अरे, अरे काय ह्या?? ऑँ?? हयसर सगळे जमलेसत काय कारणान, तुम्ही झगडतसात काय कारणा काढून, अरे शोभता काय ह्या?? अशान काय्येक होवचा नाय हातून, समाजल्यात?? तर आता हो धयकालो बंद करात आणि मुद्याचा काय ता बोलाक लागात!!"
"मी काय म्हणतय काकानुं, असा केल्यान तर? म्हणजे बघा, एक तर तुम्ही जावात, तुम्ही म्हणजे कशे, जरा वडीलधारे नाऽऽऽय, मगे तुमका समाजतला कसा वागूचा, काय बघूचा… होय का नाय रे??"
"होय, होय…" सगळ्यांनीच होकार भरलो!! सगळ्यांचा एक झटक्यात झालेला एकमत बघून पारही अचंबित झालो!!
"अजून कोणाक धाडूयात?? ओ गुरवानु, तुम्ही जाशात काय?? तुमका आपला देवाधर्माचा माह्यत आसा, तुम्ही जावात काकांबरोबर..... काय हो काकानुं??"
परत एकदा होय, होय असो घोष झालो, अशा रितीन दोन मेंबर तरी ठरले.
"आता अजून कोणाक धाडूयात??"
"मी काय म्हणतय, आपल्या शाळेचे हेडमासतर आसत, तेंका जावदे हेंच्या बरोबर! जरा शहाणो माणूस बरोबर असलो म्हणजे बरा, नाऽऽऽय?"
"म्हणजे रे काय?? काका आणि गुरव काय वेडे रे?? काऽऽय मेलो बोलतासाऽऽऽ, समाजली अक्कल! उगी रव!!"
"रे उगीच अकलेवर जाव नको हां!! सांगान ठेवतय!!"
"अरे, अरे काय ह्या?? सतत कसले रे भांडत रवतत!! बायल माणसा तरी बरी रे तुमचेपेक्षा!! उगी रवात बघया!! आरे मास्तरांका असांदी बरोबर, मीच सुचवतलय होतय ह्या, शिक्षक आसात ते, चार बुका वाचलेली आसत, तेंका कळता बरा वाईट आपल्यापेक्षा… असांदेत" इति काका.
"आणि आता बायल मनशा कोण कोण जातली?? ह्यापण ठरवा बघू…"
"बायल मनशा?? ती कित्यां आणि?? थय काय तुझ्या आवशीचा डोहाळ जेवाण आसा की काय?? आणि बायल मनशा जातली आणि हयसर घराकडे कोण बघतला?? काय पण मेलो सांगतासा!!"
"अरे असा काय, ते स्वामीच नाय सांगी होते, की बायला माणसां पण येवूक व्हयी आणि तेणी पण बघूक व्हयो आश्रम म्हणान?? ता मी सांगी होतय!! आणि काय रे चुकला माझा?? बायल माणसांका बरोब्बर समाजता, कसा काय वातावरण आसा तां, समाजला?? तेंच्या दृष्टीन पण बघूक व्हया ना?? आजकाल सरकारात पण तेत्तिस टक्क्यांची भाषा करतत, वाचलेलय मां पेपरात?? मगे?? काय नुसतेच आपले नट्यांचे फोटो बघीत रवतय??"
"तां खरां, अरे मेल्या पण असा जाताला कोण घरदार अन पोरा टोरां टाकून??"
" मी सांगू कोणाक धाडूचा ता??" बाबल बोललो.
"बोल, बोल बाबल, काय म्हणी होतय?" काकांन विचारल्यान.
"काकांनु, ह्या तर खराच की कोणी घरातसून बायल माणसांक तसा पाठवचा नाय.... आता बायल माणसाबरोबर घोवाकय धाडूचो लागतलो मांऽऽऽ.... त्यापेक्षा, तुम्हींच काकीबायेक घेवन जायात आणि मास्तरानुं तुम्ही मास्तरीणकाकीक नेयात होऽऽ... कसा?? आणि बरोबर सुमल्याक नेयात!"
"रे, ह्या समाजला की, काकीबाय आणि मास्तरीणबाय जातले, ता ठीक, पण सुमल्या कित्या आणि?? थय काय हळदी कुंकू आसा काय रे?? काय फुगडे घालूचे आसत??"
"च्च!! इतक्या समाजणा नाऽऽऽय तुका?? रे, ही तशी जरा म्हातारी मंडळी जातत मां..... काकानु, मास्तरानु, रागाव नकात हांऽऽ म्हातारा म्हटलय म्हणान, पण आता तुम्हीच सांगात बघया, मी काय खोटा म्हणतय काय?? सुमल्या जायत तर तेंची काळजी घेईत नाऽऽऽयऽऽ.... अगदीच कसो रे तुझो वरचो भाग रिकामो?? द्येव विसारलो मुद्देमाल ठेवूक की मेल्या तू धावलेलय मागच्या बाजूक द्येव अक्कल वाटीत होतो तेंव्हा??"
"....मगे काकानु, काय वाटता तुमका??
"रे, माका काय न चलूक?? पण सुमल्याक पण विचारुक व्हया मां? तेणी हो म्हणूक व्हया मां? आयला तर बराच होईत, आमका ही काळजी नाय होईत, आणि पोरग्या आसाही चुणचुणीत, काय हो मास्तर, तुमका काय वाटता??"
"माझ अनुमोदन आहे हो!! हुशारच ती, पण शिकली नाही!! नाहीतर आज गावाचे नाव काढले असते हो पोरीनं!! हंऽऽऽ! कमी का समजावले मी तीस आणि तिच्या आईस आणि बापूसाक?? पण नाहीं!! कोणी फारसे मनावरच नाही घेतले!! असो. रे बाबल, येऊ दे हो सुमतीला आमच्या सोबत. भारी तीक्ष्ण नजरेची पोर आहे होऽऽऽ आणि तुझ्या काकीबायची आवडती पण. बायका बायका घालतील घोळ एकत्र, आमच्या डोक्यांस शांतता!! कसें??"
आणि अश्या रीतीन ठरला, काका, मास्तर आणि दोघांचे फ़्यामिल्ये, गुरव आणि सुमल्या, येवढे मंडळी जावन आश्रम बघून येतली, आणि गावाक येवन रिपोर्ट करतली!! मगे ठरतला आश्रमाचा काय ता......
अपूर्ण.....
प्रतिक्रिया
21 Feb 2009 - 12:34 pm | बैलोबा
मस्तच.
21 Feb 2009 - 1:19 pm | मितालि
मालवणी ही गोड भाषा.. छान वाटते माका तुका...
21 Feb 2009 - 1:27 pm | घाशीराम कोतवाल १.२
माका पण आवडला
हा
अशाच लिहा यशोधरा ताई
************************************************************
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप||
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||
21 Feb 2009 - 1:28 pm | दशानन
छान !
भाषेचा बाज जबरा !!!
यशो !
पुर्ण कर लवकर ;)
* बाकी हे क्रमश : पेक्षा अपुर्ण वाचायला आवडले =))
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
21 Feb 2009 - 4:07 pm | विसोबा खेचर
मस्त भाषा!
वाचतो आहे! :)
तात्या.
21 Feb 2009 - 11:28 pm | प्राजु
सुमल्याक वारिस शिक्का मोर्तब झाला असा..
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Feb 2009 - 5:02 am | सुक्या
नवीन वाचायला शिकलेला जसा एक एक शब्द जोडत वाचतो तसे दोन्ही भाग वाचले. मजा आली वाचताना. खरंच गोड भाषा आहे.
पुढचा भाग येवंदे लवकर :-)
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
22 Feb 2009 - 6:23 am | श्रीकृष्ण सामंत
मालवणीक गोड भाषा म्हणतहत. म्हणजे हेंकां साखरेची चवंच नाय म्हणूचा लागताला.अहो आमच्या मालवणीक
"असंस्कृत,उद्धट,शिव्यानी ओतम्बओत भरलेली,फटकळ भाषा आहे "
असं आम्हाला पेठेकाकूनी एकदा सुनावलं होतं.
मी त्यांना म्हटलं होतं,
"अहो पेठेकाकू,कोकणी माणूस रसाळ फणासारखा असतो,बाहेरून कांटेरी असला तरी आतून रसाळ गर्यांसारखा असतो बरं का!"
"रे मेल्या!" असं जरी वरून म्हटलं तरी त्याला आतून "माझ्या बाबा" असं म्हणायचं असतं"
तेव्हा यशोधरे,तूं लिव्हितच र्हंव.हळू हळू मी पण तुका सांथ देवूची म्हणतंय मिपावर.
नायतरी तात्यारावानी "मस्त भाषा" म्हटला आसां.
आणि ते "वाचूक लागलेत" असां पण म्हणतंत. वाचकांकपण "गोड भाषा" वाटतां,मग आणखीन काय व्होयांss?
आणि माकापण तुझो हो गोष्टीचो दुसरो भाग वाचूक आवाडलो हां!.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
22 Feb 2009 - 7:18 am | यशोधरा
बैलोबा, मिताली, घाको१.१, राजे धन्यवाद!
तात्या, तुम्हांला ही भाषा नवीन नको वाटायला, देवगडात बहुधा मराठीशी जास्त जवळचा असा कोकणीचा बाज असावा, पण कोकणी बोलली जात असेलच की!
प्राजू, :)
सुक्या, धन्यवाद! कोकणी आहेच गोड भाषा. नेहमीच्या सवयीतली नसूनही प्रयत्नपूर्वक वाचून अभिप्राय दिल्याबद्दल खूप आभार.
सामंतकाका, उजू सांगल्यात अगदी! :) जाऊदेत हो, पेठेकाकूंक कोकणीची चव काय! :D
22 Feb 2009 - 8:01 am | पिवळा डांबिस
पेठेकाकूंक कोकणीची चव काय!
आता "यज्ञकर्म" मध्ये तू नुसता पाणी पी, पाण्याचा बिल भर, आणि भायेर पड........
तुकां काय वाटलां, थंय पेठकर काकाची सत्ता चालतां?
खुळी नाय तिकडची!!!!!!
पेठकरकाकांक सगळे रेसेपी येतत, पण त्याने काय व्होता?
त्येंचो बोलवितो धनी तुकां म्हायत नाय काय?
:)
"साळूंकी गात असे मंजुळ गाणी....
बोलविता धनी, वेगळाची"
:)
हीही हा हा हॉ हॉ हॉ हॉ हॉ!!!!!!!
पिवळो राक्षस!!!!
22 Feb 2009 - 8:09 am | यशोधरा
ओ पिडांकाका, पेठकर आणि पेठे ही दोन वेगळी आडनावां आसत मां!
उगाच आपलां माका भियावतत! :S @) :/
22 Feb 2009 - 8:19 am | पिवळा डांबिस
>पेठकर आणि पेठे ही दोन वेगळी आडनावां आसत मां!
आवशीचो घोव!!!
आसां असा काय?
आम्ही हिथे मिपावर पेठक्रर काकां-काकूंकच ओळ्खतोंव.....
ह्ये पेठकर कोण तां आम्ही जाणत नाय.....
जाणून घेवंची गरजही नाय!!!!
(बाकी तुकां थोडां भिववलां ह्यांदेखिल काय थोडां नाय!!!!)
:)
22 Feb 2009 - 3:06 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त चाललंय!!! पुढचा भाग लवकर टाक.
बिपिन कार्यकर्ते
22 Feb 2009 - 3:13 pm | यशोधरा
>>बाकी तुकां थोडां भिववलां ह्यांदेखिल काय थोडां नाय!!!!)
होय तर!! कित्ती कित्ती भियालय मी!! =)) >:)
हो, बिपिनदा :)
22 Feb 2009 - 8:41 pm | शितल
यशो,
:)
मस्तच लिहिले आहेस, लवकर लिहि पुढचा भाग. :)
22 Feb 2009 - 10:21 pm | अवलिया
मस्त .... वाचतो आहे :)
--अवलिया
22 Feb 2009 - 10:51 pm | नीधप
मस्त गं..
येवंद्यात!!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home