नोंद : लेखा चा उद्देश अंधश्रद्धा ला खतपाणी घालणे नाहि.
तेव्हा मी महाविद्यालय मध्ये शिकत होतो तेव्हाची हि माझी गोष्ट आहे. पहाटे लवकर उठून व्यायाम शाळेत जाण्यासाठी मी माझे गजराचे घड्याळ एक तासाने पुढे करून ठेवत असे, जेणे करून ५ वाजता गजर वाजला तर मी ४ वाजताच उठून एक तास अभ्यास करून फ्रेश होऊन मग ५ वाजत व्यायाम शाळेत जाईल असा होता.
सकाळी लवकर ४ ला उठणे खूप जिकरीचे आणि अवघड वाटे म्हणून हि खटाटोप केली होती.
असो, त्या दिवशी पण मी नेहमी प्रमाणे ५ वाजताचा गजर वाजताच उठलो, पण आदल्या रात्री मित्रांसोबत चिवडा खात खात खूप खमंग भुतांच्या गप्पा मारल्या होत्या. तसेच त्या दिवशी अमावस्या आहे हे पण गप्पातून कळले होते. या विचारात असतानाच मी हे विसरून गेलो कि माझे घड्याळ मी एक तासाने पुढे करून ठेवले आहे आणि ५ वाजले म्हणून तसाच माझी सायकल घेऊन व्यायाम शाळे कडे निघालो. 4 वाजताचा अंधार रोजच्या पेक्षा जास्त वाटत होता, कारण माझा समज मी ५ वाजता बाहेर आलो होतो असा होता. मनात आज अमावस्या आहे आणि रात्रीच्या भुतांची गप्पाची आठवण होती आणि त्या मुळे मनात आधीच भीती होती.
आणि घराच्या गेट बाहेर येताच माझे पाय एका नारळावर पडले, नीट बघितले तर कोणी तरी गेट बाहेर कुंकवाचे गोल करून त्यात नारळ लिंबू ठेवले होते. तिथेच मनात एकदम भीती वाटली . पण व्यायाम ला जाणाऱ्याने कशाला भ्यायचे असा विचार केला आणि तसाच पुढे निघालो , आज रस्त्यावर माणसे पण खूपच कमी दिसत होती.
एक मन म्हणत होते घरी वापस जाऊन मस्त ताणून झोपावे , पण तसेच सायकल चालवत राहिलो आणि मुख्य रस्त्यावर आलो .
तेव्हड्यात रस्त्यावर समोर एक विरुद्ध दिशेने बंद टेम्पो उभा दिसला, आणि जसे जसे पुढे जाईल तसे टेम्पो विरुद्ध दिशेने हळू हळू पुढे येत आहे असे वाटले. टेम्पो चा आवाज तर येत नव्हता, म्हणून वाटले मला भास होत असेल . पण नीट निरखून बघितले तर लक्षात आले, कि टेम्पो खरंच हळू हळू पुढे येत होता. मला वाटले चालक हळू हळू टेम्पो चालवत पुढे घेत असेल. पण जवळ जाऊन समोरून टेम्पो च्या केबिन मध्ये सायकल वरूनच बघितले तर आत कुणीच दिसले नाही आणि टेम्पो तर पुढे येत होता.
मग मात्र माझे सायकलचे पँडल मारणारे पाय एकदम थंड पडले, आणि मनात एकदम भीती वाटून आली, कि आज अमावास्याचे भुताटकी होईल आपल्याला .
रात्री भुतांच्या गप्पा मधले हर एक किस्सा आठवून मन अजूनच घाबरले, सगळीकडे अंधार होता. टेम्पो मधले भूत आता आपल्याला दिसून आपले काही खरे नाही असे वाटू लागले. बंद टेम्पो विना चालक कसा काय पुढे जात आहे हे कळेना, मन एकदम सुन्न झाले, आमवासची पहाट त्यात रस्त्या वर कुणी चिट पाखरू नाही, धड-धड एकदम वाढली . टेम्पो विना चालक पुढे येत होता, तरी पण मी सायकल दामटली , आणि जसा टेम्पो क्रॉस केला तेव्हा टेम्पो मागाहून चालक आणि त्याचा सहायक टेम्पो ला ढकलत असलेला दिसला, तेव्हा लक्षात आले कि बंद टेम्पो विना चालक कसा पुढे चालला होता आणि एकदम सुटकेचा श्वास टाकला आणि पुढे गेलो. आलेला अनुभव आठवूं स्वतःचेच हसू आले.
प्रतिक्रिया
9 Jun 2017 - 2:52 pm | एस
खी खी खी खी!!!
9 Jun 2017 - 2:52 pm | एस
खी खी खी खी!!!
9 Jun 2017 - 2:55 pm | खेडूत
छान अनुभव! =)
हा लेख किरकोळ बदल करून सकाळ पेपरच्या मुक्तपीठ साठी पाठवा, खरंच खूप मजा येईल.
10 Jun 2017 - 10:28 pm | mayu4u
लुना वाले ब्रह्मे, पावसकर मॅडम, मांजर वाल्या सप्तर्षी आणि लाडू कावळा यांना स्पर्धा!
9 Jun 2017 - 3:24 pm | प्रीत-मोहर
लोल
9 Jun 2017 - 3:42 pm | अनन्त्_यात्री
.
9 Jun 2017 - 4:01 pm | Ravimanwar
आमच पण असाच काही झालं म्हणावं ..
9 Jun 2017 - 4:02 pm | Ravimanwar
आमच पण असाच काही झालं म्हणावं ..
9 Jun 2017 - 4:28 pm | सचिन काळे
भूsssत आयाsss भागो!!! :lol:
मस्तं (घाबरवणारा) अनुभव.
9 Jun 2017 - 4:34 pm | पी. के.
छान अनुभव!
9 Jun 2017 - 4:40 pm | सिरुसेरि
+१ . खट्याळ टेम्पो .
9 Jun 2017 - 4:47 pm | किसन शिंदे
आदल्या रात्री चिवड्याच्या ऐवजी बदाम खाल्ले असतेत तर मोकळा टेम्पो पुढे येताना पाहून घाबरण्याऐवजी मागून कुणी ढकलतंय का हे आधी पाह्यलं असतंत.
असो.
9 Jun 2017 - 5:59 pm | गामा पैलवान
काय सांगता राव! अवघ्या एका रात्रीत बदाम पचून त्यांचं सार मेंदूत पोहोचून बुद्धी तल्लख झाली असती? अकलेची एक्स्प्रेस डिलिव्हरी वाटतं? ;-)
-गा.पै.
9 Jun 2017 - 6:10 pm | किसन शिंदे
:D
9 Jun 2017 - 6:54 pm | सूड
मला वाटलं बदाम जास्त खाऊन गरम पडल्यामुळे वारी लागल्याबद्दल बोलतोयेस की काय!!
9 Jun 2017 - 5:30 pm | मुक्त विहारि
मस्त
9 Jun 2017 - 5:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टेंपो मागून ढकलत होते ही आयडीया आवड्ली.
-दिलीप बिरुटे
9 Jun 2017 - 6:31 pm | आदिजोशी
सरदारजीवर असा एक जुना विनोद होता. असो. काल्पनीक कथा लिहिताना मुदलातल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.
कोणतीही गाडी ढकलताना स्टिअरींग रिकामे सोडून सगळे जण धक्का मारत नाहीत. कधीच.
9 Jun 2017 - 9:50 pm | मुक्त विहारि
आम्ही सायकलच्या धक्क्याने चारचालीला पुलावरून ढकललेले पण वाचले आहे, त्यामानाने हे तर काहीच नाही....
हा हन्त हन्त....
जीवन मोहीत्यांनी लिकाण बंद केले आणि आम्ही पहिले हा प्रतिसाद पण बंद झाला,
9 Jun 2017 - 8:45 pm | सानझरी
लोल!
9 Jun 2017 - 9:59 pm | सतिश गावडे
घाबरलो ना मी.
9 Jun 2017 - 10:02 pm | जव्हेरगंज
भारी!!!
14 Jun 2017 - 4:12 pm | ज्योति अळवणी
वा. मस्त! अगोदर लेखाची दुसरी बाजू वाचली आणि मग उत्सुकतेपोटी हा लेख वाचला. दोन्ही मस्त!
14 Jun 2017 - 5:28 pm | पद्मावति
मस्तच :)
15 Jun 2017 - 1:06 pm | खट्याळ पाटिल
लेखाला सर्व वाचक आणि प्रतिक्रिया देणार्यांचे आभार