वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in तंत्रजगत
10 Apr 2017 - 3:03 pm

डिअर ऑल,

अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल.

वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मुलगा करेल. लोकांचे अध्यात्मिक गैरसमज दूर करुन जीवन सर्वांग सुंदर करणारा एक विषय त्यांच्याप्रत पोहोचावा असा उद्देश आहे.

यात माझं आतापर्यंत झालेलं लेखन, लेखावरच्या लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी दिलेली उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल. साईटला अर्थात नाममात्र वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अ‍ॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता आयुष्यातला कोणताही प्रश्न विचारता येईल (त्यासाठी प्रश्नाला शंभर रुपये शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल.

साईट बाय-लिंग्विअल (मराठी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल.

जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :

१) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक)

२) जवळजवळ सर्व डेटा टेक्स्ट्युअल असेल तर डेटाबेस किती असावा ?

३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ?

४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.

प्रतिक्रिया

अर्थात ती जागतिक आणि सार्वत्रिक आहे.

कायम एकच क्षण चालू आहे याचा अर्थ कायम आत्ताच आहे!

आणि या आत्तामधेच मी तुम्हाला समजावू शकतो. माझ्या समजावण्याचा एकूण कालावधी मोजला तर तो काही मिनीटांचा असेल.

नाही. तुमचं उत्तर तरीही चुकत आहे. :) मी क्षणाला वेळ समजत नाहीये, म्हणूनच मी तो प्रश्न विचारला आहे.

तुमच्या लेखी क्षण म्हणजे काय ?

आता पेक्षा वेगळ्या काळात तुम्ही कोणतीही घटना घडवून दाखवू शकाल का ?

माझ्या लेखी क्षण म्हणजे केवळ क्षण. त्यात पाच मिनिटं, १० मिनिटं असं काही नाही. तुम्ही जो समजावण्याच्या ५ मिनिटांचा रेफ देत आहात - त्या समजावण्याची सुरुवात तर तुम्ही करु शकता पण त्या समजावण्याचा शेवट तुम्ही करु शकाल ह्याची खात्री तुम्ही सुरुवात केल्या क्षणी देऊ शकता काय? तुमचं उत्तर हो असेल, तर पुन्हा एकदा गंड्याक्स, इतकं नक्की. :)

मी तर "शरीर" जिवंत असतं हे वाक्यही मान्य करत नाही हो. असो. :)

संजय क्षीरसागर's picture

21 Apr 2017 - 10:51 am | संजय क्षीरसागर

१) माझ्या लेखी क्षण म्हणजे केवळ क्षण

अर्थात, मग एकच क्षण कायम आहे. तो म्हणजे हा आताचा, चालू क्षण.
तुमचे माझ्या प्रतिसादाकडे डोळे लागलेत तो क्षण.
आता सुरुवातीपासून इथपर्यंत तुम्ही वाचलंत. याला कालावधी लागला की नाही ?
हा कालावधी १० सेकंद असू शकेल आणि प्रतिसाद मोठा असेल तर पाच मिनीटं असू शकेल.

२) तुम्ही जो समजावण्याच्या ५ मिनिटांचा रेफ देत आहात - त्या समजावण्याची सुरुवात तर तुम्ही करु शकता पण त्या समजावण्याचा शेवट तुम्ही करु शकाल ह्याची खात्री तुम्ही सुरुवात केल्या क्षणी देऊ शकता काय?

पुढचा क्षण ? आहो, एकच क्षण आहे. प्रतिसाद देतांना मी किंवा वाचतांना तुम्ही कालवश झालात तरी ते याच क्षणात होईल ! म्हणून तर मी वर म्हटलंय :

आता पेक्षा वेगळ्या काळात तुम्ही कोणतीही घटना घडवून दाखवू शकाल का ?

तुमच्याकडे याचं उत्तर असणं असंभव आहे.

३) मी तर "शरीर" जिवंत असतं हे वाक्यही मान्य करत नाही हो

मग तुम्ही हा प्रतिसाद कोणत्या शरीरानं देतायं ?

मूळात तुम्हाला हा क्षणच कळलेला नाही ! तुम्ही उगीच काल्पनिक गोष्टींवर इकडून तिकडून फट शोधयची व्यर्थ खटपट करतायं.

ज्याला हा क्षण कळला त्याला इतर काहीही जाणून घ्यायची गरज नाही. तो क्षणस्थ झाला. तो बुद्ध झाला. तिथे सगळे वाद संपले, सगळे प्रश्न संपले !

यशोधरा's picture

21 Apr 2017 - 6:58 pm | यशोधरा

LOL! तुम्ही परस्परविरोधी विधानं नेहमी करत असता, हे तुमच्या कधी लक्षात येतं की नाही?
ओशो आवडतात ना तुम्हांला? तर ओशोंपेक्षाही तुम्ही उत्तम समजावू शकता इत्यादि गैरसमज जमल्यास बाजूला ठेवून ठेवून निदान ओशो तरी मन लावून वाचा .

संजय क्षीरसागर's picture

21 Apr 2017 - 7:55 pm | संजय क्षीरसागर

बहुदा तुमची चुकीची अध्यात्मिक साधना झाली असेल. अदरवाईज जे लिहीलंय त्यात काहीही परस्परविरोध नाही.

यशोधरा's picture

21 Apr 2017 - 8:05 pm | यशोधरा

मी काय म्हणते, इतरांच्या साधनेचं परीक्षण करण्यापेक्षा आदगी स्वतः साधना सुरू तर करा :)

यशोधरा's picture

21 Apr 2017 - 8:05 pm | यशोधरा

आधी*

संजय क्षीरसागर's picture

21 Apr 2017 - 8:12 pm | संजय क्षीरसागर

मी तर "शरीर" जिवंत असतं हे वाक्यही मान्य करत नाही हो.

जिथे इतका बेसिक गोंधळ आहे तिथे पुढे काय बोलणार ? तरीही तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून मी प्रयत्न केला. चालूं द्या तुमचं जे चालललंय ते.

यशोधरा's picture

21 Apr 2017 - 8:22 pm | यशोधरा

लोल! असं म्हणताय? बरं, बरं. परस्पर विरोधी विधानं तरी किती करणार तुम्ही, नाही का? अस्तु, अस्तु.

एकतर तुम्हाला विरोधाभास दाखवता येत नाही आणि चुकीच्या ठाम धारणांमुळे उलगडा ही होत नाही असा दुहेरी पेच आहे .

तुम्ही माझ्या विधानातला विरोधाभास दाखवाल तेवढं अनाकलन उघड होत जाईल. बघा प्रयत्न करुन.

यशोधरा's picture

21 Apr 2017 - 11:35 pm | यशोधरा

मी लाख सांगेन संक्षी पण तुम्ही जर स्वतःची आकलनशक्ती बंद करुन ठेवली आहे, तर समोरची व्यक्ती काय म्हणते आहे हे तुमच्या लक्षात कसे येईल. मीच बरोबर, असे तर ओशोही म्हणत नव्हते हो.

उदा: शरीर. साध्या तुम्ही वेबसाईट काढताय नं? तर हे शरीर म्हणजे एक वेबसाईटच आहे असं समजा. पण तुमच्या वेबसाईटला कंटेट नसेल तर त्या वेबसाईटचा उपयोग आहे का? जे कंटेट आहे, त्यामुळे वेबसाईटला अर्थ आहे. पण तुमची वेबसाईट नसेल तर कंटेटला तरीही अर्थ राहील का? तर होय, राहील. कंटेट "तुमच्या" वेबसाईटवर अवलंबून नाही.

तद्वत शरीराचे आहे. असो.

संजय क्षीरसागर's picture

22 Apr 2017 - 10:52 am | संजय क्षीरसागर

जेवढा विरोधाभास दाखवाल तेवढं अनाकलन उघड होईल !

कंटेंट वेब-साईटवर अवलंबून नाही हे योग्य आहे पण वेब-साईटचा अर्थच साईट प्लस कंटेंट असा होतो. नुसत्या कंटेंटला, जोपर्यंत तो संकेतस्थळ किंवा वेब-साईटवर अभिव्यक्त होत नाही, अर्थ नाही.

आता सर्वांना समजेल असं उदाहरण देतो. मिसळपावला अर्थ आहे कारण सदस्य लिहीतात आणि सदस्यांच्या लेखनाला अर्थ आहे कारण मिसळपावद्वारे ते अभिव्यक्त होतं. सो, मिसळपाव प्लस सदस्यांचं लेखन दोन्ही आहे म्हणून एकमेकांना अर्थ आहे.

थोडक्यात, सगळ्या अध्यात्मिकांचा जो फंडामेंटल झोल होतो तोच तुमचा झालायं. तुम्ही काही तरी फँटास्टिक द्वैता-अद्वैताच्या धारणा धरुन बसला आहात, हे पाहा :

मी तर "शरीर" जिवंत असतं हे वाक्यही मान्य करत नाही हो.

माझ्या लेखनात विरोधाभास असंभव आहे. तुमचं अनाकलन तुम्हाला विरोधाभास दर्शवतं आणि अश्या चुकीच्या धारणांमुळेच बहुतांश अध्यात्मिकांची गोची होते. त्यांना जिकडेतिकडे विरोधाभास दिसतो कारण त्यांच्या चुकीच्या धारणा आणि वास्तविकता यांचा मेळच बसत नाही. मग यथावकाश असे लोक फ्रस्ट्रेट होतात आणि ते फ्रस्ट्रेशन माझ्या लेखांवर काढतात !

तुम्ही समजाल अशी आशा करतो. आय हॅव नथींग अगेंस्ट यू. माझा आक्षेप अध्यात्म न कळलेल्या आणि चुकीच्या धारणा पसरवून साधकांची दिशाभूल करणार्‍यांवर आहे.

यशोधरा's picture

22 Apr 2017 - 6:31 pm | यशोधरा

आय हॅव नथींग अगेंस्ट यू. >> सेम हिअर.
आणि अनाकलन आणि आकलन ह्याबद्दल म्हणाल, तर तुमाचा हा प्रतिस वाचून काय ते पूर्णच समजले. माझा मुद्दा सिद्ध केल्याबद्दल आभार. :)
तुमच्या धारणांचे निराकरण होवो ह्या शुभेच्छा.

संजय क्षीरसागर's picture

22 Apr 2017 - 6:55 pm | संजय क्षीरसागर

सुद्धा काहीही समजलं नाही !

असो.

यशोधरा's picture

22 Apr 2017 - 7:32 pm | यशोधरा

मला सगळं समजलं आहे, असं मानण्याचा उद्दामपणा आणि भ्रम माझ्यापाशी नाही, हे माझं सुदैव मानते. :)

संजय क्षीरसागर's picture

22 Apr 2017 - 7:43 pm | संजय क्षीरसागर

प्रतिसाद समजला नाही इतकाच मुद्दा होता. तरीही असो.

यशोधरा's picture

22 Apr 2017 - 7:50 pm | यशोधरा

असोच. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Apr 2017 - 9:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

शेवटचा प्रतिसाद माझा. मी डां.....मी जिंकलो.

यशोधरा's picture

22 Apr 2017 - 11:09 pm | यशोधरा

अगदी, अगदी =))

गामा पैलवान's picture

21 Apr 2017 - 11:43 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

ज्याला हा क्षण कळला त्याला इतर काहीही जाणून घ्यायची गरज नाही. तो क्षणस्थ झाला. तो बुद्ध झाला. तिथे सगळे वाद संपले, सगळे प्रश्न संपले !

हे रोचक विधान आहे. यांतला क्षण हा शब्द काढून मन हा शब्द टाकला की अर्धवटरावांचा दृष्टीकोन उत्पन्न होईल. वानगीदाखल त्यंचा एक प्रतिसाद : http://www.misalpav.com/comment/930723#comment-930723

विस्तारभयास्तव इथे केवळ मासल्याचा उल्लेख केला आहे. खरंतर तुम्हां दोघांची पूर्ण चर्चा वाचली पाहिजे.

धागाबाह्य संदर्भ दिल्याबद्दल क्षमस्व. चर्चा भरकटू नये अशी इच्छा व्यक्त करतो.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

21 Apr 2017 - 2:16 pm | संजय क्षीरसागर

ती चर्चा `मना वेगळा कुणी नाही' यावर होती. त्याला यथार्थ उत्तर मनाच्या बाहेर !मधे दिलं आहे. इथे त्याचा संदर्भ नाही.

गामा पैलवान's picture

21 Apr 2017 - 5:03 pm | गामा पैलवान

क्षणाबाहेर कुणी आहे का? असल्यास होण आहे?
-गा.पै.

असल्यास कोण आहे, असं विचारायचं होतं.
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

21 Apr 2017 - 5:18 pm | संजय क्षीरसागर

.

गामा पैलवान's picture

21 Apr 2017 - 6:41 pm | गामा पैलवान

तर मग क्षण आणि मन यांच्यात फरक तो काय उरला?
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

21 Apr 2017 - 7:53 pm | संजय क्षीरसागर

आपण मनाच्या परिघाबाहेर आहोत याचा, क्षण = मन याच्याशी काय संबंध ?

गामा पैलवान's picture

21 Apr 2017 - 10:33 pm | गामा पैलवान

क्षण = मन अशा अर्थी की तुम्ही ज्याला क्षण म्हणता आहात त्याला अर्धवटराव मन म्हणताहेत. फक्त मनाच्या बाहेर काही नाही इतकंच ते वेगळं बोलताहेत. बाकी तुमच्यासाठी क्षण हे सर्वस्व तर अर्धवटरावांसाठी मन हे सर्वस्व आहे.

-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

21 Apr 2017 - 10:42 pm | संजय क्षीरसागर

त्यांच्या पोस्टवर (मनातल्या मनात) किंवा माझ्या पोस्टवर (मनाच्या बाहेर) क्षणावर चर्चा नाही.

गामा पैलवान's picture

22 Apr 2017 - 12:21 am | गामा पैलवान

त्या सर्व पोष्टींत मनाच्या जागी क्षण असंही टाकता येईल की. जरी मनावर चर्चा असली तरी ती क्षणालाही तितकीच लागू पडते (किंवा पडावी). हे नवल नव्हे काय!

फक्त फरक इतकाच की तुम्ही 'आपण' बाहेर म्हणताय तर अर्धवटराव यांना 'आपण' नामे स्वतंत्र अस्तित्व मान्य नाही.

-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

22 Apr 2017 - 4:51 pm | संजय क्षीरसागर

त्या सर्व पोष्टींत मनाच्या जागी क्षण असंही टाकता येईल की. जरी मनावर चर्चा असली तरी ती क्षणालाही तितकीच लागू पडते (किंवा पडावी). हे नवल नव्हे काय!

नाही !

फक्त फरक इतकाच की तुम्ही 'आपण' बाहेर म्हणताय तर अर्धवटराव यांना 'आपण' नामे स्वतंत्र अस्तित्व मान्य नाही.

हाच सगळ्यात मोठा झोल आहे !

आपण किंवा स्व हा सार्वभौम आहे. तो मनाच्या पूर्वीपासून आणि मनानंतर (म्हणजे मन शांत झाल्यावर) सुद्धा आहे. अरांना त्याचा पत्ताच नाही ! या उप्पर अरा कडी करतात, ती अशी की `स्व' (किंवा `मी') ही मनाचीच निर्मिती आहे . मनोनिर्मित स्व हे व्यक्तिमत्त्व आहे आणि सार्वभौम स्व ही स्थिती आहे. थोडक्यात, अरांचा पुरता झोल झाला आहे आणि त्यांना वाटतंय की मला उत्तरं देऊन ते माझ्यासाठीच सत्कार्य करतायंत !

गामा पैलवान's picture

22 Apr 2017 - 7:17 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

हाच सगळ्यात मोठा झोल आहे !

असू द्या की झोल. काही फरक पडंत नाही. जरी मनाला सर्वस्व मानलं तरी आत्म्याचं काहीही बिघडत नाही. जोवर आपापलं मन कह्यात आहे तोवर कोणाचंही काहीही बिघडणार नाही.

बरं ते जाउद्या. मन आणि क्षण वेगळे का नाहीत? क्षण पकडायला मन हवंच. नाहीतर सर्व क्षण सारखेच. तसंच मन पकडायला क्षण हवाच. अन्यथा मन माकडाप्रमाणे उड्या मारीत बसेल.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

22 Apr 2017 - 7:55 pm | संजय क्षीरसागर

१) जरी मनाला सर्वस्व मानलं तरी आत्म्याचं काहीही बिघडत नाही. जोवर आपापलं मन कह्यात आहे तोवर कोणाचंही काहीही बिघडणार नाही.

त्यांना मनावेगळं कुणी आहे हेच मंजूर नाही ना ! मग मन कुणाच्या काह्यात राहाणार ?

२) मन आणि क्षण वेगळे का नाहीत? क्षण पकडायला मन हवंच. नाहीतर सर्व क्षण सारखेच. तसंच मन पकडायला क्षण हवाच. अन्यथा मन माकडाप्रमाणे उड्या मारीत बसेल.

चला तुमचा हा पण डाऊट काढून टाकू ! हा क्षण म्हणजेच आपण, शुद्ध वर्तमान ! कृष्ण त्याला सनातन वर्तमान म्हणतो. हा क्षण कायम मनाच्या कक्षेबाहेर आहे. हे एकदा समजलं की मन कायम आपल्या काह्यात आहे.

थोडक्यात, क्षण पकडायला मनाची गरज नाही. खरं तर अंदाधुंद मनामुळेच हा क्षण गवसत नाही. पण एकदा हा क्षण कळला की आपण स्वतःशी कनेक्ट होतो आणि मग मन बायोकंप्युटर होतं !

गामा पैलवान's picture

23 Apr 2017 - 2:19 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

१.

त्यांना मनावेगळं कुणी आहे हेच मंजूर नाही ना ! मग मन कुणाच्या काह्यात राहाणार ?

हे बरोबर आहे. मात्र आत्म्यासंबंधीही हाच युक्तिवाद करता येतो. आत्मा दाखवता येत नाही. मग आपण आत्मा आहोत हे कशावरून?

२.

हा क्षण म्हणजेच आपण, शुद्ध वर्तमान ! कृष्ण त्याला सनातन वर्तमान म्हणतो. हा क्षण कायम मनाच्या कक्षेबाहेर आहे. हे एकदा समजलं की मन कायम आपल्या काह्यात आहे.

एकाग्र मनाच्या सहाय्यानेच क्षण पकडता येतो. अन्यथा नाही. मनाची एकाग्रता ही नैसर्गिक स्थिती झाली पाहिजे. तर आणि तरंच क्षण पकडला असं म्हणता येईल.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

23 Apr 2017 - 6:47 pm | संजय क्षीरसागर

१) मग आपण आत्मा आहोत हे कशावरून?

मी अरांना दिला होता तोच चायलेंज तुम्हाला देतो ! तुम्ही `मी नाही' असं मनातल्या मनात सुद्धा म्हणू शकणार नाही ! हा `मी' तुमचा, माझा, कृष्णाचा, कुत्र्याचा, दगडाचा (त्यांना म्हणता येत नसला तरी) एकच आहे. कारण मी ही व्यक्ती नसून कालातीत स्थिती आहे. आणि तीच आत्म्याची सिद्धता आहे !

२) एकाग्र मनाच्या सहाय्यानेच क्षण पकडता येतो.

क्षण पकडण्याचा प्रश्नच नाही, तो उमजण्याचा प्रश्न आहे कारण हा क्षण म्हणजे खुद्द आपणच आहोत ! एकदा आपण स्वतःशी कनेक्ट झालो की काल अशी वस्तू या जगात नाही याची प्रचिती येते. एकदा आपण क्षणस्थ झालो की मग मन ही केवळ मेंदूत चाललेली अ‍ॅ क्टिविटी आहे हा पण प्रत्यय येतो. ज्या क्षणी तो प्रत्यय येतो त्या क्षणी मन काह्यात येतं. मन आपल्याला पकडू शकत नाही. आपण मन बायोकंप्युटर सारखं वापरायला लागतो.

मी अरांना दिला होता तोच चायलेंज तुम्हाला देतो ! तुम्ही `मी नाही' असं मनातल्या मनात सुद्धा म्हणू शकणार नाही !

वेड पांघरुन पेडगावच्या वार्‍या करण्यातच सुख मानताय का ? तुम्ही जो सतत "मी" चा घोषा लावलाय तो मनोद्भवा आहे हा सिंपल मुद्दा होता ना? "मी नाहि" म्हणण्याचा प्रश्न येतोच कुठे ?

अर्धवटराव's picture

31 May 2020 - 10:20 pm | अर्धवटराव

अरांचा काहिही झोल वगैरे झालेला नाहि.
"मला" अमुक तमुक गोष्टीत रस होता, मग तो उरला नाहि, असं म्हणायचं, आणि वरतुन हा "मी" मनाबाहेरचा कोणितरी आहे असा दावा करायचा... ही मानसशास्त्राची आध्यात्माशी भेसळ आहे.

अरांचा पुरता झोल झाला आहे आणि त्यांना वाटतंय की मला उत्तरं देऊन ते माझ्यासाठीच सत्कार्य करतायंत !

आपली कॉण्ट्रॅडीक्शन कोणि दाखवुद दिली कि त्याला झोल वगैरे लेबलं चिटकवणे हा मनाचा कद्रुपणा आहे.

पैसा's picture

23 Apr 2017 - 7:58 am | पैसा

तुम्हाला वेबसाईट कशी तयार करावी याची माहिती पाहिजे होती ना! त्या माहितीवर लक्ष केंद्रित करा की! 'आपल्याच धाग्याचा खरडफळा करणे' याचं सोदाहरण प्रात्यक्षिक कशाला?

सतिश गावडे's picture

23 Apr 2017 - 10:35 am | सतिश गावडे

>>आवो सर

तुम्हाला "आवो ठाकूर" म्हणायचं होतं का? ;)

विनोद सोडून द्या, पण त्यांचे बरोबर आहे. ते त्यांच्या वेबसाईट चर्चिले जाणारे "सब्जेक्त म्याटर" डिस्कस करत आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Apr 2017 - 1:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

Any publicity is good publicity ! (पक्षी : घटं भिंद्यात... ) ;)

गामा पैलवान's picture

23 Apr 2017 - 11:55 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला.

१.

तुम्ही `मी नाही' असं मनातल्या मनात सुद्धा म्हणू शकणार नाही ! हा `मी' तुमचा, माझा, कृष्णाचा, कुत्र्याचा, दगडाचा (त्यांना म्हणता येत नसला तरी) एकच आहे

.

तुमचं विधान मला मान्य आहे. मात्र 'मी नाही' किंवा 'मी आहे' हे मनातच म्हणावं लागणार. मनाबाहेर कसं जायचं ते कोणी बघितलंय?

स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसंत नाही. कशावरून तुम्ही (किंवा मी) स्वर्गात आहात?

सांगायचा मुद्दा काये की आत्मा जरी मनावेगळा असला, तरी अचिंत्य असल्याने तसा पुरावा सादर करता येत नाही. त्याप्रमाणे काळ जरी अस्तित्वात असला तरी त्याचा थेट पुरावा देता येत नाही. मात्र देहाद्वारे काळाचा प्रत्यय येतो.

संजय क्षीरसागर नामे कोणतरी व्यक्ती काळाचं अस्तित्व नाकारून सिद्धास्तित्व जगू शकते. फाईन इनफ, फेअर इनफ. पण तरीही ती काळाचे नियम पाळतच असते. त्याला ती सुज्ञ माणसाचं लक्षण वगैरे काहीतरी नाव ठेवते. मला तरी यांत काही विसंगती दिसंत नाही.

२.

क्षण पकडण्याचा प्रश्नच नाही, तो उमजण्याचा प्रश्न आहे कारण हा क्षण म्हणजे खुद्द आपणच आहोत !

म्हणजेच क्षण ही आत्म्याची उपाधी आहे. अगदी तशीच कालांतर (म्हणजे दोन क्षणांमधील अवधी) ही देखील आत्म्याची उपाधी आहे. किंबहुना काळ दर्शवायची दोन मापं आहेत. पाहिलं काळ (= क्षण या अर्थी) आणि दुसरं वेळ (= क्षणांतर या अर्थी).

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

24 Apr 2017 - 10:33 am | संजय क्षीरसागर

१) आत्मा जरी मनावेगळा असला, तरी अचिंत्य असल्याने तसा पुरावा सादर करता येत नाही.

आपण आहोत याला पुराव्याची गरज नाही. चिंतनाची तर त्याहून नाही कारण ती मानसिक प्रक्रिया आहे.

२) संजय क्षीरसागर नामे कोणतरी व्यक्ती काळाचं अस्तित्व नाकारून सिद्धास्तित्व जगू शकते. फाईन इनफ, फेअर इनफ. पण तरीही ती काळाचे नियम पाळतच असते.

एखादी कल्पना सर्वोपयोगी असू शकते. उदा. पैसा हा रंगीत कागदच आहे पण ती कल्पना व्यावाहारिक सुलभता आणते. तद्वत, वेळ अस्तित्त्वात नसली तरी कल्पना म्हणून उपयोगी आहे. सो, सर्वांच्या सोयीसाठी आपण वेळ पाळतो. थोडक्यात, कल्पना उपयोगी आहे पण वास्तविकात काल असं काहीही नाही. तो फक्त पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यानं होणारा भास आहे.

३) म्हणजेच क्षण ही आत्म्याची उपाधी आहे. अगदी तशीच कालांतर (म्हणजे दोन क्षणांमधील अवधी) ही देखील आत्म्याची उपाधी आहे. किंबहुना काळ दर्शवायची दोन मापं आहेत. पाहिलं काळ (= क्षण या अर्थी) आणि दुसरं वेळ (= क्षणांतर या अर्थी).

हा क्षण एकच आहे आणि तोच कायम चालू आहे. हा क्षण ही स्थिती आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो आत्म्याकडे निर्देश करणारा शब्द (उपाधी) आहे किंवा तो आत्म्याचाच पर्यायवाची शब्द आहे. तो वेळ किंवा कालाचा भाग नाही.

दोन क्षण असं अस्तित्त्वात काही नाही. मानव निर्मित कालाच्या सुरुवातीपासून, त्याच्या मध्यांतरात (ज्याला तुम्ही दोन क्षणातलं अंतर म्हणतायं) आणि त्याच्या अंतानंतरही, हा क्षण तसाच राहील कारण तो कालज्जयी आहे.

गामा पैलवान's picture

25 Apr 2017 - 1:55 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,,

दोन क्षण असं अस्तित्त्वात काही नाही. मानव निर्मित कालाच्या सुरुवातीपासून, त्याच्या मध्यांतरात (ज्याला तुम्ही दोन क्षणातलं अंतर म्हणतायं) आणि त्याच्या अंतानंतरही, हा क्षण तसाच राहील कारण तो कालज्जयी आहे.

आमच्या लहानपणी शाळकरी वयात असतांना एक विनोद सांगितला जायचा. रेखा व बिंदू यांत फरक काय? विनोदी उत्तर असं की रेखा नायिका आहे तर बिंदू खलनायिका.

या प्रश्नाचं बिनविनोदी उत्तर चक्रावून टाकणारं आहे. साधारणत: आपल्याला भूमितीत शिकवलं जातं की एकेक बिंदू जोडून रेखा तयार होते. या व्युत्पात्तीत अडचण अशी की बिंदूला लांबी, रुंदी, उंची काहीच नाही. मग असे एकसारखे असंख्य बिंदू जरी जोडले तरी तो एकंच बिंदू असेल. दोन बिंदू एकत्र येऊन रेखा कधीच उत्पन्न करू शकणार नाहीत. बिनविनोदी उत्तर म्हणूनंच बुचकळ्यात टाकणारं आहे. मात्र रेखा प्रमाण मानली तर दोन रेखा जिथे एकमेकींना छेदतात ते स्थळ म्हणजे एक बिंदू अशी व्याख्या करता येते.

इथे बिंदू = क्षण आणि रेखा = काळ म्हणून टाकून पहा.

क्षण सतत असतो म्हणजे बिंदू सर्वत्र आहे. मान्य. मात्र याच्या सर्वत्रपणामुळेच असंख्य्र रेखा उत्पन्न होताहेत. तुम्ही क्षणाला कालज्जयी म्हणता ते मान्य. मात्र हे करतांना क्षणाच्या सृजनशक्तीची उपेक्षा तर होत नाहीये ना? या सतत चालू असलेल्या क्षणामुळेच काळ उत्पन्न झालाय, नाहीका?

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2017 - 2:12 am | संजय क्षीरसागर

१) दोन बिंदू एकत्र येऊन रेखा कधीच उत्पन्न करू शकणार नाहीत. बिनविनोदी उत्तर म्हणूनंच बुचकळ्यात टाकणारं आहे. मात्र रेखा प्रमाण मानली तर दोन रेखा जिथे एकमेकींना छेदतात ते स्थळ म्हणजे एक बिंदू अशी व्याख्या करता येते.

भौमितिक सिद्धांत हा फक्त दृष्टीचा खेळ आहे आणि लॉजिक म्हणून तो पटू शकतो. पण काल आहे किंवा नाही हे आकृत्या किंवा तर्क सिद्ध करु शकत नाहीत.

२) क्षण सतत असतो म्हणजे बिंदू सर्वत्र आहे. मान्य. मात्र याच्या सर्वत्रपणामुळेच असंख्य्र रेखा उत्पन्न होताहेत. तुम्ही क्षणाला कालज्जयी म्हणता ते मान्य. मात्र हे करतांना क्षणाच्या सृजनशक्तीची उपेक्षा तर होत नाहीये ना? या सतत चालू असलेल्या क्षणामुळेच काळ उत्पन्न झालाय, नाहीका?

क्षण सर्व-सर्जक आहे त्याला सृजनासाठी काल उत्पन्न करायची गरज काय ? तो डायरेक्ट प्रक्रियाच उत्पन्न करतो ! या क्षणात स्वर उमटू शकतो तो कितीही वर, खाली, सरळ, किंवा सर्वत्र एकसारखा पसरु शकतो. जर स्वराच्या सुरुवातीपासून ते लयाच्या `कालावधीच्या मापनाचा' आग्रह धरला तरच कालाची आवश्यकता आहे. अन्यथा स्वराचा `गोडवा' जगणं आनंदी करायला पुरेसा आहे.

गामा पैलवान's picture

26 Apr 2017 - 1:10 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

१.

पण काल आहे किंवा नाही हे आकृत्या किंवा तर्क सिद्ध करु शकत नाहीत.

तुम्ही जसं क्षण म्हणजे आपण म्हणता त्याच धर्तीवर काळ म्हणजे आपण असंही म्हणता येतं.

२.

क्षण सर्व-सर्जक आहे त्याला सृजनासाठी काल उत्पन्न करायची गरज काय ? तो डायरेक्ट प्रक्रियाच उत्पन्न करतो !

इथे तुम्ही प्रश्न आणि उत्तर एकत्रं दिलंय. क्षणाने सृजनार्थ काळ उत्पन्न केलाय. म्हणूनंच प्रक्रिया प्रत्ययास येते. अन्यथा सद्वस्तु एकंच आहे.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

26 Apr 2017 - 1:37 am | संजय क्षीरसागर

१) तुम्ही जसं क्षण म्हणजे आपण म्हणता त्याच धर्तीवर काळ म्हणजे आपण असंही म्हणता येतं.

आपण कालातीत आहोत ! हाच तर अध्यात्माचा सिद्धांत आहे.

२) क्षणाने सृजनार्थ काळ उत्पन्न केलाय. म्हणूनंच प्रक्रिया प्रत्ययास येते. अन्यथा सद्वस्तु एकंच आहे.

प्रक्रियेचा प्रत्यय यायला जाणीव पुरेशी आहे. कालाची गरज नाही.

सद्वस्तू एकच आहे पण काल भासमान आहे.

बाय द वे, तुम्ही कितीही आणि कोणत्याही प्रकारे काल आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. पार शरीरशास्त्र, गणित, भूमिती, फिजिक्स, थिअरी ऑफ रिलेटिविटी, संगीत, नृत्य, चित्रकला, सायकॉलॉजी, खगोल, भूगोल, ..... काहीही. त्या शास्त्रांच्या दृष्टीकोनांचा ऑलरेडी आभ्यास झालायं आणि काल नाही हा माझा अनुभव आहे.

गामा पैलवान's picture

26 Apr 2017 - 5:12 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

१.

प्रक्रियेचा प्रत्यय यायला जाणीव पुरेशी आहे. कालाची गरज नाही.

माझ्या मते प्रक्रिया घडायला काळ हवाच. अन्यथा प्रक्रिया घडतेय हे कळणार नाही.

२.

बाय द वे, तुम्ही कितीही आणि कोणत्याही प्रकारे काल आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. पार शरीरशास्त्र, गणित, भूमिती, फिजिक्स, थिअरी ऑफ रिलेटिविटी, संगीत, नृत्य, चित्रकला, सायकॉलॉजी, खगोल, भूगोल, ..... काहीही. त्या शास्त्रांच्या दृष्टीकोनांचा ऑलरेडी आभ्यास झालायं आणि काल नाही हा माझा अनुभव आहे.

माझ्या मते शास्त्रांचा दृष्टीकोन असं काही नसतं. दृष्टीकोन असतो तो माणसाचा असतो.

काळ नाही असा तुमचा अनुभव आहे तो मान्य. मात्र काळ अस्तित्वात असून त्याच्याशी सुसंगतपणे वागायचं असतं असा माझा अनुभव आहे. सांगायचा मुद्दा असा की, जे तुम्हाला गौण वाटतं (उदा. मन) नेमकं त्याच्या सहाय्याने इतर कोणी (उदा. अर्धवटराव) आत्म्यापर्यंत वाटचाल करू शकतात.

बरं आता एक सांगा की स्मृती म्हणजे नक्की काय? मला वाटतं आपली यावर चर्चा झालेली आहे. पण या धाग्याच्या संदर्भात परत करायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

26 Apr 2017 - 6:59 pm | संजय क्षीरसागर

१) माझ्या मते प्रक्रिया घडायला काळ हवाच. अन्यथा प्रक्रिया घडतेय हे कळणार नाही.

प्रक्रिया कळायला काळ लागतो म्हणणं म्हणजे भूक लागली हे समजायला घड्याळ वापरावं लागतं म्हणण्यासारखं आहे.

२) माझ्या मते शास्त्रांचा दृष्टीकोन असं काही नसतं. दृष्टीकोन असतो तो माणसाचा असतो.

`प्रक्रिया घडण्यासाठी कालाची आवश्यकता आहे' हा विज्ञानाचा फंडामेंटल दृष्टीकोन नाही काय ?

३) काळ नाही असा तुमचा अनुभव आहे तो मान्य. मात्र काळ अस्तित्वात असून त्याच्याशी सुसंगतपणे वागायचं असतं असा माझा अनुभव आहे.

काल ही उपयोगी कल्पना आहे. मी सुद्धा रात्री झोपतो आणि सकाळी उठतो. ठराविक वेळी खेळायला जातो आणि सगळी कामं वेळेवर करतो पण ती सोय आहे, त्यानं कालाची वास्तविकता सिद्ध होत नाही.

३) सांगायचा मुद्दा असा की, जे तुम्हाला गौण वाटतं (उदा. मन) नेमकं त्याच्या सहाय्याने इतर कोणी (उदा. अर्धवटराव) आत्म्यापर्यंत वाटचाल करू शकतात.

मेंदू ही मनाची एकूण मर्यादा आहे. आपण मनाबाहेर आहोत. अन्यथा देहांतानंतर, शरीराबरोबर मन आणि त्या बरोबर आपण असा सगळाच खेळ संपला ! कृष्ण व्यर्थ झाला, बुद्ध निरर्थक झाला आणि सांख्य निरुपयोगी झाला !

तस्मात, मनाच्या साह्यानं स्वतःप्रत पोहोचणं म्हणजे रोलर-कोस्टर राईडमधे बसून अचलतेच्या अनुभवाची अपेक्षा करणं आहे.

४) बरं आता एक सांगा की स्मृती म्हणजे नक्की काय?

मन म्हणजे काय ते टफींच्या पोस्टवर ऑलरेडी सांगून झालंय. इथून पुढची त्या विषयावरची चर्चा तिथे किंवा माझ्या `मनाच्या बाहेर' या पोस्टवर होऊ शकेल.

धन्यवाद !

गामा पैलवान's picture

27 Apr 2017 - 2:24 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

१.

प्रक्रिया कळायला काळ लागतो म्हणणं म्हणजे भूक लागली हे समजायला घड्याळ वापरावं लागतं म्हणण्यासारखं आहे.

भुकेची जाणीव होते. पण प्रत्येक प्रक्रियेची जाणीव होईलंच याची खात्री काय? समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन तिचे ढग बनतात. या प्रक्रियेत जाणीव कुठेच नाही.

२.

`प्रक्रिया घडण्यासाठी कालाची आवश्यकता आहे' हा विज्ञानाचा फंडामेंटल दृष्टीकोन नाही काय ?

कोणी असं विधान केलंय का? माझ्या मते अशी काहीही पूर्वअट नाही. मात्र याबाबत चूकभूल देणेघेणे.

३.

काल ही उपयोगी कल्पना आहे. मी सुद्धा रात्री झोपतो आणि सकाळी उठतो. ठराविक वेळी खेळायला जातो आणि सगळी कामं वेळेवर करतो पण ती सोय आहे, त्यानं कालाची वास्तविकता सिद्ध होत नाही.

स्मृती आणि स्वप्न यांतून काळाचं अस्तित्व सिद्ध होतं. भागवत पुराणात महर्षी व्यासांनी स्पष्टपणे लिहिलंय की भगवान कालरूपाने सर्व जिवांना व्यापून आहेत (संदर्भ : http://satsangdhara.net/bhp/bhp03-26.htm येथे 'कालरूपाने' शोधणे.).

४.

तस्मात, मनाच्या साह्यानं स्वतःप्रत पोहोचणं म्हणजे रोलर-कोस्टर राईडमधे बसून अचलतेच्या अनुभवाची अपेक्षा करणं आहे.

रोलरकोस्टरात बसलेल्याचं बूड खुर्चीला चिकटून स्थिरंच असतं. किंबहुना ते तसं स्थिर असल्यानेच आकाशात गटांगळ्या खाल्ल्याचा अनुभव घेऊनही जिवंत राहता येतं.

असो.

स्मृती म्हणजे काय हे तुम्ही सांगितलं नाहीत. माझ्या मते स्मृती काळाशी निगडीत असतात. तुम्ही म्हणता तो काळ अस्तित्वात नसेल तर स्मृती कुठून उत्पन्न होतात?

आ.न.,
-गा.पै.