा मला सर्वांत धीट वाटायचे.आणि मला अगदी त्यांच्या सारखं व्हायला आवडायचं.त्यांनी कधीही शाळा चूकवली नाही.त्यांच्या कॉलेजचा खर्च त्यांनी मोलमजुरी करून संभाळला.
अर्धवेळ एका कचेरीत हिशोबनीस म्हणून काम करून रात्रीच्या शाळेत जाऊन शिक्षण घेतलं.
माझ्या बाबांनी मला खंबीर कसं राहायचं ते शिकवलं.शरण जायला अनिच्छुक कसं राहायचं ते शिकवलं.खंबीर राहिल्याने मी एकदा बलात्काराच्या प्रसंगातून वाचली.मी त्या नालायकाला झूंज दिली.माझ्या हातात असलेल्या वस्तूने त्याचा चेहरा काळामोरा केला. त्याचा चेहरा आणि त्याचे कपडे कसे होत ते माझ्या स्मृतित ठेवलं.इतर मुलींना त्याच्यापासून उपद्रव होऊं नये म्हणून निश्चय केला.मी त्याची कोर्टात ओळख पटवून त्याला तुरूंगात घालण्याची तजवीज केली.
कधीकधी धीटपणा आणि खंबीरपणा असणं पूरं नसतं.आप्पलपोटेपणावरही माझा विश्वास आहे.
मी काही भलीमोठी बाई नाही.तसा माझा कद लहानसाच आहे.खरं सांगू तर माझी हजेरी आणि माझा कद पाहून माझ्या मला मी कुणाचं ध्यान ओढून घेण्यापैकी नाही.एका लहानश्या संध्याकाळच्या कॉलेजमधे मी इंग्रजी हा विषय शिकवते. शिक्षणाची भारी उत्सुकता नसलेल्याना मी शिकवते.तशी मी मतलबी आहे.मी माझ्या विद्दार्थ्याच्या मागे लागत असते.काहीना माझी ही वागणूक आवडतही नसावी.पण नंतर ते माझी कदर करताना पाहिलंय.
"आता अनादर करा नंतर कदर करा" हे माझं ध्येय आहे.
मी माझ्या स्वतःशीसुद्धा कधीकधी मतलबी राहते.त्यामुळे जरी आदल्या रात्रीचं जागरण झालं तरी मी माझ्या मलाच सकाळी बिछान्यातून उठवते.मी माझ्याशीच चांगली वागत नाही.घरात वेळ काढत राहायला मी माझ्या मला परवानगी देत नाही.
माझ्या स्वतःच्या बेशिस्त राहाण्याच्या संवयीला मी विरोधात असल्याने माझ्या विद्दार्थ्यांची ससेहोलपट होण्याला मी कारणीभूत होत नाही.आणि तेच दिवस माझे विशेष मनोरंजनाने शिकवायचे दिवस असतात.
माझ्यातल्या आपमतलबीपणाला अशी मी उत्तरदायी ठरते.
ती धीट आणि खंबीर राहाण्याची माझ्यातली इच्छा जी माझ्या बाबांकडून मला मिळाली ती इच्छाचा मला अशा तर्हेने नुकसान न होण्यापासून उचित उपयोग होतो.माझ्या बाबांना अर्धांगवायू होऊन निर्वतताना मी पाहिलंय.पण त्यांनी जगण्याची इच्छाशक्ति कधी सोडली नाही.कदाचीत त्यांना आणि आम्हा सगळ्यांना त्यांच लवकर निर्वतनं जास्त सोपं गेलं असतं जर का त्यानी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मृत्युशी लढत दिली नसती तर.
जरी ते माझ्या जीवनात आता नसले तरी त्यावेळी ते त्यांचा शेवट येई पर्यंत स्वतःचेच राहिले.कुणा एका कविने आपल्या वडीलांशी अनुरोध करीत म्हटलं आहे,
"करा हो क्रोध त्या विजत्या वातीचा"
स्त्रीयांना बहुदा विनम्र राहण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं.पण माझ्या जीवनाने माझी कसोटी भरपूर घेतली.मला वाटतं, माझ्यातला धीटपणा,आणि खंबीरपणा आणि त्याऊप्परही माझ्यात असलेला आपमतलबीपणा ह्याचा चांगल्यातर्हेने माझं मला त्या कसोटीतून पार पडण्यात उपयोग झाला "
तिचा निरोप घेताना मी तिला म्हणालो,
"नलू तू धीट,खंबीर आणि आपमतलबी आहेसच आणि त्याशिवाय विनम्रपण आहेस.हे मी तुला सांगितलं तर त्यात काही चूकीचं होणार नाही.कारण स्त्रीया जात्याच विनम्र असतात."
नलूने हे ऐकल्यावर जो चेहरा केला तो अजून माझ्या लक्षात आहे.
ती विनम्र दिसलीच आणि लाजलेली दिसली.तिला काहीही न सांगता मी माझ्याशी पूटपूटलो.
"लाजणं हा तर स्त्रीयांचा उपजत गूण आहे"
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
25 Feb 2009 - 2:17 pm | दशानन
सुंदर.
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
25 Feb 2009 - 10:06 pm | प्रमेय
अप्रतिम.
याला जरा पुढच्या पानावर आणा राव!
25 Feb 2009 - 10:17 pm | चकली
लेखन आवडले. छान लिहलाय!
चकली
http://chakali.blogspot.com
25 Feb 2009 - 10:34 pm | शितल
सामंत काका,
खुप सुंदर लिहिले आहे. :)
25 Feb 2009 - 11:04 pm | संजय अभ्यंकर
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
25 Feb 2009 - 11:07 pm | अनामिक
सुंदर लेख!
अनामिक
26 Feb 2009 - 1:10 am | भाग्यश्री
फार आवडला हा लेख सामंतकाका!
http://bhagyashreee.blogspot.com/
26 Feb 2009 - 10:34 am | मैत्र
खूप आवडला..
28 Feb 2009 - 7:37 am | श्रीकृष्ण सामंत
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com