स्वतः लिहिलेल्या लेखनाचे संपादन कसे करावे?

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
4 Feb 2008 - 9:08 pm

मला हा प्रश्न पडला आहे.
मी दिलेल्या प्रतिक्रीयांचे किंवा उत्तरांचे संपादन करता येते कारण "संपादन" पर्याय तिथे दिसतो.
परंतु मूळ लेखनातच काही दुरुस्ती करावयाची असल्यास तसा पर्याय नाही.
तांत्रिक विभागाने पहाणी करुन योग्य तिथे दुरुस्ती करावी ही विनंती.

अवांतर - माझ्याप्रमाणेच आणखीही काही जणांना हा प्रश्न पडल्याचे वाचले आहे.

चतुरंग

हे ठिकाणचौकशी

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

4 Feb 2008 - 9:13 pm | केशवसुमार

काही दिवसांन पुर्वी ते करता यायचे.. पण आता नाही..
त्या मेल्या जनरल डायराच्या आणिबाणीचा साईड एफेक्ट हाय का ह्यो??
केशवसुमार

विसोबा खेचर's picture

4 Feb 2008 - 10:43 pm | विसोबा खेचर

आपण केलेल्या लेखनाला जोपर्यंत प्रतिसाद मिळणे सुरू होत नाही तोपर्यंत संपादन करता येईल. एकदा का एखादा प्रतिसाद मिळाला ही संपादन करणे शक्य होणार नाही अशी आता नवी डेव्हलपमेन्ट झाली आहे, अशी आमची माहिती आहे.

असो, या बाबतचा अधिक खुलासा मिपाचा तांत्रिक सल्लागार नीलकांतने करावा अशी त्याला विनंती..

मेल्या जनरल डायराच्या आणिबाणीचा साईड एफेक्ट हाय का ह्यो??

:))

आपला,
जनरल डायर!

चतुरंग's picture

4 Feb 2008 - 11:14 pm | चतुरंग

त्यामुळे गोची होते हो - चुका असतील तर सुधारणा करता येत नाहीत, काही दुवे/चित्रे/माहिती इ. मूळ लिखाणात नंतर टाकायचे असल्यास काय करायचे?

जर कोणी काही आक्षेपार्ह लिहिले आणी नंतर मूळ लिखाण संपादित करुन "मी ते लिहिलेच नव्हते" अशी भूमिका घेण्याच्या शक्यतेतून ही "सुधारणा(?)" केली गेली असेल तर मग तसे न करता मूळ लिखाण तिथेच एक दुवा म्हणून दिसेल असे काहीतरी करता येऊ शकेल का?

चतुरंग

संजय अभ्यंकर's picture

4 Feb 2008 - 10:51 pm | संजय अभ्यंकर

मि.पा. वर चित्र कसे लोड करावे?

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग's picture

5 Feb 2008 - 1:59 am | चतुरंग

थोडी धडपड करुन सुटला.
प्रथम तुम्हाला flickr.com किंवा तत्सम स्थळी जाऊन एक खाते उघडून तिथे तुम्हाला हवे ते फोटो डकवावे लागतील.
ते कसे, त्याची माहिती तिथेच आहे ती सोपी आहे.

त्यानंतर जो फोटो तुम्हाला टाकायचा आहे त्याची flickr.com वरील पध्दत पुढीलप्रमाणे. (दुसर्‍या स्थळांवरही थोडीफार ह्याच प्रकारची पध्दत असावी.)
१ - फोटो उघडा.
२ - त्याच्या वरती "All Sizes" असा पर्याय आहे तो टिचका!
३ - फोटो उघडेल त्यावर ५ साइझेसचे पर्याय येतील त्यापैकी एक निवडा.
४ - फोटोच्या खाली दोन पर्याय आहेत त्यापैकी दुसरा "Grab the photo's URL:" ह्यातील URL कॉपी करुन घ्या.
५ - मि.पा.वर ज्या पानावर लेखन करायचे आहे त्या पानावरचा "Insert/edit image" हा पर्याय निवडा.
६ - त्यामधे उघडणार्‍या खिडकीत "URL" डकवा.
७ - त्यानंतर पानाच्या खाली "पूर्वपरीक्षण" हे टिचकलेत की तुम्हाला चित्र दिसायला हवे.

चतुरंग

नीलकांत's picture

5 Feb 2008 - 12:00 pm | नीलकांत

आपल्या लेखाच्या संपादनाच्या सोईचा गैरवापर झाला असे लक्षात आले. मुळ लेख काढून टाकल्यावर त्यावर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांचा घोळ होतो. म्हणून ती सोय काढून टाकण्यात आलेली आहे. आपल्याच लिखाणात बदल करण्यात काही गैर नाही. पण जेव्हा त्यावर इतर लोक आपली बाजू मांडतात तेव्हा तेथील मुळ लिखाण काढल्यास इतरांच्या लिखानातील संदर्भ निघुन जातो. असं होऊ नये म्हणून ही सोय काढण्यात आलेली आहे.

स्वतःचे लेखन संपादन करण्याचा अधिकार प्रतिक्रिये बाबत मात्र अद्याप शाबूत आहे.

तरीही.. मिसळपावकरांचा आग्रह असल्यास व आणिबाणी लागू असल्यामुळे तात्याची संमती असल्यास ती सेवा पुर्ववत सुध्दा करता येईल.

मिसळपाव वर चित्रे कशी डकवावी याबद्दल वर माहिती दिलीच आहे. लवकरच सुधारणा होतील अशी अपेक्षा आहे.

नीलकांत

"संपादन" हा पर्याय देताना, मूळ लेखात संपादन केल्यावर नवा संपादित लेख दिसेलच, शिवाय मूळ लेखाची प्रत त्याच खिडकीमधे "मूळ लिखाण" असा दुवा म्हणून दिसेल अशी सोय केलीत तर दोन्ही गोष्टी साध्य होतील -
कोणी गैरवापर करायला नको आणि ज्यांना खरोखरच सुधारणा करायच्या आहेत त्यांची अडचण संपुष्टात येईल.

जनरल डायर नी ह्याचा विचार करावा.

चतुरंग

विसोबा खेचर's picture

4 Mar 2008 - 9:01 pm | विसोबा खेचर

त्या दृष्टीने विचार सुरू आहे..

तात्या.

चतुरंग's picture

4 Mar 2008 - 9:30 pm | चतुरंग

लवकरच अपेक्षित बदल पहायला मिळतील ही इच्छा!

चतुरंग

संजय अभ्यंकर's picture

5 Feb 2008 - 1:22 pm | संजय अभ्यंकर

चतुरंगजी,

आभार!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

अवलिया's picture

5 Feb 2008 - 2:32 pm | अवलिया

प्रतिक्रिया पण संपादित करता येवु नये
ज्यांना बदल करायचा असेल ते नवीन प्रतिसाद लिहु दे

नाना