डिअर ऑल,
अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल.
वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मुलगा करेल. लोकांचे अध्यात्मिक गैरसमज दूर करुन जीवन सर्वांग सुंदर करणारा एक विषय त्यांच्याप्रत पोहोचावा असा उद्देश आहे.
यात माझं आतापर्यंत झालेलं लेखन, लेखावरच्या लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी दिलेली उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल. साईटला अर्थात नाममात्र वार्षिक
सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता आयुष्यातला कोणताही प्रश्न विचारता येईल (त्यासाठी प्रश्नाला शंभर रुपये शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल.
साईट बाय-लिंग्विअल (मराठी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल.
जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :
१) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक)
२) जवळजवळ सर्व डेटा टेक्स्ट्युअल असेल तर डेटाबेस किती असावा ?
३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ?
४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.
प्रतिक्रिया
10 Apr 2017 - 3:25 pm | गणामास्तर
'ऑनलाईन बाबा' होताय काय ?
बाकी आज सकाळीच एक नुकताच इंजिनियरिंग झालेला पोरगा हापिसात आला होता. कसला तरी स्टार्ट अप चालू केलाय त्याचं मार्केटिंग करत होता.
डोमेन नेम, मेंटेनन्स आणि साईट डिझाईनचे ४ हजार सांगून गेला. गरजेप्रमाणे सॉफ्टवेअर पण बनवून देऊ म्हणाला.
तुम्हाला हवा असेल तर देतो नंबर. .
10 Apr 2017 - 3:56 pm | संजय क्षीरसागर
नंबर जरूर कळवा.
14 Jun 2017 - 8:14 am | शशिकांत ओक
नमस्कार, आपण इथल्या लोकांना विचारून अध्यात्मिक उन्नती साठी वेबदुनिया करायचेच ठरवले असेल तर पुढे काय प्रगती झाली आहे? हे समजून घेण्यासाठी विचारणा... नाडीग्रंथ भविष्य विषयावर At A Glance Shashikant Oak by shashioak.weebly.com साईट आहे. नजरेखालून घाला.
14 Jun 2017 - 9:04 am | मोदक
संक्षि,
नाडीग्रंथ भविष्य या बद्दल तुमचे काय मत आहे?
14 Jun 2017 - 10:01 am | संजय क्षीरसागर
सध्या कामाच्या गडबडीत वेळ होत नाहीये, ते जरा फुर्सतीनं करायचं काम आहे.
14 Jun 2017 - 8:59 pm | ट्रेड मार्क
असं कसं शक्य आहे? मनाला येईल तेव्हा आवडेल ते काम करणारे तुम्ही एक वेबसाईट बघण्याएवढा वेळ नाही म्हणता?
देव (??) करो आणि तुम्हाला वेबसाईट बघायची इच्छा होवो. तसेच मिपावर जास्त वेळ घालवायची इच्छा होवो, इकडे काही धागे कासवगतीने पुढे जातायेत तर काही मृतप्राय झालेत.
10 Apr 2017 - 3:31 pm | प्रचेतस
अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल.
जालापेक्षा जालावर नसलेले कितीतरी रसिक वाचक आहेत ते सर्व ह्या आध्यात्मिक अनूभूतीला मुकतील, तेव्हा पुस्तक रद्द करण्याचा विचार रद्द करावा, साईट सह पुस्तकही प्रकाशित करुन टाकावं.
साईटला अर्थात नाममात्र वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल
बहुतांश लोक नोकरदार असतात, त्यांना ऑफिसचे फुकटचे आंतरजाल वापरायची. तसेच फुकटच्या साइट्स बघायचीच सवय असते त्यामुळे तुमची वेबसाईट सशुल्क असेल तर कोणी तिथे न फिरकण्याचीच शक्यता अधिक. आठवा पैसे घेउन ईमेल सेवा देणारी युएसए.नेट आज कुठे आहे आणि फुकट ईमेल पुरवणारी जीमेल कुठे आहे. ब्लॅकबेरी कुठे आणि एन्ड्रोईड कुठे ते.
तेव्हा ह्या निर्णयाचा गांभीर्याने विचार करावा, शिवाय तुमच्याकडे पैसा पुरेसाअसल्याने साईट अॅडमिनिस्ट्रेशनचा खर्चाची चिंता करण्याची तुम्हास जरुर आहे असे खरोखर वाटत नाही.
जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :
आपलेच एक मिपाकर मित्र सतिशजी गावडे हे मित्रांना कॉम्प्लिमेंटरी म्हणून वेबसाईट बनवून देतात. त्यांच्याशी संपर्क साधा ते तुम्हास ह्या कामी नक्की मदत करु शकतील.
10 Apr 2017 - 4:26 pm | संजय क्षीरसागर
१)
पुस्तक रद्द करण्याचा विचार रद्द करावा, साईट सह पुस्तकही प्रकाशित करुन टाकावं.
येस कंटेंट रेडी झाल्यावर तो पुस्तकत रुपातही प्रकाशित करता येईल आणि तेही करणार आहे. पण साईटला संवादाचं स्वरुप असल्यानं ती पुस्तकापेक्षा वेगळी फॅसिलीटी आहे. वाचकांशी संवाद हा खरा उद्देश आहे. शिवाय कंटेंटला वेळोवेळी अॅडिशन्स होत राहातील, त्या वेगानं पुस्तकाच्या आवृत्या काढता येणार नाहीत.
२)
तुमची वेबसाईट सशुल्क असेल तर कोणी तिथे न फिरकण्याचीच शक्यता अधिक.
सशुल्कतेचा दुहेरी फायदा आहे. लोक्स कंटेंट मनापासून वाचतात आणि प्रामाणिक प्रश्नोत्तर करतात. सध्याच माझ्याकडे दोनशेच्या आसपास इंटरेस्टस आहेत. सदस्यत्त्व सशुल्क असलं तरी मेजर कंटेंट ओपन असेल. कंटेंटवर प्रश्न मात्र सदस्यांनाच विचारता येतील.
३)
तुमच्याकडे पैसा पुरेसाअसल्याने साईट अॅडमिनिस्ट्रेशनचा खर्चाची चिंता करण्याची तुम्हास जरुर आहे असे खरोखर वाटत नाही.
अध्यात्मिक इतिहासात पहिल्यांदा, ओशोंनी प्रवचनाला तिकीट लावायला सुरुवात केली. अध्यात्म तर मोफत हवं असं एकानं म्हटल्यावर त्यांनी मजेशिर उत्तर दिलं, ते म्हणाले, `तिकीट काढून ऐकायला आलेला, ऐकतांना सहसा झोपत नाही !'
10 Apr 2017 - 3:58 pm | अभ्या..
नमस्कार संजयजी,
माझ्या हपिसची वेबसाईट बनवायची होती. आपले मिपाकर सतीश गावडे ह्यांनी हे काम अत्यंत सुंदर रीतीने करुन दिले. ,मला ते डोमेन नेम पर्चेस, होस्टिंग वगैरे अजिबात कळत नव्हते. सगळे त्याने पहिल्यांदा समजावून सांगितले. वेळप्रसंगी स्वतःच्या आकाउंटमधून पे केले ऑनलाईन कंपनींना पण माझे काम अडू दिले नाही.
तुमच्या चिरंजीवाप्रमाणेच ग्राफीकचे काम मी करुन दिले पण बाकी महत्त्वाचे म्हणजे कंटेंट आणि साईट डिझायनिंग/मॅनेजमेंट वगैरे सगळे सतीशनेच केले.
टाईम म्हणले तर त्याने डिझाईन कंटेंट दिल्यानंतर दिड दिवसात हे काम अप्रतिमरित्या करुन दिले. लोगो वगैरे हवे त्या फॉर्म्याटात करुन घेतले. ह्यासाठी त्याने फक्त व्हाटसपवर आणि मेलवर साधलेल्या संवादावर काम केले. प्रत्यक्ष भेटावेच लागले नाही.
आता केलेल्या कामाचा मोबदला म्हनाल तर अजून त्याचे खूप पैसे देणे आहे. तो तगादा लावत नाही किंवा सोलापूरला येत नाही तोपर्यंत मी देणार नाही ;)
26 Apr 2017 - 3:41 pm | मी-सौरभ
लै भारी काम केलत
10 Apr 2017 - 4:31 pm | पैसा
नव्या साईटसाठी शुभेच्छा!
अध्यात्म त्यातून पेड साईट मला काय परवडणारी नाही त्यामुळे सदस्यत्व घेणे अवघड आहे. मात्र मराठीतून अध्यात्मावर साईट ही अभिनव कल्पना आहे. नव्या साईटला मनःपूर्वक शुभेच्छा! मग काय तुम्ही मिपावर कमी येणार का काय?
10 Apr 2017 - 5:03 pm | अप्पा जोगळेकर
सशुल्क वेबसाईट करण्यापेक्षा सुरुवातीला जर तुम्ही फुकट सेवा उपलब्ध करुन दिली तर वाचकवर्ग वाढेल आणि नंतर लोकप्रिय वेबसाईत आहे म्हणून जाहिरात माध्यमातून पैसा उभा करणे सोपे पडेल. इट इज अ गुड बिझनेस.
10 Apr 2017 - 5:09 pm | अभ्या..
हा राव, हे बरोबर आहे,
जीमेलवाले पण पैसे मागायले आता, १५ जीबी वर गेले म्हणे आता. पैसे भरा.
आम्ही जुन्या मेलातल्या अॅटचमेंटा उडवून काम चालवतोय पण एक दिवस गूगल वसूलल्याशिवाय राहणार नाही. :(
10 Apr 2017 - 11:40 pm | कुंदन
मॅगा बायटी प्रतिसाद देत जा.
10 Apr 2017 - 11:44 pm | कुंदन
* नका देत जाउ.
10 Apr 2017 - 6:05 pm | यशोधरा
तुम्ही सशुल्क उत्तरं देणार, तर तुमच्या प्रश्नांना इतरांनी फुकट उत्तरं का द्यावीत?
10 Apr 2017 - 6:50 pm | राघवेंद्र
सही जवाब या सही सवाल :)
10 Apr 2017 - 6:54 pm | यशोधरा
जैसे आपका नजरिया ;)
10 Apr 2017 - 7:01 pm | सूड
+ सहमत!!
10 Apr 2017 - 7:33 pm | चित्रगुप्त
हे एनलाईटनमेंट म्हणून जे काही असते असे सांगितले जाते, ते धागाकर्त्यास/साईट-कर्त्यास स्वतःला झालेले आहे काय, असल्यास कसे, केंव्हा, त्याचे स्वरूप नेमके काय, त्यामुळे कोणते बदल घडून आलेत, वगैरे खुलासा आधी इथे केल्यास लोकांना पैका खर्चून सदस्यत्व घेण्याचा निर्णय घेणे सोपे जाईल. नुस्त्या ऐकीव/वाचीव माहितीच्या आधारे पायरी पायरीने मार्गदर्शन करणार असल्यास तसे आधी स्पष्ट करावे. मागे मिपावर विंग कमांडर साहेब "आधी स्वतः पैसे खर्चून नाडी भविष्य बघा, मगच चर्चा करा" असे ठासून सांगत, त्याची आठवण झाली.
अर्थात हेही कळण्यासाठी आधी सदस्यत्व घेणे जरूरी असल्यास तोबा तोबा.
10 Apr 2017 - 7:42 pm | संदीप डांगे
असं मुद्द्याचे बोलू नका काका... ;-)
12 Apr 2017 - 12:41 am | डॉ सुहास म्हात्रे
चित्रगुप्तसाहेब,
तुम्ही काय लोकांची दुकाने बंद करायचा विडा उचलला आहे काय ?! =)) =)) =))
10 Apr 2017 - 7:49 pm | जेपी
वेबचे वाचन फुकट आहे का ?
10 Apr 2017 - 8:58 pm | संजय क्षीरसागर
साईटच्या कंटेटेची कल्पना यावी आणि आवडल्यास सदस्यत्व घ्यावं म्हणून काही टायटल्स ओपन असतील.
11 Apr 2017 - 8:04 am | औरंगजेब
www.wix.com वर फुक्कट templates आहेत.Tutorials पण आहेत. मी माझ्या Travel Consultanyची website पण wix.com वरच बनवली आहे. Details तुम्हाला व्य.नी.करतो.एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला अंदाज येईल.
11 Apr 2017 - 9:52 am | संजय क्षीरसागर
चांगली कल्पना आहे. धन्यवाद !
11 Apr 2017 - 8:20 am | कंजूस
wordpress चे फ्री डोमेन वापरले तर कंजूस.wordpress dot com अशी वेबसाइट मिळते. तेच पेड घेतल्यास कंजूस डॅाट कॅाम मिळेल. हे प्रथम सुरुवात करून नंतर नवीन वेबसाइटला फिरवता/जोडता येईल. तुमचे लेखन ग्राफिक कंटेंटपेक्षा टेक्स्ट महत्त्वाचे आहे. शिवाय wordpress हे एचटिटिपिएस असण्याचा फायदा मिळेल॥
11 Apr 2017 - 9:51 am | संजय क्षीरसागर
धन्यवाद !
11 Apr 2017 - 11:17 am | मोदक
स्वामीजी, तुमचे फंडे एखाद्याने (पैसे देऊन) अनुसरले आणि त्याचे कांही नुकसान झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी घेणार का..?
नसल्यास तसे तुमच्या वेबसाईटवर स्पष्ट लिहा.
11 Apr 2017 - 3:34 pm | अद्द्या
अध्यात्म वगैरे मुळातूनच पटत नाही.. पण वेब होस्टिंग आणि इतर विषय आले म्हणून हे ..
सुरुवातीचे काही दिवस ( एखादं वर्ष तरी ) शुल्क घेण्याचा विचार डोक्यातून काढून टाका . २०० interests हे वेबसाईट्स साठी चिल्लर आहेत .
ते २०००+ नियमित वाचक होतील तेव्हा विचार करा अगदी नाममात्र शुल्क ठेवण्याचा ..
उदाहरण च द्यायचं झालं तर " www.misalpav.com " इथे शुल्क द्यावं लागलं तर किती लोक येतील हि शंकाच आहे . . अगदी शेकडो रेग्युलर लोक असून सुद्धा..
ते असो .. वर वर्डप्रेस चा उल्लेख आहेच ..
11 Apr 2017 - 3:54 pm | संजय क्षीरसागर
पण मला क्रिकेट किंवा राजकारणात रस नाही तसा अनेकांना अध्यात्मात रस नसणं समजू शकतो.
लोकांना फुकट मिळालं की किंमत नसते हे इथल्या मदतीचे सल्ले मागणारे नंतर फिरकत सुद्धा नाहीत यावरनं लक्षात येईल. सो लेट मी ट्राय !
11 Apr 2017 - 4:47 pm | सूड
तेच तर म्हणतायेत लोक. लोकांना फुकट मिळालं किंमत नसते म्हणणारे तुम्ही इथे कुठल्या तोंडाने मदत मागायला आला आहात?
12 Apr 2017 - 12:42 am | डॉ सुहास म्हात्रे
आयाई.............. =))
11 Apr 2017 - 6:19 pm | अद्द्या
Irony jumped from top of a server
असो , असे बरेच ब्लॉग्स / वेबसाईट्स सुरुवातीपासून सशुल्क केल्यामुळे सुरुवातच न झालेले बघितले आहेत.. सोप्प गणित आहे.. आधी मार्केट मध्ये आपला माल कितपत चालतोय याचा अंदाज घ्या. लोकांना आवडतोय कि नाही हे बघा.. मग त्याची किंमत ठरवा .. नाही तर मग फक्त शारुक ची फिल्म म्हणून ५०० रुपये तिकीट लावतो थेटर वाला .. पण त्याचा मग happy new year होतो ..
पण असो .. शेवटी आपापला बिजिनेस प्लॅन . आम्ही फुकटे काय सांगणार तुम्हाला :)
11 Apr 2017 - 7:44 pm | चौकटराजा
मला क्रिकेट व राजकारणात चांगलाच रस आहे. पण अध्यात्मात नाही. पण मी तुमचा अध्यात्मातील रस समजू शकतो. एक खरे की जो जिवंत आहे त्याला भक्तीमार्गातून सुटका असेल पण अध्यात्मातून नाही. स्वतः ला ओळखणे म्हणजेच अधि अधिक आत्म. मी माझ्या पुरता माझाच गुरू असल्याने माझ्या मर्यादा व सामर्थ्याची ओळख मी आपल्याशीच संवाद साधून करतो. सबब प्रवचने पुस्तके वेबसाईट याशी आपला कायबी सबंध नाही.
11 Apr 2017 - 4:53 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
स्पिरिच्युअल रीसर्च फाउंडेशन नामे एक संस्था आहे : www.ssrf.org
सनातन संस्थेचेच लोकं हे संकेतस्थळ चालवतात. तिथली लोकं तुम्हाला मदत करू शकतीलसं वाटतंय. विशेषत: प्रश्न क्रमांक २ व ३ च्या संदर्भात.
आ.न.,
-गा.पै.
11 Apr 2017 - 7:03 pm | संजय क्षीरसागर
पाहातो. धन्यवाद !
11 Apr 2017 - 6:29 pm | चित्रगुप्त
सशुल्क असो वा निशुल्क, बुद्धत्वाविषयी मार्गदर्शन करू पाहणाराने आधी स्वतःला बुद्धत्व प्राप्त झालेले आहे, हे खणखणीतपणे सिद्ध केलेले असले पाहिजे, नुस्त्या ऐकीव गप्पा ढिगाने मिळतात फुकट.
12 Apr 2017 - 7:55 am | उदय
सर्वप्रथम तुम्हाला डोमेन नेम (म्हणजे वेबसाइटचा पत्ता) रजिस्टर करावे लागेल. त्यासाठी डोमेन रजिस्ट्रार वापरावा लागतो. मी स्वतः https://www.godaddy.com आणि https://www.gandi.net वापरतो. तुम्हाला स्वस्तात पाहिजे असेल तर https://in.godaddy.com इथे प्रयत्न करून बघा. २ वर्षांना साधारण १२०० रुपये खर्च येइल, असं दिसतंय. gandi.net त्या तुलनेत बरेच महाग आहे.
डोमेन नेम घेतले म्हणजे फक्त पत्ता मिळाला, पण घर उभे राहिले नाही. त्यासाठी तुम्हाला होस्टिंग कंपनी शोधावी लागेल. होस्टिंगमध्ये वेगवेगळे प्लॅन्स असतात, ज्यात तुम्हाला किती स्पेस हवी, किती बँडविड्थ हवी, सर्व्हर कशा प्रकारचा हवा (विंडोज की लिनक्स, शेअर्ड होस्टिंग की डेडिकेटेड वगैरे) अशा अनेक गोष्टी ठरवाव्या लागतील. जर इ-कॉमर्स साईट असेल तर तुम्हाला डेडिकेटेड आय.पी. अॅड्रेस आणि एस.एस.एल. सर्टिफिकेटपण लागेल. (तुमच्या केसमध्ये याची गरज नाही.) होस्टिंग अकाउंट झाले की रजिस्ट्रारच्या अकाउंटमध्ये जाऊन डी.एन.एस. सर्व्हर सेटिंग बदलावे लागते.
होस्टिंग अकाउंटमधून तुम्ही वर्डप्रेस किंवा ड्रूपल या प्रणाली वापरून मराठी-हिंदी-इंग्रजी अशा अनेक भाषांमधील वेबसाईट तयार करू शकता. तुम्हाला हव्या त्या (बाय-लिंग्विअल साईट (मराठी आणि इंग्रजी), पेड मेंबरशिप, पुस्तक लिहिणे आणि ते डाउनलोडसाठी उपलब्ध करणे वगैरे, ) सुविधा ड्रूपलमध्ये मिळू शकतील, पण ड्रूपलचा लर्निंग कर्व्ह जास्त आहे आणि तुम्हाला शिकण्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागतील, असे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो.
३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ? >> ड्रूपलमध्ये बॅकअप अॅण्ड मायग्रेट हे तयार मॉड्यूल वापरून बॅकअपचे काम ऑटोमेट करता येते. होस्टिंग अकाउंटमधून पण डाटाबेसचा बॅकअप घेता येतो. महत्वाचे म्हणजे साईट वेळच्यावेळी अपग्रेड करणे, स्पॅमवर नियंत्रण ठेवणे, सतत कॅटेंट टाकत राहाणे, वेब साईट SEO friendly करणे हे गरजेचे आहे. एकंदरीतच कुठलीही वेब साईट व्यवस्थित चालवणे हे टेक्निकली कौशल्याचे काम आहे.
तुम्ही लिहिले आहे की "साईटला अर्थात नाममात्र वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल." खर्च भागवण्याबद्दल काळजी असेल तर मी कुणाही मिपाकराला पर्सनल वेबसाईटसाठी फ्री होस्टिंग द्यायला तयार आहे, कारण माझ्याकडे स्वतःचे रिसेलर अकाउंट आहे (पण जे मी फक्त स्वतःच्या खाजगी कामासाठी वापरतो). साईट सुरू केल्याकेल्या, साईटवर येणार्यांकडून १०० रुपये का होईना पण शुल्क घेण्याची अपेक्षा, हे लॉजिक गंडल्याचे उदाहरण आहे. पहिल्या वर्षात १५-२० जण पेड मेंबर मिळाले तरी मला आश्चर्य वाटेल. हौस म्हणून साईट चालवणे बरे, पण शेवटी तुमची मर्जी. मला उगीच त्यावरून वाद नको. तुम्हाला आणि इतर कुणाला उपयोग होईल म्हणून माहिती दिली आहे, यात माझा काडीचाही स्वार्थ नाही, हे स्पष्ट करतो.
12 Apr 2017 - 10:20 am | संजय क्षीरसागर
अनेकानेक धन्यवाद !
तुमच्याशी व्यनितून संपर्क साधतो.
20 Apr 2017 - 4:13 pm | tusharmk
नमस्कार सर,
१) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक)
==> डोमेन रजिस्टर भारतात खूप आहे. जसे की https://in.godaddy.कॉम, www.bigrock.इन,www.domainindia.ऑर्ग होस्टगेटवर , https://www.hostindia.नेट
https://www.hostgator.इन
२) जवळजवळ सर्व डेटा टेक्स्ट्युअल असेल तर डेटाबेस किती असावा ?
==> सध्या तुमची डेटाबेस साईझ किती आहे. तुम्ही घरी कुठली ऑपरेटिंग सिस्टिम वापरतात लिनक्स ( Linux) कि Windows ?
सध्या १० गब SPace खूप होईल तुम्हाला.
३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ?
==> वेबसाईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली SSL वापरतात. SSL हे खूप प्रकारचे असतात. तुम्ही अगदी नॉर्मल SSL घ्या.
वेबहोस्टिंग ज्या कंपनी कडून घ्याल ती कंपनीय तुम्हाला डेटा बॅकअप देईल तुम्हाला . तुम्ही तो डेटा बॅकअप कधी पण घेऊ शकता तुम्हला हवे तेव्हा.
A basic SSL certificate can secure only one domain name and a Wildcard SSL certificates can secure one domain + the sub-domains under it, which means that, you can protect all the addresses of your website along with the main domain such as something.domain.com with just one certificate.
Alpha SSL - A low cost, entry level SSL Certificate ideal for hosting bundles and entry level websites.
४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.
==> वेबहोस्टिंग खूप प्रकारची असते , Shared होस्टिंग, VPS , डेडिकेटेड आणि क्लाऊड.
क्लाऊड सध्या मस्त चालते आहे आणि स्वस्त पण ahe. सर्व update असते आणि कुठून पण वापरू शकता.
यात तुम्ही विंडोवस होस्टिंग घ्या ..आणि जर तुम्हाला कोणाकडून काही फी घायची असेल तर तुम्हाला " Payment Gatway : चा वापर करावा लागेल.
https://www.ccavenue.कॉम हे चांगले आहे.
काही अजून माहिती हवी असेल तर नक्की विचार
काही सूचना :
०१) Wordpress वेबसाईट वापरू नका खूप अटॅक होतात आणि कधी पण हॅक होऊ शकते.
०२) User Friendly जे OS आहे तीच वेबहोस्टिंग घ्या ( Windows)
०३) SSL नक्की घ्या SIte प्रोटेक्ट करण्यासाठी.
०४) Payment गेटवे नक्की लागेल जर काही देवाण-घेवाण करणार असाल तर.
०५) काही अजून माहिती हवी असेल तर नक्की विचारा
20 Apr 2017 - 6:06 pm | संजय क्षीरसागर
सॉलीड धन्यवाद ! तुम्हाला व्यानि करतो .
20 Apr 2017 - 4:48 pm | दशानन
मुद्दलात कल्पना चांगली आहे पण पेड सदस्य हे जगभरात अमान्य झाले आहे आज. पैसे मिळवण्याचे ईतर ही मार्ग आहेत वेबसाईट सोबत.
पण तुम्हाला सांगणे म्हणजे ... असो!
करा प्रयत्न. काही मदत लागली तर विचारा.
20 Apr 2017 - 6:11 pm | संजय क्षीरसागर
ओशोंनी प्रवचनाला तिकीट लावलं तेव्हा असाच आक्षेप होता ! शिवाय स्टेक्सही काही फार नाहीत. सो लेट मी ट्राय .
20 Apr 2017 - 11:09 pm | अभिदेश
तुम्ही ओशो नाही...
21 Apr 2017 - 1:22 am | संजय क्षीरसागर
पण ओशोंच्या हयातीत त्यांची वेबसाईट नव्हती हे एक आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे जबरदस्त कंटेंट आहे. माझी मांडणी ओशोंपेक्षाही सोपी आणि कमालीची प्रभावी आहे. जी गोष्ट समजावायला ओशोंना दीड तास लागायचा ती समजावायला मला पाच मिनीटं पुरेशी आहेत.
21 Apr 2017 - 1:28 am | मोदक
21 Apr 2017 - 1:30 am | यशोधरा
पण पाच मिंन्ट म्हणजे क्षणाहून अधिक टैम झाला ना? मंग? ह्ये कसं चालन? येक पे रैना हां!
21 Apr 2017 - 2:15 am | संजय क्षीरसागर
समजावणं कायम एकाच क्षणात घडतं पण त्याची सुरुवात ते एंड याचं मोजमाप केलं तर ते पाच मिनीटं होईल !
21 Apr 2017 - 2:29 am | यशोधरा
हे उत्तर गंड्याक्स आहे संक्षी. समजावणं जर क्षणात घडत असेल, तर त्याचं मोजमाप ५ मिंटात कसं होईल? मुळात क्षणाचं मोजमाप कसं होऊ शकेल?