संस्कृत उखाणे
मराठीत असतात तसे संस्कृतमध्येही उखाणे आहेत. त्यांना म्हणतात " प्रहेलिका". आज ४ उदाहरणे देत आहे. सुरवातीला जरा सोपे संस्कृत बघू..नेहमीप्रमाणे एखादा दिवस सर्वांना विचार करावयास द्यावा. जे लगेच उत्तर देऊ इच्छितात्त त्यांनी मला व्यनि करावा. मी त्यांनी आधी उत्तरे दिली होती हे सांगेनच.
(१) वृक्षस्याग्रे फलं दृष्टं फलाग्रे वृक्ष एव च !
अकारादि सकारान्तं यो जानाति स पण्डित: !!
(२) कृष्णमुखी न मार्जारी द्विजिव्हा न सर्पिणी !
पंचभर्ता न पांचाली यो जानाति स पण्डित: !!
(३) वृक्षाग्रवासी न च पक्षिराजस्त्रिनेत्रधारी नच शूलपाणि !
त्वग्वस्त्रधारी नच सिद्धयोगी जलं च बिभ्रन्न घटो न मेघ: !!
( ४ ) अस्ति ग्रिवा शिरो नास्ति द्वौ भुजौ करवर्जितौ !
सीताहरणसामथ्यो न रामो न रावण:!!
संस्कृत सोपे असल्याने शब्दार्थ दिला नाही. चला तर शाळेत शिकलेल्या संस्कृतची उजळणी करूया.
शरद
प्रतिक्रिया
30 May 2017 - 12:18 pm | अत्रन्गि पाउस
अननस
30 May 2017 - 12:29 pm | एस
१. या फळाचे युरोपियनांनी ठेवलेले नाव एका सूचिपर्णी वृक्षावरून असले तरी इतर अनेक देशांत आणि संस्कृतातही असलेले नाव हे मूळ 'टूपी' भाषेतील नावाशी कमालीचे साधर्म्य साधणारे आहे हे आश्चर्य आहे.
२. हा प्रतिसाद लिहायला मला हिची गरज पडली नाही. तिच्याऐवजी मी तिच्या पाचपैकी दोन नवऱ्यांचा वापर केला. ;-)
३. तिकडे गुलाबी कागद मिळाल्यास आपल्याकडे हा मिळाला असे म्हणतात.
४. आत्ता फार उकडतंय, त्यामुळे ह्याची गरज नाहीये.
:-)
30 May 2017 - 1:44 pm | गामा पैलवान
सर्जनशीलता आवडली.
-गा.पै.
31 May 2017 - 2:20 pm | सूड
+१
30 May 2017 - 1:49 pm | मोदक
३. नारळ.
30 May 2017 - 3:09 pm | दीपक११७७
१ करवंद
31 May 2017 - 2:18 pm | सूड
ककारादि दकारान्त !! =))
31 May 2017 - 3:03 pm | दीपक११७७
O:-)
1 Jun 2017 - 8:01 am | शरद
श्री. एस यांनी उत्तरेही कोड्यात दिली आहेत व ती मजेदार आहेतच. श्री. मोदक यांनी एक बरोबर दिले आहेच आता सगळे आपल्याला कळेल अशा मराठीत बघू.
(१) वृक्षाच्या वरच्या टोकावर फळ व फळावर वृक्ष याचे उत्तर अननस. दुसर्या ओळीत अने सुरवात व सने शेवट हे स्पष्ट सांगितले आहे.
(२) याचे उत्तर लेखणी (टाक,, बोरू) तोंड शाईने काळे, दोन जीभा म्हणजे पुढील भाग मध्ये चिरून केलेले दोन भाग, पंचभर्ता म्हणजे पाच बोटे.
(३) वृक्षाच्या टोकावरील फळ, नारळ, नारळाला असलेले तीन डोळे, त्याचे सालीचे वस्त्र व आतील पाणी यांचा सुरेख उपयोग..
(४) गळा आहे पण डोके नाही, दोन हात आहेत पण कर नाही म्हणजे चोळी, कंचुकी.. पहिल्या ओळीचे उत्तर शर्ट, कोट होऊ शकेल पण दुसर्या ओळीत खरी खुबी आहे. सीत्तेचे हरण रावणाने केले हे खरे पण ते शक्य का झाले ? तिने कांचनमृगाचा हट्ट धरला म्हणून. हा मृग का हवा ? त्याच्या कातडीची चोळी करावयाची म्हणून.,
म्हणजे सर्व सीताहरण घडले चोळीमुळे.
(आता श्री. एस यांच्या उत्तराची गोडीही लक्षात येईल)
हा धागा पुढे चालवला तर आधी अर्थ मराठीत द्यावा हे उचित.
शरद
.
1 Jun 2017 - 12:08 pm | सूड
लिहित राहा असंच तुमच्या लेखामुळे विस्मरण झालेल्या गोष्टी परत वर येतील. तुम्ही मागे लिहीलेल्या 'मेघनादरिपूतात'च्या ओळींचा भयाण अर्थ फेसबुकावर वाचला. तुमचा लेख आधी नसता वाचनात आला तर ते लक्षात नसतं आलं.