वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in तंत्रजगत
10 Apr 2017 - 3:03 pm

डिअर ऑल,

अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल.

वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मुलगा करेल. लोकांचे अध्यात्मिक गैरसमज दूर करुन जीवन सर्वांग सुंदर करणारा एक विषय त्यांच्याप्रत पोहोचावा असा उद्देश आहे.

यात माझं आतापर्यंत झालेलं लेखन, लेखावरच्या लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी दिलेली उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल. साईटला अर्थात नाममात्र वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अ‍ॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता आयुष्यातला कोणताही प्रश्न विचारता येईल (त्यासाठी प्रश्नाला शंभर रुपये शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल.

साईट बाय-लिंग्विअल (मराठी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल.

जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :

१) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक)

२) जवळजवळ सर्व डेटा टेक्स्ट्युअल असेल तर डेटाबेस किती असावा ?

३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ?

४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

27 Apr 2017 - 7:07 am | संजय क्षीरसागर

१. भुकेची जाणीव होते. पण प्रत्येक प्रक्रियेची जाणीव होईलंच याची खात्री काय? समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन तिचे ढग बनतात. या प्रक्रियेत जाणीव कुठेच नाही.

भूकेच्या जाणीवेला कालाची गरज नाही. पहिला पार्ट तुम्हाला मान्य आहे. समुद्राच्या पाण्याची वाफ होते ही प्रक्रिया जाणीवेच्या कक्षेत आली की झालं ! नाही तरी तो शोध ती प्रक्रिया कुणाच्या तरी जाणीवेत आली म्हणूनच लागला ना ? शिवाय जाणीव हा तुम्ही व्यक्तिगत फिनॉमिना समजतांय पण मूळात जाणीव ही शरीर बद्ध नाही. ती यत्र-तत्र-सर्वत्र असलेली निराकार स्थिती आहे. कधी तुम्ही चंद्रावर जरी गेलात तरी तिथे तुम्हाला चंद्रावर आलो ही जाणीव होईलच.

२) `प्रक्रिया घडण्यासाठी कालाची आवश्यकता आहे' हा विज्ञानाचा फंडामेंटल दृष्टीकोन नाही काय ? कोणी असं विधान केलंय का?

मग अरा काय म्हणतायंत असं तुम्हाला वाटतं ? घासकडवींनी इथे प्रदीर्घ वैज्ञानिक लेखमाला (इकडून तिकडून विदा गोळा करुन) पोस्टल्या आहेत. त्यांच्याशी याच तर फंडावर मी मतभेद व्यक्त केला होता आणि सर्वच्या सर्व लेखमालातून निव्वळ माहितीशिवाय काहीही हाती लागणार नाही, असं त्यांना पहिले छूटच सांगितलं होतं.

३) स्मृती आणि स्वप्न यांतून काळाचं अस्तित्व सिद्ध होतं.

स्मृती किंवा स्वप्न ही या क्षणात झालेली जाणीव आहे. व्यासांनी काल हा देहातून वर्णन केलेला फिनॉमिना आहे. म्हणजे `काल देहासी आला खाऊ' टाईप. पण जाणीव सार्वभौम आहे, काल नाही.

४) रोलरकोस्टरात बसलेल्याचं बूड खुर्चीला चिकटून स्थिरंच असतं. किंबहुना ते तसं स्थिर असल्यानेच आकाशात गटांगळ्या खाल्ल्याचा अनुभव घेऊनही जिवंत राहता येतं.

बूड स्थिर आहे ही जाणीव नव्हे काय ? ती मनाच्या बाहेर आहे तोपर्यंत स्थिरत्वाचा अनुभव येतो. ती एकदा मनाच्या गुंत्यात हरवली की चक्कर येते.

५) स्मृती म्हणजे काय हे तुम्ही सांगितलं नाहीत. माझ्या मते स्मृती काळाशी निगडीत असतात. तुम्ही म्हणता तो काळ अस्तित्वात नसेल तर स्मृती कुठून उत्पन्न होतात?

स्मृती हे मेंदूतलं रेकॉर्डींग आहे. वर्तमान क्षणात जाणीवेच्या कर्सरनं वेध घेतला की ती अ‍ॅक्टीवेट होते. तिचा कालाशी संबंध नाही. म्हणजे एखादी घडून गेलेली घटना आठवायला कालाची गरज नाही तर जाणीव जागृत हवी.

ती घटना `घडली तेव्हा' ते कळलं जाणीवेमुळे आणि आता ती घटना`तेव्हा घडली होती' हे कळलं तेही जाणीवेमुळेच. कालाचा घटना घडण्याशी किंवा स्मृती अ‍ॅक्टीवेट होण्याशी काहीएक संबंध नाही.... कारण काल अशी काही वस्तूच या अस्तित्वात नाही !

ष्टेप बाय ष्टेप जलद अध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग इथेही उपलब्ध आहेसा दिसतोयः कुणी जाऊन बघितले आहे का, हा काय प्रकार आहे तो ?
.

संक्षिसर, धाग्यात पुन्हा एक चित्र घालत असल्याबद्दल क्षमस्व. परंतु एका अर्थी हे धाग्याशी संबंधित आहे, म्हणून कुणाला याविषयी प्रत्यक्ष माहिती आहे का, हे जाणण्यासाठी घातले आहे.

गामा पैलवान's picture

28 Apr 2017 - 5:43 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

तुमचा वरचा संदेश वाचला.

१.

भूकेच्या जाणीवेला कालाची गरज नाही. पहिला पार्ट तुम्हाला मान्य आहे.

पहिला सोडा हो, सगळेच पार्ट्स मान्य आहेत. फक्त व्यवहारी जगात काळ का अस्तित्वात नाही हे शोधायचंय.

२.

शिवाय जाणीव हा तुम्ही व्यक्तिगत फिनॉमिना समजतांय पण मूळात जाणीव ही शरीर बद्ध नाही. ती यत्र-तत्र-सर्वत्र असलेली निराकार स्थिती आहे.

मी जाणीवेस केवळ व्यक्तिगत अनुभव समजत नाही. केवळ हा शब्द महत्त्वाचा. जाणीव जेंव्हा देहाबाहेर विस्तारते तेंव्हा ती दैहिक काळाच्या पल्याड जाते. पण म्हणून दैहिक काळ अवैध (इन्व्हॅलिड) ठरंत नाही. अन्यथा झोपेतून परत जाग आलीच नसती. जाणीव जरी देहापल्याड विस्तारली तरी तिचा एक छोटासा अंश देहाशी तादात्म्य राखून असतोच.

३.

मग अरा काय म्हणतायंत असं तुम्हाला वाटतं ? घासकडवींनी इथे प्रदीर्घ वैज्ञानिक लेखमाला (इकडून तिकडून विदा गोळा करुन) पोस्टल्या आहेत. त्यांच्याशी याच तर फंडावर मी मतभेद व्यक्त केला होता आणि सर्वच्या सर्व लेखमालातून निव्वळ माहितीशिवाय काहीही हाती लागणार नाही, असं त्यांना पहिले छूटच सांगितलं होतं.

ही चर्चा मला माहित नाही. किंवा झाली असेल तर आठवंत नाही. यामुळे माझा टाटा.

माझ्या मते पारंपरिक विज्ञानात (= न्यूटनीय विज्ञानात = स्थूल विज्ञानात ) काळाची उपस्थिती गृहीत धरतात. ती पूर्वावश्यकता नव्हे. मात्र पुंजीय विज्ञानात (= क्वांटम मेक्यानिक्स) परिस्थिती वेगळी असू शकते.

४.

व्यासांनी काल हा देहातून वर्णन केलेला फिनॉमिना आहे. म्हणजे `काल देहासी आला खाऊ' टाईप. पण जाणीव सार्वभौम आहे, काल नाही.

काळ देहाला कुरतडून खातोय म्हणून तर देह जिवंत आहे. देह अस्तित्वात असणे ही काळ अस्तित्वात असल्याची खूण आहे.

मात्र असं असलं तरीही तुम्ही म्हणता तशी जाणीव सार्वभौम आहेच, काळ नाही.

५.

बूड स्थिर आहे ही जाणीव नव्हे काय ? ती मनाच्या बाहेर आहे तोपर्यंत स्थिरत्वाचा अनुभव येतो. ती एकदा मनाच्या गुंत्यात हरवली की चक्कर येते.

तुम्ही म्हणता तसा रोलरकोस्टरात बसून स्थैर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर मनाच्या गुंत्यात हरवता कामा नये. यासाठी मन भ्रमणानुभव देणाऱ्या इंद्रियांशी (डोळा, जठार, इत्यादि) संयुक्त झालं असेल तर ते तिथून काढून आपल्या बुडापाशी स्थिर केलं पाहिजे. मगंच रोलरकोस्टरात बसून स्थैर्याचा अनुभव घेता येईल.

याच धर्तीवर मनाच्या सहाय्याने मनाचं निरीक्षण करून आत्मतत्त्वापर्यंत पोहोचता येतं. 'मन करा रे प्रसन्न' हा तुकोबांचा अभंग याचीच साक्ष आहे.

६.

मन म्हणजे काय ते टफींच्या पोस्टवर ऑलरेडी सांगून झालंय. इथून पुढची त्या विषयावरची चर्चा तिथे किंवा माझ्या `मनाच्या बाहेर' या पोस्टवर होऊ शकेल.

प्रश्न स्मृती म्हणजे काय असा होता. जर स्मृती अस्तित्वात असेल तर काळ अस्तित्वात आहे असं म्हणता येतं.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

28 Apr 2017 - 7:32 pm | संजय क्षीरसागर

६) प्रश्न स्मृती म्हणजे काय असा होता. जर स्मृती अस्तित्वात असेल तर काळ अस्तित्वात आहे असं म्हणता येतं.

हे ऑलरेडी वरच्या प्रतिसादात पॉईंट नंबर ५ मधे झालंय की ! बघा.

आता तुमच्या सगळ्या प्रश्नांना एकच फायनल उत्तर देऊन टाकतो !

१) पहिला सोडा हो, सगळेच पार्ट्स मान्य आहेत. फक्त व्यवहारी जगात काळ का अस्तित्वात नाही हे शोधायचंय.

२) जाणीव जेंव्हा देहाबाहेर विस्तारते तेंव्हा ती दैहिक काळाच्या पल्याड जाते. पण म्हणून दैहिक काळ अवैध (इन्व्हॅलिड) ठरंत नाही. अन्यथा झोपेतून परत जाग आलीच नसती. जाणीव जरी देहापल्याड विस्तारली तरी तिचा एक छोटासा अंश देहाशी तादात्म्य राखून असतोच.

३) माझ्या मते पारंपरिक विज्ञानात (= न्यूटनीय विज्ञानात = स्थूल विज्ञानात ) काळाची उपस्थिती गृहीत धरतात. ती पूर्वावश्यकता नव्हे. मात्र पुंजीय विज्ञानात (= क्वांटम मेक्यानिक्स) परिस्थिती वेगळी असू शकते.

४) काळ देहाला कुरतडून खातोय म्हणून तर देह जिवंत आहे. देह अस्तित्वात असणे ही काळ अस्तित्वात असल्याची खूण आहे. मात्र असं असलं तरीही तुम्ही म्हणता तशी जाणीव सार्वभौम आहेच, काळ नाही.

५) याच धर्तीवर मनाच्या सहाय्याने मनाचं निरीक्षण करून आत्मतत्त्वापर्यंत पोहोचता येतं. 'मन करा रे प्रसन्न' हा तुकोबांचा अभंग याचीच साक्ष आहे.

__________________________________________

हे मात्र ज्याम लक्षपूर्वक वाचा. यापलिकडे कोणत्याही प्रश्नाला काहीही उत्तर नाही.

जाणीवेनंच सर्व अस्तित्व बनलंय. तो एकमेव घटक एकाच वेळी आकार असून सुद्धा निराकार आहे. त्या जाणीवेपरता अखिल विश्वात काहीही नाही. म्हणून सर्व ज्ञानी अस्तित्व एक आहे म्हणतात.

`अहं ब्रह्मास्मी'चा अर्थ नंदन मंडळी `आय एम दि सुपर पॉवर' असा काढतात आणि तसं कुणी म्हटलं तर त्याच्याकडे नक्की `कोणत्या पॉवर्स आहेत' हे पाहातात. त्याला भींत चालवता येते का? त्याला पाण्यावर चालता येतं का? त्याला न्यायला एंडला आकाशातून विमान येणार का ? अँड सो ऑन.... बाकीची नंदन मंडळी `आयला ! ही काही तरी अचाट भानगड दिसते. आपलं चाललंय ते बरंय, नको तिकडे फिरकायला' असा विचार करतात. वास्तविकात इट इज अ सिंप ल स्टेटमंट ऑफ फॅक्ट. जर सगळं ब्रह्मच आहे तर मी त्या वेगळा कसा असू शकतो ? त्या मुळे मी सुद्धा ब्रह्मच आहे. इट इज जस्ट इंपॉसिबल टू बी अदरवाईज.

या जाणीवेची हजोरो नांवं आहेत : बुद्ध तीला शून्य म्हणतो, तुकाराम आकाश (स्पेस) म्हणतात, ज्ञानी आत्मा म्हणतात, अध्यात्मात ब्रह्म म्हटलंय, कृष्ण तीला सनातन वर्तमान म्हणतो, ओशो तीला 'नाऊ अँड हिअर' म्हणतात, एकहार्ट `बिईंग' म्हणतो, निसर्गदत्त महाराज `सद्वस्तू' म्हणतात, मी `निराकार' म्हणतो, कुणी तीला सत्य म्हणतं तर कुणी तीला आदीम शांतता म्हणतात..... आणि इन द फायनल रन, आपण ती जाणीवच आहोत. कारण अखिल विश्वात त्यापरता व्यक्त किंवा अव्यक्त असं काहीही नाही.

या जाणीवेची स्वतःत अब्जावधी प्रक्रिया निर्माण करण्याची क्षमता आहे. मग ती सूर्यमालीका असो, लक्षावधी आकाशगंगा असोत, समुद्र असो, वृक्षवल्लरी असो, की मुंगी असो की माती की सूक्ष्मातल्या सूक्ष्म विचाराचा ध्वनी... . प्रत्येक व्यक्त गोष्ट त्या अव्यक्तातूनच प्रकट होते आणि त्यातच विलीन होते कारण त्या वेगळं काहीही नाही.

त्यामुळे जाणीव देहाच्या आत-बाहेर यत्र-तत्र सर्वत्र आहे. इन फॅक्ट देह सुद्धा जाणीवेच्याच एलीमेंटसचा बनला आहे. तस्मात, जाणीवेला स्वतःत काहीही निर्माण करायला कोणत्याही बाह्य वस्तूची (उदा. काल) गरज नाही कारण ती सर्वसंपन्न आहे.

झोप झाली की जाग आपोआप येते, तिथे कालाची गरज नाही. फिजिक्स असो की क्वांटम मेकॅनिक्स, सगळ्या प्रक्रिया अंतीमतः जाणीवेच्याच अखत्यारित आहेत. त्या दृष्टीनं सर्व शोध हे फक्त उलगडा आहेत. तुम्ही जाणीवेच्या प्रक्रियेचे नियम दीर्घकालासाठी थोपवू शकत नाही कारण जाणीवेला काळाची फिकीरच नाही (ती फक्त माणसालाये). देहाच्या कोणत्याही प्रक्रियेसाठी कालाची गरज नाही. कालाची कल्पना बाद केली तरी जनन-मरण होईलच. मानच्या साह्यानं जाणीवेप्रत जाता येत नाही कारण एक विचार फक्त दुसरा विचार निर्माण करतो, तो जाणीव `निर्माण' करु शकत नाही. कारण जाणीव अनिर्मित आहे. तिच्याप्रत जायला कोणताही सेतूच नाही..... तो फक्त उलगडा आहे.

सचु कुळकर्णी's picture

28 Apr 2017 - 7:44 pm | सचु कुळकर्णी

तुम्ही जाणीवेच्या प्रक्रियेचे नियम दीर्घकालासाठी थोपवू शकत नाही कारण जाणीवेला काळाची फिकीरच नाही

अर्धवटराव's picture

29 Apr 2017 - 1:42 am | अर्धवटराव

आपणच जाणिव आहोत, आपल्यातच प्रक्रिया होते, प्रक्रियेचे नियम देखील आपलेच आहेत तर ते नियम, दीर्घकाल काय किंवा अगदी क्षणभर काय, थोपवुन कसे धरता येतील ? याचा अर्थ नियम थोपवुन धरणारे 'तुम्ही' जाणिवेच्या बाहेरचे आहात ??

गामा पैलवान's picture

28 Apr 2017 - 11:44 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

१.

तस्मात, जाणीवेला स्वतःत काहीही निर्माण करायला कोणत्याही बाह्य वस्तूची (उदा. काल) गरज नाही कारण ती सर्वसंपन्न आहे.

जाणीव सर्वसंपन्न आहे म्हणूनंच ती काळ उत्पन्न करू शकते, नाहीका? किंबहुना तिचं सर्वसंपन्नत्व कालातीत आहे. तुमच्या दृष्टीने काळ म्हणजे पृथ्वीचं परिवलन आहे. तर माझ्या दृष्टीने काळ त्या परिवलनास चालना देणारा आहे.

२.

मानच्या साह्यानं जाणीवेप्रत जाता येत नाही कारण एक विचार फक्त दुसरा विचार निर्माण करतो, तो जाणीव `निर्माण' करु शकत नाही. कारण जाणीव अनिर्मित आहे. तिच्याप्रत जायला कोणताही सेतूच नाही..... तो फक्त उलगडा आहे.

मनाच्या सहाय्याने जाणीवेप्रत जाता येतं. तुकोबांचा 'मन करा रे प्रसन्न' हा अभंग हेच सांगतो.

एक विचार जरी दुसरा विचार उत्पन्न करंत असला तरी मन निर्विकार करता येतं. निर्विकार मन जाणीवेत लय पावतं. माऊलींनी ज्ञानेश्वरीत याचं बहारदार वर्णन केलं आहे (ऐकीव माहिती).

आ.न.,
-गा.पै.

विचार देखील जाणिवेचच अपत्य आहे. विचारांना जाणिवेच्या मार्गातली धोंड का समजल्या जातं ?

गामा पैलवान's picture

29 Apr 2017 - 2:23 pm | गामा पैलवान

अर्धवटराव,

निर्विकार म्हणजे निर्विचार नव्हे.

आ.न.,
-गा.पै.

एक विचार जरी दुसरा विचार उत्पन्न करंत असला तरी मन निर्विकार करता येतं.

मन निर्वीकार व्हायला हि विचारांची वाहिनी अडथळा आणते असा काहिसा अर्थ वाटला मला. आणि मन, विचारांचं सौंदर्य मनातले विकार नाहिसे करायचा अप्रतीम मार्ग आहे हा स्वानुभव आहे. त्यामुळे प्रश्न केला. असो.

अवांतरः
ते नॉट इक्वल टु चिन्ह कसं टाईपायचं ??

अवांतर : गुग्गुळाचार्यांना "not equal sign" म्हणून विचारा.
-गा.पै.

कंजूस's picture

30 Apr 2017 - 8:34 pm | कंजूस

Not equal to
A &ne* B
=
A ≠ B

( * च्या ठिकाणी ; सेमिकोलोन टाकणे)

अर्धवटराव's picture

30 Apr 2017 - 8:57 pm | अर्धवटराव

तुम्ही माहिती देण्यात अजीबात कंजुसी केली नाहि :)
धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2017 - 9:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

संजय क्षीरसागर's picture

29 Apr 2017 - 10:13 am | संजय क्षीरसागर

आणि मी त्यावर लेखन करणार नाही. शेवटचा आणि अल्टीमेट प्रतिसाद वर दिला आहे. तो गोड मानून घ्यावा. तरीही मी काहीही हातचं राखलेलं नाही.

याचा अर्थ तुमच्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत असा नाही. पण हा फोरम अध्यात्मिक लेखनासाठी नाही. मन, काल इथपर्यंत ठीके पण जाणीवेवर इथे चर्चा होऊ शकत नाही.

गामा पैलवान's picture

29 Apr 2017 - 2:33 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

चर्चेबद्दल धन्यवाद! मला झालेलं आकलन सांगून मीही आवरतं घेतो.

तुम्ही म्हणता ती जाणीव सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान आहेच. यांत तिळमात्रही संशय नाही. मात्र मांडुक्योपनिषदात जाणीव त्रिभाजित होते असं म्हंटलंय. त्यामुळे तुमच्या या विधानाची मांडुक्योपनिषदाशी थेट संगती लागंत नाही.

मांडुक्योपनिषदात जागृतावस्थेतल्या जाणीवेस वैश्वानर, स्वप्नावस्थेत तैजस आणि सुषुप्तीत प्राज्ञ अशा संज्ञा आहेत. तुम्ही वर्णिलेली सर्वव्यापी जाणीव प्राज्ञशी जुळणारी आहे. ही स्थिती सुषुप्तीत प्रत्ययास येते. स्वप्नावस्थेत व जागृतीत जाणीव बरीच मर्यादित असते. ही मर्यादा म्हणजे काळ, असं माझं आकलन आहे.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

29 Apr 2017 - 3:31 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही इतकी सुयोग्य चर्चा केलीत म्हणून मी जाणीवेवर लिहीलं. अन्यथा माझ्या अध्यात्मिक पोस्टसवर पब्लिकनी इतका गोंधळ घातला होता की बोलायची सोय नाही. गाढवाचे फोटो काय, विडंबनं काय, ज्यांना अध्यात्मातलं घंटा काही कळत नाही त्यांच्या वाट्टेलत्या कमेंटस काय.... सो आय कॉल्ड इट अ डे ! एनी वे, इतक्या चांगल्या चर्चेनंतर तुमचा हा डाऊट पण क्लिअर करतो.

जाणीवेचं त्रिभाजन हे वास्तविकात ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान असं आहे. तुम्ही वर्णन केलेलं मांडुक्योपनिषदातलं त्रिभाजन : (जागृतावस्थेतल्या जाणीवेस वैश्वानर, स्वप्नावस्थेत तैजस आणि सुषुप्तीत प्राज्ञ अशा संज्ञा आहेत)..... सुद्धा निद्रा, स्वप्न, सुषुप्ती या अँगलनं योग्य आहे.

पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा निद्रा, स्वप्न आणि सुषुप्ती या देहाच्या आणि देहातल्याच अवस्था आहेत. थोडक्यात, उपनिषदात जाणीवेचा वेध देहाच्याच लिमीटेड अँगलमधनं घेतला आहे. जाणीव ही देहबद्ध नाही. ती तशी असती तर अध्यात्माला अर्थच उरला नसता. देह संपला की जाणीव संपली, आपण संपलो, विषय संपला ! जाणीव ही फार थोर गोष्ट आहे तीचा कालाशी सुतराम संबंध नाही. म्हणून तर कृष्ण तीला `सनातन वर्तमान' म्हणतो ! आणि त्यामुळेच कृष्ण अजूनही हजर आहे, बुद्ध अजूनही उपस्थित आहे आणि ओशो देहांतानंतरही जसेच्या तसे आहेत. इन फॅक्ट ज्याला जाणीव कळली तो सुद्धा ती कायम स्थिती होतो. मग त्याच्यात आणि इतर सिद्धात काही फरक राहात नाही. कारण सर्व सिद्ध म्हणजे केवळ एकच `सर्वकाल उपस्थिती' आहे. तीचा कालाशी काहीही संबंध नाही... कारण काल अशी काही वस्तूच अस्तित्वात नाही. ती केवळ प्रक्रिया मापनासाठी केलेली मानवनिर्मित कल्पना आहे. आणि देहात आहोत तोपर्यंत (वास्तविकात नसली तरी) उपयोगाची नक्की आहे.

संजय क्षीरसागर's picture

29 Apr 2017 - 3:50 pm | संजय क्षीरसागर

...सुद्धा जागृती, निद्रा, स्वप्न, सुषुप्ती या अँगलनं योग्य आहे.

पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जागृती, निद्रा, स्वप्न आणि सुषुप्ती या देहाच्या आणि देहातल्याच अवस्था आहेत.

इरसाल's picture

29 Apr 2017 - 2:51 pm | इरसाल

याचाच अर्थ प्रत्येकाला आपलच सांगायच आहे. माझं कोणी ऐकुनच घेवु ईच्छित नाही.
ठिकाय ठिकाय, मेरी वेळ आयेन्गी तब बघुन घेयेन्गे मय !!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Apr 2017 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

ओ इरसालसाहेब !

"ओशोंना जे समजाऊन द्यायला तासभर तरी लागत असे अशी गोष्ट तुम्हाला पाच मिनिटात समजाऊन सांगणे शक्य असेल आणि तरिही तुम्ही अनेक दिवसांमध्ये दिलेल्या असंख्य प्रवचनपर प्रतिसादांनंतरही तुमचे मत अनेक लोकांना पटत नसेल"; तरच तुम्हाला इथे मन, जाणीव, अध्यात्म, इत्यादी उच्च विषयांवर अधिकाराने लिहायला परमिशन आहे, बर्का ! :) =)) (हघ्या)

गामा पैलवान's picture

30 Apr 2017 - 3:21 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा निद्रा, स्वप्न आणि सुषुप्ती या देहाच्या आणि देहातल्याच अवस्था आहेत.

माझ्या मते जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या जाणीवेच्या अवस्था आहेत. देहाच्या फक्त जिवंत आणि मृत या दोनच अवस्था आहेत. कितीही विचार केला तरी स्वप्न खरं की जागृतावस्था खरी हा निर्णय त्या त्या अवस्थेत असतांना घेता येत नाही. ही देहाची मर्यादा नसून जाणीवेवर पडलेला अज्ञानाचा पडदा आहे.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

30 Apr 2017 - 9:37 am | संजय क्षीरसागर

जाणीवेला अवस्था नाहीत ती एकसंध आणि अस्पर्शित आहे.
शिवाय `अवस्था' होण्यासाठी ती प्रक्रिया नाही, अचल`स्थिती' आहे.

गामा पैलवान's picture

30 Apr 2017 - 12:30 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

ती एकसंध आणि अस्पर्शित आहे.

माझी जाणीव (हे लिहितेवेळी) एकसंध आणि अस्पर्शित नाही. तिच्यावर अज्ञानाचा पडदा आहे. तो दूर कसा करू?

आ.न.,
-गा.पै.

साधकाला बोध होणं किंवा न होणं हा त्याच्या व्यक्तिगत (चुकीच्या) धारणा, त्याच्या आयुष्यातले जाणीवेचं अवधान वेधून घेणारे प्रश्न आणि या दोहोंच्या निस्सरणानंतर, बोध होण्यासाठी त्यानं स्वतःच्या आयुष्यात निर्माण केलेली फुर्सत यावर अवलंबून आहे. तुम्ही जाणीवेच्या त्रिभाजनाचा प्रश्न निर्माण केला म्हणून प्रतिसाद दिला. पण वर म्हटल्याप्रमाणे अध्यात्मावर इथे लेखन नाही.

कंजूस's picture

30 Apr 2017 - 12:31 pm | कंजूस

माझं दुसरं मत -
एखादी जागा( कोकणातले घरसुद्धा) घेऊन तिथे चार/ सात दिवस राहण्याची व्यवस्था करा भाविकांची. त्यांनि काय ध्यानधारणा करायची ती तिथे करतील.
शेवटी जागाच धंधा करते.
इमेलमधून/ फोनने संपर्क करून बँक अकाउंटला पैसे घेता येतील NFTS ने.
एक साधीशी ओपन वेबसाइट जनसामान्यांसाठी ठेवायची.

माझ्या लेखी सत्य निर्वैयक्तिक आहे. त्यामुळे `काय सांगितलंय' ते `कोण सांगतोयं' यापेक्षा कायम महत्वाचंय. आणि ते सर्वांसाठी सारखंच आहे. ज्या पद्धतीनं इथे सर्वांसाठी`अनोळखी' हीच माझी ओळख आहे, तोच पॅटर्न संकेतस्थळावर राहील. आणि तो लेखनावर फोकस करायला बेस्टे. शिवाय बोललेले शब्द रेकॉर्ड केले नाहीत तर हवेत विरुन जातात. लेखनाचं तसं नाही. लेखन लोकांना फुर्सतीत, रेफरंससाठी पुढेमागे जात वाचता येतं....म्हणून वेब साईट !

पैसा's picture

30 Apr 2017 - 10:10 pm | पैसा

माझं जरा वेगळं मत आहे. पटतंय का बघा. सामान्य माणसाला आपल्या गुरूची 'ओळख' पाहिजे असते. त्याने कितीही मूर्खासारखे प्रश्न विचारले तरी गुरू त्याचे समाधान होईपर्यंत ज्ञानदान करत असतो. गुरू हा आपल्या आईसारखा मानायची आपली पद्धत आहे. त्यामुळे गुरूने शिष्याशी प्रेमाने, अनुकंपेने वागावे अशी त्यांची नेहमी अपेक्षा असते. त्यामुळे "साधक चिकटले" हे शब्द मला जरा पटले नाहीत. शेवट तुमची साईट, तुमचे शिष्य. तेव्हा त्यांच्याशी कसे वागावे हे तुम्हीच ठरवणार. मी आपले एक निरीक्षण नोंदवले.

संजय क्षीरसागर's picture

30 Apr 2017 - 11:10 pm | संजय क्षीरसागर

साधक पूर्णपणे गुरुला लटकतो आणि सो कॉल्ड गुरु पण त्याला दिलासा देत राहातो. वस्तुस्थिती अशीये की आपण ऑलरेडी सत्य आहोत. साधकाला दिलासा देण्यापेक्षा त्याच्या आकलनात नक्की कोणती गोष्ट आड येतेयं हे शोधणं महत्त्वाचं असतं. सब घोडे बारा टक्के छाप एका गुरुचे सर्व साधक गुरुंच्या गुरुंनी सांगितलेली साधना आयुष्यभर करतात. त्यानं ज्याम लाईट पडत नाही कारण साधकाचा नक्की प्रश्न काये त्याप्रमाणे त्याला साधना द्यावी लागते.

गुरु आईसारखा वगैरे नसतो. तो मित्रासारखा असतो. तो पहले छूटच साधकाला सांगतो की प्रश्न साधनेचा नाही, तर आपण सत्य आहोत हे समजण्यात, त्या साधकाचा नक्की काय लोच्या आहे तो सोडवण्याचा आहे. कारण सत्य ही काही भविष्यात घडणारी घटना नाही. ती आता, या क्षणी असलेली वस्तुस्थिती आहे. तस्मात, साधकाला आपल्यावर अजिबात रेलू न देता, एखाद्या कुशल सर्जनप्रमाणे त्याला त्याचा प्रश्न दाखवून देणं आणि सुटकेचा मार्ग सांगणं, हे मला गुरुचं खरं काम वाटतं.

गुरूला शिष्य निवडता येतो का? किंवा शिष्याला गुरू निवडता येतो का?

चित्रगुप्त's picture

30 Apr 2017 - 2:26 pm | चित्रगुप्त

जे योगियांची समाधी । जे धारिष्टांची कृतबुद्धी । जे विद्या अविद्या उपाधी । तोडून टाकी ॥
जे माहापुरुषाची भार्या । अति सलग्न अवस्था तुर्या । जयेकरितां महत्कार्या । प्रवर्तले साधु ॥
जे महंतांची शांती । जे ईश्वराची निज शक्ती । जे ज्ञानियांची विरक्ती । नैराशशोभा ॥
जे अनंत ब्रह्मांडें घडी । लीळाविनोदेंचि मोडी । आपण आदिपुरुषीं दडी । मारून राहे ॥
जे प्रत्यक्ष पाहातां आडळे । विचार घेतां तरी नाडळे । जयेचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥
जे सर्व नाटक अंतर्कळा । जाणीव स्फूर्ती निर्मळा । जयेचेनी स्वानंदसोहळा । ज्ञानशक्ती ॥

समर्थ जिच्याबद्दल म्हणतात "जयेचा पार न कळे - ब्रह्मादिकांसी" ती जाणीव म्हणजे काय याबद्दल मिपावर शेवटी काय ठरले म्हणे ??

निष्पक्ष सदस्य's picture

30 Apr 2017 - 7:33 pm | निष्पक्ष सदस्य

आपणांस नवीन कार्याच्या शुभेच्छा!!
शुल्क आकारण्याबाबत काही सदस्यांनी तुम्हाला सांगितले आहेच,पण तुम्ही "लेट मी ट्राय" असे म्हणत आहात तर बघा ट्राय करून.आम्हास वाटलेच तर येवू आपल्या संस्थळावर.वरची चर्चा वाचून डोक्यात मुंग्या आल्यात,कदाचित कुंडली जागृत होत असावी.

संजय क्षीरसागर's picture

30 Apr 2017 - 7:41 pm | संजय क्षीरसागर

बिपी किंवा शुगर प्रॉब्लम दर्शवतं ! कुंडलीनी जागृत झाली नाही तरी चालेल, पण तब्येतीच्या दृष्टीनं ते पहिले चेक करावं.

निष्पक्ष सदस्य's picture

30 Apr 2017 - 7:57 pm | निष्पक्ष सदस्य

=)).
संजयजी,
कसयं... बघा पटतय का,
मुद्दा क्रं एक-अध्यात्माचे शिखर गाठलेला माणुस कधीही हेवेदावे करत नसतो.
उदा-मी ओशोंपेक्षा सोपं करून सांगतो वगैरे.
मुद्दा क्रं दोन-सुरवातीला तुम्ही काही असंबंद्ध प्रतिसाद जे कि तुमच्याशी स्कोर सेटलिंग साठी येत होते ते तुम्ही इग्नोर केलेत तेव्हा छान वाटलं,पण नंतर तुम्ही परत त्यात अडकलात,याला मोहमाया म्हणतात,यासाठी कि तुम्ही हे चांगलेच जाणता कि तुमच्या विचारांशी काहीजण सदैव असहमत असतात तरीही तुम्ही प्रतिवाद करत बसता,हे कशाचे लक्षण आहे?मग तुमच्या अध्यात्मिक उन्नतीचा काय उपयोग?
(कृपया यावर प्रतिवाद करू नका.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2017 - 11:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

निष्पक्ष प्रतिसाद !

संजय क्षीरसागर's picture

30 Apr 2017 - 11:43 pm | संजय क्षीरसागर

समजतंय का बघा :

१) अध्यात्माचे शिखर गाठलेला माणुस कधीही हेवेदावे करत नसतो. उदा-मी ओशोंपेक्षा सोपं करून सांगतो वगैरे.

एकेका श्लोकावर ओशो दीड तास प्रवचन द्यायचे. जमाना बदलला आहे. पब्लिकचा अटेंशन स्पॅन कमालीचा कमी झालायं. आज ओशोंच्या जुन्या प्रवचनांना काहीही मागणी नाही. ती फुकट डाऊनलोड करता येतात. अशा वेळी अत्यंत थोडक्यात आणि नेमकं सांगता येणं महत्त्वाचं झालंय. इतर सदस्य आणि मान्यवरांचं सोडा पण तुम्हाला मुद्दा कळायला अडचण नसावी.

२) मुद्दा क्रं दोन-सुरवातीला तुम्ही काही असंबंद्ध प्रतिसाद जे कि तुमच्याशी स्कोर सेटलिंग साठी येत होते ते तुम्ही इग्नोर केलेत तेव्हा छान वाटलं,पण नंतर तुम्ही परत त्यात अडकलात,याला मोहमाया म्हणतात,यासाठी कि तुम्ही हे चांगलेच जाणता कि तुमच्या विचारांशी काहीजण सदैव असहमत असतात तरीही तुम्ही प्रतिवाद करत बसता,हे कशाचे लक्षण आहे?मग तुमच्या अध्यात्मिक उन्नतीचा काय उपयोग?

उत्तम प्रतिवाद करता येणं हे सुद्धा अध्यात्मिक प्रगतीचंच लक्षण आहे कारण कोणताही आणि कसाही प्रश्न आला तरी नेमकं कळलेला (च) न गडबडता उत्तर देऊ शकतो. हे सुद्धा एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल.

३ ) (कृपया यावर प्रतिवाद करू नका.)

घाबरु नका. तुमची अध्यात्मिक उन्नतीची परिकल्पना दूर केली आहे.

पैसा's picture

30 Apr 2017 - 7:42 pm | पैसा

=)) कुंडली जागृत होणे हा काय प्रकार आहे?

निष्पक्ष सदस्य's picture

30 Apr 2017 - 8:07 pm | निष्पक्ष सदस्य

कुंडलिनी असं म्हणायचं होतं मला.यामध्ये स्व गवसतो म्हणे!

गामा पैलवान's picture

30 Apr 2017 - 10:28 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. त्यातला जाणीवेचा फंडा तुम्ही सांगितलाय तो मला पूर्वीपासूनंच मान्य आहे.

१.

साधकाला बोध होणं किंवा न होणं हा त्याच्या व्यक्तिगत (चुकीच्या) धारणा, त्याच्या आयुष्यातले जाणीवेचं अवधान वेधून घेणारे प्रश्न आणि या दोहोंच्या निस्सरणानंतर, बोध होण्यासाठी त्यानं स्वतःच्या आयुष्यात निर्माण केलेली फुर्सत यावर अवलंबून आहे.

यांचसोबत साधकात बोध करून घ्यायची इच्छा प्रबळ हवी.

२.

तुम्ही जाणीवेच्या त्रिभाजनाचा प्रश्न निर्माण केला म्हणून प्रतिसाद दिला.

खरंतर जाणीवेचं त्रिभाजन मांडुक्योपनिषदात सांगितलेलं आहे. माझं स्वतःचं काहीच नाही. ते वचन तुमच्या बोधकथनाशी जुळवायचं बघंत होतो. हा प्रयास माझा मलाच करावा लागणार आहे. तुमच्याशी चर्चा करून उत्तरं मिळाली नाहीत तरी प्रश्न सापडल्यासारखा वाटतो आहे. त्याबद्दल धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये संजय क्षीरसागर in तंत्रजगत http://www.misalpav.com/node/39432
हे दोन्ही धागे एकाच आहे ना ? फक्त लेखक वेगळा आहे..बरोबर ना ?

वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये संजय क्षीरसागर in तंत्रजगत http://www.misalpav.com/node/39444
हे दोन्ही धागे एकाच आहे ना ? फक्त लेखक वेगळा आहे..बरोबर ना ?

संजय क्षीरसागर's picture

12 May 2017 - 10:17 pm | संजय क्षीरसागर

हे दोन धागे कसे झाले कल्पना नाही.

अहो.. ते दुसरं विडंबन आहे!

संजय क्षीरसागर's picture

13 May 2017 - 11:14 am | संजय क्षीरसागर

ते चित्रगुप्तांचे विडंबन आहे.

इरसाल's picture

15 Jun 2017 - 12:37 pm | इरसाल

लै म्हन्जे लैच बेक्क्क्क्कार लोका हायेत.

मला पण एक वेबसाईट सुरू करायची आहे पण इंटरेस्ट घेऊन काम करणारा कुणी भेटत नाही. चांगलं वेब डिझाईन करणारा माणूस हवा आहे. डोमेन घेतला आहे ३ वर्ष फक्त रिंन्यू करतोय. काम मनासारखं होत नाही. स्वतः शिकायचा प्रयत्न केला पण हे खूप कंटाळवाणं काम वाटलं. कुणी तरी मराठी वेब डिझाईन करणारा हवा आहे. इ. कॉमर्स साईट आहे त्यात कमिशन द्यायची तयारी आहे. कुणी असेल तर ९९८७६६२६२६ या नंबर वर फोन करावा.

सतिश गावडे's picture

21 Jun 2017 - 9:22 pm | सतिश गावडे

१. ठीकठाक वेबसाईट बनवून देणारे खुप लोक असतात. हे लोक साधारण चार पाच हजारास होम पेज आणि त्यापुढील प्रत्येक पेजला चार पाचशे रुपये या दराने वेबसाईट बनवून देतात. एक Contact Us पेज सोडले तर बाकी पेजेस static असतात.

बहुतेक हौशी लोकांचे, छोट्या दुकानदारांचे अशा वेबसाईटने समाधान होते.

२. Interactive आणि आकर्षक वेबसाईट बनवणे हे खर्चिक, मेहनतीचे आणि वेळखाऊ काम असते. बहुतेक वेळा वेब डिझायनर, फ्रंट एंड डेव्हलपर आणि वेब प्रोग्रामर अशा तीन व्यक्ती (किंवा वेब डिझाईन, वेब फ्रंट एन्ड डेव्हलपमेंट आणि वेब प्रोग्रामिंग यातील एक किंवा अधिक गोष्टी जमणाऱ्या व्यक्ती) अशा वेबसाईट बनवण्यासाठी एकत्र काम करतात.

त्यामुळं अर्थातच आकर्षक वेबसाईटचे बजेट प्रचंड वाढते.

धर्मराजमुटके's picture

21 Jun 2017 - 8:08 pm | धर्मराजमुटके

वेबसाईट डिझाईन करणे आणी पेपर मिडीयातील कोणतेही पँप्लेट, ब्रोशर, अ‍ॅड डिजाईन करणे जवळपास सारखेच आहे. गिर्‍हाईकाला २-४ वेगवेगळी डिझाईन्स बनवून द्यावी लागतात. डिझायनरचा मुड असला की तो चांगले खपून एक डिझाईन बनवतो. दोन-तीन दुसर्‍या प्रॉडक्टचे कॉपी मारतो. आता त्याला वाटतं की हे मनापासून खपून केलेले डिझाईन गिर्‍हाईकाला आवडणार आणि तो मनातल्या मनात खुश होतो. पण गिर्‍हाईकाला शेवटी कॉपी पेस्टवालं डिझाईनच पसंत पडतं. झक मारली आणि वेळ घालवला असं होतं कधीकधी. (अपवाद आहेच पण ते अपवादात्मकच).
शेवटी कार्यक्षेत्र कुठलही असो, रट्टा मारावाच लागतो बॉस !

नमस्कार म पा,
चर्चा फार चांगली वाटली. चर्चे मध्ये ssrf.org चा संधर्भ वाचला त्याबद्धल व अधात्मा बद्धल थोडेसे.

“ अध्यात्माचे प्रस्थाविक विवेचन” हा छोटा ग्रंथ आपल्याला अध्यात्माचे महत्व नावाप्रमाणे विवेचानात्माक कथन करतो.
दुसरा छोटा ग्रंथ “ अध्यात्म ” ह्यातही आपल्याला अध्यात्माची चांगली माहिती मिळते.

एस एस आर एफ डॉट ओआरजी हि वेब जागतिक दर्जाची असून सहा लाखाहून जास्त जगभरातील जिज्ञासू वेब ला भेट देतात.
वेब चे घोष वाक्य आहे “ Bridging the known and unknown world “
या वेब वर अतिशय सविस्तरपणे वेगवेगळे अध्यात्मिक विषय सविस्तरपणे मांडले आहेत.
वेब पूर्णपणे मोफत आहे.
आपला एखादा अध्यात्मिक प्रश्न आपल्याला मांडता येतो व त्याचे उत्तर अत्ठेचालीस तासात आपल्याला मिळते.
या वेब ला जगभरातील सामान्य लोकापासून ते scientist सुध्दा भेट देतात.
“ Science has limitations, it can not see before birth or after death of human being, spirituality can.” Says Dr Vijay Bhatkar world renowned scientist from Pune.

खाली काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पण दिलेली आहेत कृपया वाचावी.

For beginners
I have no background knowledge on this topic, where do I begin?
The Take a Tour section will provide you with an overview of the main sections on our website depending on your primary interest.

From where have you obtained this knowledge? Who is the source of the information on the website?
The source of the knowledge is the Universal Mind and Intellect, an aspect of God. Some of the SSRF seekers, through their developed sixth sense, are able to tap into the Universal Mind and Intellect. All knowledge received by them is also verified by His Holiness Dr. Athavale through His highly activated sixth sense.

Spirituality and Science
Why do you term Spirituality as a science?
We call the Spiritual Science (i.e. Spirituality) a ‘science’ because of the following:
The study of the spiritual dimension is just as systematic and logical as that of the physical world.
The reason for everything that happens in the spiritual or subtle-dimension is discernible just as in the physical or gross world.
The principles concerning the spiritual dimension can be tested again and again with the requisite tools. Just as the research tools are different for physics and architecture, so also are they for Spiritual Science. Here the main tool required is developed subtle-perception ability or an activated sixth sense.

How come other research studies do not reach the same conclusions?
Most research studies explore the spiritual dimension and its effects on man, with conventional tools of research while SSRF uses the medium of the activated sixth sense. Using conventional research methodologies to explore the spiritual realm is like trying to measure intelligence with a foot ruler. At best, this type of research can only be corroborative in nature rather than first hand research into the etiology of phenomena in the spiritual realm. What the mind/brain does not know, it will not seek to corroborate. Since all research conducted by SSRF is through the medium of the activated sixth sense, it does not face the restrictions of conventional research methodologies. Hence, the research conclusions are bound to be different.

Spiritual Science the same as Scientology?
Spiritual Science and Scientology both study about the Truth, but they differ in many aspects. For example, Scientology says the goal of life is to survive whereas Spiritual Science states that the goal of life is to merge with God.

My life is really good; can I still gain from this website?
Yes, you can still gain from this website
A deeper understanding about our life: This website provides a deeper perspective into our life and the factors that affect it. This includes the basic purpose of life, why we do the things we do even when sometimes they are contrary to our nature, the root causes of difficulties in life and how to deal with them, etc.
Change is the only constant: Everything around us changes, and the status of our life at this moment is no guarantee of the future. 35% of our life events are decided by our willful actions and 65% are pre-destined. One can overcome mild to moderate destiny by doing spiritual practice. One cannot escape severe destiny, but one can get the ability to bear it by doing spiritual practice.

नारायण नाडकर्णी.

रानरेडा's picture

29 May 2020 - 4:17 pm | रानरेडा

ही साईट बनली का ?
तीन वर्षात बहुदा बरेच लोक मिळाले असतील , कसं प्रतिसाद आहे ?
डोमेन इकडे दिल्यास सर्वांना कळेल पण !

सतिश गावडे's picture

29 May 2020 - 7:03 pm | सतिश गावडे

होय, या वेबसाईटचे काय झाले हे जाणून घेण्यास मी ही उत्सुक आहे.
आज हा धागा वर येण्याआधीच्या शेवटच्या तीन प्रतिसादात माझा प्रतिसाद आहे. :)