फॉर्मॅलीटी

समो's picture
समो in जनातलं, मनातलं
24 May 2017 - 7:49 pm

बरेच दिवस झाले हा लेख लिहायचा असे चाललेलं आज योग आला. त्याला कारण ही तसेच आहे, गेल्या महिन्यात एका पाहुण्यांच्या घरी कामा निमित्त जाण्याचा योग आला, मी आपला साधारण संध्याकाळच्या वेळी गेलो, जसे सर्वांचे असते तसेच आमच्याही गप्पा टप्पा झाल्या त्याच बरोबर गॉसिपिंग मधून इतर पाहुण्यांचे क्षेम कुशल कळाले. गपांच्या नादात जेवणाची वेळ कधी आली कळा लेच नाही, काही मोजके पदार्थ सोडून सगळे माझ्या नावडीचे पदार्थ होते, परंतु आपल्या संस्कारा नुसार फॉर्मलिटी पाळण्यासाठी मला सगळे खावेच लागणार म्हणून मी नावडता पदार्थ सर्वात आधी संपवायचं ठरवला आणि तो पदार्थ संपल्यावर फॉर्मलिटी म्हणून म्हटले चांगला झालाय असे म्हणायचा अवकाश,तर क्षणाचाही बिलम्ब न करता माझे ताट त्या नावडत्या पदार्थने लगेच भरून टाकण्यात आले.
हा किस्सा सांगायचा उद्देश म्हणजे आपण लहान पणा पासून समोरच्या माणसाला दुखवायचेच नाही या उद्देशाने काही फॉर्मलिटी पाळत असतो, पण त्या खरंच गरजेच्या असतात का ओ? आता बघा ना मगाशी सांगितल्या प्रमाणे मी जर जेवणा आधी संगितले असते की हा पदार्थ मला आवडत नाही तर ते दुखावले गेले असते मान्य आहे. पण समोरच्याला नाही आवडणार ह्या विचाराने आपण संकोच करतो आणि स्पष्ट बोलणे टाळतो हीच प्रक्रिया लहानपणा पासून ते जीवनभर अव्ह्याहत पणे चालू असते,जो फॉर्मलिटी पाळतो तो संस्कारी आणि जो नाही पाळत तो mannerless असे सरळ वर्गीकरण करतो आपण.
आता बघा ना जर बायको ने नवऱ्याला विचारले की आज माजा मेकअप कसा झालाय किंवा ह्या साडीत मी कशी दिसते तर नवऱ्याने हि नसंकोचता चांगले तर चांगले आणि नाही तर नाही informaly सांगितले पाहिजे असे मला वाटते.
सध्या तर मी साध्या फॉर्मलिटी मोडण्यापासून सुरवात केलीये जसे की एखादा पदार्थ आवडत नसेल तर नकोच म्हणणे किंवा चहा नकोच असेल तर नाहीच म्हणणे.
एकेकेदा असे वाटते की आपण उगाचच फॉर्मलिटी मध्ये गुंतून जातो आणि freely बोलण्याचे विषय राहूनच जातात किंवा बोलल्याच जात नाहीत.
माझे तर असे मत आहे की तोडून टाका फॉर्मलिटी व्हा जरा informal आणि बघा त्या जगण्यात पण एक वेगळीच मजा आहे.
सध्या तरी इथेच थांबतो हा माझा मिपा वरचा पहिलाच लेख आहे.ह्या विषयावरील आणखी काही किस्से असतील तर नक्कीच share करेन.
आपला अभिप्राय नक्की कळवा आवडला असेल तर हो नाही तर नाही b informal.
-आपलाच informal मित्र समो

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

सच्चिदानंद's picture

24 May 2017 - 8:02 pm | सच्चिदानंद

हा हा हा.. छान.!
मी पण आता आधीच प्लेट मागून घेतो आणि जे आवडत नाही, जे संपणार नाही, ते आधीच काढून ठेवतो. कोणी काय म्हणायचे ते म्हणो.

वत्सा, गोष्टी साध्या सोप्या केलेल्या नेहमीच बर्‍या.

तेजस आठवले's picture

24 May 2017 - 8:15 pm | तेजस आठवले

भिडस्तपणा दाखवलात तर असेच होणार.
मी खालील वाक्ये वापरतो. फटकळपणाचा शिक्का आहेच कायमस्वरूपी पण एकदा बोललो की आपण मोकळे :)
"मला अमुकअमुक पदार्थ आवडत नाही परंतु तो पानात वाढलेला आहे म्हणून मी तेवढाच खाईन."
"हा पदार्थ मी खाऊ शकत नाही, त्यामुळे तो पानातून काढून ठेवा. मी तो कुठल्याही परिस्थिती खाणार नाही आहे."
" मला हा पदार्थ फारसा आवडला नाही.तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही परत हा करू शकता पण मला खाण्यासाठी (गृहीत)धरू नका."

आधी कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय.

मला देखील असे वाटत आहे. नेमकं कोठे वाचले असावे हे आठवत नाही आहे.

निसोंनी डुआयडी काढला की काय?
जाता जाता, हे काथ्याकूट मध्ये हवे होते.. आणि टफिंच्या धाग्यापेक्षा फारच मिळमिळीत (चांगला वाईट हे काय ते तुम्ही ठरवा) आहे हे पण नमूद करतो..

मी नावडता पदार्थ सर्वात आधी संपवायचं ठरवला आणि तो पदार्थ संपल्यावर फॉर्मलिटी म्हणून म्हटले चांगला झालाय असे म्हणायचा अवकाश,तर क्षणाचाही बिलम्ब न करता माझे ताट त्या नावडत्या पदार्थने लगेच भरून टाकण्यात आले.

याच्या उलट झाले माझ्यासोबत. कोणाकडे गेले असताना मी म्हणालो पोहे चांगले झाले आहेत तर मित्र म्हणाला एवढं फॉर्मल नको बोलू :)

अत्रे's picture

26 May 2017 - 6:37 am | अत्रे

अवांतर:

मला वाटत बोलताना स्वत:च्या शब्दापेक्षा टोन कडे लक्ष द्यावे. एकच वाक्य वेगवेगळ्या टोन ने म्हटल्यामुळे लोक वेगवेगळे अर्थ काढतात.

उदा. एखादी भाजी खरात झाली असेल आणि आपण फॉर्मॅलिटी म्हणून "भाजी चांगली झाली आहे" असे म्हटले त त्या व्यक्तीला वाटू शकेल की थट्टा करत आहे.

जर एखादा पदार्थ खायचा नसेल तर इन्फॉर्मल व्हायच्या नादात - मी xyz कधीच खात नाही असे ठसक्यात म्हणू नये. मंद स्मित करावे आणि नको मला असे म्हणावे.

प्रकाश घाटपांडे's picture

26 May 2017 - 4:10 pm | प्रकाश घाटपांडे

जर एखादा पदार्थ खायचा नसेल तर इन्फॉर्मल व्हायच्या नादात - मी xyz कधीच खात नाही असे ठसक्यात म्हणू नये. मंद स्मित करावे आणि नको मला असे म्हणावे.

काही लोकांना शांतपणे व नम्रपणे सांगितलेले समजत नाही. ते त्यांच्या प्रेमळ आग्रहाच्या धुंदीत असतात. त्यांची पिन तिथेच अडकते. जेव्हा कठोरपणे सांगितले जाते तेव्हा त्यांच्या टाळक्यात शिरते की यांना आग्रह चालणार नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

26 May 2017 - 10:40 am | प्रकाश घाटपांडे

मी बाहेर कुणाकडे गेलो कि तिथे आदरातिथ्याचा भाग वा पारंपारिक चालीरितीचा भाग म्हणून चहा किंवा खायला न विचारताच आणुन ठेवले जाते. मला आयबीएस चा त्रास होतो म्हणुन मला काहीच नको आहे हे मी सांगतो. आयबीएस म्हणजे काय/ असा प्रश्न जिथे येण्याची शक्यता आहे तिथे पोटाचा त्रास आहे हे मी सांगतो. हे सांगितल्यावर 'असं कसं? घ्या हो थोडे. थोड्याने काही होत नाही.' अस म्हणून आग्रह केला जातो. मला आयबीएस चा त्रास होतो हे महान पातकाची कबुली द्यावी असे सांगावे लागते. जस जसा आग्रह केला जातो तस तशी माझी चिडचिड वाढत जाते. प्रत्येक ठिकाणी जवळपास हेच घडत. त्यांची सांगण्याची वा प्रेमळ आग्रह करण्याची पहिलीच वेळ असेलही कदाचित पण माझी सांगायची ही शंभरावी वेळ असते. त्यामुळे सुट्या पैशाला वैतागलेल्या कंडक्टरसारखी अवस्था होते. सुरवातीच्या काळात हा अत्याचार सहन करण्याची क्षमता होती. पण या दोन वर्षात तीही नाहीशी झाल्याने मला काही नकोच आहे हे मी स्पष्टपणे वा प्रसंगी थोडे उद्धटपणेही सांगतो. मग माझ्याकडे विक्षिप्त नजरेने पाहिले जाते. नातेवाईकांच्याकडे गेलो तरी परत परत तेच तेच सांगावे लागते म्हणून मी त्यांच्याकडे देखील जाणे टाळतो

प्रकाश घाटपांडे's picture

26 May 2017 - 10:51 am | प्रकाश घाटपांडे

आदरातिथ्य या नावाखाली जी काही कृती केली जाते ती जर तुम्हाला त्रासदायक असेल तर तुम्ही तसे स्पष्टपणे यजमानांना सांगितले पाहिजे. आदर हा "समोरच्याला" आदर वाटेल अशी कृती पाहिजे "तुम्हाला" आदर वाटेल अशी नाही. तुमच्या आनंदाच्या आदराच्या कल्पना समोरच्यावर लादणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही. इतरांच्या आनंदाच्या, समाधानाच्या, कंफर्टच्या कल्पना तुमच्या पेक्षा वेगळ्या असू शकतात.

हो. हे मी सुद्धा अनुभवले आहे. माझा एक चुलत भाऊ आहे. लहानपणापासून सोबत वाढल्यामुळे आमच्यात तशी काही फॉर्मिंलिटी नाहीये. पण त्याच्या घरी गेल्यावर आग्रहाचा अतिरेक होतो. 'अरे माझं जेवण झालंय' असा कितीही ओरडून सांगितलं तरी 'थोडंसं घे' असा आग्रह होतोच. जेवायला गेल्यावर साधारण तीन पोळ्या आणि भात इतका माझा आहार आहे. (त्याचाही तेव्हढाच आहे). पण आग्रहाने चौथी पोळी खाल्ल्यावर सुद्धा पाचवी खा असा आग्रह होतोच. आता साल्याला त्याच्या बायकोसमोर शिव्याही देता येत नाही.
ते नवरा-बायको एकमेकांना सुद्धा आग्रह करतात. त्याच्या बायकोला दिवस असताना मी त्याला हात जोडून विनंती केली होती. "भाऊ..कृपा करून तिला जबरदस्ती खायला लावू नको."

आपल्याकडे आग्रहाचा अतिरेक केला जातो हे सत्य आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

26 May 2017 - 2:45 pm | अत्रुप्त आत्मा

या खाण्याच्या आग्रहावर एक डाकू डाव वापरावा.. मला हे पदार्थ वर्षभर खायचे नाहीयेत. तो अमुकतमुक मित्र वारलाय.. त्याप्रीत्यर्थ हे पदार्थ वर्षभर सोडलेत!
बात खतम.. यावर कोणीहि आग्रह करत नाही.

विशुमित's picture

26 May 2017 - 3:09 pm | विशुमित

पहिली गोष्ट मला ताटामध्ये भरपूर पदार्थ वाढले की ते सगळे कसे संपवायचं याच जाम टेन्शन येते.

दुसरे माझ्या आवडीचे पदार्थ/भाज्या करतात खरे पण ते इतके वाढतात की ते सगळे पदार्थ आता माझ्या मनातून उत्तरले आहेत.

प्रत्येक वेळेस सांगून सुद्धा पुन्हा पुन्हा तेच रिपीट करत. मागच्या खेपेला सगळ्यांसमोर बायकोला सांगितलं की जेवायचं पान तू करत जा. बिचाऱ्या दोन्ही मेहवण्यांच्या बायका हिरमुसल्या पण मी व्यवस्थित जेवलो.
(सासुरवाडी मधील वागायची फॉर्मॅलिटी मी कधीच सोडून दिली आहे. बरोबर केले की चूक यावर धागा काढावा म्हणतोय.)

काढा काढा धागा काढा..तेव्हढंच आम्हाला ट्रेनिंग मिळेल.
तो मिपाच्या इतिहासातला अजरामर धागा होईल अशी भविष्यवाणी वर्तवतो.

प्रकाश घाटपांडे's picture

26 May 2017 - 4:19 pm | प्रकाश घाटपांडे

्मग त्यांना सांगायच की तुम्हाला जेवढ वाढायच आहे तेवढ तुम्ही वाढा मला जेवढे खायचे आहे तेवढच मी खाईन. अन्न उरले अन वाया गेले तर पाप तुमच्या माथी

विशुमित's picture

27 May 2017 - 10:05 am | विशुमित

सासुरवाडीच्या लोकांच्या डोक्यावर पाप लादून कसे चालेल प्रकाश जी ? अजून ७० वर्ष संसार तडीस नेयचाय मला.

प्रकाश घाटपांडे's picture

27 May 2017 - 10:23 am | प्रकाश घाटपांडे

दुसरी आयडिया करा. ते तुमच्याकडे आले की आजिबात आग्रह करायचा नाही व म्हणायचे नि:संकोच जेवा! आमच्याकडे आग्रह वगैरे फॊर्मेलिटि नसतात.कारण मला स्वत:ला आग्रह आवडत नाही.

मि तर सासुरवाडि ला जेवायचेच बंद केले आहे.

१) मी कुणाकडे आणि कधीही गेलो तरी (आणि स्वतःच्या घरी सुद्धा) स्वतःचं ताट स्वतःच वाढून घेतो. त्यामुळे नावडते पदार्थ वाढून घ्यायचा प्रश्नच येत नाही .

२) जेवतांना सुद्धा मी कधीही कुणालाही मला वाढायला सांगत नाही. हवे ते पदार्थ, हवे तितकेच वाढून घेतो.

३) एखादे वेळी आग्रह झाला आणि मला नको असेल तर `आय एम डन!' म्हणून सांगतो.

३) आजतागायत ताटात एकही पदार्थ उरलेला नाही. :)

विशुमित's picture

27 May 2017 - 11:29 am | विशुमित

मुद्दा क्रमांक १, २, आणि ३ अवलंबले आहेत.

मुद्दा ४ ) ताटात काही उरणार नाही हे कटाक्षाने पाळतो. ताटात जर कोणता पदार्थ राहिलाच तर संपूर्ण जेवण झाल्याचे फील येत नाही. रुखरुख लागते.

विशुमित's picture

27 May 2017 - 11:34 am | विशुमित

एक उलटी सुचुवेशन आहे.

पोटात तर भूक आहे, जेवण ही उत्तम बनवले आहे पण यजमान काही आग्रह करत नाहीत अशा वेळेस फॉर्मॅलिटी बासनात बांधून खुंटीला अडकावी का?

संजय क्षीरसागर's picture

27 May 2017 - 12:11 pm | संजय क्षीरसागर

आपणच वाढून घेतोयं म्हटल्यावर सगळे प्रश्नच संपले ! आवडता पदार्थ संपला असेल तर बॅड लक म्हणून सोडून द्यायचं.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे. सगळं शरीर हे अन्नाचं रुपांतरण आहे. तस्मात, प्रकृती उत्तम हवी असेल तर आहार रुचिपूर्णच हवा. इट इज बेटर नॉट टू इट दॅन टू इट समथींग अनवाँटेड.

तृप्ती हा जेवणाचा खरा क्रायटेरीया आहे. प्रत्येक जेवणानंतर तृप्ती आली नाही तर नुसतं जेवण झालं (आयटेम टिक झाला), पण मजा आली नाही असा अर्थ होतो.

विशुमित's picture

27 May 2017 - 12:22 pm | विशुमित

बॅड लक ला गुड लक मध्ये परावर्तित करण्या साठी फॉर्मॅलिटी बासनात बांधावी का हा प्रश्न होता.

प्रत्येक जेवणानंतर तृप्ती आली नाही तर नुसतं जेवण झालं== सहमत.

संजय क्षीरसागर's picture

27 May 2017 - 12:26 pm | संजय क्षीरसागर

नाही तर आपण वाढून घेतोच. घर कुणाचंय, कोण आग्रह करतंय का नाही हा प्रश्न कुठे येतो ?

प्रकाश घाटपांडे's picture

27 May 2017 - 11:55 am | प्रकाश घाटपांडे

बिंधास्त अम्का पदर्थ शिल्ल्क असेल तर वाढा! फॉर्मॅअलिटि इथ ही नको

विवेक्पूजा's picture

29 May 2017 - 10:23 am | विवेक्पूजा

हाहा समो, आता जेवणाची आमंत्रण मिळतात का रे!